संदीप खरे यांच्या काव्यांवर सध्या तलवार चालवली जाते आहे. केशवसुमार, धनंजय, सर्किट, ओगले साहेब यांच्या खमंग भाजलेल्या खार्या शेंगदाण्याच्या पुडित माझा हा खवट, कुसका शेंगदाणा खपवून घ्यावा ही विनंती.
चाल : मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत....
खर गव्हातं, तांदळातं, गूळाच्या शिर्यातं..
खर नाजूकशी एक गार, माझ्या वरण आणि भातात..
घरी चाळणींची चळचळ
वाढे खरखरं उगी तशात
इथे वाण्याला सांगतो आणि
अरे वाणी..
असे भेसळ तुझ्या मालात..
भिडू लागे राख दातालाही
माझ्या दातांची धार घशात...
माझ्या नयनी लक्ष त्या धारा
आणि राग तुझ्या डोळ्यांत...
- प्राजु
छान विडंबन
In reply to छान विडंबन by आनंदयात्री
जेथे बघेन तेथे विडंबन
In reply to जेथे बघेन तेथे विडंबन by बेसनलाडू
मस्त !!!
In reply to मस्त !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
च्यालेन्ज
नि:शुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
वा!