हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :)
हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .
मागे केलेल्या चर्चेनुसार अनेकांना हि कादंबरी १००-२०० पानानंतरच रटाळ वा वाचावी अशी वाटली नाही. मी छापील पुस्तक वाचायला घेतले असता माझीही तीच अवस्था झाली असती कारण कादंबरीच्या शीर्षकामुळे माझ्यासारखे अनेक वाचक याकडे आकृष्ट झाले आहेत यात मुळीच दुमत नाही. परंतु शीर्षकानुसार हि कादंबरी पहिल्या भागात अजिबात मनाला भिडत नाही. मग शीर्षकाचे ओझे व आपल्या अपेक्षा बाजूला सारत ,खंडेराव याची कहाणी म्हणून वाचताना कादंबरीची मुळें समजायला लागतात .
कादंबरीच्या सुरुवातीला भारत -पाकिस्तान सिंधू संस्कृती यांच्या पासून सुरुवात होते.स्वातंत्र्याचा लढा त्याचा अर्थ यांची संक्षिप्त विविध कथांद्वारे उहापोह दिसते. नंतर खंडेरावच्या आयुष्यात आई वडील,भाऊ,बहिणी ,आत्या ,काकू ,काका यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा तुकडा कादंबरीत त्याच्या लहानपणासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत जोडला जातो. तसेच ग्रामीण जीवनातील आजूबाजूचे विविध जातीपातीतील लोकांचे जीवन त्यातील दु:ख आनंदाचे प्रसंगही त्याचा आयुष्याशी जोडून एक रंगेबेरंगी उबदार गोधडीच तयार होते.पण असे हे ग्रामीण जीवन ,रोजच्या जीवनातील प्रसंग कधीच उजेडात आले नाही .केवळ अभिजात संशोधन कथाच प्रकाशित होतात .आणि मग अशा अनेक ग्रामीण कथा एक अडगळ होतात पण त्याही समृद्ध आहेतच ना म्हणून या हिंदू भूमीवरच्या ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे वाटून गेले
असा खंडेराव ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ,संशोधनासाठी शहरात गेल्यावर ग्रामीण मुळांपासून दूर होत जात असतानाच वडिलांच्या अखेरच्या काळात त्याला एकाच मुलगा या नात्याने पुन्हा मागे फिरावे लागतेच ,तेव्हा पुन्हा एकदा जगण्याच्या बदलेल्या व्याख्या अनेक छोट्या छोट्या संभाषणातून रेखाटल्या आहेत.
या कादंबरीची अस्सल ग्रामीण कथा साहित्याच्या दृष्टीने नक्कीच वाहवा करायला पाहिजे.अशा खिळवून ठेवणाऱ्या खुसखुशीत पद्धतीने कथा समोर रेखाटल्या आहेत. कादंबरीच्या शेवटी घरात खंडेराव एकटाच पुरुष ,तेव्हाही आणि संपूर्ण कादंबरीतही बाईचे सोशिक जीवन ,गौण स्थान याविषयी अनेकदा स्पष्टपणे नावड दाखवलीच आहे ,ही अजून एक जमेची बाजू वाटते.
कांदबरीत शिव्यांची लाखोटी भरभरून आहे.आपण तरीही कादंबरीचा गाभा दूषित न करता वेगच वाढवतात .
खूप दिवसांनी ग्रामीण जीवनावरची काठावरची कादंबरी न वाटता खोल डोहात नेणारी कादंबरी वाचाल्याची करमणूक नक्कीच झाली." वंशवृक्षाच्या पारंब्या " हा कादंबरीचा पुढचा भाग असणार आहे व तसेच हि कादंबरी एकूण चार भागांची असणार आहे असे वाचनात आले आहे.
-भक्ती

वाचने
4501
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
पुस्तक जाऊ दे खड्ड्यात,
In reply to पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, by प्रसाद गोडबोले
काय माहीती नाही? पॉप्युलर
In reply to काय माहीती नाही? पॉप्युलर by Bhakti
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं
In reply to गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं by प्रचेतस
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे
In reply to अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे by Bhakti
रामदास भटकळांचे पॉप्युलर,
In reply to रामदास भटकळांचे पॉप्युलर, by प्रचेतस
+१००
आटोपशीर आणि सुंदर ओळख.
In reply to आटोपशीर आणि सुंदर ओळख. by चौथा कोनाडा
धन्यवाद चौको.स्टोरीटेलवर ऐकली
In reply to धन्यवाद चौको.स्टोरीटेलवर ऐकली by Bhakti
ओके... कुणाच्या आवाजात आहे ?
In reply to ओके... कुणाच्या आवाजात आहे ? by चौथा कोनाडा
अतुल पेठे यांचे अभिवाचन आहे.
In reply to अतुल पेठे यांचे अभिवाचन आहे. by Bhakti
नाट्यमय अभिवाचनामुळेच
In reply to नाट्यमय अभिवाचनामुळेच by प्रचेतस
:) :)
करायचं म्हणून....
In reply to करायचं म्हणून.... by कपिलमुनी
हिंदू कादंबरीला 'काहीतरी'
भालचंद्र नेमाडे
In reply to भालचंद्र नेमाडे by कर्नलतपस्वी
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व
In reply to भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व by Bhakti
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा
In reply to जा ओलांडूनी, सार्थ, पारखा by प्रचेतस
वाह! मस्तच! नक्कीच वाचणार.
In reply to जा ओलांडूनी, सार्थ, पारखा by प्रचेतस
पर्व....
In reply to जा ओलांडूनी, सार्थ, पारखा by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतस
कोसला आवडली
In reply to कोसला आवडली by श्वेता२४
हा .... हा .... हा .... !
उद्धव ज. शेळक्यांची 'धग'.
मौज
In reply to मौज by मारवा
खुपच सुंदर प्रतिसाद!मला