Skip to main content

बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही !

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/03/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
जरा चुकीचे, खूप बरोबर बोलू काही ! बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही ! खच्चून घुटके मद्याचे हे घेत रहा तू मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! उभाच पाहून ताठ मला कुजबुजले सारे पाठ लागू दे भूईस नंतर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! मिळेल तितके मद्य तुला तर हवेच आहे साकी लावे खिशास कातर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! उद्या-उद्याची कशास पर्वा ड्राय डे जरी खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! `ग्लास' धरी बा डोळ्यावरती चष्मा म्हणूनी वाट आंधळी! असलो धड तर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! (*दारूवर म्हणजे दारु या विषयावर नव्हे.. 'over drinks' या अर्थाने.) -अविनाश ओगले संदीप खरे यांच्या कवितेचे विडंबन. मूळ कविता येथे उपलब्ध..http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/Laxaneeya/8.htm

वाचने 5553
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

एकदमच भन्नाट्...खूप हसले. - (सर्वव्यापी)प्राजु

ग्लास' धरी बा डोळ्यावरती चष्मा म्हणूनी..हे खासच.. ओगलेशेठ.. जबरा विडंबन.. (ढापणा)केशवसुमार

खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही ह ह पु वा.... मस्त आहे एकदम

मस्त विडंबन! (मूळ काव्यापेक्षा अर्थ पटकन समजला!)

ओगलेशेठ, विडंबन एकदम जबरा......विशेषत: मिळेल तितके मद्य तुला तर हवेच आहे साकी लावे खिशास कातर बोलू काही हे ऐकल्यावर तर आमची जी 'मद्यानंदी' टाळी लागलीये.....ती उतरालया (टाळी हो) तयारच नाहीये.... खच्चून घुटके मद्याचे हे घेत रहा तू मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही आहाहा!!!! सुख यापेक्षा अजून काय असु शकेल? आपला, (मद्यानंदी) छोटी टिंगी ;)

उद्या-उद्याची कशास पर्वा ड्राय डे जरी खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही ओहोहो, क्या केहेने ओगलेशेठ! क्लासच लिहिलंय... आपला, (सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.