मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चांगल्या बातम्या - १

राघव ·

राघव 16/08/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव 16/08/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव 18/08/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव 09/10/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव 19/08/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. 19/08/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

राघव 21/08/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव 22/08/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव 28/08/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा 28/08/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव 06/09/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा 07/09/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 07/09/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव 23/09/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद 23/09/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव 24/09/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव 24/09/2025 - 20:05

अभ्या.. 23/09/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव 24/09/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर 13/10/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव 15/10/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव 25/11/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म 25/11/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव 26/11/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म 26/11/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र 26/11/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव 28/11/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २

लेखनप्रकार
नमस्कार! येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे. आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा. Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.

ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु 14/08/2025 - 09:37
श्री० गोडबोले, 'जन्मना जायते शूद्रः' हे स्मृतीवचन तुम्हाला ठाऊक असेलच. याचा अर्थ असा की मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो शूद्र असतो. मग त्याचे उपनयन होते तेव्हा तो पित्याच्या गोत्रात प्रवेश करतो (पहा- 'शूद्र पूर्वी कोण होते', बाबासाहेब आंबेडकर). मग तो ब्राह्मण-वैश्यादि वर्ण धारण करतो. आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे! त्यात आता गोत्र वगैरे गोष्टीची निरर्थकता पुरेशी सिद्ध केलेली असल्यामुळे त्याची आता त्याच्यावाचून उर्वरित आयुष्यात काहीही अडणार नाही. म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू! पण माझ्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता नाही, तिथेच सगळी गोची आहे. तेव्हा या संदर्भात काय करता येईल?

In reply to by युयुत्सु

तेव्हा या संदर्भात काय करता येईल?
म्हणजे ? तुमच्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता कशी मिळवून देता येईल असे विचारत आहात का ? तर माफ करा मी कायदे तज्ज्ञ नाही. ह्याबाबत मी काहीही मदत करू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे!
माझी समस्या आणखी वेगळी आहे. माझी मुंज झाली आहे पण सोडमुंज म्हणून एक प्रकार असतो तो झालेला नाही. सोडमुंज लग्नाच्या आदल्या दिवशी करतात म्हणे. माझ्या लग्नाच्या वेळेला सोडमुंज असे काही असते हे तर मी विसरूनच गेलो होतो. माझ्या आईच्या लक्षात होते (ते मला नंतर कळले) पण अशा गोष्टींवर माझा आणि आईचाही विश्वास नसल्याने तो विषय परत निघालाच नाही. दुसरे म्हणजे मुंज झाल्यापासून लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याश्रम. त्या काळात शिकून आपल्याला कमावायला आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला सक्षम करायचे आणि मग लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. म्हणजेच काय की गृहस्थाश्रमात असताना शिकणे अपेक्षित नसावे. आता माझ्या बाबतीत झाले असे की मी लग्न झाल्यानंतरही शिकतच होतो. इतकेच नाही तर बायको पण शिकत होती. आम्ही दोघे त्या दोन वर्षात वेगळ्या ठिकाणी राहायचो. म्हणजे आम्ही त्या आश्रम पध्दतीच्या नियमांचा भंग केला ना? बापरे... कुठे फेडायची ही पापं?
म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू!
मी सर्टिफाईड उजवा (पण सनातनी नक्कीच नाही) आणि लिब्राण्डू तर नक्कीच नाही :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 14/08/2025 - 11:59
बापरे... कुठे फेडायची ही पापं? तुम्ही पुरुष म्हणून मोक्षाच्या रांगेत लवकर नंबर लागायची शक्यता जास्त! तुमच्या पत्नीने, शिक्षणाच्या ओढीने आश्रम व्यवस्थेचे पालन केलेले नसल्याने मोक्षप्राप्तीची शक्यता कमी वाटते.

In reply to by युयुत्सु

मला खरेच उत्सुकता आहे की तुमचे हे असे आकलन कोणत्या वाचनाने झालेले आहे ! कृपया संदर्भ द्यावा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ? 2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी. हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही. 3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा. 4.तुम्हाला पाप म्हणजे काय माहिती आहे का ? तुमची पापा पुण्य इत्यादी व्याख्या कोणत्या वाचनावर आधारित आहे ? गृहस्थाश्रमात शिकणे हे पाप आहे असे तुम्ही कोठे वाचले ? तुम्हाला कोणी सांगितले ? 5. तुम्हाला खरेच जाणून घेण्यात रस आहे का निव्वळ विषयांतर करायचे आहे अन्य लोकांच्याप्रमाणे ? तुम्ही मनापासून प्रश्न विचारत असल्यास मी मनापासून अगदी प्रांजळपणे माझ्या आकलनानुसार उत्तर देईन. शिवाय माझी मते कोणालाही पटली पाहिजेत असा माझा अभिनिवेशही नाही. हां, निव्वळ टाइमपास करायचा असल्यास, आमचा पास. त्यापेक्षा आम्ही आम्ही आमचा लाँग वीकेंड वेगळ्या चिंतनात सार्थकी लाऊ.

In reply to by प्रसाद गोडबोले

1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ?
आपण असे करू शकतो असे प्रत्येकाला थोड्याबहुत प्रमाणात वाटत असावे. मात्र दुसर्‍या बाजूच्या व्यक्तीला मात्र समोरचा आपले पूर्वग्रह बाजूला करायला तयार नाही असे वाटत असावे. हे तुम्हाला किंवा अन्य कोणाला उद्देशून नाही पण एक जनरल गोष्ट लिहित आहे.
2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी. हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही.
मी कधी म्हटले तो विधी आईने करायचा असतो? सोडमुंज हा प्रकार माझ्या लक्षात नव्हता पण माझ्या आईच्या लक्षात होता. मुळात माझ्या लक्षातच नसल्याने तो करावा असे मी म्हणायचा प्रश्नच नाही. आईच्या लक्षात होते पण तिचा पण अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने तिने पण तो विषय काढला नाही. पण समजा तो विषय काढला गेला असता आणि माझी सोडमुंज झाली असती तर ती आईने केली असती असे मला वाटते असे कुठे लिहिले आहे? तो केला नाही केला तरी इतर कोणाला काही फरक पडतो की नाही हा प्रश्नच माझ्यासाठी गैरलागू आहे. कारण मलाच मुळात फरक पडत नाही.
3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा.
तसे नसेल तर उत्तम. मला वाटत होते की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार 'नॉन ओव्हरलॅपिंग' आश्रम आहेत. बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही. इंटरेस्ट वाटून त्यात झोकून द्यावे असे कित्येक विषय जगात आहेत. माझ्यासाठी असले विषय त्यातील नक्कीच नाहीत. कदाचित मी खूप खालच्या पायरीवर असेन ही शक्यता आहे पण सो बी इट :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रांजळ प्रत्युत्तराबद्दल धन्यवाद !
बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही.
इतकं सरळ साधं स्पष्ट बोलणं किती सोपं असतं ना . बघा आपल्या दोघांचाही वेळ वाचला. मला काय तुमच्या किंवा कोणाच्याच मानगुटीवर बसून "शिकच आता" असे सक्तीचे करायचे नाही. ज्याला हौस आहे तो करेल, हौस नाही तो करणार नाही. ह्याही प्रतिसादात तुम्ही गडबड केली आहेच खालची पायरी वरची पायरी वगैरे ज्याला संदर्भ कोणते ग्रंथ आहेत अन् कोणते वाचन आहे की नुसतेच ऐकीव पूर्वग्रह आहेत देव जाणे ! पण सोडा . अध्यात्म ही गती नसून स्थिती आहे त्यामुळे तिथे वर खाली अशा पायऱ्याच नाहीत. ज्याला कळायचं त्याला कळतं. बाकीचे उगाच विषयांतर करत राहतात. असो. दोघांचाही वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by प्रसाद गोडबोले

चुकीची दुरुस्ती वरील प्रतिसादात " समावर्तन हा संस्कार नाही." असे मी लिहिण्याच्या ओघात लिहून गेलो आहे. ह्यात काहीतरी गडबड होत आहे असे वाटल्याने काही शोधाशोध करून पाहिल्यावर लक्षात आले की समावर्तन हा 16 संस्कारांपैकी 1 संस्कार आहे. मात्र ह्या संस्काराचा लोप झाल्याने काही पाप लागते अशा अर्थाचे मला काहीही सापडले नाही. (अजूनतरी.) आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे तुम्ही हे काही मनातच नसल्याने तुम्हाला फरक पडत नाहीच. तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
चुकीचे सांगितले तरी फार टेन्शन घेऊ नका. मला झुमरीतलय्यामध्ये फारसा रस नाही त्यामुळे झुमरीतलय्याचे महापौर बबनराव झुंझारखाडे आहेत असे तुम्ही चुकून सांगितलेत आणि प्रत्यक्षात झुमरीतलय्याचे महापौर गुलाबराव काटेवाले आहेत असे सांगितलेत तरी तुम्ही मुळात चुकीचे सांगितले आहे हे मला कळायचेच नाही आणि कळले नाही किंवा झुमरीतलय्याचे महापौर कोण हे मला माहित नाही याचे फारसे वैषम्य मला नसावे :)

युयुत्सु 14/08/2025 - 09:53
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे ! स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे, या वर थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by युयुत्सु

स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे
मार्ग अनेक आहेत, मार्ग महत्वाचे नाही, गंतव्य प्राप्त झाल्याशी मतलब. बाकी साधुसंतात समाजात लोक जाती पाती वरून भेदभाव करतात, तुम्ही स्त्री पुरुष असा भेदभाव करत आहात, दोन्ही वृत्ती समानच. तरीही तुकोबांनी सरळ साधा सोपा मार्ग सांगितला आहे वरच . "नामस्मरण". नामस्मरणाचा अधिकार सर्वांना. ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ नामस्मरणाला दुषणे देऊन अन्य काही साधने करीन असे म्हणणाऱ्या व्यक्तीचा मार्ग अशक्यप्राय खडतर आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो मत स्त्री असो की पुरुष, शूद्र असो की ब्राह्मण. नामस्मरणाला दुषणे देणाऱ्या , थट्टा मस्करी करणाऱ्या माणसाचे तोंड देखील पाहू नये असे खुद्द तुकोबांनी सांगून ठेवले आहे. बाकी जनाबाई, बहिणाबाई, अक्का स्वामी , वेण्णास्वामी ह्यांचे अभंग , मार्गदर्शन पाहू शकता. मी ज्या अर्थाने स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्ष म्हणालो आहे त्या अर्थाचा एक बहिणाबाई ह्यांचा अभंग आहे तो हा पहा. भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥ वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥ भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥ भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥ चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥ भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥ बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥

In reply to by युयुत्सु

मस्तच ! जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling हे असे वाचन कधीही उत्तम ! आजचा सुविचार : वाचेल ते वाचेल.

In reply to by युयुत्सु

मस्तच ! जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling पेक्षा हे असे वाचन कधीही उत्तम ! आजचा सुविचार : वाचेल तो वाचेल.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 14/08/2025 - 10:38
हे पहा - "आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत ."

In reply to by युयुत्सु

सोत्रि 14/08/2025 - 15:35
अन्य वर्णाश्रमातील लोकांना ज्ञान व्हावे तरी कसे
गंमत म्हणजे, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी साक्ष कोणाची तर तुकोबारायांची, ज्यांची गाथा सनातन धर्मविरोधी ठरवून बुडवायला लावली होती. त्या तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती. - (अधर्मी) सोकाजी

In reply to by सोत्रि

तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती.
पुरावा काय पुरावा काय पुरावा काय ??? मी फार पुर्वी २०२० मध्ये तुकोबांचे निवडक अभंग https://www.misalpav.com/node/47002 असा लेखनाचा एक धागा सुरु केला आहे . तुम्ही वरील विधानाला समरथन देणारे तुकोबांचे अभंग तिथे पुराव्यादाखल टाकावेत ही कळकळीची विनंती आहे. तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार कित्येकवर्षे चालु आहे त्याला पुराव्यादाखल असा घाणेरडा अपप्रचार करणार्‍यांनी किमान काही तरी तुकोबांचे अभंग सादर करावेत . अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥ वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ तुकोबा अतिषय स्पष्टपणे वर्णाश्रम धर्माचे आचरण करा , विधीनिषेध पाळा असे म्हणत आहेत . तुम्ही लोकं जाणीवपुर्वक तुकोबांच्या नावावर काहीही खपवता हे फार वेदनादायक आहे . माझे लेखन, आणि त्यावर येणारे तुमचे हे असले प्रतिसाद. ह्या असल्या तुमच्या अपप्रचारला मी निमित्तमात्र व्हायला नको. बास झालं .

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 14/08/2025 - 18:29
सदर धागा # सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय असल्याने प्रतिसादही स्वान्तःसुखाय आहे, सबब पुराव्याच्या उत्तरदायित्वास नकार लागू! - (स्वान्तःसुखी) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार =)) 'सनातनी' लेंड्या टाकणा-यांना सगळं जग सनातनी दिसतं. संत तुकाराम हे 'सनातनी' होते अशा अपप्रचाला कोणीही बळी पडू नये म्हणून वाचकांना विनंती की, थेट तुकोबांची गाथा वाचावी. आजच्या काळात कोणासही बदनामी करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल. वाचकांनी आ.ह.साळुंके यांचे 'विद्रोही तुकाराम' ही वाचून काढावे. संत तुकारामांना विद्रोही का म्हटल्या जाते तेही लक्षात येईल. वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरापासून पासून ते संत तुकारामापर्यंत मोठा वारकरी संप्रदाय आणि थोर संत होऊन गेले. संत तुकाराम वेगळे आणि विद्रोही का वाटतात ते आजही तीनशे वर्षानंतर लक्षात येईल. समतेचा पुरस्कार करणे हा तत्कालीन व्यवस्थेने गुन्हा माणून त्यांच्या वह्या सनातन्यांनी इंद्रायनीत बुडवायला लावल्या. नशीब आपलं की त्यांच्या वह्या लोकगंगेने तारल्या. बाय द वे, 'गोबरयुगात' सनातनी सगळंच कसं श्रेष्ठ होतं, श्रेष्ठ ते आपलं म्हणनारे 'पोटूशी पुरुष' आंतरजालावर जागोजागी दिसतील त्यावर विश्वास ठेवू नका. 'बुडते हे जन देखवे न डोळा, येतो कळवळा म्हणनिया' श्रेष्ठ संत तुकाराम आधुनिक विचारांचे श्रेष्ठ संत होते. मोठा विषय. 'चिरगुटे घालुनि वाढविले पोट, ग-हवार बोभाट जनामधे लटिके चि डोहळे दाखवी प्रकार, दुध स्तनी पोर पोटी नाही तुका म्हणे अंती वांज चि ते खरी, फजिती दुसरी जनामधे' प्रतिसाद स्वातंसुखाय आहे, 'सनातनी' लोकांनी उपप्रतिसादाच्या लेंड्या टाकू नयेत. बाय द वे, अशा 'सनातनी आणि वांज पोटूशी पुरुषां' पासून वाचकांनी दूर राहावे, एवढीच विनंती. =)) -दिलीप बिरुट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 15/08/2025 - 19:21
संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल.
मी गाथा मंदिर दोन महिन्यांपूर्वी पाहिले...नाही वाचूनच काढले.तब्बल १/२ तास शांतपणे पाहत होते (एकटीच गेली असते तर कदाचित २ तास तरी अजून निवांत वाचले असते.) तुकारामांनी तत्कालीन कित्येक ढोंगी,अघोरी प्रथांवर घणाघाती वार केले हे लगेच समजले.खरचं ते विद्रोही होते. पण सर्वच संतांमध्ये जो गुण ठासून भरलेला असतो तो म्हणजे अव्यक्ताशी एकरूप तोही त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता तोहि वेदांचा अभ्यास न करता. माऊलीही तसेच,कल्पद्रुमाचिये तळी हे ढेरे यांचे माऊलींवरचे सुंदर पुस्तक वाचत आहे.माऊली स्वतः कौलमता परंपरेतील,त्यातही काही अघोरी प्रथा असायच्या पण माऊलींनी नीरक्षीरविवेकाने यांना दूर ठेवत शुद्धीकरण केले आणि भागवत धर्म सर्वांना खुला केला. या संतांच्या बदलानेच आजचा महाराष्ट्र घडला आहे,शुद्ध हेतू असल्यास माणसाने बदलाला ,बदल घडवायला घाबरू नये.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 14/08/2025 - 19:32
तुकोबारायांनी अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती - _/\_ त्यांची साक्ष याच हेतूने कुणी काढत असेल, तर रास्त आहे. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी, जातीय द्वेष पसरवण्यासाठी करण्यासाठी किंवा झुंडशाही बळकट करण्यासाठी तुकोबारायांची साक्ष काढली जाणे दुर्दैवी आहे. एरवी तर्क, बुद्धीप्रामाण्य वगैरेचा धोशा लावणारे आणि 'सिलेक्टिव रिडींगचा" निषेध करणारे या बाबतीत चिडीचूप बसतात हे अधिकच दुर्दैवी आहे. असो.

In reply to by सोत्रि

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू । अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप । दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती. -संत तुकाराम. -दिलीप बिरुटे

भृशुंडी 14/08/2025 - 22:57
सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे !
हे परस्पर ठरवून मोकळं झाल्यावर स्त्रियांनी काय करायचं? हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल? मोक्ष नको म्हणून बाजूला होईल.

In reply to by भृशुंडी

स्वधर्म 15/08/2025 - 14:45
>> हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल? नुकत्याच दुसर्‍या धाग्यावर आलेल्या अनुभवानुसार हे असं नाही, एवढेच म्हणतो.

भृशुंडी 15/08/2025 - 23:28
१. "पूर्वजांनी क्षयज्ञ व्यवस्था केली आहे, म्हणून ती खरी आणि योग्य आहे."/ बाबा वाक्यं प्रमाणं - आता पुरे. हे प्रकरण थांबवा. पूर्वजांनी तेव्हाच्या काळी शक्याशक्यतेची काही बांधणी करून एक व्यवस्था निर्माण केली (करण्याचा प्रयत्न केला). तो आता १०००-२००० वर्षं किंवा आणखी जास्त कालावधीनंतर योग्य आहे - हे "पटवून" घेण्याचा आग्रहाभिनिवेश कशाला? २. संस्कृती प्रवाही असते, किंबहुना असावी. अशा प्रवाहाला पुन्हा मूळ जागी नेण्याचा उपद्व्याप कशासाठी? तेही मूळ काय- हेच ठाऊक नसताना. १०० ग्रंथ लिहिल्याने मूळ संस्कृतीचं साकल्य जपलं जाऊ शकत नाही. त्याचे थोडेफार अंश आपल्याला त्या शाब्दिक रचनेत दिसतात आणि त्यालाच प्रमाण मानून पुढे जाणं हे फारच ढोबळ आहे. ३. अध्यात्म आणि व्यवहार/कायदे ह्यातला फरक - एक तर हे अध्यात्म -म्हणजे मोक्षप्राप्ति इत्यादीपुरतं सीमित असू दे किंवा मग सरळ कायद्याची भाषा असू दे- कलम/अ‍ॅक्ट अशा तपशीलात बोला. दोहोंची सरमिसळ नको. अध्यात्मप्राप्तीसाठी जनांनी (विषेश करून ज्यांना नियम बनवण्याचा हक्क नाहे अशांनी) कसं वागावं आणि काय करावं हे सांगणं ढोंगी आहे. असो. प्रतिक्रियेची अपेक्षा नाही, स्वांतसुखायची "आमची कुठेही शाखा नाही"वाली पाटी अगोदरच वर लावली आहे.

In reply to by भृशुंडी

कॉमी 15/08/2025 - 23:45
परफेक्ट. एकाच वेळी म्हणतात मटेरियलीस्ट जीवनात मुक्ती नाही. त्याग करा. पण स्त्रियांचा मोक्ष कशात म्हणे तर लगीन करण्यात. ख्या ख्या ख्या.

पण संन्यास घेणे आवश्यक आहे. रादर संन्यास घेतलात तरच तुम्म्ही "मोक्ष" ह्या अवस्थे प्रत पोहोचणार आहात , संन्यास न घेता , नुसतेच निपुत्रिक मेलात तर , भले मग तुम्हाला कितीही ज्ञान असो, तो मोक्ष नाहीच ,
मागे मी मिपावरच एके ठिकाणी लिहिले होते की माझा भारतीय लेखकांविषयी एक आक्षेप असतो आणि तो म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे आहे हे स्पष्टपणे कधीच न लिहिता ते गोलमटोल लिहितात. मोक्ष म्हणजे एखादी जागा आहे का की जिथे एकदा गेले की आपले सगळे काही झाले? आणि तिथे जायला संन्यास घेतलाच पाहिजे, संन्यास घेतला नसेल तर मुलगाच (मुलगी पण चालणार नाही) नसेल तर तुम्हाला नो एन्ट्री. ते काय दिल्लीतले रेस्टॉरंट आहे का भारतीय वेशभूषा असेल तर प्रवेश नाकारणारे? मोक्ष ही एक अवस्था आहे असे तुम्हीच लिहिले आहे ते अधिक लॉजिकल वाटते. आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी इतक्या पन्नाशसे साठ अटीशर्ती असतील तर जल्ला नको तो मोक्ष असेच अनेक सामान्यांना वाटायची शक्यता आहे. निदान मला तरी वाटते. त्यापेक्षा मग परदेशी तत्वज्ञ वेन डायर म्हणतात ते अधिक पटते- Wayne Dyer आणि कोणते चॉईस करायचे? तर एकहार्ट टोलींनी म्हटल्याप्रमाणे वर्तमानात राहा Eckhart Tolle आणि मनात उठणार्‍या विचारांच्या कल्लोळापासून आपल्याला मुक्त करणे. Eckhart Tolle कदाचित तुम्ही ज्याला संन्यास म्हणत असाल ते यापेक्षा वेगळे नसेलही. वेन डायर, एकहार्ट टोली वगैरे परदेशी तत्वज्ञांचे लेखन वाचताना असे जाणवते की कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याच तत्वज्ञानात सांगितलेल्या आहेत- त्या गोष्टी कुठेतरी रिलेटेबल वाटतात पण कितीतरी अधिक सोप्या आणि अशा अटीशर्ती न लादता. तुम्ही हे सगळे लिहिले आहे- अमुक केले नाही तर मोक्ष मिळायचा नाही, मोक्ष मिळायला संन्यास घेतला पाहिजेच पण तुम्हाला मोक्ष म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय अभिप्रेत आहे हे लिहायला नको का? इथे परदेशी तत्वज्ञ अधिक भावतात. कोणतेही जडजंबाल शब्द न वापरता आपण काय करायचे ते ते लोक बरोबर सांगतात. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या तत्वज्ञानात ते सांगितलेले नाही असे मला म्हणायचे नाही. माझा मुद्दा या अशा लेखांविषयी आहे.

युयुत्सु 16/08/2025 - 12:34
श्री० गोडबोले आणि भगव्या गॅंगमधील यच्चयावत् सनातनी यांचा गोग्गोड वैचारिक गैरसमज झालेला असतो, तो समजाऊन सांगण्यासाठी एका प्रसंगाची आठवण सांगणे आवश्यक आहे. छद्मविज्ञानभूषण, फेकाफेकचूडामणी डॉ० प० वि० वर्तक यांच्या अनुयायांनी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि सत्कार आयोजित केला होता. त्यांच्या सत्काराला करवीरपीठाचे शंकराचार्य मुख्य पाहूणे म्हणून बोलवले होते. मला त्या दिवशी प्रचंड कंटाळा आला होता, कशातही मन रमत नव्हते म्हणून जरा ऑफ-बीट करमणूक करून घेण्य़ासाठी मी वर्तकांच्या सत्काराला हजेरी लावण्य़ाचे ठरवले. मी बालगंधर्ववर पोचलो तेव्हा मला काही धक्के बसले. मला वाटले की फार गर्दी नसेल, पण अमाप गर्दी लोटली होती. माझ्या "आउटलायरत्वाची जाणीव" होऊन मी शरमिंदा झालो आणि शेवटच्या रांगेत कशीबशी जागा मिळवली आणि करमणुकी ऐवजी सहनशीलतेची परिक्षा दिली. त्या कार्यक्रमात शंकराचार्यांनी बोलता-बोलता एक वाक्य टाकले. ते म्हणाले, "परंपरेत सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत." माझ्या दृष्टीने यच्चयावत सनातनी लोकांच्या भाबड्या श्रद्धांना बळकटी देणारे हे वाक्य आहे. साहजिकच अशा श्रद्धांच्या मशागतीने समाजाची दोन अभेद्य गटात विभागणी होऊन एका कटु संघर्षाला तोंड फुटते, ज्याने सध्या परमोच्च बिंदू गाठला आहे. गोडबोल्यांसारखे लोक उतरंडप्रधान कुटुंब/समाजव्यवस्थेत जो त्याग सदस्यांवर लादला जातो त्याचे केवळ समर्थन करून थांबत नाहीत तर उदात्तीकरण करण्यात आपले सर्वस्व पणाला लावतात आणि हे करताना एक अक्षम्य चूक करतात. ती अशी, आपण सकाळी उठतो आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने आपले मन प्रसन्न होते. पण प्रत्यक्षात तो किलबिलाट पक्ष्यांच्या भीषण जीवनसंघर्षाची सुरुवात असते. सर्व सनातन्यांची छाती इतिहासातील सोन्याच्या पानांनी भरून येते, तेव्हा लादलेल्या त्यांगांचे (पक्षी-शोषणांचे) आक्रोश (किलबिलाट?) त्यांना कधीच ऐकू येत नाही. मग त्यांना जे परंपरा-पुरस्कृत उतरंड, तसेच परंपरेने शोधलेली उत्तरे स्वीकारू शकत नाहीत, ते धोकादायक वाटायला लागतात. मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...

In reply to by युयुत्सु

सोत्रि 16/08/2025 - 19:22
मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...
तंतोतंत! - (आउटलायर) सोकाजी

आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत .
म्हणजे काय? तर थोडक्यात मी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय करायचे हे दुसरा कोणीतरी सांगणार. मला काय करावेसे वाटते, माझी इच्छा काय आहे, माझी आवडनिवड कशात आहे या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारायच्या. आणि परत दुसर्‍या तोंडाने हिंदू धर्म कसा सहिष्णू आणि व्यक्तीस्वातंत्र्य जपणारा म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची. बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते. सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. सगळ्यांना न्युक्लिअर फ्युजन आणि फिशन वगैरे गोष्टी कळायची गरज नाही हे नक्कीच. एखाद्याला त्या क्षेत्रात गती आहे की नाही हे तपासायचे परीक्षा वगैरे मार्ग आहेत. ते सगळे फाट्यावर मारून कोणाला कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही हे दुसरा कोणीतरी सांगणार आणि सगळ्यांनी त्याप्रमाणेच वागायचे या रचनेला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 17/08/2025 - 16:21
>> बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना? ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच. मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 19/08/2025 - 18:16
वरील प्रतिसादात 'मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' या वाक्यात माझी चूक झाली आहे. स्वभाव म्हटल्यामुळे तो प्रतिसाद व्यक्तीशी जोडला जातो. चंद्रसूर्यकुमार यांच्या स्वभावाविषयी काहीच म्हणायचे नव्हते. योग्य वाक्यरचना अशी हवी होती: 'मूळ विचारसरणी तीच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' तसेच प्रतिसादाचे शीर्षक 'मूळ विचारसरणी' असेच हवे होते. त्याबद्दल दिलगिरी.

In reply to by स्वधर्म

हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना?
यात एक मोठा फरक म्हणजे डापु हा वर्ण जन्माने येत नाही आणि त्या विचारांमुळे किती नुकसान झाले आहे हे समजल्यावर माणूस त्या तथाकथित वर्णातून बाहेर पडू शकतो. म्हणजे डापु हा स्टॅटिक प्रकार नाही तर डायनॅमिक आहे तर जन्माने मिळणारे वर्ण हे स्टॅटिक आहेत.
ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच.
हे बरोबर उलटे आहे. म्हणजे एखाद्याला आधी डापु ठरवून मग ते कसे असतात, काय विचार करतात हे मनाचे श्लोक तयार करत नाही तर मला अभिप्रेत असलेली डापुपणाची लक्षणे एखाद्यात दिसली तर त्याला डापु म्हणतो. त्यातूनही वर म्हटल्याप्रमाणे काही लोक आयुष्यभर डापु असतात तर काही त्यातून बाहेर पडतातही. बाहेर पडलेल्यांमध्ये काही अंशी मी स्वतः पण आहे. म्हणजे मीच माझे पूर्वीचे विचार तपासून बघतो तेव्हा पूर्ण डापु होते असे म्हणणार नाही पण डापुपणाकडे काही अंशी झुकणारे नक्की होते. माझ्या जवळच्या अती जास्त प्रमाणावर हिंदू-हिंदू करणार्‍या नातेवाईकांविरूध्दची ती प्रतिक्रिया होती असे आता मला जाणवते. पण नंतर तटस्थपणे विचार केल्यावर इतर कोणी काही केले म्हणून त्याविरूध्द प्रतिक्रिया येणे योग्य नाही हे मला पण जाणवले. आजही- अगदी याच लेखावरील प्रतिक्रियेत लिहिले आहे की मला भारतीय लेखकांपेक्षा परदेशी लेखक अधिक आवडतात कारण भारतीय लेखक अनेकदा नक्की काय करायचे हे न सांगता गोलमटोल काहीतरी सांगतात. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या लेखकांना आमचा धर्म किती महान, आमची संस्कृती किती महान या वेदकालीन जंगलात भटकायचा इन्सेन्टिव्ह असतो आणि अनेकदा ते तसे करतातही. त्यात मुळातला मेसेज बाजूला पडतो. त्या तुलनेत मी वाचतो त्या परदेशी लेखकांना भारतीय संस्कृती किंवा हिंदू धर्म किती महान याच्या चिपळ्या वाजवत राहायचे काहीही कारण नसते. त्यामुळे ते लेखन अधिक प्रभावी वाटते (मला तरी). हे वेदकालीन जंगलात भटकणार्‍यांना मान्य होईल का? मी असे काही लिहिले की डापुवाले मला त्यांच्यातला समजतात आणि त्यांच्यावर टिका केली की एकदम सनातनी लोक मला त्यांच्यातला मानतात. पण असो. सो बी इट.

युयुत्सु 17/08/2025 - 10:48
सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. या विधानाचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो. आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्‍हाईताने ठरवणे चुकीचे आहे. एका तरूण डॉकटरशी गप्पा नुकताच मारायचा योग आला. मग मी माझे निरीक्षण सांगितले (की डॉ०ना सजग आणि हुशार रूग्ण आवडत नाहीत). सदर डॉ०ने सांगितले की, "नव्या पिढीतले डॉ० बरेच वेगळे आहेत. त्यांना पेशंट वाचून आला असेल तर फारसे वावडे नसते. ही काळाची अपरिहार्यता आहे आणि डॉ०नी स्वीकारणे आवश्यक आहे. काय वाचायचे ते वाचा आणि विचारायचे ते विचारून घ्या. काही प्रॉब्लेम नाही". हे ऐकल्या क्षणी माझ्या मानगुटीवरचा वेताळ "उल्लसित" मनाने झाडावर जाऊन लोंबकळू लागला...

आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्‍हाईताने ठरवणे चुकीचे आहे.
तेच तर म्हणत आहे. हे तिर्‍हाईताने ठरवू नये. पण त्या बरोबरच ज्ञानोपासना करायची फार इच्छा आहे पण त्या विषयात गती नसेल तर अशा व्यक्तींचे काय करायचे? मला समजा न्युक्लिअर फिशन आणि फ्युजनमध्ये सखोल ज्ञान घ्यायची इच्छा फार आहे पण १२ वी च्या बेसिक कॅल्क्युलसमध्येच मी अडखळत असेन तर त्यापेक्षा कितीतरी जास्त क्लिष्ट गणिते कशी समजणार आहेत?तशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. सगळे सचिन तेंडुलकर बनू शकत नाहीत कारण तितके पुढे जाण्यासाठी मुळात त्या विषयात गती असावी लागते. ती गती आहे की नाही हे कसे जोखायचे? तर प्रवेश परीक्षा किंवा अन्य जो काही मार्ग असेल तो. आता समजा एखादा सचिन तेंडुलकर बनू शकत नसेल पण रामानुजन बनू शकत असेल तर त्याला क्रिकेटऐवजी गणितात ज्ञानोपासना करायचा मार्ग मोकळा असला पाहिजे. तू रामानुजन बनू नकोस तर तू अमुक एक म्हणून जन्मलास किंवा आयुष्याच्या अमुक एक टप्प्यावर तू आहेस म्हणून कुमार सानू बन असे इतरांनी मला सांगायचे नाही. मुख्य आक्षेप त्याला आहे. बाकी वर उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे न्युक्लिअर फिशन आणि फ्युजन वगैरे विविध क्षेत्रातील क्लिष्ट संकल्पनांचा ९९.९९% लोकांना त्यांच्या त्यांच्या कामात काहीही उपयोग नसतो. त्या संकल्पना नाही समजल्या तरी हरकत नाही. मात्र एखाद्याला त्या विषयात गती असेल आणि आवड असेल तर त्याला अडवायचा अधिकार इतरांना नाही हे पण तितकेच खरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे. तुम्हाला पटत नाही तर शांत राहू शकता. मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे. सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना. एका मोठ्या पुरोगामी नेत्याच्या घरात तंत्रमंत्र वाले इंद्रजालचा फोटो काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता आव्हाड साहेबांच्या घरी शंकर महाराजांचा फोटो एका पत्रकाराने फोटोत पकडला होता विश्वंभर चौधरींच्या घरी सत्यनारायण की मुंज तत्सम कोणतातरी विधी बहुधा लपून झाला होता आणि हे त्यानी स्वतः मान्य केले. प्रभू श्रीराम काल्पनिक पात्र आहे, वारकरी वैष्णव नसतात म्हणणारे लोक वारीत चिपळ्या घेऊन राम कृष्ण हरी म्हणतात. त्यांना हे सगळे विसंगत वर्तन चालते पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.

In reply to by अप्पा जोगळेकर

आग्या१९९० 19/08/2025 - 11:45
यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.
बरोबर आहे. वैचारिक दिवाळखोरीने श्रीमंत असल्यास परवडू शकते.

In reply to by अप्पा जोगळेकर

युयुत्सु 19/08/2025 - 15:25
पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले. विज्ञाननिष्ठ म्हटल्यावर चिकित्सा ही अपरिहार्य ठरते. तीची जर अ‍ॅलर्जी असेल तर तो तुमचा पराभव आहे. सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना. हे जरी नसले तरी तितकेच प्रतिगामी घातक विचार परत समाजात रूजवले जात आहेत आणि ते घातक आहे. २०२४ निवड्णूकीच्या आधी हा उन्माद पराकोटीला पोचला होता. मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून मुलींना शिकवू नका (शिकलेल्या मुलींशी कसं वागायचे याबद्दल चकार शब्द कुणी काढलेला आठवत नाही. मुलीने माहेरचे पाश तोडायचे पण मुलाने आईचा पदर सोडायचा नाही!), "कन्यादाना" सारख्या टाकाऊ आणि अपमानकारक विधींचे उदात्तीकरण, पश्चिमेकदून आलेल्या ज्ञानाबद्दल विष भिनविणे, पेटंट इकॉनॉमी ऐवजी टेंपल इकॉनॉमीला उत्तेजन, विश्वगुरु सारख्या भ्रामक कल्पना, तसेच मुक्त कलाविष्कार आणि चर्चा यावर अर्धवट डोक्याच्या लोकांकडून नियंत्रण ठेवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न केला गेला. आणि इतकं करून ही एका प्रश्नाचं उत्तर मिळालच नाही ते नाहीच - सनातन धर्माची कोर्टात/संसदेत टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही. गंमतीचा भाग असा की मंदबुद्धी लोकांचा लोकाचार जितका सनातन आहे, तितकीच विज्ञाननिष्ठांची चिकित्सकबुद्धी सनातन आहे. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले. कारण साधे आहे - असे लोक नियंत्रणात ठेवायला सोपे असतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना...
हे नक्की का? वोक लोक किती प्रमाणावर आहेत हे माहित आहे ना?
उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे
मी उलट म्हणतो. डापुंना ठोकायला इतर कितीतरी जास्त व्हॅलिड मुद्दे आहेत. त्यावर त्यांना होईल तितके मी पण ठोकत असतो. पण तसे करताना उगीच काही असमर्थनीय गोष्टींचे समर्थन करायला गेल्यास आपणच उलट त्यांना हिंदूंना ठोकायची संधी देत असतो.
मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे.
मान्य. तसे असेल तर नरेटिव्ह तयार करताना आपल्या बळकट आणि डापुंच्या कमकुवत मुद्द्यावर नरेटिव्ह बनवायला हवा. ते न करता आपण आपल्याच कमकुवत बाजूचे समर्थन करत राहिलो तर आपल्याच बाजूचे नुकसान होते.
सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना.
नाहीच. पण म्हणून तमुक आश्रम पाळणे २०२५ मध्ये कसे योग्य हे पण बोलायची गरज नाही ना? असो.

स्वधर्म 17/08/2025 - 16:06
गोडबोले यांनी हा लेख लिहून फारच उपकार केले आहेत. आणखी असे लेख लिहून प्रबोधन करावे अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आमच्या सांगलीचे प्रा. जगदीश काबरे म्हणतात की आपल्या मुलांना, खास करून मुलींना आपले धर्मग्रंथ वाचायला जरूर प्रोत्साहन दिले पाहिजे. मग त्यांना कळेल की ते किती विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर आहेत. अशा लेखाने गोडबोले यांनी ते साध्य केले आहे.

In reply to by स्वधर्म

नक्की लिहित राहीन. मला जे जसे समजते तसे मनापासून मी लिहितो. कोणाला पटो अथवा न पटो. धर्मग्रंथात जसे लिहिलं आहे तसे मी लिहितो, चुका झाल्यास प्रांजळपणे कबूलही करतो. ज्यांना माझे निष्कर्ष चुकीचे वाटतात ते मला अधिक माहिती संदर्भासहित देतात तेव्हा ते वाचून मी माझे आकलन बदलतो किंवा सुदृढ करतो. ज्यांना धर्मग्रंथ विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर वाटतात त्यांना हिंदू धर्माचा त्याग करायची संपूर्ण मुभा, स्वातंत्र्य आहेच ! त्यांना प्रोत्साहनच आहे माझे. सुखाने निश्चिंत होऊन धर्मांतर करा ! खुश राहा. सनातन धर्म व्यवस्था ... आहे हे असे आहे ... Take it or leave it. मी नक्की लिहित राहीन !! धन्यवाद

अर्धवटराव 18/08/2025 - 23:56
एक उणीव जाणवली.. धर्मशास्त्राची उकल करताना नाममार्गाचा उहापोह सुरु झाला त्यावेळी हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीट ला घातल्या सारखी वाटली.. अपघाताची शक्यता…

In reply to by अर्धवटराव

सोत्रि 19/08/2025 - 13:58
अर्धवटराव,
"हां पण हे झालं पुरुषांच्यासाठी. स्त्रीयांसाठी काय ? "
खरतर इथून हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीटला गेली आणि खाचखळग्यांचा प्रवास सुरु झाला. नाममार्गाचा उहापोह झाला तेव्हा गाडी पंक्चर झाली होती. - (खाचखळग्यांचा प्रवास आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव 19/08/2025 - 20:29
गाडी बहुतेक इन्डी़केटर वापरतच नाहिए :) स्वान्तसुखाय लेखन असल्यामुळे लेखकाला ति लिबर्टी आहे म्हणा. उपोत्घाताशिवाय कादन्बरी प्रकाशीत व्हावी तसे काहिसे झाले आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय __________________________________________ "प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?" "भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !" "ख्या ख्या ख्या " "ख्या ख्या ख्या " गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा ! तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच !

गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी

Bhakti ·

उत्तम ! एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ? माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा. बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti 13/08/2025 - 14:48
अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).
बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.
मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात. १ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि २.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि
ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही. तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.
अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे

गीतारहस्य -प्रकरण८ ( पान क्र. १०२-११८) **विश्वाची उभारणी व संहारणी सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे. प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे.

इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी

कुमार जावडेकर ·

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती / खुलासा

विजुभाऊ 14/08/2025 - 12:44
या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या.
पहिली गोष्ट मान्य आहे. पण दुसरी गोष्ट अमान्य. लिखाणात विनोद आढळला नाही.( सरकाष्टीक म्हणजे कुजकट पुणेरी की कसा म्हणतात तो देखील नाही) ही चूक कशी दुरूस्त करणार ते सांगा.

भाग १: स्वातंत्र्यदिनाची कल्पना इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: स्वातंत्र्यदिनाची तयारी स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे समजावण्यापासून जिथे तयारी आहे तिथे हे खायचं काम नव्हतं. पण यमदेवांना त्यावरही उपाय सुचला. त्यांनी गांधीजींवर ही जबाबदारी सोपवली.

खरडवहीतील ‘भेळ’ !

हेमंतकुमार ·

गवि 11/08/2025 - 15:34
सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप काळानंतर तुमचे नाव लेखक कॉलममधे बघून फार आनंद झाला. लेख सुंदर.. अगदी रिलेट करण्यासारखा. आमच्या शालेय जीवनापासून आताच्या कॉन्फरन्स आदि प्रवासात या खरडण्याची सदैव साथ मिळाली आहे. पाकळ्या पाकळ्या आणि त्याचे फूल.. ही एक सुपरहिट खरड. गाण्यांच्या दोन चार ओळी, वहीच्या पानांवर कोपऱ्यात थोडे थोडे बदलते असे काटकी सदृश मनुष्य चित्र. मग फ्लिप बुक सारखी पाने टर्र करून पलटली की सलग चल- चित्र.. इतरही बरेच काही. नववीत एका सॅडिस्ट सरांना एखाद्या पोराची वही उचलून त्यातील शेवटची पाने जाहीर वाचून दाखवण्याची करमणूक सापडली होती. एखादे भाषण किंवा कॉन्फरन्स मधील प्रेझेंटेशन याचे मोठे अपयश म्हणजे टेबला टेबलावर पडलेल्या रायटिंग पॅडस मधे प्रेक्षक आणि श्रोते लोकांनी गिरबटलेली टकलू माणूस, फुले पाने, रांगोळ्या..

वरील प्रमाणेच म्हणतो, पहीले लेखकाचे नाव बघुन आनंद वाटला. लेख आवडलाच आणि स्वतःच्या शालेय आणि कॉलेजिय जीवनाशी रिलेटही करता आला. याच खात्यात पुस्तकातील माणसा/बायकांना काढलेल्या दाढीमिशा, कुंकू, वेण्या वगैरेही धरावे काय? तीही एक प्रकारे क्रिएटिव्हिटिच, नाही का? याचेच मोठ्या प्रमाणावरचे रुप म्हणजे बाथरूम लिटरेचर, शाळेच्या मुतारीत, आडनिड्या भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे आणि लेखन, जोड्या लावा वगैरे वगैरे बरेच काय काय आठवले या निमित्ताने :)

भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये वह्या शिक्षकांकडे नियमित तपासणीसाठी जात असल्याने हे सगळे उद्योग रफ वही म्हणून वेगळ्या वहीमध्ये चालायचे. वरचं ते हात न उचलता, आणि रेघ न गिरवता काढण्याचं कोडं चांगलं आठवतंय, आणि ऑफ तासांना फुली-गोळ्याने भरलेल्या वह्या आहेत. पुस्तकांना मात्र विद्रुप करण्याची इच्छा कधी झाली नाही.

हेमंतकुमार 11/08/2025 - 16:21
जुने जाणते मिपाकरहो, उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !! होय, मी मोजून सव्वा वर्ष ठरवून येथे लेखनविश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे एकंदरीत आंतरजाल वावर ठरवून कमी करणे. दोन संस्थळांवर विहार करतांना दुप्पट वेळ जातो. त्यातून माझे बरेचसे लेखन माहितीपर असल्यामुळे प्रश्नोत्तरांचा भागही बऱ्यापैकी असतो; त्यात दमछाक देखील होते. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात पलीकडे प्रमाणात लेखन आणि इथे फक्त निवडक वाचनाचा अधूनमधून आनंद घेतला. असो. तुम्हा सर्वांच्या प्रेमपूर्वक स्वागतामुळे हुरूप आलेला आहे हे नक्की. आपणा सर्वांचेच प्रतिसाद रोचक आणि रंजक आहेत हे वे सां न ल. 😀 आता एखाद्या खरड-चित्रमय प्रतिसादाची पण वाट पाहतो. 🤚

Bhakti 11/08/2025 - 21:15
मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या मागील पानांवर चांदण्या(हात न उचलता स्टार काढणे),फुलं असायची.थोर व्यक्तींची नावं,उगाच सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. आता भेळ जास्त करत नाही,पण डायरीतल्या बऱ्याच पानांवर अगदी लहानपणापासून सुविचार म्हणजे "You can do it",Don't get scare,Be strong ,Goal -focus-dream ही अशी वाक्य आपोआप कोपऱ्यात ,समोर ,वरती लिहिली जातात. १० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत "श्रद्धा ,माझी तुझ्याशी कट्टी आहे." "शुभ्रा,तू माझ्याशी बोल" असे काही आहे ;)

हेमंतकुमार 12/08/2025 - 07:25
*
१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत
लहान मुलांची भेळ म्हणजे तर आनंदयात्राच ! .. *
थोडासा इरसालपणा
होय, अ ग दी !

तुमचं आमचं सेम असतं. आपली अनुपस्थिती जाणवली. मस्तच, आठवणी जागवल्यात. आम्ही एक ते दहा आकडे वहीच्या मागच्या पानावर काढून मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

छान, जोरदार पुनरागमन. अभिनंदन. भेळ आवडली. माझ्या शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा होता. वेगवेगळे ध्वनी निर्माण करून ठराविक, कंटाळवाणे शिकवणार्‍या शिक्षकांना सतावणे वा कंटाळा घालवणारी करमणूक निर्माण करणे हा उद्योग होता. १. डेस्कच्या लाकडी सांध्यात ब्लेडचा तुकडा अडकवून तो वाद्याच्या तारेसारखा छेडला की टाँय टाँय असा एकतारीचा आवाज येत असे. पण तो कोठून येतो कसा येतो हे सरांना काय, इतर मुलांना पण कळत नसे. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. हे ठराविक मुलांचे गुपित होते. २. शाळेत जमिनीवर शहाबादी फरशी होती. त्या जुन्या काळचे शर्टाचे काढता येणारे प्लॅस्टीकचे बटण फरशीवर ठेवून चपलेच्या वा बुटाच्या चामड्याच्या सोलने दाब देवून बटण सरकवले की कर्र् र्र र्र र्र .....च्च च्च .... चुईक ...च्युईक ..... असा जोरदार कर्कश ध्वनी येत असे. हाही कोठून येतो कसा येतो हे मात्र कळत नसे. हेही ठराविक मुलांचे गुपित होते. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. काही शिक्षक दुर्लक्ष करीत तर काही शिक्षक भलत्याच पण द्वाडपणात प्रसिद्ध मुलांना पकडत आणि शिक्षा करीत. त्या मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. पण करमणूक होऊन कंटाळा निघून जात असे. ३. काही मुले मुद्दाम कंपास पेटी जोरात जमिनीवर आपटत तर चुगलीखोर मुलांचे टिफीन पळवून जोरात आवाज करून पाडले जात. मग ज्याचा डबा त्याला शिक्षा होई. मग एक कंपासपेटी/डबा पडल्यानंतर आणखी काही कंपासपेट्यांना/डब्यांना पण पडावेसे वाटे. ३५ मिनिटे कंटाळवाणी जाण्यापेक्षां एकदोन वेळा असे घडणे चांगलेच! नाही? व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच! नाही? मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

हेमंतकुमार 12/08/2025 - 19:14
आपुलकीयुक्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद ! ..
मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.
खासच. हा खेळ बहुतेक सर्वांनी खेळलेला असतो. **
शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा . . . व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच!
आ हा हा ! अशा खोड्या हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. लिहा कोणीतरी.

शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही.

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि 12/08/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत 12/08/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव 13/08/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त 13/08/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?

नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

षड्रिपु - एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·

गामा पैलवान 10/08/2025 - 21:15
प्रगो, जबराट चिंतन आहे. ऐसेचि लिहिते राहो. मला वाटतं की मत्सर सर्वात छुपा म्हणूनंच सर्वात प्रबळ शत्रू आहे. कामापासनं सगळ्यांची सुरुवात जरी होत असली तरी तरी लक्ष्य ( फोकस ) मीच असतो. पण मत्सराच्या बाबतीत फोकस माझ्यावरून उडून इतरांवर जातो. तोही नकळत. लै ड्यांजर भौ ! आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:21
उत्तम लेख आहे. षड्रिपुंपासून मुक्ती, म्हणजे एकाअर्थी सर्व सिद्धी मिळवणे. त्यासाठी सदा 'प्रसन्न' असणे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" तर मन सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रत्यक्ष-प्रायोगिक-व्यवहार्य उपाय सांगणारे ( - ज्यांना 'नामस्मरण' पटत/जमत/आवडत/शक्य नसेल, आणि मानसशास्त्रात रुची असेल, त्यांचासाठी-) एक अत्यंत उपयोगी पुस्तक हे आहे: . अ‍ॅमेझॉनवर सुमारे ३८० रुपयात उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

युयुत्सु 11/08/2025 - 08:49
"आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !! "आता बास. पुरेसे आहे इतके" हा विचार मी वयाच्या ~२५ वर्षापूर्वी स्वीकारला तेव्हा मला समाजाने खूप मनःस्ताप दिला (तसा तो या ना त्या स्वरूपात अजुन ही चालू असतो). शेपूट तुटलेल्या कोल्ह्यांना शेपूट असलेल्या कोल्ह्यांचा राग येतो. त्यांना सर्वांनीच शेपूट तोडून टाकावे असे वाटते. ज्यांना थांबता येत नाही, त्यांना "आता बास. पुरेसे आहे इतके" असा विचार करणार्‍यांचा राग येतो.

In reply to by चित्रगुप्त

नका आठवण करून देऊ काका. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी न्यू यॉर्क मध्ये होतो. माझा अक्षरश: दिनक्रम होता हा ! इथं भारतात किमान मी जे लिहितोय ते मला तरी शक्य आहे अशी आशा आहे. अमेरिकेत शक्यच नाही ह्या rat race मधून बाहेर पडणे. तिथं षड्रिपुंचे जाळे इतके स्ट्राँग आहे की त्यातून बाहेर पडणे निव्वळ अशक्य आहे. आणि त्यात जे अडकले आहेत ते "हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग" आहे हे स्वतःचेच स्वतःला समजून सांगत आहेत. Consumerism can never lead to a content life. Most of the luxuries, and many of the so called comforts of life, are not only indispensable, but positive hinderances to the elevation of mankind. With respect to luxuries and comforts, the wisest have ever lived a more simple and meagre life than the poor. - Henry David Thoreau

Bhakti 12/08/2025 - 10:49
प्रगो चांगलं विवेचन केले आहे. पण सर्वच रिपुंमध्ये स्त्रीयांना खुपच स्वार्थी वर्णन केल्या सारखं वाटतं.तुम्ही वर्णन केलेल्या स्त्रीया १८००-१९०० मध्ये सापडत असतील.आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही. आणि मला तुमचे दुसऱ्या धाग्यावरचे मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. अहो तुमच्यासारख्या हुशार लोकांनी बदलत्या काळानुसार बदल मान्य केले पाहिजे.(माफ करा मला खूप खेद वाटलं वाचून) ज्ञान,कर्म,भक्ति,योग हे मार्ग सर्वांसाठी खुले आहेत,यात स्त्री पुरुष दोघेही आचरण करून शांती घेऊ शकतात.

In reply to by Bhakti

ठीक आहे भक्ती. सर्वच विचार पटले पाहिजेत असा माझा अट्टाहास नाही.
आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही.
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे. अनेक पराकोटीच्या स्वार्थी स्त्रिया मला माहिती आहेत. उदाहरणे लिहित बसलो तर विषयांतर होईल. तरीही एक उदाहरण लिहितो जे अत्यंत जवळच्या मित्रासोबत झाले आहे , होत आहे - त्याच्या पत्नीने डिव्होर्स साठी अर्ज केला, 6-8 लाख रुपये "सेटलमेंट" म्हणून मागितले , तेही द्यायला तो तयार झाला तेव्हा अचानक कोर्टात फिरली अन् म्हणाली की मी मानसिक दृष्ट्या तयार नाहीये. मी मित्राला विचारलं की बाबारे, पण तू कशाला डिव्होर्स वगैरे भानगडीत पडतो, तो म्हणाला - तीने लग्नाआधी तिच्या प्रियकरासाठी कर्ज काढले होते , लग्नानंतर देखील ती त्याचे हप्ते भरत आहे. मी म्हणाली बरं ठीक आहे पण किमान मुलाच्या कस्टडी साठी तरी प्रयत्न कर , आपल्या संस्कृतीनुसार मुलं ही पूर्णपणे बापाची असतात. बापाचाच अधिकार असतो. त्यावर तो काही बोलला नाही. ( आता तुम्हाला समजायचं ते तुम्ही समजून घ्या.) आणि ही एक गोष्ट नाहीये अशी किमान अजून 3 -4 उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. जास्त लिहू शकत नाही कारण ह्या अत्यंत खाजगी गोष्टी असतात, बोलून पुरुषांचीच बदनामी होते आणि बायका ह्याचाच गैरफायदा उचलतात. बाकी दुसऱ्या धाग्यावरील चर्चा तिथे केल्यास उत्तम. इथे विषयांतर होणार नाही. मी उदासीन अवस्थेत रहात असल्याने हे सगळं फार "वरून" पहात असतो. 18 व्या वर्षी मातृत्व हा विचार तुम्हाला सहन होत नाही ह्या बद्दल खंत वाटते. 18व्या वर्षी मातृत्व हे निसर्गाचे डिझाइन आहे, निसर्गाची तशी इच्छा नसती तर मुली 24 व्या वयात आल्या असत्या , 14व्या नाही. आणि जग फार बदललं आहे ताई. बाहेर अशा अशा घटना घडत आहेत की तुमचा विश्वास बसणार नाही. माझे घर एका शाळेजवळ आहे. मी घरी जात असताना मला 2 मुली दिसल्या , युनिफॉर्म वरून 8वी 9वी मधील असाव्यात असा अंदाज बांधला मी. एकदम गालातल्या गालात हसत लाजत बघत होत्या. मी चकित होऊन विचार केला हे काहीतरी भलतं चालू आहे म्हणून मी इकडं तिकडे पाहिलं तर , माझ्या मागून 2 छपरी पोरं, मिसरूड देखील न फुटलेली , एक्टिवा वर आली, पोरी पटकन त्यांच्या मागे बसल्या, अन् माझ्या कडे पाहून हसत हसत सुसाट निघून गेले. मी आवाक होऊन पाहत राहिलो . हे असं जग बदललेले आहे. 18 व्या वर्षी असं casual sexploration करण्यापेक्षा रीतसर लग्न करून गृहस्थाश्रम करणे हे कधीही उत्तम असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात जे असे sexploration करत आहेत त्यांना माझा मुळीच विरोध नाही. समाजात अशा मुलींची गरज आहेच . ;) बाकी बरेच आहे बोलण्यासारखे. बोलू एकेक करून.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/08/2025 - 18:44
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे.
आधी होते कोशात,बायकांनी असंच वागायचं, असं नाही,ढिमकं फलानं आता तर कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू आहे तेही खुप सुंदर, खुप मोठं ;) ;) वाईट उदाहरणे मलाही माहिती आहे पण दुरुक्ती कशाला करायची.सगळीकडे स्त्रिया वगैरे कशाला सरसकटीकरण कशाला??असो. छान , नेहमीप्रमाणे अद्भुत लिहा!

In reply to by Bhakti

सरसकटीकरण ह्या लेखाच्या संदर्भाने , षड् रिपु आणि त्यांच्या स्त्री आणि पुरुषांमधील भिन्न भिन्न अभिव्यक्ती मधून प्रकट होणे हे मी माझ्या निरीक्षणावरून मांडलेले आहे. मी ह्याला जनरलायझेशन न म्हणता on an average असे म्हणेन. आणि हो मला फुलपाखरे मनापासून आवडतात. आमची अवस्था "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नहाने" अशीच आहे ;) त्यामुळे माझा फुलपाखरांना विरोध नाहीच. ( असो. जाऊ दे, जास्त लिहू शकत नाही. )

In reply to by Bhakti

स्वधर्म 13/08/2025 - 15:48
>> मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. वरील प्रतिसादात तुंम्ही स्त्रियांची बाजू अगदी नेमकेपणाने मांडली आहे. सनातनींना अर्थातच स्त्र्यियांना देवी मानून, मखरात बसवून त्यांचे संरक्षण करायचे असते. असं वागवलेलं सनातनी स्त्र्यियांना आवडतं व त्यांना त्याचा गौरवही वाटत असतो. परंतु तुंम्ही इथे त्यांच्या लग्नाच्या बाबतीतल्या स्वयंनिर्णयाबद्द्ल जरी थेट बोलला नसला तरी स्त्रिया आता बदलल्या आहेत व लवकर लग्न करणे, मातृत्व वगैरे आपणांस सहन होत नाही असे म्हटले आहे. सनातनी पुरुष मुलींकडे एक संपत्ती, जिच्यातून लवकरात लवकर सुटायचे आहे अशी जोखीम म्हणून पाहतात हे धाग्यातील विचारांमधून स्पष्टच आहे. मुलीला जगात स्वतः चं स्थान निर्माण करणं व त्यासाठी तिला लग्नाच्या आधी हवा तेवढा वेळ देणं हे सनातनी विचारात बसत नाही. टिळकांचाही मुलींचे संमतीवय ९ वरून १३ करायला विरोध होता. तसेच त्यांनी 'कुणब्यांना व स्त्रियांना राष्ट्रीय सभेत पाठवून तिथे काय नांगर चालवायचा आहे का पोळ्या लाटायच्या आहेत?' असे उद्गार काढले होते हे आपणांस माहितच असेल. बाकी तुंम्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 13/08/2025 - 15:58
म्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते. परफेक्ट.. म्हणून तर सनातन्यांचा महात्मा फुल्यांना विरोध. त्यांनी वृत्तीचा उल्लेख केला की सन्यातन्यांनी जातीवर घ्यायचे आणि त्यांच्यामुळे मिळालेले फायदे चोखत वरुन जातीयवादी म्हणत झोडपायचे हे वारंवार दिसत आले आहे.

In reply to by स्वधर्म

धन्यवाद स्वधर्म ! तुमच्याकडून टीका करणारा प्रतिसाद दिसला की मला शाब्बासकी मिळाल्याचा आनंद होतो ! No sarcasm intended. खरंच धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/08/2025 - 16:39
मी धाग्यात काय लिहिलंय ते बघतो, तुंम्ही 'कुणी' लिहिलंय ते बघता. माझा फोकस मुद्द्यावर असतो. तुम्ही शक्यतो व्यक्तींवर रोख ठेवता, त्यांना गटात टाकता, त्यांना काय काय म्हणत असता. तुम्ही लिहिलेलं कुणाला समजलं नाही म्हटलं की तुंम्हाला ग्रेट वाटतं, म्हणून तुंम्ही मग त्यांची प्रशंसा सुरू करता. मी लिहिलेलं कुणाला समजलं नाही तर मला तो गौरव न वाटता उणीव वाटते. फर्क साफ है| असो.

In reply to by स्वधर्म

फर्क साफ है| >>> अगदी अगदी. म्हणूनच तर म्हणालो की मला तुमचा प्रतिसाद शाब्बासकी वाटतो ! अवांतर: बाकी ह्या लेखनात संमती वय हा मुद्दाच नव्हतो. ते भक्तीताईंनी केलेलं विषयांतर होते. तो मूळ धागा युयुत्सु ह्यांचा असून अन् त्यावरील माझा प्रतिसाद ह्या इथे आहे - http://misalpav.com/comment/1196962#comment-1196962

In reply to by स्वधर्म

Bhakti 13/08/2025 - 18:14
होय होय आत्मभान जागृत झाली आहे.आणि अक्षरशः सनातनी पुरुषांची मानसिकताही पाहिली,अनुभवली आहे.मला एकच मुलगी म्हणून सनातनींनी एकटी मुलगी हट्टी होईल वगैरे म्हणून अजून अपत्य पाहिजे अस टोमण्याने सांगायचा प्रयत्न केला ,अरे तुम्ही सांभाळायला येणार का नंतर (असं मनातच हसून म्हटलं)(प्रगोने तिकडे ४ अपत्य पाहिजे असं लिहिलंय ..हे राम ;)) नोकरी सोड इ.अजून खुप किस्से आहेत ;)But I am daughter of strong mother!!! नाही बधणार या भुलभुलैय्याला! खरंय अशा पुरूषांनी बायकांनी कर्मकांडातच गुरफटून राहायला पाहिजे,ती त्यातच गेली तर फरक पडणार नाही तिला 'देवी' करतील. आता टिळकांनी बद्दल, भारतीय अध्यात्माचा अभ्यास हा मला लहानपणापासून करायचा होता.गीतारहस्यापर्यंत शुद्ध बुद्धीने पोहचायला प्रगोमुळेच जमलं.अध्यात्मात रूची असल्याने त्याचे लेख आवडायचे.एका ठिकाणी त्याने नमूद केले होते,"गीतारहस्य" वाचले पाहिजे. जानेवारी वाचायला सुरुवात केली,अहाहा! 'फिटे अंधाराचे जाळे,झाले मोकळे आकाश!" अशी अवस्था झाली.सारे सारे प्रश्न मिटले. मग टिळकांविषयी उत्सुकता जागृत झाली.भारतभूमी धन्य झाली आहे अशा महान रत्नामुळे!!दोन मासिकं त्यांच्या कार्याविषयी घेतली आहेत.त्यांच्यावरचा 'होमरूलचा' लेख तुम्ही वाचला असेलच. आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते.माझी तर लायकीच नाही अशा नेत्यांबद्दल असं काही लिहायची. महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. एकंदरीत मला ठोकळ्यासारखे /पूर्वग्रहदूषित विचार कधीच करता येत नाही.

In reply to by Bhakti

अभ्या.. 13/08/2025 - 18:31
महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. वाहवा.... आणि हे मनापासून आहे. वाचलेच पाहिजे. वाचले, समजून घेतले/नाही समजले आणि आवडले/न आवडले हे टप्पे पाहिजेतच. संविधान लिहिणार्‍या आंबेडकरांना हेच तर अपेक्षित होते. छोट्या मुलीलाही शुभेच्छा

In reply to by Bhakti

स्वधर्म 13/08/2025 - 18:38
>> आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते. ठीक आहे, त्यांनी स्त्रियांविषयी आणखी काय लिहिलंय ते तुंम्ही दुसरी बाजू म्हणून सांगा. समजून घ्यायचा प्रयत्न राहील. पण ठोक स्वरुपात कोणतीही व्यक्ती पूज्य किंवा तिरस्करणीय नसते असे मत आहे. त्यामुळे टिळकांच्या इंग्रजांविरूध्द केलेल्या असंतोषाच्या कार्याचा आदर आहे. महात्मा फुले यांनी त्यांना देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी १० हजार रुपयांची मदत केली होती. महात्मा फुले जेंव्हा गेले, तेंव्हा केसरीने त्यांची बातमी मात्र छापली नाही. कितीही अध्यात्मावर पकड असली तरी मनाचा उमदेपणा नाही. तोच प्रकार वेदोक्त प्रकरणात, पंचहौद प्रकरणात. टिळकांच्या बाबत या सगळ्या बाजूसुध्दा माहित असल्याने, तसा भक्तीरस पाझरू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. बाकी प्रगो अनेकदा अभिमानाने स्वतःला सनातनी म्हणवून घेतात. तुंम्हाला सनातनी पुरूषांची चीड आहे असे तुंम्ही लिहिता. बुध्दी मात्र आमची शुध्द नाही म्हणता. त्याचा आदर करून थांबतो.

In reply to by स्वधर्म

आता एवढे विषयांतर झाले आहे त्यात अजून थोडी भर म्हणून ही विनंती करतो की वेदोक्त प्रकरण, पंचहौद प्रकरण ह्या दोन्ही विषयांवर आपण दोन स्वतंत्र , छोटेखानी का होईना लेख लिहावेत. मला उत्सुकता आहे तुमचे ह्या प्रकरणाचे आकलन आणि अभ्यास समजून घेण्याची . कारण माझ्या अल्पशा अभ्यासानुसार ह्या दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. आणि तिसरा स्वतंत्र लेख ताई महाराज बलात्कार प्रकरण ह्यावर लिहिल्यास मी आपल्या धाडसाचे कौतुक करेन. कारण टिळकांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यावर बलात्कार सारखा नीच आरोप करणाऱ्या स्त्रीला कोणाचे पाठबळ होते हे देखील समाजापुढे येणे तितकेच गरजेचे आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/08/2025 - 22:02
>> दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. हे आधीच ठरलेले आहे, त्यामुळे काहीही लिहिले तरी फरक पडणार नाही हे स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे आपली विनंती मान्य करू शकणार नाही. कारण मत आधीच ठरवले गेलेले असेल तर चर्चेत कितीही मुद्दे आले तरी त्याचा उपयोग नसतो. उदा. वरती भक्ती यांनी स्वतः च सनातनी पुरुषांची मानसिकता अनुभवून त्यांना भान आले आहे, त्यांनी बंडही केले आहे असे लिहिले. पण तशीच मानसिकता टिळक यांची दाखवून दिली, तर माझी बुध्दी अशुध्द असे म्हटले. हे माझ्यासाठी अतिशय खेदकारक व अनाकलनीय आहे. जर माझी माहिती खोटी दाखवून दिली असती, तर मी माझे मत नक्कीच दुरूस्त केले असते. शिवाय टिळक त्यांच्या काही प्रतिगामी मतांमुळे लहान ठरत नाहीत की त्यांचे योगदान कमी होत नाही. तेवढी परिपक्वता मला अपेक्षित होती. पण आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. दे जस्ट शूट द मेसेंजर, मग सत्य किंवा वस्तुस्थिती काहीही असो. माझी या चर्चेतून निवृत्ती _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 14/08/2025 - 09:46
आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. बाडीस अशी स्थिती लोकमान्य टिळकांबदलच नव्हे तर सुभाष बोस, भागात सिंह, गांधीजी पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांबद्दल दिसून येते. यामुळे कोणत्याही नेत्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसलेले आहे.

In reply to by स्वधर्म

https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf - हे पुस्तक प्रताधिकार मुक्त आहे. आपापल्या कुवतीनुसार योग्य अयोग्य ठरवावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 13/08/2025 - 17:40
सेम पिंच,आणि तुझ्या या धाग्याने माझ्या गीतारहस्य धाग्याची जाहिरात केली आहे :) वाह =)))) धागा धागा खेळायला आवडतं नाही.आपण काय रोबोट आहोत का? एका धाग्यापुरते स्वीट ऑन/ ऑफ व्हायला. समग्र आक्षेप/कौतुक आवडतं.मला असंच आवडतं. सॉरी युयुत्स काका ;) ;)

छळताना कोणालाच सोडत नाहीत. वाईट चांगले सगळीकडेच, भेदाभेद करणे वादाचा विषय होऊ शकतो. बाकी काळानुसार जगरहाटी बदलणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥

थोडा कळला, थोडा डोक्यावरुन गेला. पण नेहमीच "अरे हा तर माझ्याही पुढे गेलाय" असे अनुभव येत असल्याने फार मनाला लावुन घेतले नाही. कुठेतरी थांबायला हवे हे मात्र खरे. नाहीतर ती सुर्यास्तापर्यंत जमिनीसाठी धावणार्‍या माणसा सारखी अवस्था व्हायची. नीमकरोली बाबांच्या डायरीतील पान आवडले. जाताजाता--एकदा त्यांचा एक भक्त त्यांना भेटायला आला. त्याच्याकडे आर्सेनिक या विषाची बाटली होती. बाबांनी त्याला विचारले की काय आणले आहे? त्याने बाटली दाखवली. त्यावर बाबांनी त्यातील मूठभर तोंडात टाकले. सगळे लोक घाबरुन रडु लागले की हे आता मरणार. त्यावर बाबांनी एक ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले काही होत नाही. बोलो राम राम. पुढे ते वाचले.

विजुभाऊ 13/08/2025 - 17:11
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपु जिवंत मानवाला आवश्यक आहेत. काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार ( ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे) क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते. वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते. मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल. मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल. त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी. अर्थात त्यांचा अतिरेक वाईटच. तसा पाणी पिण्याचा अतिरेकही वाईट जीवघेणा ठरू शकतो

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 13/08/2025 - 17:26
मी पण हेच लिहीणार होतो. पण टंकायचा कंटाळा आला. या भावनांवर मेंदूतील उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. तो विकसि त नसेल तर प्रश्न निर्माण होतात. उपाग्रखण्डाचा विकास ताण, आहार, ध्यान, कौशल्य विकास इ० वर अवलंबून असतो. ताणाचा उपाग्रखण्डावर घातक परिणाम होतो आणि भावनिक नियंत्रण अवघड बनते.

In reply to by विजुभाऊ

निदान सांसारीक मानवासाठी
+१ हे अगदी बरोबर आहेच . संसाराचा निषेध कोणत्याही सनातनी साहित्यात मला तरी आढळलेला नाही आजवरच्या वाचनात. अर्जुनाला 4 पत्नी होत्या, कृष्णाला किमान 8. क्रोधाच्या आवेशात कृष्णाने भीष्म पितामहांच्यावर चक्र उगारल्याच्या प्रसंग सुप्रसिद्ध आहेच. आणि लोभाच्या बाबतीत बोलायचे झाले तर खांडव वन दहन प्रकरणात दोघांनी मिळून नागांचा संहार केलेला स्पष्ट दिसून येतो तोही इंद्रप्रस्थ आणि त्या जमिनी करिता! कृष्णार्जुनाची उदाहरणे दिली कारण ती पटकन सुचली म्हणून , एरव्ही जवळपास सर्वच सनातनी हिंदू साहित्यातील राजांची उदाहरणे थोड्याफार फरकाने देता येतील. शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धके मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।” (रघुवंशम्–1.6) आणि इथेच खरे गमक आहे. संसार, प्रपंच कोठवर करत रहायचे ? ह्या सहा रिपूंच्या चक्रात किती आणि कसे खेळत रहायचे ह्याची नियम रीतसर घालून दिलेले आहेत ज्याला वर्णाश्रम व्यवस्था म्हणाले आहे. These people have made frameworks for everything. सुचत जाईल तसे लिहित जाईन . प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 14/08/2025 - 16:14
त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी.
सांसारिक मानव षडरिपुनी ग्रासलेला असतो. पण ते अगदी आवश्यक नाहीत, सांसारीक मानवासाठीसुद्धा आणि मुमुक्षुसाठीही.
काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार
संसारात (जन्मृत्युच्या जंजाळात) अडकून राहण्यासाठी पुनरुत्पादन कारणीभूत आहे, पर्यायाने काम, त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी काम ह्या रिपूवर विजय मिळवावा लागेल. (तसंही, फक्त वंश पुढे चालवायचा म्हणून एका अपत्याला जन्माला घालून थांबल पाहिजे, तसं न होता आमोदासाठी कामाच्या आहारी जाण होत)
क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते.
बरोबर उलट आहे, क्रोधामुळे निर्णय क्षमता हरवून बसते, क्रोधाच्या भरात घेतलेले निर्णय रियॅक्शन असते रिस्पॉन्स नसतो.
वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
वैयक्तिक मोह स्वार्थाला जन्म देतो त्यामुळे योग्य आणि यथार्थ प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल.
मत्सर ( ईर्ष्या) ह्यामुळे घेतलेला ध्यास उत्तमतेचा ध्यास नसतो, दुसऱ्याच्या आनंदाकडे किंवा क्षमतेकडे बघून येणाऱ्या नकारात्मकतेने घेतलेला ध्यास असतो.
मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल.
मदमस्त लीडरशीपमुळे अनागोंदी होईल. (उदा. विजय माल्या). - (मुमुक्षू) सोकाजी

कॉमी 13/08/2025 - 22:14
लेखातले स्त्रियांविषयक विचार निव्वळ TRP साठी लिहिलेले वाटले. उगी ओढून ताणून. तसा फारसा लेखाच्या मूळ विषयाशी संबंध नाही. आता स्त्रीला कामेच्छा जास्त का पुरुषाला ह्यावर परिच्छेद पाडण्याचे प्रयोजन समजले नाही. त्यामुळे इंटरनेट वर ज्याला रेजबेट म्हणतात तसले लिखाण वाटले. एक उदाहरण बघू-
१. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! (...)अनेक मित्रांमध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि आजवर तरी लोकांनी एकच पहिल्या पर्यायाची निवड केलेली आहे. दुसरा पर्याय निवडणारा अजुनतरी मला कोणी भेटालेला नाही. असो.
ह्या असो नंतर वरचा स्त्री का पुरुष जास्त कोण कामुक हा थ्रेड पूर्णपणे फेकून दिला आहे आणि मूळ टायटल वाला रिपू खाली काही वाक्यात संपवला. बरेचसे विचार हास्यास्पद आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कामुक असतात हे उदाहरण म्हणून घ्या.

विंजिनेर 13/08/2025 - 22:55
काय रे गोडबोल्या, स्त्री-पुरूषांच्या कामेच्छांची मोजणी करायला तू काय तिथे कंदील पकडून उभा होतास की काय? झालंच तर मत्सर - दोन-चार सासु-सुनेचे पिक्चर पाहून आणि चार दिवस न्युयॉर्क मध्ये राहुन हिरवा माज दाखवला की "मत्सराची भावना पुरूषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी असते" अश्या पिंका टाकायला मोकळा झालास वाट्टं? तीच गोष्ट लोभाची - तूला तुझ्या आयुष्यात असलेल्या (किंवा येतील अशी लोभी आशा असलेल्या) स्त्रियांची हवी ती हौस-मौज पुरवता पुरवता जेरीस आल्यानंतर इथे येऊन त्यांच्या नावाने खडे फोडतोस होय? शिवाय मत्सराचा संबंध कामुक समाधानाशी जोडतोयस - तुझं बोळा तुंबलेला दिसतोय - चिल मार, अंमळ प्रतिसाद आणि ट्यर्र्पीसाठी उगाच प्रक्षोभक आचरट लेख पाडायचा अन् काय. उगीच मिपावर लेख लिहून आपण योगी महर्षि असल्याचा आव आणू नकोस.

In reply to by विंजिनेर

धाग्यातील विषयांवर स्वतःची मते मांडायचे सोडुन , वैयक्तिक टिप्पणी , तीही खालच्या थराला जाऊन केलेली आहे स्पष्ट . हे मिसळपावच्या धोरणात बसत नाही. बाकी संपादक कारवाई करतील योग्य ती. तुम्ही तुमची संस्कृती दाखवुन दिलीत हे मात्र एक झाले ! २

In reply to by प्रसाद गोडबोले

विंजिनेर 13/08/2025 - 23:44
स्वतःची मते मांडायचे स्वतःची मते मांडायचे
प्रतिसादात वैयक्तिक सोडून इतरांची मतं मांडत नाही मी
खालच्या थराला जाऊन केलेली आहे
लेखाच्या थराला जाऊन टिप्प्णी केली असं म्हणायचंय का? माझ्या संस्कृती मिपावरच्या सवंग लेखाला शाब्दिक चपराक देऊन ठरण्याइतकी उथळ नाही रे....

सुबोध खरे 14/08/2025 - 10:08
विंजिनेर साहेब पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते मग कर्कश्य बोलावे काय निमित्य? वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही. षड्रिपू नसलेली माणसं एक तर संत असतात किंवा मनोरुग्ण. सामान्य माणूस नव्हे. आपण या दोन्हीत नाही तेंव्हा हा विषय काथ्याकुटासाठी उत्तम आहे. प्रगो यांची बरीचशी मते मला सुद्धा पटत नाहीत. त्यात अध्यात्म जास्त आहे आणि सत्य कमी आहे. त्याचे खंडन सहज करता येईल. पण त्यासाठी वैयक्तिक पातळीवर उतरणे बरोबर नाही

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 14/08/2025 - 15:49
वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही.
डॉक, नक्की ना? - (युयुत्सूंच्या धाग्यांवरील प्रतिसादात सभ्यपणा शोधणारा ) सोकाजी

In reply to by सोत्रि

सुबोध खरे 14/08/2025 - 19:45
माझा असभ्य खालच्या पातळीचा प्रतिसाद ससंदर्भ दाखवून द्या हि नम्र विनंती आहे. याउलट त्यांनी अनेक वेळेस पातळी सोडून माझ्यावर टीका केली आहे तरी मी संयम च बाळगलेला आहे.

मारवा 17/08/2025 - 20:00
लोभ आणि मोह हे एकच आहेत त्यात धर्मशास्त्र लिहिणारे जे कोणी होते त्यांची पुनरुक्ती झालेली आहे असे नेहमी वाटते. फरक स्पष्ट स्वच्छ काटेकोर नाही. अर्थात काही फरक त्याने पडत नाही अजून एक विरोधाभास एकीकडे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे असा ही गौरव आहे. हाच काम रिपु म्हणजे शत्रू पण आहे आणि पुरुषार्थ ही आहे. एकूण धार्मिक साहित्यात विसंगती आणि पुनरुक्ती अतार्किकता असल्याशिवाय ते धर्मग्रंथ या पदाला प्राप्त होत नाही. दुसरे टिळक हे अत्यंत सनातनी मागास विचार करणारे होते हे त्यांनी त्यांच्या काळाच्या आसपास जगलेल्या सुधारकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरून घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. त्याहून रोचक.म्हणजे टिळक स्वतः खोत होते खोती संदर्भातील टिळकांची भूमिका तर चक्क स्वार्थी म्हणावी इतकी संकुचित होती. पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत असो अजून एक क्रोध काम यांना एक मोठे उत्क्रांतीमूल्य आहे. अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. सदरील काम क्रोध या मानवी नॉर्मल भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि नकारात्मक आहे . स्वधर्म यांनी टिळकांचा दाखवलेला दाखला अचूक आहे .

In reply to by मारवा

अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. - उत्क्रांतीवाद हि थिअरी (मराठी शब्द?)आहे, सिद्धांत नाही. अशा बऱ्याच वेगवेगळ्या थिअरीज आहेत. शेतीचा शोध ८००० वर्षाम्पूर्वी लागला अशीसुद्धा एक थिअरी आहे. मास्क लावला कि कोविड पासून बचाव होतो अशीसुद्धा एक थिअरी सांगितली गेली होती. सिद्धांत proven असतो. उदा - पृथ्वी सुर्याभोवती फिरते.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/08/2025 - 19:35
"पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत" आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते. आणि तसे केल्यास आपल्याकडे अस्मितेची गळवे ठसठस करू लागतात. मामला दंगलीपर्यंत जाऊ शकतो यातून लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, भगतसिंह, गांधीजी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून श्रीमती इंदिरा गांधी, श्री नरसिम्ह राव, अटळ श्री बिहारी वाजपेयी डॉ मनमोहन सिंह आणि श्री नरेंद्र मोदी यांचीही सुटका झालेली नाही. आणि आपली रेष मोठी करण्यासाठी दुसरी रेष लहान आहे दाखवण्यातही अहमहमिका असते. आपण मिठाई खावी, कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. - श्री व्यंकटेश माडगूळकर

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 20/08/2025 - 20:43
हा खरा खरे डॉक्टरांचा प्रतिसाद. उमदा, अनुभवी, सर्वांगिण आणि लॉजिकल. आम्हाला हेच डॉक्टर चांगले माहितेत. . डॉक्टरसाहेब नका ते बरनॉल आणि इनो वाटप केंद्र चालवू. प्रतिसादातूनही उगा वस्सकन अंगावर आल्यासारखे वाटता. ;)

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 23/08/2025 - 09:52
मला असे प्रतिसाद देण्याची अजिबात हौस नाही. परंतु मिपावर तीन चार व्यक्तिमत्वे अशी आहेत कि ज्यांना कोणत्याही गोष्टीत मोदीद्वेष आणल्याशिवाय जेवण जात नाही. अशा लोकांना केवळ अशीच भाषा समजते. क्लिंटन हे फार सहनशीलतेने अशा लोकांच्या प्रतिसादाला मुद्देसूद उत्तरे देत असतात. पण हे लोक सुधारण्यातले नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण people will accept what they want to accept. कालच एक बाई आल्या होत्या ज्यांना पाळीचा त्रास होता. मागच्या डिसेंबर मध्ये आपल्याला कर्करोग होण्याची बरीच शक्यता आहे असे जीव तोडून सांगितले असताना सुद्धा त्या गेले ८ महिने होमिओपॅथीची औषधे घेत होत्या त्याचा काहीही फायदा झाला नाही म्हणून काल परत आल्या. आता जी शक्यता होती ती वस्तुस्थितीत रूपांतरित झालेली आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. कालही त्यांना परत स्त्रीरोगतज्ञाकडे जायला सांगितले आहे. पुढचे त्यांच्या नशिबावर ! इतके स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगूनही लोक ऐकत नाहीत याची आता सवय झाली आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते.
आयडी हॅक झाला की काय.. =)) -दिलीप बिरुटे

# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय
षड्रिपु - एक चिंतन
रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु. आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. १. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! पण काम ह्या शब्दाचे बोली भाषेतील भाषांतर सेक्स अर्थात संभोगाची इच्छा असे केल्याने त्यातील मूळ अर्थ काहीसा अलभ्य होउन जातो.

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

मार्गी ·

मार्गी 23/08/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा 25/08/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी 04/02/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस 04/02/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी 12/02/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.

सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती‌ होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.

आव्वाज कुणाचा?

राजेंद्र मेहेंदळे ·

संपूर्ण इतीहास थोडक्यात मांडलाय. खरेतर याला संवादिनी ची बखर म्हणतत येईल . १९८७ मधे महू ,म प्र मधे होतो. दहा नंतर एस टि डी स्वस्त म्हणून शनिवारी लाईन लावायचो.

गवि 08/08/2025 - 21:01
अतिशय उत्तम आढावा.. हा काळ, त्या काळातले सर्वकाही आणि त्यापूर्वीचे आणि आजपर्यंतचे सर्वकाही नुसतेच वापरणे नव्हे तर त्यात काही ना काही योगदान देत आलेली एकमेवाद्वितीय पिढी म्हणजे Gen X.. आमची.. एकाच पिढीत आणि एकाच आयुष्यात सर्वाधिक जास्त बदल पाहिलेली. तूर्त पोच. आणखी बरेच काही आठवले या निमित्ताने.

अभ्या.. 08/08/2025 - 22:47
तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले. थोडा ग्याप पडला सर. म्हणजे एक पायरी राहिल्यासरखी वाटली. १९९८ ला रात्री एस्टीडी बुथवर मीटर बघत बोलाय्यचे लोक तेंव्हा काहीजण घरात अँटेना लावून ते ५ कीमी च्या अंतरात चालणारे कॉर्डलेस बाळगायचे. आणि त्याच वर्षी मुंबईच्या पेपरात "कोल्हापूरचे प्रसिध्द उद्योगपती संजय घोडावत(स्टार उद्योग) ह्यांचा मोबाईल फोन (पोलिसांच्या वीऑकीटॉकीसारखा दिसणारा, मोटोरोला कंपनी) हरवला आहे, आणून देणार्‍यास योग्य बक्षीस" अशी जाहिरात वाचल्याचे स्मरते. नंतर एटीअँडटी (जो नंतर बिर्ला टाटा अ‍ॅन्ड एटीअ‍ॅन्ड टी झाला, नामकरण आयडीया चिटचॅट झाले. आणि एअरटेल आणि मग बीपीएल( नंतर हच , मग व्होडाफोन, आता व्ही आय मधली व्ही) ह्या कंपन्यांचे कार्डस आणि त्यांचे पेपर व्हावचर्स चालले. इनकमिंगला पैसे घेणारा हा काळ होता. हॅन्डसेट हे सिमेन्स, सोनी एरिकसन, मोटोरोला, पॅनासॉनिक आणि नंतर नोकीयाचे आले. काही पोस्टपेड प्लान्स नी इनकमिंग फ्री दिले मात्र रिम (रिलायन्स इंडीया मोबाईल) आल्यानंतर इनकमिंग सगळ्यांचेच फ्री झाले. मधला काही काळ टाटा आणि रिलायन्सच्या वॉकी सारख्या वायरलेस डब्बा फोनने पण गाजवला. व्हर्जिन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल अशा सर्व्हिस पण येऊन गेल्या. बहुतांशी सगळ्या जीएसएम होत्या. हा काळ २००५ पर्यंत चालला. सिंगल कलर डिस्प्ले पासून कलर डिस्प्ले पर्यंत मोबाईल प्रवास होताना सॅमसंगचे बाडा ओएस वर आधारित टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग ऑडिओ, व्हिडीओ, इमेज, रिंगटोन असे ट्रान्सफर ब्ल्युटूथ किंवा आयआर ने केले जाई किंवा दुकानात जाउन डायरेक्ट केबल जोडून भरले जाई. ज्यावेळी स्मार्टफोन आणि व्हाटसप आले २०१०/११ ला तेंव्हापासून कनेक्टिव्हीटी आणि डेटा ह्याचा धबधबा सुरु झाला.

In reply to by अभ्या..

ही माहितीची भर घातल्याबद्दल धन्यवाद!! माझ्यामते स्थळ काळानुसार हे तपशील बदलत असतात. म्हणजे एखादा शहरी माणुस आणि गावाकडचा माणुस यांच्या अनुभवात फरक पडु शकतो. काही ट्रेंड्स ईथे असतात, तिथे नाही वगैरे. शिवाय मी साधारण २००१ पासुनचा काळ घेतला आहे, तोही एक फरक. पुन्हा धन्यवाद

सोत्रि 09/08/2025 - 04:14
पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय?
इलॅान मस्कची न्युरालिंक कंपनी अशा चीपवर काम करत आहे. टेलीपथी हा ट्रेडमार्क रजिस्टर करून त्या नावाने चीप इंन्प्लांट करण्याचे प्रॅाडक्ट कंपनी विकते आहे. डिसक्लेमर>जाहिरात VoIP वरून माझा एक जुना लेख आठवला! - (तंत्रज) सोकाजी

In reply to by सोत्रि

मी ही हा लेख लिहिताना नायक्विस्ट नियम वगैरे तांत्रिक बाजु लिहावी का या विचारात होतो, पण आळस केला आणि फक्त स्मरण रंजनापुरते लिहिले. पण आता वाटतेय बरेच केले.

चित्रगुप्त 10/08/2025 - 08:22
माझा मोबल्या मला दिवसातून तीनचार वेळा तरी हुडकावा लागतो, कारण तो मी खिशात कधीच ठेवत नाही. बाहेर जाताना ब्यागेत आणि घरी असताना इकडेतिकडे कुठेतरी. कायप्पासकट सगळे मला लॅपटॉपवर करायला बरे वाटते. मोठा पडदा आणि कीबोर्ड, प्रकाश सहजपणे कमीजास्त करत लेखन-वाचन, विडियो बघणे, बँकेचे काम, वगैरे निवांत करता येते. एका वेळी अनेक टॅब- मुख्यतः यूट्यूब, चॅटजीपीटी, पिंटरेस्ट, मिपा, गूगल ड्राईव्ह वगैरे उघडून ठेऊन मधुनच हे तर मधुनच ते असे सहज करता येते. आवडलेली चित्रे, फोटो गूगल ड्राईव्हवर साठवता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे (विशेषतः मॅकबुकवर) अनेक तास बसले तरी डोळे शिणावत नाहीत.... वगैरे. मोबल्याचा उपयोग फोन करायला, ओटीपीसाठी आणि फोटो काढायला चांगला होतो. -- माझ्यासारखे आणखी आहेत का कोणी लॅपटॉप प्रेमी ?

काय सुंदर लिहिलं आहे ! ह्या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती सोबत आपल्या आयुष्याचा प्रवास ही डोळ्यासमोर तरळून गेला. दीड रुपये पर मिनिट कॉलिंग होतं त्या दिवसात एकेक रुपया साठवून प्रेयसी सोबत केलेले संवाद स्मरले. नंतर whatsapp वर केलेले तासनतास व्हिडिओ कॉल आठवले. कोव्हिडच्या काळात फॅमिली सोबत गप्पा टप्पा करत एकामेकाला आधार देणारे ग्रुप कॉल आठवले. नॉस्टॅल्जिक केले राव तुम्ही.

कपिलमुनी 11/08/2025 - 14:44
एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस>> इथून पुढे १-२ वर्षात रीयल टाईम ओन्लाइन भाषांतर होईल .. हव्या त्या भाषेतून अप्ल्याला हव्या त्या भाषेत होइल

"पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? " ईथे "पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कानातच एखादी चिप बसवतील काय? असा बदल करायचा आहे.

नमस्कार मंडळी हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच. तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता.

चित्तचक्षु चमत्कारी..

आजी ·

खग्रास सूर्यग्रहणाचा. चोवीस ऑक्टोबर १९९५ ला हे ग्रहण झालं. ते आम्ही ही घटना घडली तेव्हां मी अलवर, राजस्थान मधे कार्यरत होतो. संपुर्ण घटना मी व बायको,मुलींनी घरातून बघीतली. अद्भुत अनुभव होता आजही सर्व जसेच्या तसे लक्षात आहे. दुसरी घटना, सध्या मी जिथे रहातो ते घर पहिल्या मजल्यावर आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब माझ्या बेडरूमच्या पलंगाजवळ बरोबर ब्रह्ममुहुर्तावर पडते. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली तेव्हाः सौं ना म्हणलो बघ आपल्या घरात दोन चंद्र दिसत आहेत. तेव्हांपासून न चुकता कोजागीरीला दुधाची वाटी त्या ठिकाणी ठेवतो. तिसरी घटना, सूर्योदय आणी सुर्यास्त सुद्धा अप्रतिम दिसतो. जरूर बघा.लेख अवडला हे वेगळे सांगायला नको.प्रची अगदी तसेच आहेत जसे मी बघीतले. https://youtu.be/UnH6jJgTLKo?si=lEw9M6dWu-yUq175

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. 08/08/2025 - 13:00
सौं ना म्हणलो बघ आपल्या घरात दोन चंद्र दिसत आहेत. तीन नाहीयेत का? का इंदुलेखाचे वरदान आहे? . हलकेच घ्या फौजीसाहेब. ;)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 08/08/2025 - 13:30
आम्ही त्याला आल्बर्ट पिंटो टोपी म्हणायचो. नुसती टोपी बघितलीय पण संस्पेडर्स आणि त्यावर तसली टोपी वापरणारा इसम सार्वजनिक जीवनात अद्याप भेटायचाय.

"चित्तचक्षुचमत्कारी" अतिशय योग्य शब्द वापरलात या अनुभवांसाठी. बाकी इकडे पुण्यात कधी अविस्मरणीय ग्रहणे पाहिल्याचं आठवत नाही, नेहमी ढगाळ आकाशच असते ग्रहणावेळी.

स्वधर्म 08/08/2025 - 17:08
ग्रहण खूपदा बघितलंय पण ते अनुभव तुंम्ही तुमच्या शैलीने इतके सुंदर केलेत, की मी आत्तापर्यंत ग्रहण पाहिलंच नाही, असं वाटलं. आणखी लिहा.

कंजूस 08/08/2025 - 19:35
लेख आवडला. मीसुद्धा तिकडे कन्याकुमारीला सूर्यग्रहण बघायलाच गेलो होतो. विवेकानंद स्मारकासाठी होडीची रांग असते त्यात उभा राहून ग्रहण पाहिले. प्रेझंट बांधायला जो एक चकचकीत चंदेरी कागद वापरतात त्याच्या तीन घड्या करून एक फिल्टर बनवला होता. त्यातून छान दिसतो सूर्य. त्या वेळी आकाशात अभ्रे होती त्यामुळे फायदाच झाला. ( असा स्वस्त फिल्टर फक्त दोन चार सेकंदच वापरावा. सतत सूर्याकडे बघू नये.) ठाण्याच्या एका सहल आयोजकांने या सहलीचे ( कन्याकुमारी एक्स्प्रेसने अडीच दिवसांचा प्रवास करून जाणे येणे आणि कन्याकुमारीत दोन दिवस ) भाडे चार हजार सांगितले होते. मग मी स्वतंत्र पुणे त्रिशूर ते कन्याकुमारी पाच दिवस राहून खाऊन चार हजारांत जमवलं होतं. अगदी पंधरा दिवस अगोदर गरीब रथ गाडीची तिकिटेही मिळाली होती. दुसरे दिवशीचे पेपर विकत घेतले. चांगले फोटो त्यात होते. ते जपून ठेवले. अशा काही विशेष घटनांचे वर्णन डायरीत लिहून फोटोही चिकटवण्याचे उद्योग पूर्वीची पिढी करत असे. डिजिटल माध्यमाने या छंदाकडे दुर्लक्ष होत आहे.

फोटो आणि वर्णन खूपच छान. खंडग्रास सूर्यग्रहण १-२ वेळेला बघितले आहे पण खग्रास बघायचा योग काही अजून आला नाहीये. प्रचंड इच्छा आहे बघायची.

आपल्या आयुष्यात आपल्याला असे काही लोकविलक्षण,इहलोकाच्या पलिकडचे, पार्थिवतेच्या पलिकडचे, निर्गुण निराकार तत्वाचा अंशतः साक्षात्कार घडविणारे, अभूतपूर्व अनुभव येतात की ते आपण आमरणान्त विसरु शकत नाही. असे मला आलेले अनुभव मी आज तुम्हांला सांगणार आहे. या अनुभवासाठी मी एक विशेषण वापरले आहे. "चित्तचक्षुचमत्कारी".. पंधरा जानेवारी २०१० ही तारीख मी कधीच विसरणार नाही. तो माझ्यासाठी "सोनियाचा दिनु"होता.