Skip to main content

bhatakanti

सहा कोवळे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/07/2025 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 29/04/2025 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ, आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली. २०१५ – गुरदासपूर, ७ ठार, पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी ! २०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले, कडिनिंदा नी निर्बंध…. २०१६ – उरीत १९ जवान मारले, सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले! २०
काव्यरस

(गोट्या)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/06/2023 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वाट्या सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्‍या गोट्या दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या
काव्यरस

वडीलांना काव्यसुमनांजली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2021 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या जाण्याने जग सुने झाले सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे || किती आठव काढावी किती स्मृती जपावी त्या आठवांनी डोळा पाणी आले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१|| रिक्त झाली तुमची नेहमीची जागा तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२|| कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३|| आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही काळाने तुम्हाला असे अकाली का नेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४|| (मा
काव्यरस

बाल वयातील प्रेम

लेखक Shubham vanve यांनी गुरुवार, 17/06/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
छोठ होत वय माझ, ‌ पण खोट नवत प्रेम प्रिये . माध्यमिकच्या त्या बाल वयातील तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये . तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये. तुज पाहता शाळेच्या आदोगर, हृदयाचा पडायचा टोल प्रिये. तुझ्या येण्याने Classroom म्हणजे, जणू बहरलेला मोगराच प्रिये तुझ्या समवेत class मधे Inglish History ही वाटे गोड प्रिये. तू नसताना Class मध्ये संगीतही वाटे बोर प्रिये. हे सर्व घडायचे माझ्या मनी पण, तुज कोठे होते ठाऊक प्रिये. ✍️#Shubham_1way
काव्यरस

मृत्यूची सय ही निमित्तमात्र

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/03/2019 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र मग पुढे असं होतं की .. दोन श्वासातले अंतर वाढत जातं. डोळ्यामधली चमक विझत जाते. ओठावरचं हसू निवत जातं... अग्नीचा स्पर्श ही समजत नाही .. आणि नातलग लागतात गुण आठवायला.. कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला .. असं होण्या आधी भरभरून जगायचे.. मृत्यूची सय ही निमित्तमात्र.. पैजारबुवा,

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी बुधवार, 09/01/2019 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहील्या चार भागांच्या लिंक्स. सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.misalpav.com/node/43030 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.misalpav.com/node/43057 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43162 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43378 ------------------------------------------------------------------------ सकाळी ऑफीसमध्ये आल्या आ
Taxonomy upgrade extras