✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 03/05/2008 - 14:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55315 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

"आईला

तात्या विन्चू
Wed, 03/05/2008 - 15:31 नवीन
"आईला विचारून सान्गेन!" (वैयक्तीक अनुभव) आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments

वजन

आनंदयात्री
Wed, 03/05/2008 - 16:05 नवीन
अच्छा ते प्रपोज वैगेरे ठिक आहे पण एक सांगा तुम्ही मागच्या वेळी वजन कधी केले होते ? - हे आमच्या एका ४५ किलो वस्तुमानाच्या मित्रवर्याला सदाशिव पेठेत मिळालेले उत्तर!!
  • Log in or register to post comments

आणखी एक कारण

स्वाती राजेश
Wed, 03/05/2008 - 15:59 नवीन
तु ब्राम्हण आहेस का? आणि ते सुद्धा देशस्थ, नाहीतर आमचे आई बाबा तुला दारात सुद्धा उभे करून घेणार नाहीत... मग मी कशी तुला हो म्हणू?...
  • Log in or register to post comments

अम्म्म्.....

ब्रिटिश टिंग्या
Wed, 03/05/2008 - 16:29 नवीन
जाउ देत्...नकोत त्या दुख:द आठवणी :(( (जबरा हत्ती झालेला) छोटी टिंगी :)
  • Log in or register to post comments

हा हा हा..

केशवसुमार
गुरुवार, 03/06/2008 - 09:23 नवीन
जबरा हत्ती झालेला... खो.. खो.. खो.. हहपुवा.. छोटाडॉनशेठ.. कलेक्शन आवडले.. अनुभव दाणगा दिसतोय.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

माझा दांडगा (???) अनुभव ....

छोटा डॉन
गुरुवार, 03/06/2008 - 11:34 नवीन
इकड यायच्या आधी आमच्या आम्हीच मानलेल्या प्रेयसीला वट्टात सवाल टाकला " बोल, लवशिप देशील का ?" त्यावर तिच्या प्रतिक्रिया .... "अय्या , खरचं तुला असं वाटतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ? [ झाला ना लोचा...] आत्तापर्यंत ४ वर्षे काही म्हणला नाहीस ते ? पण 'तू' तिकडे गेल्यावर 'माझ्याबरोबर' इथे कोण .... तू तिकडे "दुसर्‍या कोणाला प्रपोज" करणार नाही कशावरून ? बरं ठिक आहे. ठिक आहे , मी तुला "यस एम यस" करते रात्री ...[ म्हणजे आजची संध्याकाळ व रात्रीची झोप बोंबलली ] छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

पैज??

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 03/05/2008 - 19:13 नवीन
तो: माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..माझ्याशी लग्न करशील का..?? ती: क्काय्..??तू कुणाशी पैज वगैरे लावली आहेस का मला प्रपोझ करण्याची? माझा नकारच आहे रे पण तरी विचारले..( तो फ्लॅट..)
  • Log in or register to post comments

हा! हा!! हा!!! :)))

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/06/2008 - 01:24 नवीन
क्या बात है, डॉन! मझा आया!!! आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही "टाकलं भिडवून" आणि मग "आस्मान छू लिया"!!! आज वीस वर्षं झाली, आस्मानातच वावरतोय!!!:)) आमच्या दोघांच्याही घराण्यातले हे पहिलेच लव्हमॅरेज! आमच्या लग्नाच्या वेळी इतर नातेवाईक मंडळी "शिंचे असे असते काय ते लव्हमॅरेज!!" असे म्हणत हजर होती (असे आता अंधुकसे आठवते!) -प्रेमडांबिस
  • Log in or register to post comments

प्रपोझ

पान्डू हवालदार
गुरुवार, 03/06/2008 - 02:01 नवीन
प्रपोझ करियच्या अगोदर् सासुबाइनी सागित्ले ... आता पळुन जाऊन लग्न करा .. तेव्हा पासुन रोज भाडी घास्तोय ... बायको आराम कर्तेय...
  • Log in or register to post comments

एक वेलांटी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/06/2008 - 02:18 नवीन
घाईघाईत "सासुबाईंना" असे वाचले. मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पान्डू हवालदार

हे सही आहे..

जुना अभिजित
गुरुवार, 03/06/2008 - 09:04 नवीन
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का? ४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं ..... डॉन हा तर नकारकोशच उघडलास की रे. अरे एखादी मुलगी आम्हाला हो म्हणायची ती हे वाचून एखादं कारण गळ्यात अडकवेल.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

धमाल..

विसोबा खेचर
गुरुवार, 03/06/2008 - 11:41 नवीन
छोट्या डॉना, अरे बाबा तुझे पाय कुठे आहेत? त्यांचा जरा एक फोटो काढून स्कॅन करून मला पाठव. घरी लावीन म्हण्तो! :) अरे इतका कसा काय बाबा मनकवडा तू? तू सांगितलेलं प्रत्येक कारण मी एकेकदा अनुभवलं आहे! :)) आपला, (अजूनही अविवाहीत असलेला एक दिलफेक आशिक!) तात्या.
  • Log in or register to post comments

अरे वा

पेस्तन काका
Tue, 11/26/2013 - 16:52 नवीन
म्हणजे तात्यांचा अनुभव ५० * N असा आहे तर *clapping*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

काय दांडगा अनुभव आहे डॉन

वरदा
गुरुवार, 03/06/2008 - 19:17 नवीन
मग आला का "यस"एम एस?
  • Log in or register to post comments

माझा अनुभव...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 03/06/2008 - 22:22 नवीन
मी: ***** ती: ***** आणि लग्न केलं. (शब्दावाचून कळले सारे, मधले धोके फार उशीराच उलगडले.)
  • Log in or register to post comments

वाह !

प्रसाद गोडबोले
Sat, 03/09/2013 - 00:25 नवीन
नशीबवान आहात ! God bless you !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हु हु हु हु हु हु........

सुधीर कांदळकर
गुरुवार, 03/06/2008 - 22:43 नवीन
असं बोलायला कशाला पहिजे होतं? बावळटच आहेस. मला माहित होतंच.
  • Log in or register to post comments

नमस्ते डॉन साहेब ....

आपला आभि
Sun, 03/09/2008 - 12:05 नवीन
डॉन चा अनुभव केवळ दान्डगाच नाही तर अति दान्डगा आहे ... चालु दे चालु दे.. आम्ही आहोत ... पाठिशी...
  • Log in or register to post comments

सगळे

प्राजु
Sun, 03/09/2008 - 22:27 नवीन
एकदम भारी... बाय द वे आपला अनुभव पुढ्च्या प्रेमवीरांना उपयोगी नक्की पडेल. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

जबरदस्त! एकदम भारी!

अधिराज
Wed, 03/06/2013 - 21:58 नवीन
जबरदस्त! एकदम भारी!
  • Log in or register to post comments

:)

मन१
Wed, 03/06/2013 - 22:10 नवीन
:) डान्रावांना पुन्हा कधी लिहिण्यास फुरसत होइल तो जालावरचा सुदिन.......
  • Log in or register to post comments

हं

श्रावण मोडक
Wed, 03/06/2013 - 22:13 नवीन
धागा आत्ता कसा काय वर आला बॉ? डान्या?
  • Log in or register to post comments

हा प्रश्न तुम्हाला पडला?

नाना चेंगट
Wed, 03/06/2013 - 23:20 नवीन
हा प्रश्न तुम्हाला पडला? तुम्हाला? जौ द्या आम्हाला पण पडला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

असं होय!

श्रावण मोडक
गुरुवार, 03/07/2013 - 00:34 नवीन
असं होय... मिळालं उत्तर. काय ते विचारू नका. मी तर्क करू लागेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

हा धागा योग्य व्यक्तीला

रेवती
Wed, 03/06/2013 - 22:30 नवीन
हा धागा योग्य व्यक्तीला दाखवायचा का डानराव? ;)
  • Log in or register to post comments

रेवती मावशी हे तु करच. तुला

प्रीत-मोहर
Wed, 03/06/2013 - 22:33 नवीन
रेवती मावशी हे तु करच. तुला तुझ्या गोवाभेटीत माझ्या हातची कैरीची उडदामेथी लागु!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अशी लालूच दाखवल्यावर हे काम

रेवती
Wed, 03/06/2013 - 22:59 नवीन
अशी लालूच दाखवल्यावर हे काम करायला माझी ना नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

रेवती .........

चिंतामणी
Fri, 03/08/2013 - 17:47 नवीन
योग्य व्य्क्ती सापडल्यानंतरच धागा पुन्हा वर आला आहे हे लक्षात नाही का आले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

येस्स! चिंतुकाकांशी सहमत. पण

रेवती
Fri, 03/08/2013 - 20:45 नवीन
येस्स! चिंतुकाकांशी सहमत. ;) पण धागा वर काढून, लाजून पळालेले दिसतायत डानराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

आमच अगदी वेगळे होते... त्यानी

Mrunalini
Wed, 03/06/2013 - 23:18 नवीन
आमच अगदी वेगळे होते... त्यानी प्रपोज वैगरे काही केलेच नाही... डायरेक्ट उद्या आई-बाबा येतील तुला भेटायला ऑफिस मधे असे सांगितले आणि मी पण फक्त "हो" बोलले.. आता ५ वर्ष झाली... एकदम आनंदात चालु आहे. :)
  • Log in or register to post comments

काय चालु आहे?

नाना चेंगट
Wed, 03/06/2013 - 23:19 नवीन
काय चालु आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

आहो... लग्न होउन आता ५ वर्ष

Mrunalini
Fri, 03/08/2013 - 23:22 नवीन
आहो... लग्न होउन आता ५ वर्ष झाली... म्हणुन म्हटले कि संसार एकदम छान चालु आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै

राजेश घासकडवी
Wed, 03/06/2013 - 23:24 नवीन
'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू.' थोडा वेळ आपल्या अवाक् झालेल्या चेहेऱ्याकडे निरखून पहाते. 'सॉरी, मेरी गलतफेहमी हो गयी.' (हे सगळं हिंदीमध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू' हा ड्वायलॉक इतर कुठच्या भाषेत असूच शकणार नाही इतकी खात्री होण्याइतका हिंदी सिनेमातून ऐकला आहे.)
  • Log in or register to post comments

जुन्या जाणत्या मिपाकरांचे

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/06/2013 - 23:57 नवीन
जुन्या जाणत्या मिपाकरांचे धागे कित्ती छान असतात... ;-) आणी ते जाणत्या जुन्या मिपाकरांकडून वरं(ही) आणले जातात... :-p
  • Log in or register to post comments

अरेच्चा!

स्मिता.
गुरुवार, 03/07/2013 - 00:42 नवीन
हा धागा कसा काय वर आला बुवा... कन्फेशन्स म्हणून की काय?
  • Log in or register to post comments

मज्जा आली ....

जेनी...
Fri, 03/08/2013 - 21:12 नवीन
  • Log in or register to post comments

मज्जा आली ....

जेनी...
Fri, 03/08/2013 - 21:13 नवीन
मज्जा आली .... बारावीला असताना एका सुनील नामक प्राण्याने प्रपोझ केलं होतं .. आक्च्युली क्रश आहे हे माहित होतं पण बोलेचना :-/ ... मग वाट पाहुन पाहुन मी सोडुनच दीला त्याचा विचार .. मग समिर आला .. माझ्या लिस्टीत ;) ... सुन्या जाम जळाला =)) .. एक दिवस येऊन म्हणतो कसा , " तुझं कुठे चालु नै न ? , कुणी बॉयफ्रेंड ?? " म्हटलं , " का ? " तं " नै म्हणजे .. मला विचाराचं होतं , कि म्म्म म्हणजे ," मग मीच म्हणलं , " प्रपोझ करायचय का ? " ( च्यायला केवढे ते आवंडे गिळायचे :-/ ) " हो .. हो तेच .. पण कसं बोलु तेच कळेना एवढे दिवस म्हणुन तर लागले " :( मग मी म्हणलं " आता एवढे दिवस थांबलायेस तसा अजुन थोडं थांब .... कालच सम्याने येवुन प्रपोझ मारलय .. आधी त्याचा काय तो निकाल लावते .. मग तुझा विचार करेन " :) तर सांगायचं तात्पर्य हे कि पोपट होउ वा हत्ती .. मनातलं सांगायला उशिर करु नये ...
  • Log in or register to post comments

मस्तच पुजा... अशा बर्‍याच

Mrunalini
Fri, 03/08/2013 - 23:25 नवीन
मस्तच पुजा... अशा बर्‍याच आठवणी आहेत... जाम सही लाइफ असते कॉलेजची. फुल टु धमाल!!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मॅरी मी ऑर लीव्ह द बोट

कपिलमुनी
Fri, 03/08/2013 - 21:20 नवीन
मुन्नाभाइ मधे सगळ्यात भारी ईस्टाइल सांगितली होती
  • Log in or register to post comments

मुलं पण काही कमी नमुने नसतात.

पिशी अबोली
Sat, 03/09/2013 - 00:07 नवीन
मुलं पण काही कमी नमुने नसतात..प्रपोझ करायला लाजतात तरी केवढी ती..आणि सरळ-सरळ सांगायचं ते नाही.. नुस्तं (शब्द) घुमवून, फिरवून सांगायचं..कोण होकार देणार अशा मुलांना? बाकी लिस्ट छान आहे..शाळांमधे मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवली पाहिजे.. :p
  • Log in or register to post comments

ए पिशी अबोली, आपल्याला लाईन

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 03/09/2013 - 00:20 नवीन
ए पिशी अबोली, आपल्याला लाईन देणार का ??? बघा, विचारले सरळ. देणार होकार ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

मेहेंदळेंना नेक्स्ट असं उत्तर

अप्पा जोगळेकर
Sun, 03/17/2013 - 17:39 नवीन
मेहेंदळेंना नेक्स्ट असं उत्तर मिळणार असेल तर मीदेखील नंबर लावत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

तुम्हाला नारळ मिळाल्यास

बॅटमॅन
Mon, 03/18/2013 - 03:06 नवीन
तुम्हाला नारळ मिळाल्यास तुमच्यानंतर माझापण लंबर बरंका!!! (मय्तरि-लाइनप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/18/2013 - 11:45 नवीन
ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास चालू आहे ना. वाचा आणि शिका काहीतरी. उगाच आपले प्रपोज मारत फिरतात. सगळे निट शिकण्यावर भर द्या. चालले लगेच लाईन मारायला... आपलं...लावायला.. आणि तुम्ही असे "माकडाच्या हाती.." मधल्या पुस्तकासारखे नाही करायचे. एकाच वेळी एका मुलीला ३-३ चॉईस मिळाले तर मग मी पहिला लंबर लावून काय फायदा.. सगळे कसे सीरियली होऊ देत. आले लगेच तापल्या तव्यावर पोळी शेकायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऑ.. मी इतकी सपशेल माघार

पिशी अबोली
Mon, 03/18/2013 - 12:18 नवीन
ऑ.. मी इतकी सपशेल माघार घेतल्याचं कुणीच बघितलेलं दिसत नाही.. पण विमेसाहेब, एका प्रतिक्रियेवर नुसत्या तीन तीन प्रपोजल्स येतात बघा.. त्यात मी तुमच्याशी ही प्रपोजलची पद्धत मला पटत नसल्याची इतकी खुलेआम चर्चा करूनही तेच करतात बघा सगळे..मग काय डोंबल अजून समजावायचं मुलांना?? :( तर मुद्दा हा,की इतकी प्रचंड रेंज ऑफ चॉईस असताना उगाच तीच तीच चूक करणार्‍या लोकांना कसा चान्स मिळेल बरं? मुलं मुलंच राहतील हे खरं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बाकी ठीक आहे पण

बॅटमॅन
Mon, 03/18/2013 - 12:24 नवीन
बाकी ठीक आहे पण
मुलं मुलंच राहतील हे खरं..
हे आणि काय म्हणे? :P मुलीबिली होतात का काय जणू कोणी =)) लिटरल ट्रान्सलेशन वाचून अंमळ हहपुवा झाली हे बाकी खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

बॅटमॅन-

पिशी अबोली
Mon, 03/18/2013 - 12:40 नवीन
बॅटमॅन- याला भाषाशास्त्रीय उत्तर देईन अगदी.. पण जरा इथल्या चर्चा संपूदेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयला!

बॅटमॅन
Mon, 03/18/2013 - 12:42 नवीन
आयला! विंट्रेष्टिंग. उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. चर्चा काय होतच राहतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

प्रॅग्मॅटिक्स

पिशी अबोली
Tue, 03/19/2013 - 03:44 नवीन
मला नक्की संदर्भ शोधता आले नाहीत आज..त्यामुळे ढोबळ उत्तर देतेय. लॉजिकनुसार 'टॉटॉलॉजी' म्हणून हे वाक्य घेतलं तर ते 'इन्फर्मेशनली एम्प्टी' ठरेल. त्याला अर्थ काहीच राहणार नाही. ते त्याच्या केवळ रचनेमुळे सत्य मानलं जाईल.'सिमेंटिक्स' मध्ये कदाचित या वाक्याची चिरफाड अशी केली जाईल. पण 'प्रॅग्मॅटिक्स' मध्ये हे वाक्य बघताना संदर्भानुसार त्याचा अर्थ लावला जाईल. स्वतंत्रपणे पाहता 'मुलं ही मुलंच राहतील'या वाक्याचा अर्थ काहीच नवीन माहिती देणार नाही. पण त्याला सगळ्या मुलांमधे न चुकता आढळणार्‍या काही विशिष्ट सवयी,पद्धती यांचा संदर्भ दिला असता त्याला नक्कीच अर्थ येईल. कुणी मुलगा किंवा काही मुलं 'टिपिकल' मुलांसारखं वागला/वागली असता हताशपणे,किंवा कदाचित कौतुकाने किंवा चिडून काढलेला तो उद्गार ठरेल. हे अत्यंत ढोबळ उत्तर आहे हे मला माहितेय..आणि मराठीत हे सगळं लिहिणं जरा जड जातंय..त्याबद्दल क्षमस्व. जमतील तेवढ्या सुधारणा केल्या जातील. तर मुद्दा एवढाच, की सर्वसाधारण मराठी भाषिक (झोपेचं सोंग घेतलेलं नसल्यास ;) ) या वाक्याचा अर्थ नक्कीच प्रोसेस करू शकतो.. मानवी भाषेकडे तेवढं सामर्थ्य आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि

बॅटमॅन
Tue, 03/19/2013 - 03:53 नवीन
सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि ट्रू असण्याबद्दल सहमत आहे. प्रॅग्मॅटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेल्या विचाराशीही सहमत आहे. मुद्दा इतकाच होता/आहे की ते भाषांतर पाहून हसू आलं :) ते वाक्य मराठीतून असं पहिल्यांदा वाचल्याने मजा वाटली इतकेच. अंमळ न-नाट्याची आठवण वगैरे आली ;) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा