मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेहि व्हेलेंटायिन्स डे ला एकच ग्रिटीन्ग कार्ड घेउन आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मुलीना एक एक करुन द्यायचो... दोघेहि एकमेकानमागेच असायचो.. कुणी त्याला नाहि म्हणाली की लगेचच तेच कार्ड घेउन मी जायचो आणि अस अजुन २ जण करायचे... एकीने एकदा ते कार्ड फाडुन टाकल तर आम्ही तिच्याशी भांडलो (ती कोणालाच नाहि म्हणाली म्हणुन नाहि, तर त्या बयेने कार्ड फाडल म्हणुन)... पण हे सगळ ग्रुप मध्येच बर का..
मेहेंदळे साहेब आणि जोगळेकर साहेब,
चुकतं हेच हो तुम्हा मुलांचं..मुळात कसं प्रपोज करावं याचा विचारच करत नाही तुम्ही लोक..मग मुलीने नकार दिला की दुसरी स्टाईल ट्राय करता.. नाहीतर तिसरी.. आता मुलींनी तुमची टेक्निक रिफाईन होण्याची वाट बघायची का समोर येणार्या दुसर्या चांगल्या ऑप्शनचा विचार करायचा?
सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. नुसती नकार देण्यातली तुमच्याच लिस्टमधली व्हेरिएशन्स बघा.. :p
वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.. :)
ती सेल्फ-स्टडी आहे.. ;)
पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?
नुसता टाईमपास म्हणून विचारलं तर हीच काय, याहून अजून रंगीबेरंगी उत्तरं मिळतील.. :)
"मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे."
याला काहीच अर्थ नाहीये
आणि
"पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?"
जरी या सगळ्या गोश्टी विचारात घेतल्या तरी एखादे उदाहरण तुम्हाला देता येइल का? (मुलाचे नाव
क्ष" आणि मुलीचे नाव "य" माना)
सपशेल माघार लोकहो..
मुलांना या गोष्टी समजावण्याची ताकद माझ्यात नाही. असती तर पुस्तकं लिहिली असती त्यावर..
सर्व कर्तृत्ववान व सुस्वभावी मुलांनी त्यांची त्यांची लाईन क्लीअर होताच यथाशक्ती इथे उदाहरणं द्यावीत..
स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये =))
अबोली काँग्रॅट्झ यार एक साथ तीन तीन प्रपोझल आलीत ..
टांगुन ठेव च्यामारी ... ह्यात जो जास्त वेळ सोताला टांगुन घेईल त्याचा विचार
" विचार करुन सांगते " ह्या कॅटेग्रीत टाकुन द्यायला काय हरकते ?? ;)
:D :P
हीहीही ...
अगं आत्तापरेंत ह्यांच्या तोंडावर नक्कारघंटा वाजल्यात म्हणुन इथं ऑन्लैन ट्राय
चालुये =))
पण तु ती माघार नक्को घ्याला पैजे होतीस बै :-/
नैतर तीनात अजुन भर पडली असतीना :) ..
मग चोइस पण वाढला असता न लटकनार्यांची संख्यापण ;)
कित्ती मज्जा आली असती म्हणुन सांगु =))
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी :-/
त्यामुळे तु नी मी कटाप बै :-/
अबोलीची लिश्ट वाढावयास मदत करुयात =))
( ए अबोली " मी नै जा :-/ " च म्ह्नायचं हं सग्ग्ळ्ळ्यांना ! ) :P
मुलांनीपण मुलींच्या नकार देण्याच्या स्टाईलची चिकित्सा व यादी करत बसण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार..ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी.. :)
मास्तरांनी पोरांना सांगितलं ते असं -->
शेतातून मधोमध एकच वाट जाते. या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि सुरुवातीला सगळीकडे उंचच उंच कणसाची रोपे. ती वाट तुडवत एकदाच जायचं आणि एकच कणीस तोडायचं. परत फिरायची परवानगी नाही. शेतातलं सगळ्यात उंच कणीस आणून द्या.
पोरं गेली धावत धावत. सुरुवातीची पुरुषभर उंचीची रोपं सोडून देत. पुढे असतील अजून उंच या आशेने. पण नंतर मिळाली कंबरभर, गुडघाभर उंचीची रोपे.
हे विद्वत्ताप्रचुर तर्कशास्त्र नाही. इसापनीतीने शिकवलेले व्यावहारिक शहाणपण आहे..
अनुभव १)
मी : एकदाच काय ते सांग .सोक्षमोक्ष लाव . नकार ऐकायचीही माझी तयारी आहे .
ती : ( एक घट्ट मिठी :) )
अनुभव २)
मी : सो ?
ती : (रडत रडत ) तु मला आधी का भेटला नाहीस .
अनुभव ३)
मी : आय लव्ह यु .
ती : आयेम सर्प्राइझड . तुझी आधीच एक गीएफ आहे . ती माझी बेस्ट फ्रेन्ड आहे . मीच तुम्हा दोघांचं जुळवुन देण्यात मदत केली . आनि तु "हे" बोलत आहेस ???
मी : आयेम वेटींग फॉर द आन्सर...
ती :.........................
मी : ओके . आय इन्टर्प्रेट द सायलेन्स इन माय फेव्हर ;) =))
नंतर मग जॉब लागला .... लग्न करायला लागलं .... त्यानंतर काही अनुभवच नाही राव . छ्या : थ्रिल गेलं कॉलेजलाईफ मधलं !! :(
प्रतिक्रिया