मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हम किसी भी हद तक जा सकते है|

युयुत्सु ·

रामचंद्र Fri, 07/25/2025 - 12:43
ही तत्परता... ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते. न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं. आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.

लेखनविषय:
लेखनप्रकार
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

धाव पाव देवा आता देई एक पाव...

युयुत्सु ·

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/24/2025 - 21:56
पाव घरी बनवता येतो हे मला माहिती नव्हते. म्हणजे बनत ही असावा पण बेकरीत मिळतो तसा बनत नसेल. पण तुमच्या प्र.चि मध्ये तर खर्याखुर्या बनपाव सारखा पाव दिसतो आहे.

Bhakti Fri, 07/25/2025 - 10:25
पण त्यात अनेकांना अध्यात्मिक आनंद मिळतो
हे आता पण काही शतकांपूर्वी पावामुळे लोक बाटले जायचे!किती शोकांतिका.

In reply to by Bhakti

संजय पाटिल Mon, 08/04/2025 - 14:58

पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात.

In reply to by संजय पाटिल

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 15:08
पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात. हा खरेतर मला आधिपासून पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रात, किंबहुना देशात कित्येक सहस्त्रके सर्व प्रकारच्या मांसाहाराची परंपरा आहे. अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी हा तसा फारसा अनोळखी प्रकार नसावा बहुजन हिंदूंना. अगदीच धार्मिक कारणामुळे पूर्णपणे शाकाहारी असणार्‍या काही अल्प जमाती सोडल्या तर अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी लावलेला पाव तो सुध्दा विहिरीत टाकला अन त्या विहिरीचे पाणी प्यायले तर आपला धर्म बुडेल ही भीती कशी बरे निर्माण झाली असावी?

In reply to by अभ्या..

युयुत्सु Mon, 08/04/2025 - 15:21
जुन्या पिढ्यांमध्ये शुद्ध आणि अशुद्ध, स्वच्छ आणि अस्वच्छ या कल्पनांचा पगडा (तसा तो आता ही आहे, पण वेगळ्या स्वरूपात - आता एक्स्पायरी डेट्चे माहात्म्य बरेच आहे) खुप होता. मुळात समुद्रगमन निषिद्ध, मग समुद्रमार्गाने आलेल्यांच्या सर्वांचा 'विटाळ' मानला जाऊ शकतो. टिळकांना विलायतेला जाऊन आल्यावर 'प्रायश्चित्त' घ्यावे लागले होते, असे कुठे तरी वाचले होते.

असंका Sat, 08/02/2025 - 13:45
कसा झाला होता? किती पाव तयार झाले? प्रुफिंग किती वेळ / वेळा केलं? थोडा जास्तच खरपूस झालाय असं फोटोत वाटतंय, तर ते खरंच जास्त भाजलं गेलंय का? हलका झालाय का? थोडे जास्तच प्रश्न आहेत, जमलं तर सांगा!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु Sat, 08/02/2025 - 14:49
श्री० बिरूटेसर, मनःपूर्वक धन्यवाद! बाय द वे - तुमच्या छळवादाबद्दल सहानुभूती आणि मी एकटा नाही या भावनेने बराच धीर आला.

युयुत्सु Sat, 08/02/2025 - 14:49
श्री० असंका पाव बर्‍यापैकी हातात बसला आहे. पाणी, तापमान (रूम टेंपरेचर) आणि यीस्ट्चा दर्जा याचा मेळ घालता आला की पाव जमायला लागतो. तुम्ही पाव करणार्‍या लोकांचे व्हिडीओ बघितले तर त्यांच्यात एकसमानता नाही. वर केलेला पाव एकंदर दीडतास १+ १/२ असा प्रुफ केला. म्ह० १ तास आंबवल्यावर कणिक तिंबली मग अर्धा तास वाट बघून ओव्हन मध्ये टाकला. या वेळेत यीस्ट पिठातच मिसळले. सहसा ३५-३८ सें० कोमट पाण्यात अगोदर सक्रिय करून घेतो. मला स्वतःला खरपूस भाजलेला म्ह० क्रस्ट जळलेला पाव अ तिशय आवडतो. अजून ५ मि० ठेवायला हवा होता.

असंका Sat, 08/02/2025 - 16:02
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद!! अजुन एक, टेंपरेचर काय ठेवले होते, का फक्त ग्रील केलंय? आणि वर रंग यायला ब्रशिंग केलंय का, आणि कशाने...? (किती पाव झाले, आणि हलका कितपत झालाय?..)

In reply to by असंका

युयुत्सु Sun, 08/03/2025 - 08:28
माझ्या ओव्हनमध्ये तापमान नियंत्रित होत नाही पण वॉटेज सेट करता येते. त्यामुळे फक्त ८०० वॅटला ग्रील केले आहे. ब्रशिंग केले नाही, केले असते तर आणखी चमक आली असती. पाव हलके पण त्यातलं पाणी कमी झालं की वाढतं. घरी केलेला पाव दोन दिवसांनी मुरला की जास्त चांगला लागतो. बर्‍याच दिवसांनी करत असल्यामुळे एकच केला होता.

सोत्रि Mon, 08/04/2025 - 15:28
पाव झक्कास दिसतोय, चवीलाही फक्कड असावाच. मलाही खरपूस भाजलेला पाव विषेश आवडतो. - (पाववाला) सोकाजी

आज मार्केट्मध्ये दम नव्हता. ग्रोकला स्क्रीनशॉट देऊन विचारलं होल्ड करू एक्झिट ग्रोक ने विचार करून लगेच एक्झिट करायला सांगितलं. तेव्ह्ढयात कशानंतरी लक्ष विचलित झालं आणि माझी पोझिशन गडगडली. मग चिडचिड करत बाहेर पडलो. पण मार्केटचा राग कशावर काढायचा म्हणून पाव करावा असं मनात आलं. पावासाठी कणीक तिंबणे थेरप्युटीक असते. जवळ-जवळ ४-५ वर्षे पाव घरात केलाच नव्हता. मग धडाधड सगळी कपाटे शोधून सामान बाहेर काढल.

लालची कावळा आणी नाचण

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लालची कावळा आणी नाचण ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते. "कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था" मनोहर कविश्वर यांच्या गीता प्रमाणे, सैन्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नाव मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर बापाचे कर्तव्य पुर्ण करत मुलींची लग्ने केली.जगरहाटी,नातवंड झाली.

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

किल्लेदार ·

Bhakti गुरुवार, 07/24/2025 - 15:12
सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं.
नवीनच समजलं,खुपचं वेगळा अनुभव असणार.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/24/2025 - 15:34
भन्नाट प्रचि आणी वर्णनही. उर्वरित आयुष्यात जायला मिळेल किंवा नाही पण पुनर्जन्म पेंग्वीन(भलते सलते राजकीय अर्थ काढू नये) झालो तर किती मज्जा येईल. लेख आवडलाच.

गोरगावलेकर गुरुवार, 07/24/2025 - 15:41
स्वप्नवत आहे हे सर्व . शब्दांकन आणि अप्रतिम फोटोंमुळे भटकंती अगदी जिवंत झालीय. वर्णन वाचताना जणू आपणही त्या मोहक निसर्गात फिरतोय, असे वाटते. खरोखरच उत्कृष्ट लेखन आणि अनुभव!

नि३सोलपुरकर Fri, 07/25/2025 - 15:38
अप्रतिम निसर्ग आणि प्रचि. निशब्द किल्लेदार साहेब धन्यवाद . _/\_

श्वेता२४ Sat, 07/26/2025 - 13:04
तुमचे भटकंतीचे वर्णन एखादी कादंबरी वाचतोय असे वाटते. खूप छान लिहीता तुम्ही. आणी फोटो तर निव्वळ अप्रतीम. बघु इथे जायचा योग येतो का ते.

सौंदाळा Mon, 07/28/2025 - 10:42
अप्रतिम असे कॉकटेल (सुंदर वर्णन + अप्रतिम फोटो) असलेले लेख वाचले की मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले असं वाटतं. छापील माध्यमात असे लेख वाचणे किंवा नुसते फोटो बघणे यात ही मज्जा नाही. क्रमशः बघून जीव भांड्यात पडला पुभाप्र

लेखतील चित्रे बघुन या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहीजे असे वाटायला लागलेय. सर्व छायाचित्रे सुंदर्च पण सहाणेवरचे मॅश पोटॅटो, आईस्क्रीमचा फोटो आणि कॉरदेरो असादोर बघुन तोंपासु लिहिते रहा!!

सुधीर कांदळकर Mon, 07/28/2025 - 14:49
वेगळा निसर्ग. शब्दचित्र छान रेखाटले आहे. प्रकाशचित्रांबद्दल काय बोलावे? तीही सुंदर आणि उत्कृष्टच. पेसो म्हटल्यावर जुने वेस्टर्न सिनेमे डोळ्यांसमोर येतात. एका सिनेमात फ्रॅन्को नीरो त्याला पकडून देणार्याला पोलीस ५००० पेसोचे बक्षीस लावले आहे अशा अर्थाचे पोस्टर रस्त्यावर पाहातो. त्यावर तो खडूने आणखी पाचदहा शून्ये काढून किंमत वाढवतो. वरील प्रकाशचित्रांची किंमत अशीच वाढवावीशी वाटते. एल कलाफाते प्रकाशपाटीचे चित्र आणि रेलिंग लावलेल्या पाण्याकाठीच्या मातीतल्या सज्जाचे वरून घेतलेले दृश्य फारच आवडले. धन्यवाद.

अमीबा गुरुवार, 07/31/2025 - 04:11
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे, दोन्ही अतिसुंदर! एक शंका - स्थानिक भाषा येत नसताना भाषान्तरासाठी चॅटजीपीटी वा तत्सम अँप कितपत उपयोगी येऊ शकतात, याबद्दल आपण पडताळणी केली होती काय?

किल्लेदार Fri, 08/01/2025 - 18:13
मी गुगल ट्रान्सलेट ॲप फोन मधे टाकून घेऊन गेलो होतो. बऱ्यापैकी फायदा झाला. माणूस समोर असेल तर ठीक आहे पण कुठे फोन करायचा असेल तर भयंकर पंचाईत होते. एअरपोर्ट वरून हॉटेल ला फोन केला होता तेव्हा एसी मधेही घाम फुटला होता.

श्वेता व्यास Wed, 08/13/2025 - 18:00
ग्लेशियरच्या गावाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. वातावरण आणि खाद्यसंस्कृती पाहता जाण्याची इच्छा तर नाही, पण लेख आणि चित्रांनी हा निसर्ग पुरेपूर अनुभवता आला.

रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं.

कवडसे-२

राजेंद्र मेहेंदळे ·

आर्या१२३ Mon, 07/28/2025 - 14:48
अप्रतिम ! छान आहेत आठ्वणी. हे वाचुन श्री दादा गोडसे यांना पाहण्याची ईच्छा निर्माण झाली. माझ्या एका मैत्रीणीच्या माहेरी पुज्य श्रीधर स्वामींची उपासना आहे. तिने पद्मावती मठातला फोटो पाठवला. ती सांगत होती की पद्मावतीचा मठ पुर्वी त्यांचाच होता. त्यांच्या नंतर तो वरदपुर संस्थानाने घेतला.

कवडसे पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे. ======================== तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

कर्नलतपस्वी Sat, 07/26/2025 - 17:58
आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ Mon, 07/28/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Wed, 07/30/2025 - 12:37
अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Wed, 07/30/2025 - 14:09
आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा Tue, 07/29/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत Tue, 07/29/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti Tue, 07/29/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 07/30/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ Tue, 07/29/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म Tue, 07/29/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ Tue, 07/29/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

कर्नलतपस्वी Tue, 07/29/2025 - 17:55
अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Tue, 07/29/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा Tue, 07/29/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक Tue, 07/29/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

श्वेता व्यास Tue, 07/29/2025 - 19:03
कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

रेकमेंडेशन लेटर

युयुत्सु ·

अमर विश्वास Wed, 07/23/2025 - 11:28
जेंव्हा एखाद्या विषयात गती नसताना कोगाईड व्हायला मान्यता दिलीत .. तेंव्हाच नैतिकतेचा विषय निकाली निघाला आहे .. उगाच रेकमेंडेशनच्या वेळी नैतिकतेचा बाऊ कशाला ?

In reply to by अमर विश्वास

युयुत्सु Wed, 07/23/2025 - 11:35
कोगाईड प्रशासकीय मदतीसाठी व्हायचे ठरले होते. शिवाय माझ्या मर्यादांची स्पष्ट कल्पना मित्राला दिली होती.

रेकमेंडेशन लेटर ========== पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४ माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं... हे गुण कोणते? - कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता.

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

Bhakti ·

पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, म्हणजे ते आधीच गेलेले आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की प्रकाशकांना परवडते कसे अशी पुस्तके प्रकाशित करणे ? मराठी प्रकाशन व्यवसायातील कोणाला तरी बोलावून पॉडकास्ट करायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 07/23/2025 - 14:20
काय माहीती नाही? पॉप्युलर प्रकाशन आहे. अवांतर पण प्रकाशक आणि लेखक यांच्यातील मधुर नात्यांचं एक उदाहरण पुन्हा समजले.पद्मगंधा चे जाखडे हे २१ जुलैला रा.चि.ढेरे यांच्या जन्मदिनी त्यांचे एकतरी पुस्तक पुर्नप्रकाशन करतात.नरहर कुरुंदकर म्हटले की देशमुख आणि कंपनी अजोड नातं होतं.गो.नी.दांडेकर आणि मृण्मयी प्रकाशन आहेच. हरारी,डारियस प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद, अच्युत गोडबोले म्हटलं की मधुश्री प्रकाशन समीकरण दिसते. अजून आठवलं की सांगते.

In reply to by Bhakti

प्रचेतस Sat, 07/26/2025 - 06:09
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं होतं. त्यांची बहुतेक पुस्तकं मॅजेस्टिकची आहेत. मृण्मयी प्रकाशन ही त्यांच्या मुलीची, वीणा देव यांची प्रकाशन संस्था आहे जी गोनीदांची पुस्तके आता पुन:प्रकाशित करत आहे

In reply to by प्रचेतस

Bhakti Sat, 07/26/2025 - 10:46
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे हे माहिती होतं.पण वाटलं सुरूवात गोनीदा यांनी केली असेल. पु.लं.ची पुस्तके मौज प्रकाशनाची दिसत आहेत.दुर्गाबाईंची वरदा प्रकाशनाची आहेत,पण पैसे,दुपानी,ऋतूचक्र इतर प्रकाशनाची आहेत.प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क मिळवण्यासाठी नंतर चढाओढ असते असे वाचलं होतं.

In reply to by Bhakti

प्रचेतस Sat, 07/26/2025 - 11:13
रामदास भटकळांचे पॉप्युलर, श्री पु भागवतांचे मौज, कोठावळ्यांचे मॅजेस्टिक, माजगावकरांचे राजहंस, अनंतराव कुलकर्ण्यांचे कॉन्टिनेन्टल ह्या जुन्या प्रकाशन संस्थांनी अनेक दर्जेदार लेखक घडवून पुस्तकेही दर्जेदार दिली असे म्हणता येईल. ह्या संस्था उत्तम लेखक जिव्हाळ्याने राखून ठेवण्यासाठी देखील प्रसिद्ध होत्या आणि आहेत. वरदाच्या ह. अ. भावेंनी प्राचीन साहित्य मराठीत आणून आतबट्ट्याचाही व्यवहार केला असे म्हणता येईल. मराठी वाचकांवर ह्यांचे मोठे ऋण आहे. आता मात्र तसे लेखक राहिले नाहीत आणि मेहतांसारख्या तद्दन बाजारु प्रकाशन संस्था सध्या जोरात कार्यरत आहेत. मात्र त्यांनी देखील भैरप्पांची पुस्तके मराठीत आणून मोठे कार्य केले आहे असे म्हणता येईल.

चौथा कोनाडा Wed, 07/23/2025 - 13:41
आटोपशीर आणि सुंदर ओळख. मी पहिले तीनही भाग वाचलेले आहेत.. काही ठिकाणी रटाळपणा नक्कीच अनुभवायला येतो.. कादंबऱ्यांमध्ये सुद्धा पुनरुक्ती जाणवत राहते. पण त्या रटाळपणासहित कादंबऱ्या आवडून जातात.. मनात घर करून राहतात. ही सुद्धा यादीच आहे.. अजून योग आलेला नाहीये. ही तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकली?

कपिलमुनी Fri, 07/25/2025 - 21:35
रामूने सत्या बनवला.. मग सत्यासारखं काहीतरी बनवायचा म्हणून ढीगभर पिक्चर केले.. नेमाडेंनी कोसला लिहिली..मग कोसला सारखा काहीतरी लिहायचा म्हणून हिंदू लिहिली.

कर्नलतपस्वी Sat, 07/26/2025 - 08:51
यांची कोसला खुप लोकांना आवडले. माझ्या संग्रहात आहे पण कधीही वाचायला घेतल्यावर एकदोन पानाच्या पुढे प्रगती होत नाही. तेच भैरप्पांचे अनुवादित पुस्तक एका बैठकीत संपते. असो. किंडलपेक्षा कागदी पुस्तके आवडतात. नवीन आणले की त्याचा येणारा वेगळाच सुवास लहानपणीच्या नवीन शाळेची पुस्तके आठवतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Sat, 07/26/2025 - 10:54
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व 'ऐकायला सुरूवात केली आहे.माझं आताच भैरप्पांच्या कादंबरीबरोबर नातं निर्माण झालंय.आवरण,वंशवृक्ष अक्षरशः वेड लावलं.त्यांच्या कानडी कादंबरींचा भावानुवाद मराठीत करून उमा कुलकर्णी यांनी वाचकांसाठी खुप खुप बहुमोल कार्य केले‌ आहे _/\_

In reply to by Bhakti

प्रचेतस Sat, 07/26/2025 - 11:22
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा ह्या देखील उत्कृष्ट कादंबर्‍या आहेत, त्या आवर्जून वाचा. कन्नड कादंबर्‍यांमुळे मी तर भारावून गेलोय. अफलातून चित्रण असते. शिवराम कारंथांची पुस्तके तर आवर्जून वाचा, मुकज्जी, अशी ही धरणीची माया, चोमा महार, डोंगराएव्हढा ह्या त्यांच्या एकाहून एक सरस कादंबर्‍या आहेत. ह्या शिवाय अनंतमूर्ती ह्यांची संस्कार, रावबहादूर कुलकर्णी ह्यांची ग्रामायण, गोपाळकृष्ण पै यांची स्वप्न सारस्वत ह्या सर्वच कादंबर्‍या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Sat, 07/26/2025 - 15:52
अंजावर चकटफू पडफ मिळाले. तीनशे पानं एका सटक्यात वाचली. महाभारतावरील एक वेगळा दृष्टिकोन आवडला म्हणून अमेझोन वरून मागवले. नंतर तुमच्याच (प्रचेतस, ) शिफारशीनुसार बाकीची अक्षरधारामधे खरेदी केली. सर्व चांगली आहेत.. कारंथांची मागवतो. सध्या फोटोग्राफी चा नाद लागलाय. अधुनिक तंत्रज्ञानामुळे बरेच फोटो बरेच येतात पण जरा शास्त्रशुद्ध शिकावे म्हणून डाॅक्टर कात्रे यांचे डिजीटल फोटोग्राफी हे पुस्तक मागवले आहे.

श्वेता२४ Sat, 07/26/2025 - 13:14
म्हणून ऑफीसच्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक खरेदी करणार एवढ्यात माझ्या वरीष्ठांनी माझ्यकडे आहे घेउ नका म्हणाले. नंतर त्यांनी आणून दिले. काही पाने वाचूनच ही पुस्तक पूर्ण होणर नाही याची खात्री पटली. पुस्तक परत केले व पैसे वाचवल्याबद्दल सरांना चहा दिला. :))

मारवा Sun, 07/27/2025 - 19:42
मौज प्रकाशनाने नेमाडे यांचे महत्व ओळखण्यात चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे कोसला चा पहिला खर्डा मौजेकडे गेला होता व तो नाकारण्यात आला होता चूकभूल देणे घेणे. मौजे च्या प्रकाशकांचा एक साहित्यविषयक विशिष्ट दृष्टीकोन होता. कलात्मक सौंदर्य त्यात ते महत्वाचे मानत. त्यांना सामाजिकतेचे वावडे होते असे नव्हे.पण त्यांना मूलभूत कलात्मक सौंदर्य साहित्यिक मूल्य जे घाट शैली आशय संदर्भात आहे ते अधिक मोलाचे वाटत. कलेसाठी कला या बाजूचे मौज प्रकाशन होते. पण त्यांनी या मर्यादेमुळे एकीकडे अनेक चांगलेनलेखन नाकारले हे जसे खरे आहे तसेच भागवत आदींनी त्यांच्या साहित्य तत्वांचा अंगीकार असलेले अतिशय सकानसुंदर साहित्य सुद्धा प्रकाशित करून एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. श्रीपु एकदा म्हणाले की आम्ही काय नाही दिले पेक्षा काय दिले प्रकाशिले त्यावरून आमचं मूल्यमापन करावे पॉप्युलर चे भटकळ हे मौजेचे उत्तम तत्व आणि मौजे ने नाकारलेले किंवा सामाजिक आशयप्रधान साहित्य या दोघांचा उत्कृष्ट balance पॉप्युलर ने केला असे माझे मत आहे. एकीकडे ग्रेस यांचे सर्व साहित्य आणि एकीकडे नेमाडे यांचे साहित्य पॉप्युलर सारखी संस्था प्रकाशित करू शकते हे भटकळ यांचे greatness आहे विशाल साहित्यिक दृष्टिकोन आहे. Best of both worlds मौज चां दमदार विरोधी बाजूचा काउंटर प्रवाह प्रकाशित करणारी संस्था बघू गेलो तर सर्वात वर लोक vangmay गृह हे आहे. ही साम्यवादी मंडळींची संस्था आहे पण अतिशय दमदार सकस साहित्य निर्मिती इथे होते. राजहंस ही पॉप्युलर चा पाया प्रेरणा असलेली संस्था आहे. पण त्याहून अधिक चे वैशिष्ट्य म्हणजे ती आधुनिक आणि खऱ्या अर्थाने पॉप्युलर साहित्या ची सुद्धा प्रकाशन करणारी आहे. गंमत म्हणजे मौज आणि पॉप्युलर हे जसे नावाच्या विरुद्ध गंभीर साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था आहेत. Lokwvangmay गृह नावाला जगते. पद्मगंधेचा कल हा संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाच्या साहित्य कडे अधिक आहे. (या सर्वांनी या प्रकाशक मी लेखक घडवले असे म्हणणे हा सर्व महान लेखकांचा अपमान आहे ) मला स्वतःला भागवत फार snobbish elite वाटतात. त्यापेक्षा मला भटकळ जवळचे वाटतात. भागवत मला गमतीने कधी कधी fountain head कादंबरीतील ellsworth toohey पात्रासारखे भासतात. काही लेखक स्वतः च प्रकाशित होतात जसे उत्तम कसदार लेखन असले तरी आणिंकही ठिकाणी पूर्णपणे प्रचारी चुकीचे असले तरी आ हा साळुंखे वगैरे स्वतःची पुस्तके स्वच्छ छापतात. उद्धव शेळके धग कार स्वतः प्रकाशन संस्था चालवत त्यांची परिस्थिती हलाखीची होती पुस्तक विक्री हा पोटाचा व्यवसाय होता असेही आहेत काहींप्रकाशक. प्रास प्रकाशन सारखे अशोक शहाणे सारखे अतिशय मनस्वी प्रकाशक ज्यांनी अरुण कोल्हटकरांच्या अद्भुत सुंदर कविता अतीव सुंदर रीतीने प्रकाशित केल्या या कवितेच्या पुस्तकांचा कागद त्यांचा रंग त्यांचा आकार सर्व काही वेगळा प्रयोगशील आणि फार काबील ए तारीफ असा आहे. याला म्हणतात साहित्यावरील प्रेम. निर्मितीं मूल्ये राजहंस ची उत्कृष्ट आहेत .मेहता प्रकाशन प्रामुख्याने अनुवादित साहित्य प्रकाशित करते आणि बिकने वाला मालं त्यांची काही साहित्यिक धारणा असेल असे वाटत नाही. श्री गजानन बुक डेपो म्हणजे महाराष्ट्राचा गीता प्रेस सारखा अवतार काहीसा. शब्दालय हे श्रीरामपूर सारख्या आडगावचे प्रकाशन पण भारी पुस्तके प्रकाशित करतात विलास सारंग आदनची सुद्धा. पेंग्विन सारख्या जागतिक प्रकाशनाने एक उत्तम.मराठी कथांचे संकलन प्रसिद्ध केले होते. ते कौतुकाने घेतले. निशिकांत मिरजकर हे संकलक होते उत्तम कथा पण पुस्तकात इतक्या ढिगाने व्याकरण आणि शब्द यांच्या चुका होत्या की माझ्या या प्रतिसादाला तुम्ही चक्क निर्दोष म्हणाल.त्यावर मेघना पेठे यांनी पेंग्विन ची खूप खेचली होती. मराठीत आहे तर काहीही छापा अशी चूक पठ्ठे इंग्रजीत करतील का ? अंतर्नाद चे प्रकाशन मौजे च्या सत्यकथे ला टक्कर होते. कॉम्रेड भानू काळे हे थोर साहित्यिक जाण असलेले प्रकाशक होते. अंतर्नाद बंद करावे लागले याची मोती खंत आहे सध्या नव्या दमाचे पपायरस प्रकाशन सुंदर आणि उत्कृष्ट लेखन घेऊन येत आहे.

In reply to by मारवा

Bhakti Sun, 07/27/2025 - 20:21
खुपच सुंदर प्रतिसाद!मला म्हणून मिपावर लेख लिहायला आवडतात.नाहीतर ही माहिती माझ्यापर्यंत यायला अजून पाच वर्षे लागली असती :) लोकवाङमयची पुस्तकं हा समाज हुंकार आहे.आ.ह.साळुंखे म्हणजे लोकायत संस्था.होय पपायरस प्रकाशनही उत्तम पुस्तकं छापित आहेत.

गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .

सहा कोवळे पाय

चांदणे संदीप ·

अभ्या.. Tue, 07/22/2025 - 00:40
इवलुशी प्रेरणा आणि तिचे इवलेसे भुभू आणि तिची इवलुशी कविता. क्युट क्यूट. . आवडली सॅन्डीबाबा.

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sun, 07/27/2025 - 20:10
किटकांना सहा पाय असतात. मुंगी, मधमाशी, झुरळ, फुलपाखरू हे सर्व कीटक आहेत आणि त्यांना सहा पाय असतात. कमी असतील तर तुटले असतील, जास्त असतील तर जयपूर फुट समजावे.ह.घ्या. सहा पाय म्हणजे षड्रिपू, षड्रस असे काही आहे का?कवीता उलगडली नाही ती डोक्यावरून गडगडली. बाकी,कवीता आवडली.

गणेशा Wed, 08/20/2025 - 09:01
वा वा खूप दिवसांनी आलो या विभागात आणि पहिल्या दोन कविता वाचल्या मस्त वाटलं... बालकवीता करता आली असती ह्या विषयावर तुला. - गणेशा... अवांतर : एक महिन्या पूर्वीची कविता २ no वर. कमी लोक आहेत काय काव्य विभागात आजकाल. जुने कुठे गेले पाभे वगैरे

चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2025 - 13:45
'पेर्णा' सगळ्यात शेवटे टाकलीत, हे ब्येस केले. त्यामुळे खुमारी आणखीनच वाढली आहे. आधी मलापण कुठल्यातरी कीटकाविषयी, मग षड्रिपु वगैरे वाटू लागले होते. पण त्या दोन पिल्लांची गोड लगबग बघून कविता तर समजलीच, त्याशिवाय खूप गोड, निरागस काही बघण्यातला आनंद आणि समाधान लाभले. अनेक आभार. असेच प्रयोग करत रहावे ही विनंती.

नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

क्विक कॉमर्स आणि आपण

आकाश खोत ·

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि Mon, 07/21/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि Mon, 07/21/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

श्वेता व्यास Mon, 07/21/2025 - 18:03
काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

कर्नलतपस्वी Mon, 07/21/2025 - 18:06
पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

कर्नलतपस्वी Tue, 07/22/2025 - 14:57
खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.

फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स".