मला तर ही माझीच गोष्ट वाट्ते आहे. फक्त मी इंजिनियर झाले नाही तर चित्रकार झाले. तुमची गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि माझी नऊ वर्षांपूर्वीची. मला दहावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडायचा होता. अभ्यासक्रम निवडताना योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर किती त्रास होतो हे मी चांगलं अनुभवलयं. अशिक्षित आईबाबा आणि चित्रकारांबाबतच्या वावड्या यामुळे अडचण वाटली खरी, पण तेच अशिक्षित आईबाबा जेव्हा ठामपणे मागे उभे राहिले तेव्हा खरच नवी उभारी मिळाली आणि अर्धवेळ काम करून का होईना पण माझे शिक्षण पूर्ण झाले.
धन्यवाद आनंदघन! आज तुमच्या लेखामुळे बर्याच आठवणी जाग्या झाल्या.
मलापण लहानपणी "इंजिनीयर" म्हणजे एकदम अचाट गोष्टी करणारे लोक वाटायचे. हे प्रकरण म्हणजे एकतर 'गोर्या चामडीच्या लोकांचे किंवा ईथल्या अवलिया व विक्षिप्त ' लोकांनाच साध्य आहे असा माझा समज होता[ त्याला माझ्या नात्यातल्या एका इंजिनीयर असलेल्या 'विक्षिप्त मामाने' बळकटी दिली ]. त्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचे आकर्षण होतेच . "मोठीपणी काय होणार ?" याचे उत्तर लहानपणी प्रसंगानुरूप बदलत गेले , सांगायचे तर "दूसर्यावर सूड घेण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यासाठी मला डॉक्टर व्हावे असे वाटे , एस टी कंडक्टर चा मस्त प्रवास व हातातली पैशाने भरलेली बॅग बघून मला ते आवडे , भेळचा गाडा चालवणार्या भैयाची लै ऐश असेल असे मानून माझी भेळचा गाडा टाकायची ईच्छा होत असे, सिनेमे बघून तर विचारायलाच नको ( 'बॉर्डर' बघितल्यावर मी सैनिक होतो असे म्हणल्यावर पिताजीनी अशा नजरेने बघितले की मला तो विचार जागेवर्च सोडून द्यावा लागला. मग मी ठरवले की आधी मला विरोध करणार्या 'घरातील दूश्मनांशी लढू मग देशाचे दूश्मन आहेतच की.'), 'डब्ल्यु डब्ल्यु एफ' बघून आम्ही 'फायटर' व्हायचे ठरवल्यावर पिताजींनी घरातील 'केबल कनेक्शन बंद' करून टाकले. पण त्यातल्या त्यात "इंजिनीयर " व्हायची ईच्छा मनात तशीच होती ............. पुढे १० वी व १२ वी ला जबरदस्त मार्क पडून बोर्डात आल्यावर आपोआप 'इंजिनीयरिंला जाण्याचे मार्ग' यक्दम सोपे झाले. शेवटी [कसेतरी] शिक्षण पूर्ण करून आज एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकती करताना लहानपणाचे विचार आठलले की हसू येते ........
असो. आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या ......
'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

असे मला डाक बंगला म्हटले की वाटते. :) प्रत्येक डाक बंगल्यातून एकतर स्मगलिंग चालते किंवा त्यात भुते असतात असा माझा समज आहे. :)
बाकी वर्णन छान. माझे एक काका सिव्हील इंजिनीअरची ऐट बघून सिव्हील इंजिनीअर झाले. ते म्हणत 'जीप मधून सफारी सूट घालून येणारा सिव्हील इंजिनीअर पाहीला की त्याच्या ऐटीचे आकर्षण वाटे. तसेच सिव्हील इंजिनीअरींग सोडून ईलेक्ट्रीकल, मेकॅनिकल अशा इतर शाखा असतात हे इंजिनीअरींग कॉलेज ला जाईपर्यंत माहीतच नव्हते.' त्यामुळे आपण लिहीलेला लेख वाचून मला माझ्या वयस्कर काकांची आठवण झाली.
तसेच माझ्या आजोबानी सागितलेल्या एका गमतीची आठवण झाली. ती अशी की एक 'डेक्कन कॉलेजचे' सुपरीटेंडंट असलेल्या गृहस्थांच्या वृद्ध आईने घरी आलेल्या पाहुण्याना 'आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे' असे सांगितले होते. :)
सर्व वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मूळच्या नियोजनानुसार करिअरचे एक एक पर्याय मोडीत काढून अखेर इंजिनिअरिंगला या मालिकेचा शेवट झाला होता. आता त्यापुढे काय यावर विचार करून लिहावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.
संध्याबाईंच्या चेहर्यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!
एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.
तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............
केशवसुमार..
(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)
रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :).
अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;
है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ और
च्यायला.... आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!
बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात. त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑. पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!
"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..." च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ. आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा ..... आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......
अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम .... आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]
शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस! सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना... "....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.
पोलिस चौकीत... "हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील " " हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..."
"पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची"
एक से बढकर एक... आपण पण पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......
आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . हाण तिच्याआयला!!!!
च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा .... जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....
एक आखरी 'डॉयलाग" "बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं .... बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."
येस्स्स..... साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!
च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा .... कसच॑ कसच॑.... मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?

खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.
अगदी नेमके लिहिले आहे..
माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे. सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्या-गैर्याचे काम नोहे.
जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे. हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे, वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते.
तरीपण, समिक्षा उत्कृष्टच. असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.
'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते.
हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?
आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते.
रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे.
वा ... फार छान लेख.
पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.
अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी.
त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी.
चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.
जोरात वाक्य !
लेख सुंदर.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!
अवांतर -
रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)
असो! रावसाहेब, आज पिंजर्याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!
तवा आता र्हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)
असो, तुमच्या पिंजर्याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!
"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.
जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण. लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे. या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.
अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) ) नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !
काही प्रश्न मनात उरतात.
संजोपरावानी "आसक्तीआणिविरक्तीयांच्यातलासंघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...
माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात.
संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.
'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!
वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.
निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!) 'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!
पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे.
त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल.
बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्याबद्दल लक्षात राहातात.
फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)
रावसाहेब,
'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले.
'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.
अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत.
सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे.
गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.
ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो.
बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते.
मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते.
संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)!
हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.
>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही.
-- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;)
अर्धवटराव
चित्रपट बर्याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्यांचे आभार.
परिक्षण आवडले
अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !
http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm
लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे.
हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.
परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो.
एक बारिक मुद्दा -
>>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक
हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही.
बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच.
'ग साजणे' परत शोधून ऐकले :)
पिंजराचे कथा , संवाद कोणी लिहिले ते समजुन घ्यायला आवडेल . संध्या यांना हा रोल चुकीच्या वयात मिळाला असे वाटते. बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .
बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .
ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो.
"ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो."
या प्रकारच्या अतिकृत्रिम लकबी तर वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना या सुद्धा करायच्या . पण त्या अमराठी त्यामुळे त्यांना सगळे माफ . घर की मुर्गी दाल बराबर .
नाही हो.. वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना ह्यांच्या लकबीत नाजुकपणा, अदाकारी असं काहीतरी होतं.
संध्या ह्यांच्या लकबींना हिसके देणं म्हणता येईल. काहीतरी विचित्रच स्टाईल होती त्यांची.
एखादी मराठमोळी अभिनेत्री , अमराठी वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना यांच्या गर्दीत नायिका म्हणुन उभी राहते . शांताराम बापुंच्या थोड्या वेगळ्या पठडीतल्या / कथानकांच्या सिनेमांमध्ये नायिकेचा रोल निभावते . ('झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा ) . दिग्दर्शक , न्रुत्य दिग्दर्शक यांचा विश्वास सार्थ ठरविते . शांताराम बापुंच्या सिनेमांमध्ये त्याकाळचे टॉपचे नायक - जसे की देव , दिलिप , राज नसतानाही त्या मानाने कमी परिचित नायकांबरोबर (गोपिक्रिष्न , महिपाल ) आपली भुमिका चोख बजावते . व सिनेमाच्या यशामध्ये आपलेही योगदान देते. हे कर्तुत्व टाळता येणार नाही. कितीही जड वाटले तरी. 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , पिंजरा असे अनेक चित्रपट भारतात सर्वत्र व भारताबाहेरही लोकप्रिय व आर्थिक द्रुष्ट्याही यशस्वि झाले . व यश हे नेहमीच सांघिक कामगिरिमुळे साध्य होते.

ठशावरून तर बॉब्या एकदम थोराड वाटतो आहे. हे बॉबकॅट्स एकदम हल्ला करतीलच किंवा उघडपणे तुमच्यासमोर येतीलच असे नाहि. पण लहान चणीच्या मुलांना मात्र ते घाबरत नाहि :( तेव्हा मुलांना बाहेर जपून जायला सांगा.
बाकी चतुरंगराव, जरा सांभाळून! विशेषतः लहान मुलं असतील तर काळजी घ्या. मोठ्या माणसांना तसं घाबरण्याचं कारण नाही. आम्ही पुर्वी बॉस्टनमध्ये रहात असतांना स्नो मध्ये त्याचे ठ्से पाहिले होते. पण तो मोठ्या माणसांपासून दूरच रहातो असे ऐकले होते....
जनरली ते रात्री गारबेजमध्ये चिकन-मटणाचे अवशेष असतील तर ते खायला येतात. तेंव्हा रात्री जर गारबेज टाकायला जात असाल तर काळजी घ्या. अन्यथा काळजीचे कारण नाही.

काल रात्री मॅसाच्युसेट्समधे पुन्हा हलकीशी हिमवृष्टी झाली. आज सकाळी गाडीवरचे बर्फ साफ करायला बाहेर पडलो, बरोबर चिरंजीवही होते (वय वर्षे ६ ), आणि बर्फात पायांचे ठसे दिसले, बॉबकॅटच्या! (हा प्राणी बॉबकॅटच असणार कारण मागच्याच आठवड्यात आमच्या निवासी संकुलाच्या आसपास तो दिसल्याबद्दलची भित्तिपत्रके लावली होती!). मी सावध होऊन मुलाला मागेच थांबवले!
मै कभी बतलाता नहीं बार मे जात हूं मै मा... युं तो मै दिखलाता नहीं दारू पीकर रोज़ आता हूं मै मा.... तुझे सब है पता, है ना मा... तुझे सब है पात, मेरी मा...
ठेके पे युं ना छोडो मुझे, घर लौट के भी आ ना पाऊं मै मा... पौआ लेने भेज ना इतना दूर मुझको तू, घर भी भूल जाउं मै मा...
"हां...संपतराव, तुमच्या पण डोक्यात "केमिकल लोच्या' झालेला दिसतोय, त्या
मुन्नाभाईसारखा. त्याला जिकडेतिकडे गांधीजी दिसत, तुम्हाला ती बाई दिसतेय.
माणसानं एखाद्या गोष्टीची भीती घेतली ना, की मेलाच तो!''

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान..
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून.....
सहिच....

'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.
'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.
(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता) नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.
राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'च लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)
असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
लेखन आवडले. बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा. पुढील लेखनास शुभेच्छा. मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)
आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ...
"बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले" अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ....
"आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा." धन्यवाद .... असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........

मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा
स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077
आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095

===================== ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर. (आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत) ====================== अहो येता जाता सट्टा का हो लावता, अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.
बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री चंगळच चंगळ करूनी घ्या हो, हात नका लावू कुणी कामाला
सर, विडंबनातला आशय पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही इथे टाकू :) कॉप्या करु देणार्या प्राध्यापकांचे काय करायचे !!!
अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता ? आणि कोणत्या वर्गाला ?
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.

परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे. (टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)
स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.
सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.
सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.
कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.
वा !!!हा भाग
हा भाग तर एकदम आवडला.
मस्त जमलाय. बढिया!!!
आपला
- ध मा ल.
वा !
वा आनंदघन!
मला तर ही माझीच गोष्ट वाट्ते आहे. फक्त मी इंजिनियर झाले नाही तर चित्रकार झाले. तुमची गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि माझी नऊ वर्षांपूर्वीची. मला दहावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडायचा होता. अभ्यासक्रम निवडताना योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर किती त्रास होतो हे मी चांगलं अनुभवलयं. अशिक्षित आईबाबा आणि चित्रकारांबाबतच्या वावड्या यामुळे अडचण वाटली खरी, पण तेच अशिक्षित आईबाबा जेव्हा ठामपणे मागे उभे राहिले तेव्हा खरच नवी उभारी मिळाली आणि अर्धवेळ काम करून का होईना पण माझे शिक्षण पूर्ण झाले.
धन्यवाद आनंदघन! आज तुमच्या लेखामुळे बर्याच आठवणी जाग्या झाल्या.
राजमुद्रा :)
जबरा एकदम .... इंजिनीयर स्पेशल
मलापण लहानपणी "इंजिनीयर" म्हणजे एकदम अचाट गोष्टी करणारे लोक वाटायचे. हे प्रकरण म्हणजे एकतर 'गोर्या चामडीच्या लोकांचे किंवा ईथल्या अवलिया व विक्षिप्त ' लोकांनाच साध्य आहे असा माझा समज होता[ त्याला माझ्या नात्यातल्या एका इंजिनीयर असलेल्या 'विक्षिप्त मामाने' बळकटी दिली ]. त्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचे आकर्षण होतेच .
"मोठीपणी काय होणार ?" याचे उत्तर लहानपणी प्रसंगानुरूप बदलत गेले , सांगायचे तर "दूसर्यावर सूड घेण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यासाठी मला डॉक्टर व्हावे असे वाटे , एस टी कंडक्टर चा मस्त प्रवास व हातातली पैशाने भरलेली बॅग बघून मला ते आवडे , भेळचा गाडा चालवणार्या भैयाची लै ऐश असेल असे मानून माझी भेळचा गाडा टाकायची ईच्छा होत असे, सिनेमे बघून तर विचारायलाच नको ( 'बॉर्डर' बघितल्यावर मी सैनिक होतो असे म्हणल्यावर पिताजीनी अशा नजरेने बघितले की मला तो विचार जागेवर्च सोडून द्यावा लागला. मग मी ठरवले की आधी मला विरोध करणार्या 'घरातील दूश्मनांशी लढू मग देशाचे दूश्मन आहेतच की.'), 'डब्ल्यु डब्ल्यु एफ' बघून आम्ही 'फायटर' व्हायचे ठरवल्यावर पिताजींनी घरातील 'केबल कनेक्शन बंद' करून टाकले. पण त्यातल्या त्यात "इंजिनीयर " व्हायची ईच्छा मनात तशीच होती .............
पुढे १० वी व १२ वी ला जबरदस्त मार्क पडून बोर्डात आल्यावर आपोआप 'इंजिनीयरिंला जाण्याचे मार्ग' यक्दम सोपे झाले. शेवटी [कसेतरी] शिक्षण पूर्ण करून आज एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकती करताना लहानपणाचे विचार आठलले की हसू येते ........
असो. आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या ......
आठवणीत हरवलेला छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
मस्तच
हा भाग अयिशय छान झाला आहे.
'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?
हे वाचून हसू आले.
- (सर्वव्यापी)प्राजु
झकास. त्या वयातील ......
भावना अगदी अचूक पकडल्या आहेत. छानच. धन्यवाद.
पु भा शु
हा हा!!!!
हा भाग एकदम चुरचुरीत झालाय :).. नर्मविनोद खासच!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
मस्त!
हा भाग मस्त जमून आला आहे,
नर्मविनोद खासच!
ऋषिकेशशी सहमत.
स्वाती
अगदी जवळचं वाटतंय लेखन, आनंदघन.
पुढील भाग येऊदेत!
चतुरंग
In reply to अगदी जवळचं वाटतंय लेखन, आनंदघन. by चतुरंग
हेच,
सिव्हील इंजिनीयर
'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?
असे मला डाक बंगला म्हटले की वाटते. :) प्रत्येक डाक बंगल्यातून एकतर स्मगलिंग चालते किंवा त्यात भुते असतात असा माझा समज आहे. :)
बाकी वर्णन छान. माझे एक काका सिव्हील इंजिनीअरची ऐट बघून सिव्हील इंजिनीअर झाले. ते म्हणत 'जीप मधून सफारी सूट घालून येणारा सिव्हील इंजिनीअर पाहीला की त्याच्या ऐटीचे आकर्षण वाटे. तसेच सिव्हील इंजिनीअरींग सोडून ईलेक्ट्रीकल, मेकॅनिकल अशा इतर शाखा असतात हे इंजिनीअरींग कॉलेज ला जाईपर्यंत माहीतच नव्हते.' त्यामुळे आपण लिहीलेला लेख वाचून मला माझ्या वयस्कर काकांची आठवण झाली.
तसेच माझ्या आजोबानी सागितलेल्या एका गमतीची आठवण झाली. ती अशी की एक 'डेक्कन कॉलेजचे' सुपरीटेंडंट असलेल्या गृहस्थांच्या वृद्ध आईने घरी आलेल्या पाहुण्याना 'आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे' असे सांगितले होते. :)
पुण्याचे पेशवे
चालू द्या
तुमचे कथन चालू द्या ..
आमच्या वेळेस तर फावला वेळ कसा घाल्वायचा म्ह्णुन जायचे बॉ लोक इंजिनियर व्हायला.
खरच...खुप
In reply to खरच...खुप by बापु देवकर
+१
आभार