अच्छा ते प्रपोज वैगेरे ठिक आहे पण एक सांगा तुम्ही मागच्या वेळी वजन कधी केले होते ?
- हे आमच्या एका ४५ किलो वस्तुमानाच्या मित्रवर्याला सदाशिव पेठेत मिळालेले उत्तर!!
इकड यायच्या आधी आमच्या आम्हीच मानलेल्या प्रेयसीला वट्टात सवाल टाकला " बोल, लवशिप देशील का ?"
त्यावर तिच्या प्रतिक्रिया ....
"अय्या , खरचं तुला असं वाटतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ? [ झाला ना लोचा...]
आत्तापर्यंत ४ वर्षे काही म्हणला नाहीस ते ?
पण 'तू' तिकडे गेल्यावर 'माझ्याबरोबर' इथे कोण ....
तू तिकडे "दुसर्या कोणाला प्रपोज" करणार नाही कशावरून ?
बरं ठिक आहे. ठिक आहे , मी तुला "यस एम यस" करते रात्री ...[ म्हणजे आजची संध्याकाळ व रात्रीची झोप बोंबलली ]
छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
तो: माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..माझ्याशी लग्न करशील का..??
ती: क्काय्..??तू कुणाशी पैज वगैरे लावली आहेस का मला प्रपोझ करण्याची? माझा नकारच आहे रे पण तरी विचारले..( तो फ्लॅट..)
क्या बात है, डॉन! मझा आया!!!
आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही "टाकलं भिडवून" आणि मग "आस्मान छू लिया"!!!
आज वीस वर्षं झाली, आस्मानातच वावरतोय!!!:))
आमच्या दोघांच्याही घराण्यातले हे पहिलेच लव्हमॅरेज! आमच्या लग्नाच्या वेळी इतर नातेवाईक मंडळी "शिंचे असे असते काय ते लव्हमॅरेज!!" असे म्हणत हजर होती (असे आता अंधुकसे आठवते!)
-प्रेमडांबिस
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं .....
डॉन हा तर नकारकोशच उघडलास की रे. अरे एखादी मुलगी आम्हाला हो म्हणायची ती हे वाचून एखादं कारण गळ्यात अडकवेल..
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
छोट्या डॉना,
अरे बाबा तुझे पाय कुठे आहेत? त्यांचा जरा एक फोटो काढून स्कॅन करून मला पाठव. घरी लावीन म्हण्तो! :)
अरे इतका कसा काय बाबा मनकवडा तू? तू सांगितलेलं प्रत्येक कारण मी एकेकदा अनुभवलं आहे! :))
आपला,
(अजूनही अविवाहीत असलेला एक दिलफेक आशिक!) तात्या.
आमच अगदी वेगळे होते... त्यानी प्रपोज वैगरे काही केलेच नाही... डायरेक्ट उद्या आई-बाबा येतील तुला भेटायला ऑफिस मधे असे सांगितले आणि मी पण फक्त "हो" बोलले.. आता ५ वर्ष झाली... एकदम आनंदात चालु आहे. :)
'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू.' थोडा वेळ आपल्या अवाक् झालेल्या चेहेऱ्याकडे निरखून पहाते. 'सॉरी, मेरी गलतफेहमी हो गयी.'
(हे सगळं हिंदीमध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू' हा ड्वायलॉक इतर कुठच्या भाषेत असूच शकणार नाही इतकी खात्री होण्याइतका हिंदी सिनेमातून ऐकला आहे.)
मज्जा आली ....
बारावीला असताना एका सुनील नामक प्राण्याने प्रपोझ केलं होतं .. आक्च्युली क्रश आहे हे माहित होतं
पण बोलेचना :-/ ...
मग वाट पाहुन पाहुन मी सोडुनच दीला त्याचा विचार ..
मग समिर आला .. माझ्या लिस्टीत ;) ... सुन्या जाम जळाला =)) ..
एक दिवस येऊन म्हणतो कसा , " तुझं कुठे चालु नै न ? , कुणी बॉयफ्रेंड ?? "
म्हटलं , " का ? "
तं " नै म्हणजे .. मला विचाराचं होतं , कि म्म्म म्हणजे ,"
मग मीच म्हणलं , " प्रपोझ करायचय का ? " ( च्यायला केवढे ते आवंडे गिळायचे :-/ )
" हो .. हो तेच .. पण कसं बोलु तेच कळेना एवढे दिवस म्हणुन तर लागले " :(
मग मी म्हणलं " आता एवढे दिवस थांबलायेस तसा अजुन थोडं थांब ....
कालच सम्याने येवुन प्रपोझ मारलय .. आधी त्याचा काय तो निकाल लावते .. मग तुझा विचार करेन " :)
तर सांगायचं तात्पर्य हे कि पोपट होउ वा हत्ती .. मनातलं सांगायला उशिर करु नये ...
मुलं पण काही कमी नमुने नसतात..प्रपोझ करायला लाजतात तरी केवढी ती..आणि सरळ-सरळ सांगायचं ते नाही.. नुस्तं (शब्द) घुमवून, फिरवून सांगायचं..कोण होकार देणार अशा मुलांना?
बाकी लिस्ट छान आहे..शाळांमधे मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवली पाहिजे.. :p
ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास चालू आहे ना. वाचा आणि शिका काहीतरी. उगाच आपले प्रपोज मारत फिरतात. सगळे निट शिकण्यावर भर द्या. चालले लगेच लाईन मारायला... आपलं...लावायला..
आणि तुम्ही असे "माकडाच्या हाती.." मधल्या पुस्तकासारखे नाही करायचे. एकाच वेळी एका मुलीला ३-३ चॉईस मिळाले तर मग मी पहिला लंबर लावून काय फायदा.. सगळे कसे सीरियली होऊ देत. आले लगेच तापल्या तव्यावर पोळी शेकायला...
ऑ.. मी इतकी सपशेल माघार घेतल्याचं कुणीच बघितलेलं दिसत नाही..
पण विमेसाहेब, एका प्रतिक्रियेवर नुसत्या तीन तीन प्रपोजल्स येतात बघा.. त्यात मी तुमच्याशी ही प्रपोजलची पद्धत मला पटत नसल्याची इतकी खुलेआम चर्चा करूनही तेच करतात बघा सगळे..मग काय डोंबल अजून समजावायचं मुलांना?? :(
तर मुद्दा हा,की इतकी प्रचंड रेंज ऑफ चॉईस असताना उगाच तीच तीच चूक करणार्या लोकांना कसा चान्स मिळेल बरं?
मुलं मुलंच राहतील हे खरं..
मला नक्की संदर्भ शोधता आले नाहीत आज..त्यामुळे ढोबळ उत्तर देतेय.
लॉजिकनुसार 'टॉटॉलॉजी' म्हणून हे वाक्य घेतलं तर ते 'इन्फर्मेशनली एम्प्टी' ठरेल. त्याला अर्थ काहीच राहणार नाही. ते त्याच्या केवळ रचनेमुळे सत्य मानलं जाईल.'सिमेंटिक्स' मध्ये कदाचित या वाक्याची चिरफाड अशी केली जाईल.
पण 'प्रॅग्मॅटिक्स' मध्ये हे वाक्य बघताना संदर्भानुसार त्याचा अर्थ लावला जाईल. स्वतंत्रपणे पाहता 'मुलं ही मुलंच राहतील'या वाक्याचा अर्थ काहीच नवीन माहिती देणार नाही. पण त्याला सगळ्या मुलांमधे न चुकता आढळणार्या काही विशिष्ट सवयी,पद्धती यांचा संदर्भ दिला असता त्याला नक्कीच अर्थ येईल. कुणी मुलगा किंवा काही मुलं 'टिपिकल' मुलांसारखं वागला/वागली असता हताशपणे,किंवा कदाचित कौतुकाने किंवा चिडून काढलेला तो उद्गार ठरेल.
हे अत्यंत ढोबळ उत्तर आहे हे मला माहितेय..आणि मराठीत हे सगळं लिहिणं जरा जड जातंय..त्याबद्दल क्षमस्व. जमतील तेवढ्या सुधारणा केल्या जातील.
तर मुद्दा एवढाच, की सर्वसाधारण मराठी भाषिक (झोपेचं सोंग घेतलेलं नसल्यास ;) ) या वाक्याचा अर्थ नक्कीच प्रोसेस करू शकतो.. मानवी भाषेकडे तेवढं सामर्थ्य आहे. :)
सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि ट्रू असण्याबद्दल सहमत आहे.
प्रॅग्मॅटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेल्या विचाराशीही सहमत आहे.
मुद्दा इतकाच होता/आहे की ते भाषांतर पाहून हसू आलं :) ते वाक्य मराठीतून असं पहिल्यांदा वाचल्याने मजा वाटली इतकेच. अंमळ न-नाट्याची आठवण वगैरे आली ;) ह.घ्या.
प्रतिक्रिया