Skip to main content

जयव॑त दळवी॑ या॑ची पुस्तके कुठे मिळतील?

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 04/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जयव॑त दळवी या॑ची खालील पुस्तके मी शोधत आहे १) उपहास कथा २) कशासाठी पोटासाठी वरील दोन्ही पुस्तका॑तील कथा तुफान विनोदी आहेत; पूर्वी माझ्याकडे होती ही पुस्तके पण फाटून नष्ट झाली. दुकाना॑त चौकशी केली असता 'आउट ऑफ प्रि॑ट' असे खेदजनक उत्तर मिळाले. इतक्या चा॑गल्या पुस्तका॑ची पुनर्मुद्रणे का होऊ नयेत? कोणाजवळ ही पुस्तके असतील तर कृपया मला झेरॉक्स द्यावी ..

आळस, कंटाळा व फिरंग्याची भेट !!!!

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 03/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
[ खालील रटाळ व निरर्थक लेख वाचून कुणाला कंटाल व आळस आल्यास त्याची जबाबदारी लेखकावर राहणार नाही. आपापल्या रिस्क वर वाचन करा अथवा सोडून द्या, कसे !!!]
आज एकदम काहितरी वेगळेच वाटत आहे, खूप कंटाळा आला आहे. काहिच करण्याची इच्छा होत नाहीये [ तसे नहितरी आम्ही दररोज काही तीर मारीत नाही, तरिपण ...]. मला वाटतं या सगळ्याचे कारण सोमवार असावं . पण सोमवारच का ?

बन्स रोड की निलोफर

लेखक व्यंकट यांनी सोमवार, 03/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील छोट्या पडद्यावरील "के-सिरियल्स" जेव्हा पाकिस्थानात पोचल्या, लोकप्रिय झाल्या नव्हे त्यांनी भारतीयांइतकंच पाकिस्थान्यांना वेड लावलं. त्याबरोबर तेथे सांस्कृतीक आक्रमणाची ओरड सुरू झाली. पाठोपाठ तेथील प्रसार माध्यमांतून झालेल्या चर्चा, विचारमंथनानंतर; 'बन्स रोड की निलोफर' ह्या धारावाहीकाला जन्म देण्याचे लेखक / पटकथा लेखक फसीह बारी खान आणि दिग्दर्शक एस्.

नशा - एक चिंतन!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 02/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नशा! आमच्या असे लक्षांत आले आहे की नशा या विषयावर मि. पा. वर बरेच लिहिले जाते. त्यातील बहुतेक लाईट, थट्टामस्करीच्या स्वरूपातील असते. काही जि़ज्ञासू लोकांनी ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने विचारलेले प्रश्न असतात, तर काही अज्ञ कॉमेंन्टस ही असतात. परंतु प्रस्तुत प्रयत्न मात्र या विषयावर काही गंभीर विचार मांडण्याचा आहे. नशा म्हणजे काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे. मटेरिया मेडिकाच्या व्याख्येनुसार (मराठीत अनुवादित) जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात. लक्षात घ्या, "शांत" किंवा "आनंदी" अवस्था नव्हे, तर "शिथील" अवस्था!

सुंदर चित्रे...

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 02/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रवि परांजपे ह्यांची... mor त्यांची इतर चित्रे पण छान आहेत... एक मराठी कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल अभिमान आणि ममत्व वाटते... त्यांच्या चित्रांची मी पंखा आहे...

दिल्लीदरबारची मटनबिर्याणी!!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 02/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ओ तात्या, नुसता फोटो दाखवून जळवण्यात कसलं आलंय रे "सौजन्य"? :) आजची पाककृतीमध्ये बिर्याणीचा फोटू देतोस, पण बाकी काही माहिती (जमल्यास रेसिपी) वगैरे दे ना बाबा! कमीतकमी हाटेलाची तरी माहिती दे. आपल्याकडे मुंबईकरेतर बरेच आहेत, कधी मुंबईत आले तर त्यांना उपयोगी पडेल!! हे दिल्लीदरबार म्हणजे रीगलच्या जवळचं का रे? एकदम झक्कास हाटेल आहे. थोडं महागडं, पण पदार्थ आणि एकूणच सेट्-अप मस्त आहे!! आम्ही हेक्स्ट्-हाऊसमध्ये असतांना आमचे खायचे (अर्थात कंपनीच्या खर्चाने!) ते आवडते ठिकाण होते. अजून ते आहे हे ऐकून जुना दोस्त भेटल्याचा आनंद झाला. मि. पा.

लेखनानुसार प्रतिसादाचा ट्रॅकर..

लेखक सरपंच यांनी रविवार, 02/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या मुखपृष्ठाचे काम अजूनही सुरू आहे. तरी तूर्तास लेखनानुसार प्रतिसादांचा ट्रॅकर पाहण्यासाठी कृपया डाव्या हाताच्या समासातील नवे लेखन इथे टिचकी मारा. धन्यवाद....

काही वादविवाद...("का रे भुललासि " या आमच्याच आगामी दीर्घांकातील एक भाग)

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 02/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....] >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आ

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...

लेखक फटू यांनी रविवार, 02/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं आता मी स्वत:ला सावरतो आहे अडवून पापण्याआड चिंब आसवाना मी भावनांचा पसारा आवरतो आहे कोण जाणे काय झालं होतं मला एका स्वप्नाने गात्रं भारली होती उद्याच्या उजेडावर विसंबून मी अंधारात एक उडी मारली होती कशावर तरी आदळलो, आणि जाणवलं, फसलीच आपली उडी कुठेच दिसत नाही इथे किनारा भरकटली आहे आपली होडी भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही खेळवीत चेहर्‍यावर निरागस हसू मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे पायात बेड्या पराभवाच्या अन् नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे कितीही

अंगारकी चतुर्थी दिनांक ११ मार्च

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 01/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अंगारकी चतुर्थी (विनायकी) दिनांक ११ मार्च रोजी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस. ही चतुर्थी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच आहे. त्यामुळे पूजा, अभिषेक आणि विशेषत्वाने आवर्तने त्यापूर्वी संपतील याची काळजी घ्यावी. आपला, (घनपाठी) धोंडोपंत