मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

मार्गी ·

ramjya 31/07/2025 - 11:40
मस्त सर.......बीड ला बालाघाट डोंगर रांगा आहेत पण पाडळसिंगी-बीड-तेलगाव-माजलगाव-पाथ्री-परभणी मार्ग एवढा डोंगराळ नाहिये......दक्षिण भारत भ्रमंती साठी शुभेच्छा....मी ऐकुन आहे कन्याकुमारी आनी रामेश्वररम मधला 'मान्न्पाड' ( Manapad)भाग सुन्दर आहे

दक्षिण भारत निसर्ग समृद्ध आहे. या भागात स्वताच्या गाडीने प्रवास केल्याने अनुभवला आहे. दाक्षिणात्य लोक हिन्दी बोलत नाही,समजत नाहीत. पण इंग्रजीत संभाषण करू करतात. हे आपल्याला माहीत असेलच पण फक्त समयोचीत पुनरावृत्ती. पुढील ट्रिप साठी शुभेच्छा.

मार्गी 02/08/2025 - 11:43
सर्वांना धन्यवाद! :) @ rmjya जी, ओके. @ अनामिक सदस्य जी, खूप मोहीमा केल्या आहेत. त्यानुसार जितकं आवश्यक तितकंच सामान. किरकोळ दुरुस्ती करता येते. पंक्चर किट ठेवतो. सर्व सर्विसिंग केलं व नवीन टायर्स घेतले तर जास्त काही करावं लागत नाही.

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

येरे येरे पावसा मराठी बालगीत, | Marathi Rhymes | Marathi Balgeet | Jingle Toons ए० आय० ने बनवलेले तिसरे पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·
नमस्ते मित्रानो आधीच्या दोन्ही ai मुद्रित गाण्यानं प्रतिसाद दिल्याबाद्दल धन्यवाद , जमल्यास कोणी मला बालगीतं स्वतः गाऊन दिले तर मला पूर्ण नव निर्मितीचं आनंद येईल सध्या ये रे पावसा वर अनिमेशन बनवले आहे https://youtu.be/qpFDvSvEH7c ,ह्यात एक नवीन प्रयत्न केला आहे , प्रत्येक वेळी प्राण्याची वेगळी रूपे झाले असे कि मी सारखेच प्राणी वापरू शकतो पण दरवेळी नवीन प्राणी आधी पेक्षा जास्त चांगले ,बाकी थोडी ai ची मर्यादा जश्या भारतीय रुपया बनावता आला नाही ,पण पावसाळा सुरु असल्याने हे आवडेल आधीच्या २ गाण्यांचे लिंक https://youtu.be/8un9_tUz13U https://youtu.be/ADozRUMBpd8

बखरीच्या पानाआड

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 11/08/2025 - 18:15
गहन आशयाची साध्या सोप्या शब्दातली मांडणी आवडली. जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी ++ हेच रामायण- महाभारत - ग्रीक - रोमन- चिनी - इजिप्शियन - पासूनच्या सगळ्या 'इतिहासा'चे वास्तव.

स्वधर्म 11/08/2025 - 20:11
बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड? या ओळी खासच. सत्य फार 'महाग' असते, किंमत दिल्याशिवाय गवसत नाही.

बखरीच्या पानाआड पाहिले मी क्षणभर दडपल्या वास्तवाचे छिन्नभिन्न कलेवर प्रचलित इतिहास तुझ्या माझ्या मेंदूतून अज्ञाताच्या शक्यतांना टाके पुरता पुसून जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड?

अखेर जमलं !

नूतन ·

खेडूत 26/07/2025 - 20:25
मस्तच.. छान जमलं आहे! मी काचेवर चित्र रंगवायला एक box मागवला आहे. बघू चित्राला कधी मुहूर्त मिळतो. (अजून चित्र काढत रहा..)

नूतन 26/07/2025 - 23:55
बाकी आवडीच्या गोष्टींचा त्रास होत नाही. असो.प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

अरे वाह ! छान रंगकाम आणि आवड. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छाही देणार होतो. पुढे सर्व खुलासा वाचला आणि आवरलं. :) -दिलीप बिरुटे

नादिष्हेटपणा एक मेडिटेशन चा प्रकार आहे जो स्वता करता मेडिसीन आणी दुसर्‍यासाठीचे टेन्शन असते. बाकी, लेख मस्त.

चित्र आणि पेन्सिली ठेवायची युक्ती--दोन्हीही. वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मी ही असाच एक तूनळी चॅनल बघुन प्रभावित झालो होतो आणि एक मोठी चित्रकला वही आणि बरेच अ‍ॅक्रिलिक रंग घेउन बसलो होतो. पण बरीच धडपड करुनही जमले नाही. हा तो चॅनल https://www.youtube.com/channel/UCHm9SiOLG8UoBT8STWY5mVA

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नूतन 28/07/2025 - 15:12
शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धडपड करून बघायला काय हरकत आहे? त्यासाठी शुभेच्छा.

सोत्रि 29/07/2025 - 02:57
वाढदिवसाच्या लेटलतीफ शुभेच्छा!! चित्र सुंदर आणि पेन्सिली ठेवायची युक्ती व त्यासाठीचे प्रयत्न भन्नाट आणि प्रेरणादायी!! - (जमवण्याचे प्रयत्न आवडलेला) सोकाजी

ज्या इरेने पेटून तुम्ही हवी त्या रंगाची पेन्सिल हवी तेव्हा चटकन मिळेल अशा रीतीने पेन्सिली व्यवस्थित ठेवण्याचे साधन बनवले त्या ईर्षेला विनम्र अभिवादन. आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. आतां हवे तेव्हां हवा तितका वेळ बालवयात वा किशोरवयात शिरून चित्रकारी, रंगकाम करा आणि चित्रकारी/रंगकाम सत्र आटोपले की मगच या खर्‍या जगात परत या. अनेक अनेक शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

नूतन 29/07/2025 - 12:01
शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. १००% खरं!

नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे. तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.

हम किसी भी हद तक जा सकते है|

युयुत्सु ·

रामचंद्र 25/07/2025 - 12:43
ही तत्परता... ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते. न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं. आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.

https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

धाव पाव देवा आता देई एक पाव...

युयुत्सु ·

पाव घरी बनवता येतो हे मला माहिती नव्हते. म्हणजे बनत ही असावा पण बेकरीत मिळतो तसा बनत नसेल. पण तुमच्या प्र.चि मध्ये तर खर्याखुर्या बनपाव सारखा पाव दिसतो आहे.

Bhakti 25/07/2025 - 10:25
पण त्यात अनेकांना अध्यात्मिक आनंद मिळतो
हे आता पण काही शतकांपूर्वी पावामुळे लोक बाटले जायचे!किती शोकांतिका.

In reply to by Bhakti

संजय पाटिल 04/08/2025 - 14:58

पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात.

In reply to by संजय पाटिल

अभ्या.. 04/08/2025 - 15:08
पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात. हा खरेतर मला आधिपासून पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रात, किंबहुना देशात कित्येक सहस्त्रके सर्व प्रकारच्या मांसाहाराची परंपरा आहे. अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी हा तसा फारसा अनोळखी प्रकार नसावा बहुजन हिंदूंना. अगदीच धार्मिक कारणामुळे पूर्णपणे शाकाहारी असणार्‍या काही अल्प जमाती सोडल्या तर अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी लावलेला पाव तो सुध्दा विहिरीत टाकला अन त्या विहिरीचे पाणी प्यायले तर आपला धर्म बुडेल ही भीती कशी बरे निर्माण झाली असावी?

In reply to by अभ्या..

युयुत्सु 04/08/2025 - 15:21
जुन्या पिढ्यांमध्ये शुद्ध आणि अशुद्ध, स्वच्छ आणि अस्वच्छ या कल्पनांचा पगडा (तसा तो आता ही आहे, पण वेगळ्या स्वरूपात - आता एक्स्पायरी डेट्चे माहात्म्य बरेच आहे) खुप होता. मुळात समुद्रगमन निषिद्ध, मग समुद्रमार्गाने आलेल्यांच्या सर्वांचा 'विटाळ' मानला जाऊ शकतो. टिळकांना विलायतेला जाऊन आल्यावर 'प्रायश्चित्त' घ्यावे लागले होते, असे कुठे तरी वाचले होते.

असंका 02/08/2025 - 13:45
कसा झाला होता? किती पाव तयार झाले? प्रुफिंग किती वेळ / वेळा केलं? थोडा जास्तच खरपूस झालाय असं फोटोत वाटतंय, तर ते खरंच जास्त भाजलं गेलंय का? हलका झालाय का? थोडे जास्तच प्रश्न आहेत, जमलं तर सांगा!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु 02/08/2025 - 14:49
श्री० बिरूटेसर, मनःपूर्वक धन्यवाद! बाय द वे - तुमच्या छळवादाबद्दल सहानुभूती आणि मी एकटा नाही या भावनेने बराच धीर आला.

युयुत्सु 02/08/2025 - 14:49
श्री० असंका पाव बर्‍यापैकी हातात बसला आहे. पाणी, तापमान (रूम टेंपरेचर) आणि यीस्ट्चा दर्जा याचा मेळ घालता आला की पाव जमायला लागतो. तुम्ही पाव करणार्‍या लोकांचे व्हिडीओ बघितले तर त्यांच्यात एकसमानता नाही. वर केलेला पाव एकंदर दीडतास १+ १/२ असा प्रुफ केला. म्ह० १ तास आंबवल्यावर कणिक तिंबली मग अर्धा तास वाट बघून ओव्हन मध्ये टाकला. या वेळेत यीस्ट पिठातच मिसळले. सहसा ३५-३८ सें० कोमट पाण्यात अगोदर सक्रिय करून घेतो. मला स्वतःला खरपूस भाजलेला म्ह० क्रस्ट जळलेला पाव अ तिशय आवडतो. अजून ५ मि० ठेवायला हवा होता.

असंका 02/08/2025 - 16:02
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद!! अजुन एक, टेंपरेचर काय ठेवले होते, का फक्त ग्रील केलंय? आणि वर रंग यायला ब्रशिंग केलंय का, आणि कशाने...? (किती पाव झाले, आणि हलका कितपत झालाय?..)

In reply to by असंका

युयुत्सु 03/08/2025 - 08:28
माझ्या ओव्हनमध्ये तापमान नियंत्रित होत नाही पण वॉटेज सेट करता येते. त्यामुळे फक्त ८०० वॅटला ग्रील केले आहे. ब्रशिंग केले नाही, केले असते तर आणखी चमक आली असती. पाव हलके पण त्यातलं पाणी कमी झालं की वाढतं. घरी केलेला पाव दोन दिवसांनी मुरला की जास्त चांगला लागतो. बर्‍याच दिवसांनी करत असल्यामुळे एकच केला होता.

सोत्रि 04/08/2025 - 15:28
पाव झक्कास दिसतोय, चवीलाही फक्कड असावाच. मलाही खरपूस भाजलेला पाव विषेश आवडतो. - (पाववाला) सोकाजी

आज मार्केट्मध्ये दम नव्हता. ग्रोकला स्क्रीनशॉट देऊन विचारलं होल्ड करू एक्झिट ग्रोक ने विचार करून लगेच एक्झिट करायला सांगितलं. तेव्ह्ढयात कशानंतरी लक्ष विचलित झालं आणि माझी पोझिशन गडगडली. मग चिडचिड करत बाहेर पडलो. पण मार्केटचा राग कशावर काढायचा म्हणून पाव करावा असं मनात आलं. पावासाठी कणीक तिंबणे थेरप्युटीक असते. जवळ-जवळ ४-५ वर्षे पाव घरात केलाच नव्हता. मग धडाधड सगळी कपाटे शोधून सामान बाहेर काढल.

लालची कावळा आणी नाचण

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लालची कावळा आणी नाचण ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते. "कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था" मनोहर कविश्वर यांच्या गीता प्रमाणे, सैन्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नाव मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर बापाचे कर्तव्य पुर्ण करत मुलींची लग्ने केली.जगरहाटी,नातवंड झाली.

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

किल्लेदार ·

Bhakti 24/07/2025 - 15:12
सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं.
नवीनच समजलं,खुपचं वेगळा अनुभव असणार.

भन्नाट प्रचि आणी वर्णनही. उर्वरित आयुष्यात जायला मिळेल किंवा नाही पण पुनर्जन्म पेंग्वीन(भलते सलते राजकीय अर्थ काढू नये) झालो तर किती मज्जा येईल. लेख आवडलाच.

गोरगावलेकर 24/07/2025 - 15:41
स्वप्नवत आहे हे सर्व . शब्दांकन आणि अप्रतिम फोटोंमुळे भटकंती अगदी जिवंत झालीय. वर्णन वाचताना जणू आपणही त्या मोहक निसर्गात फिरतोय, असे वाटते. खरोखरच उत्कृष्ट लेखन आणि अनुभव!

अप्रतिम निसर्ग आणि प्रचि. निशब्द किल्लेदार साहेब धन्यवाद . _/\_

श्वेता२४ 26/07/2025 - 13:04
तुमचे भटकंतीचे वर्णन एखादी कादंबरी वाचतोय असे वाटते. खूप छान लिहीता तुम्ही. आणी फोटो तर निव्वळ अप्रतीम. बघु इथे जायचा योग येतो का ते.

सौंदाळा 28/07/2025 - 10:42
अप्रतिम असे कॉकटेल (सुंदर वर्णन + अप्रतिम फोटो) असलेले लेख वाचले की मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले असं वाटतं. छापील माध्यमात असे लेख वाचणे किंवा नुसते फोटो बघणे यात ही मज्जा नाही. क्रमशः बघून जीव भांड्यात पडला पुभाप्र

लेखतील चित्रे बघुन या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहीजे असे वाटायला लागलेय. सर्व छायाचित्रे सुंदर्च पण सहाणेवरचे मॅश पोटॅटो, आईस्क्रीमचा फोटो आणि कॉरदेरो असादोर बघुन तोंपासु लिहिते रहा!!

वेगळा निसर्ग. शब्दचित्र छान रेखाटले आहे. प्रकाशचित्रांबद्दल काय बोलावे? तीही सुंदर आणि उत्कृष्टच. पेसो म्हटल्यावर जुने वेस्टर्न सिनेमे डोळ्यांसमोर येतात. एका सिनेमात फ्रॅन्को नीरो त्याला पकडून देणार्याला पोलीस ५००० पेसोचे बक्षीस लावले आहे अशा अर्थाचे पोस्टर रस्त्यावर पाहातो. त्यावर तो खडूने आणखी पाचदहा शून्ये काढून किंमत वाढवतो. वरील प्रकाशचित्रांची किंमत अशीच वाढवावीशी वाटते. एल कलाफाते प्रकाशपाटीचे चित्र आणि रेलिंग लावलेल्या पाण्याकाठीच्या मातीतल्या सज्जाचे वरून घेतलेले दृश्य फारच आवडले. धन्यवाद.

अमीबा 31/07/2025 - 04:11
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे, दोन्ही अतिसुंदर! एक शंका - स्थानिक भाषा येत नसताना भाषान्तरासाठी चॅटजीपीटी वा तत्सम अँप कितपत उपयोगी येऊ शकतात, याबद्दल आपण पडताळणी केली होती काय?

किल्लेदार 01/08/2025 - 18:13
मी गुगल ट्रान्सलेट ॲप फोन मधे टाकून घेऊन गेलो होतो. बऱ्यापैकी फायदा झाला. माणूस समोर असेल तर ठीक आहे पण कुठे फोन करायचा असेल तर भयंकर पंचाईत होते. एअरपोर्ट वरून हॉटेल ला फोन केला होता तेव्हा एसी मधेही घाम फुटला होता.

ग्लेशियरच्या गावाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. वातावरण आणि खाद्यसंस्कृती पाहता जाण्याची इच्छा तर नाही, पण लेख आणि चित्रांनी हा निसर्ग पुरेपूर अनुभवता आला.

रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं.

कवडसे-२

राजेंद्र मेहेंदळे ·

आर्या१२३ 28/07/2025 - 14:48
अप्रतिम ! छान आहेत आठ्वणी. हे वाचुन श्री दादा गोडसे यांना पाहण्याची ईच्छा निर्माण झाली. माझ्या एका मैत्रीणीच्या माहेरी पुज्य श्रीधर स्वामींची उपासना आहे. तिने पद्मावती मठातला फोटो पाठवला. ती सांगत होती की पद्मावतीचा मठ पुर्वी त्यांचाच होता. त्यांच्या नंतर तो वरदपुर संस्थानाने घेतला.

कवडसे पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे. ======================== तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!