मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि Tue, 08/12/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत Tue, 08/12/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव Wed, 08/13/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त Wed, 08/13/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

षड्रिपु - एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·

गामा पैलवान Sun, 08/10/2025 - 21:15
प्रगो, जबराट चिंतन आहे. ऐसेचि लिहिते राहो. मला वाटतं की मत्सर सर्वात छुपा म्हणूनंच सर्वात प्रबळ शत्रू आहे. कामापासनं सगळ्यांची सुरुवात जरी होत असली तरी तरी लक्ष्य ( फोकस ) मीच असतो. पण मत्सराच्या बाबतीत फोकस माझ्यावरून उडून इतरांवर जातो. तोही नकळत. लै ड्यांजर भौ ! आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 06:21
उत्तम लेख आहे. षड्रिपुंपासून मुक्ती, म्हणजे एकाअर्थी सर्व सिद्धी मिळवणे. त्यासाठी सदा 'प्रसन्न' असणे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" तर मन सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रत्यक्ष-प्रायोगिक-व्यवहार्य उपाय सांगणारे ( - ज्यांना 'नामस्मरण' पटत/जमत/आवडत/शक्य नसेल, आणि मानसशास्त्रात रुची असेल, त्यांचासाठी-) एक अत्यंत उपयोगी पुस्तक हे आहे: . अ‍ॅमेझॉनवर सुमारे ३८० रुपयात उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

युयुत्सु Mon, 08/11/2025 - 08:49
"आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !! "आता बास. पुरेसे आहे इतके" हा विचार मी वयाच्या ~२५ वर्षापूर्वी स्वीकारला तेव्हा मला समाजाने खूप मनःस्ताप दिला (तसा तो या ना त्या स्वरूपात अजुन ही चालू असतो). शेपूट तुटलेल्या कोल्ह्यांना शेपूट असलेल्या कोल्ह्यांचा राग येतो. त्यांना सर्वांनीच शेपूट तोडून टाकावे असे वाटते. ज्यांना थांबता येत नाही, त्यांना "आता बास. पुरेसे आहे इतके" असा विचार करणार्‍यांचा राग येतो.

In reply to by चित्रगुप्त

नका आठवण करून देऊ काका. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी न्यू यॉर्क मध्ये होतो. माझा अक्षरश: दिनक्रम होता हा ! इथं भारतात किमान मी जे लिहितोय ते मला तरी शक्य आहे अशी आशा आहे. अमेरिकेत शक्यच नाही ह्या rat race मधून बाहेर पडणे. तिथं षड्रिपुंचे जाळे इतके स्ट्राँग आहे की त्यातून बाहेर पडणे निव्वळ अशक्य आहे. आणि त्यात जे अडकले आहेत ते "हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग" आहे हे स्वतःचेच स्वतःला समजून सांगत आहेत. Consumerism can never lead to a content life. Most of the luxuries, and many of the so called comforts of life, are not only indispensable, but positive hinderances to the elevation of mankind. With respect to luxuries and comforts, the wisest have ever lived a more simple and meagre life than the poor. - Henry David Thoreau

Bhakti Tue, 08/12/2025 - 10:49
प्रगो चांगलं विवेचन केले आहे. पण सर्वच रिपुंमध्ये स्त्रीयांना खुपच स्वार्थी वर्णन केल्या सारखं वाटतं.तुम्ही वर्णन केलेल्या स्त्रीया १८००-१९०० मध्ये सापडत असतील.आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही. आणि मला तुमचे दुसऱ्या धाग्यावरचे मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. अहो तुमच्यासारख्या हुशार लोकांनी बदलत्या काळानुसार बदल मान्य केले पाहिजे.(माफ करा मला खूप खेद वाटलं वाचून) ज्ञान,कर्म,भक्ति,योग हे मार्ग सर्वांसाठी खुले आहेत,यात स्त्री पुरुष दोघेही आचरण करून शांती घेऊ शकतात.

In reply to by Bhakti

ठीक आहे भक्ती. सर्वच विचार पटले पाहिजेत असा माझा अट्टाहास नाही.
आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही.
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे. अनेक पराकोटीच्या स्वार्थी स्त्रिया मला माहिती आहेत. उदाहरणे लिहित बसलो तर विषयांतर होईल. तरीही एक उदाहरण लिहितो जे अत्यंत जवळच्या मित्रासोबत झाले आहे , होत आहे - त्याच्या पत्नीने डिव्होर्स साठी अर्ज केला, 6-8 लाख रुपये "सेटलमेंट" म्हणून मागितले , तेही द्यायला तो तयार झाला तेव्हा अचानक कोर्टात फिरली अन् म्हणाली की मी मानसिक दृष्ट्या तयार नाहीये. मी मित्राला विचारलं की बाबारे, पण तू कशाला डिव्होर्स वगैरे भानगडीत पडतो, तो म्हणाला - तीने लग्नाआधी तिच्या प्रियकरासाठी कर्ज काढले होते , लग्नानंतर देखील ती त्याचे हप्ते भरत आहे. मी म्हणाली बरं ठीक आहे पण किमान मुलाच्या कस्टडी साठी तरी प्रयत्न कर , आपल्या संस्कृतीनुसार मुलं ही पूर्णपणे बापाची असतात. बापाचाच अधिकार असतो. त्यावर तो काही बोलला नाही. ( आता तुम्हाला समजायचं ते तुम्ही समजून घ्या.) आणि ही एक गोष्ट नाहीये अशी किमान अजून 3 -4 उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. जास्त लिहू शकत नाही कारण ह्या अत्यंत खाजगी गोष्टी असतात, बोलून पुरुषांचीच बदनामी होते आणि बायका ह्याचाच गैरफायदा उचलतात. बाकी दुसऱ्या धाग्यावरील चर्चा तिथे केल्यास उत्तम. इथे विषयांतर होणार नाही. मी उदासीन अवस्थेत रहात असल्याने हे सगळं फार "वरून" पहात असतो. 18 व्या वर्षी मातृत्व हा विचार तुम्हाला सहन होत नाही ह्या बद्दल खंत वाटते. 18व्या वर्षी मातृत्व हे निसर्गाचे डिझाइन आहे, निसर्गाची तशी इच्छा नसती तर मुली 24 व्या वयात आल्या असत्या , 14व्या नाही. आणि जग फार बदललं आहे ताई. बाहेर अशा अशा घटना घडत आहेत की तुमचा विश्वास बसणार नाही. माझे घर एका शाळेजवळ आहे. मी घरी जात असताना मला 2 मुली दिसल्या , युनिफॉर्म वरून 8वी 9वी मधील असाव्यात असा अंदाज बांधला मी. एकदम गालातल्या गालात हसत लाजत बघत होत्या. मी चकित होऊन विचार केला हे काहीतरी भलतं चालू आहे म्हणून मी इकडं तिकडे पाहिलं तर , माझ्या मागून 2 छपरी पोरं, मिसरूड देखील न फुटलेली , एक्टिवा वर आली, पोरी पटकन त्यांच्या मागे बसल्या, अन् माझ्या कडे पाहून हसत हसत सुसाट निघून गेले. मी आवाक होऊन पाहत राहिलो . हे असं जग बदललेले आहे. 18 व्या वर्षी असं casual sexploration करण्यापेक्षा रीतसर लग्न करून गृहस्थाश्रम करणे हे कधीही उत्तम असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात जे असे sexploration करत आहेत त्यांना माझा मुळीच विरोध नाही. समाजात अशा मुलींची गरज आहेच . ;) बाकी बरेच आहे बोलण्यासारखे. बोलू एकेक करून.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Tue, 08/12/2025 - 18:44
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे.
आधी होते कोशात,बायकांनी असंच वागायचं, असं नाही,ढिमकं फलानं आता तर कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू आहे तेही खुप सुंदर, खुप मोठं ;) ;) वाईट उदाहरणे मलाही माहिती आहे पण दुरुक्ती कशाला करायची.सगळीकडे स्त्रिया वगैरे कशाला सरसकटीकरण कशाला??असो. छान , नेहमीप्रमाणे अद्भुत लिहा!

In reply to by Bhakti

सरसकटीकरण ह्या लेखाच्या संदर्भाने , षड् रिपु आणि त्यांच्या स्त्री आणि पुरुषांमधील भिन्न भिन्न अभिव्यक्ती मधून प्रकट होणे हे मी माझ्या निरीक्षणावरून मांडलेले आहे. मी ह्याला जनरलायझेशन न म्हणता on an average असे म्हणेन. आणि हो मला फुलपाखरे मनापासून आवडतात. आमची अवस्था "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नहाने" अशीच आहे ;) त्यामुळे माझा फुलपाखरांना विरोध नाहीच. ( असो. जाऊ दे, जास्त लिहू शकत नाही. )

In reply to by Bhakti

स्वधर्म Wed, 08/13/2025 - 15:48
>> मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. वरील प्रतिसादात तुंम्ही स्त्रियांची बाजू अगदी नेमकेपणाने मांडली आहे. सनातनींना अर्थातच स्त्र्यियांना देवी मानून, मखरात बसवून त्यांचे संरक्षण करायचे असते. असं वागवलेलं सनातनी स्त्र्यियांना आवडतं व त्यांना त्याचा गौरवही वाटत असतो. परंतु तुंम्ही इथे त्यांच्या लग्नाच्या बाबतीतल्या स्वयंनिर्णयाबद्द्ल जरी थेट बोलला नसला तरी स्त्रिया आता बदलल्या आहेत व लवकर लग्न करणे, मातृत्व वगैरे आपणांस सहन होत नाही असे म्हटले आहे. सनातनी पुरुष मुलींकडे एक संपत्ती, जिच्यातून लवकरात लवकर सुटायचे आहे अशी जोखीम म्हणून पाहतात हे धाग्यातील विचारांमधून स्पष्टच आहे. मुलीला जगात स्वतः चं स्थान निर्माण करणं व त्यासाठी तिला लग्नाच्या आधी हवा तेवढा वेळ देणं हे सनातनी विचारात बसत नाही. टिळकांचाही मुलींचे संमतीवय ९ वरून १३ करायला विरोध होता. तसेच त्यांनी 'कुणब्यांना व स्त्रियांना राष्ट्रीय सभेत पाठवून तिथे काय नांगर चालवायचा आहे का पोळ्या लाटायच्या आहेत?' असे उद्गार काढले होते हे आपणांस माहितच असेल. बाकी तुंम्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. Wed, 08/13/2025 - 15:58
म्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते. परफेक्ट.. म्हणून तर सनातन्यांचा महात्मा फुल्यांना विरोध. त्यांनी वृत्तीचा उल्लेख केला की सन्यातन्यांनी जातीवर घ्यायचे आणि त्यांच्यामुळे मिळालेले फायदे चोखत वरुन जातीयवादी म्हणत झोडपायचे हे वारंवार दिसत आले आहे.

In reply to by स्वधर्म

धन्यवाद स्वधर्म ! तुमच्याकडून टीका करणारा प्रतिसाद दिसला की मला शाब्बासकी मिळाल्याचा आनंद होतो ! No sarcasm intended. खरंच धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Wed, 08/13/2025 - 16:39
मी धाग्यात काय लिहिलंय ते बघतो, तुंम्ही 'कुणी' लिहिलंय ते बघता. माझा फोकस मुद्द्यावर असतो. तुम्ही शक्यतो व्यक्तींवर रोख ठेवता, त्यांना गटात टाकता, त्यांना काय काय म्हणत असता. तुम्ही लिहिलेलं कुणाला समजलं नाही म्हटलं की तुंम्हाला ग्रेट वाटतं, म्हणून तुंम्ही मग त्यांची प्रशंसा सुरू करता. मी लिहिलेलं कुणाला समजलं नाही तर मला तो गौरव न वाटता उणीव वाटते. फर्क साफ है| असो.

In reply to by स्वधर्म

फर्क साफ है| >>> अगदी अगदी. म्हणूनच तर म्हणालो की मला तुमचा प्रतिसाद शाब्बासकी वाटतो ! अवांतर: बाकी ह्या लेखनात संमती वय हा मुद्दाच नव्हतो. ते भक्तीताईंनी केलेलं विषयांतर होते. तो मूळ धागा युयुत्सु ह्यांचा असून अन् त्यावरील माझा प्रतिसाद ह्या इथे आहे - http://misalpav.com/comment/1196962#comment-1196962

In reply to by स्वधर्म

Bhakti Wed, 08/13/2025 - 18:14
होय होय आत्मभान जागृत झाली आहे.आणि अक्षरशः सनातनी पुरुषांची मानसिकताही पाहिली,अनुभवली आहे.मला एकच मुलगी म्हणून सनातनींनी एकटी मुलगी हट्टी होईल वगैरे म्हणून अजून अपत्य पाहिजे अस टोमण्याने सांगायचा प्रयत्न केला ,अरे तुम्ही सांभाळायला येणार का नंतर (असं मनातच हसून म्हटलं)(प्रगोने तिकडे ४ अपत्य पाहिजे असं लिहिलंय ..हे राम ;)) नोकरी सोड इ.अजून खुप किस्से आहेत ;)But I am daughter of strong mother!!! नाही बधणार या भुलभुलैय्याला! खरंय अशा पुरूषांनी बायकांनी कर्मकांडातच गुरफटून राहायला पाहिजे,ती त्यातच गेली तर फरक पडणार नाही तिला 'देवी' करतील. आता टिळकांनी बद्दल, भारतीय अध्यात्माचा अभ्यास हा मला लहानपणापासून करायचा होता.गीतारहस्यापर्यंत शुद्ध बुद्धीने पोहचायला प्रगोमुळेच जमलं.अध्यात्मात रूची असल्याने त्याचे लेख आवडायचे.एका ठिकाणी त्याने नमूद केले होते,"गीतारहस्य" वाचले पाहिजे. जानेवारी वाचायला सुरुवात केली,अहाहा! 'फिटे अंधाराचे जाळे,झाले मोकळे आकाश!" अशी अवस्था झाली.सारे सारे प्रश्न मिटले. मग टिळकांविषयी उत्सुकता जागृत झाली.भारतभूमी धन्य झाली आहे अशा महान रत्नामुळे!!दोन मासिकं त्यांच्या कार्याविषयी घेतली आहेत.त्यांच्यावरचा 'होमरूलचा' लेख तुम्ही वाचला असेलच. आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते.माझी तर लायकीच नाही अशा नेत्यांबद्दल असं काही लिहायची. महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. एकंदरीत मला ठोकळ्यासारखे /पूर्वग्रहदूषित विचार कधीच करता येत नाही.

In reply to by Bhakti

अभ्या.. Wed, 08/13/2025 - 18:31
महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. वाहवा.... आणि हे मनापासून आहे. वाचलेच पाहिजे. वाचले, समजून घेतले/नाही समजले आणि आवडले/न आवडले हे टप्पे पाहिजेतच. संविधान लिहिणार्‍या आंबेडकरांना हेच तर अपेक्षित होते. छोट्या मुलीलाही शुभेच्छा

In reply to by Bhakti

स्वधर्म Wed, 08/13/2025 - 18:38
>> आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते. ठीक आहे, त्यांनी स्त्रियांविषयी आणखी काय लिहिलंय ते तुंम्ही दुसरी बाजू म्हणून सांगा. समजून घ्यायचा प्रयत्न राहील. पण ठोक स्वरुपात कोणतीही व्यक्ती पूज्य किंवा तिरस्करणीय नसते असे मत आहे. त्यामुळे टिळकांच्या इंग्रजांविरूध्द केलेल्या असंतोषाच्या कार्याचा आदर आहे. महात्मा फुले यांनी त्यांना देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी १० हजार रुपयांची मदत केली होती. महात्मा फुले जेंव्हा गेले, तेंव्हा केसरीने त्यांची बातमी मात्र छापली नाही. कितीही अध्यात्मावर पकड असली तरी मनाचा उमदेपणा नाही. तोच प्रकार वेदोक्त प्रकरणात, पंचहौद प्रकरणात. टिळकांच्या बाबत या सगळ्या बाजूसुध्दा माहित असल्याने, तसा भक्तीरस पाझरू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. बाकी प्रगो अनेकदा अभिमानाने स्वतःला सनातनी म्हणवून घेतात. तुंम्हाला सनातनी पुरूषांची चीड आहे असे तुंम्ही लिहिता. बुध्दी मात्र आमची शुध्द नाही म्हणता. त्याचा आदर करून थांबतो.

In reply to by स्वधर्म

आता एवढे विषयांतर झाले आहे त्यात अजून थोडी भर म्हणून ही विनंती करतो की वेदोक्त प्रकरण, पंचहौद प्रकरण ह्या दोन्ही विषयांवर आपण दोन स्वतंत्र , छोटेखानी का होईना लेख लिहावेत. मला उत्सुकता आहे तुमचे ह्या प्रकरणाचे आकलन आणि अभ्यास समजून घेण्याची . कारण माझ्या अल्पशा अभ्यासानुसार ह्या दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. आणि तिसरा स्वतंत्र लेख ताई महाराज बलात्कार प्रकरण ह्यावर लिहिल्यास मी आपल्या धाडसाचे कौतुक करेन. कारण टिळकांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यावर बलात्कार सारखा नीच आरोप करणाऱ्या स्त्रीला कोणाचे पाठबळ होते हे देखील समाजापुढे येणे तितकेच गरजेचे आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Wed, 08/13/2025 - 22:02
>> दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. हे आधीच ठरलेले आहे, त्यामुळे काहीही लिहिले तरी फरक पडणार नाही हे स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे आपली विनंती मान्य करू शकणार नाही. कारण मत आधीच ठरवले गेलेले असेल तर चर्चेत कितीही मुद्दे आले तरी त्याचा उपयोग नसतो. उदा. वरती भक्ती यांनी स्वतः च सनातनी पुरुषांची मानसिकता अनुभवून त्यांना भान आले आहे, त्यांनी बंडही केले आहे असे लिहिले. पण तशीच मानसिकता टिळक यांची दाखवून दिली, तर माझी बुध्दी अशुध्द असे म्हटले. हे माझ्यासाठी अतिशय खेदकारक व अनाकलनीय आहे. जर माझी माहिती खोटी दाखवून दिली असती, तर मी माझे मत नक्कीच दुरूस्त केले असते. शिवाय टिळक त्यांच्या काही प्रतिगामी मतांमुळे लहान ठरत नाहीत की त्यांचे योगदान कमी होत नाही. तेवढी परिपक्वता मला अपेक्षित होती. पण आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. दे जस्ट शूट द मेसेंजर, मग सत्य किंवा वस्तुस्थिती काहीही असो. माझी या चर्चेतून निवृत्ती _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे गुरुवार, 08/14/2025 - 09:46
आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. बाडीस अशी स्थिती लोकमान्य टिळकांबदलच नव्हे तर सुभाष बोस, भागात सिंह, गांधीजी पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांबद्दल दिसून येते. यामुळे कोणत्याही नेत्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसलेले आहे.

In reply to by स्वधर्म

अप्पा जोगळेकर Wed, 08/20/2025 - 16:56
https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf - हे पुस्तक प्रताधिकार मुक्त आहे. आपापल्या कुवतीनुसार योग्य अयोग्य ठरवावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 08/13/2025 - 17:40
सेम पिंच,आणि तुझ्या या धाग्याने माझ्या गीतारहस्य धाग्याची जाहिरात केली आहे :) वाह =)))) धागा धागा खेळायला आवडतं नाही.आपण काय रोबोट आहोत का? एका धाग्यापुरते स्वीट ऑन/ ऑफ व्हायला. समग्र आक्षेप/कौतुक आवडतं.मला असंच आवडतं. सॉरी युयुत्स काका ;) ;)

कर्नलतपस्वी Tue, 08/12/2025 - 19:57
छळताना कोणालाच सोडत नाहीत. वाईट चांगले सगळीकडेच, भेदाभेद करणे वादाचा विषय होऊ शकतो. बाकी काळानुसार जगरहाटी बदलणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥

थोडा कळला, थोडा डोक्यावरुन गेला. पण नेहमीच "अरे हा तर माझ्याही पुढे गेलाय" असे अनुभव येत असल्याने फार मनाला लावुन घेतले नाही. कुठेतरी थांबायला हवे हे मात्र खरे. नाहीतर ती सुर्यास्तापर्यंत जमिनीसाठी धावणार्‍या माणसा सारखी अवस्था व्हायची. नीमकरोली बाबांच्या डायरीतील पान आवडले. जाताजाता--एकदा त्यांचा एक भक्त त्यांना भेटायला आला. त्याच्याकडे आर्सेनिक या विषाची बाटली होती. बाबांनी त्याला विचारले की काय आणले आहे? त्याने बाटली दाखवली. त्यावर बाबांनी त्यातील मूठभर तोंडात टाकले. सगळे लोक घाबरुन रडु लागले की हे आता मरणार. त्यावर बाबांनी एक ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले काही होत नाही. बोलो राम राम. पुढे ते वाचले.

विजुभाऊ Wed, 08/13/2025 - 17:11
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपु जिवंत मानवाला आवश्यक आहेत. काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार ( ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे) क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते. वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते. मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल. मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल. त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी. अर्थात त्यांचा अतिरेक वाईटच. तसा पाणी पिण्याचा अतिरेकही वाईट जीवघेणा ठरू शकतो

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु Wed, 08/13/2025 - 17:26
मी पण हेच लिहीणार होतो. पण टंकायचा कंटाळा आला. या भावनांवर मेंदूतील उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. तो विकसि त नसेल तर प्रश्न निर्माण होतात. उपाग्रखण्डाचा विकास ताण, आहार, ध्यान, कौशल्य विकास इ० वर अवलंबून असतो. ताणाचा उपाग्रखण्डावर घातक परिणाम होतो आणि भावनिक नियंत्रण अवघड बनते.

In reply to by विजुभाऊ

निदान सांसारीक मानवासाठी
+१ हे अगदी बरोबर आहेच . संसाराचा निषेध कोणत्याही सनातनी साहित्यात मला तरी आढळलेला नाही आजवरच्या वाचनात. अर्जुनाला 4 पत्नी होत्या, कृष्णाला किमान 8. क्रोधाच्या आवेशात कृष्णाने भीष्म पितामहांच्यावर चक्र उगारल्याच्या प्रसंग सुप्रसिद्ध आहेच. आणि लोभाच्या बाबतीत बोलायचे झाले तर खांडव वन दहन प्रकरणात दोघांनी मिळून नागांचा संहार केलेला स्पष्ट दिसून येतो तोही इंद्रप्रस्थ आणि त्या जमिनी करिता! कृष्णार्जुनाची उदाहरणे दिली कारण ती पटकन सुचली म्हणून , एरव्ही जवळपास सर्वच सनातनी हिंदू साहित्यातील राजांची उदाहरणे थोड्याफार फरकाने देता येतील. शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धके मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।” (रघुवंशम्–1.6) आणि इथेच खरे गमक आहे. संसार, प्रपंच कोठवर करत रहायचे ? ह्या सहा रिपूंच्या चक्रात किती आणि कसे खेळत रहायचे ह्याची नियम रीतसर घालून दिलेले आहेत ज्याला वर्णाश्रम व्यवस्था म्हणाले आहे. These people have made frameworks for everything. सुचत जाईल तसे लिहित जाईन . प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

In reply to by विजुभाऊ

सोत्रि गुरुवार, 08/14/2025 - 16:14
त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी.
सांसारिक मानव षडरिपुनी ग्रासलेला असतो. पण ते अगदी आवश्यक नाहीत, सांसारीक मानवासाठीसुद्धा आणि मुमुक्षुसाठीही.
काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार
संसारात (जन्मृत्युच्या जंजाळात) अडकून राहण्यासाठी पुनरुत्पादन कारणीभूत आहे, पर्यायाने काम, त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी काम ह्या रिपूवर विजय मिळवावा लागेल. (तसंही, फक्त वंश पुढे चालवायचा म्हणून एका अपत्याला जन्माला घालून थांबल पाहिजे, तसं न होता आमोदासाठी कामाच्या आहारी जाण होत)
क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते.
बरोबर उलट आहे, क्रोधामुळे निर्णय क्षमता हरवून बसते, क्रोधाच्या भरात घेतलेले निर्णय रियॅक्शन असते रिस्पॉन्स नसतो.
वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
वैयक्तिक मोह स्वार्थाला जन्म देतो त्यामुळे योग्य आणि यथार्थ प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल.
मत्सर ( ईर्ष्या) ह्यामुळे घेतलेला ध्यास उत्तमतेचा ध्यास नसतो, दुसऱ्याच्या आनंदाकडे किंवा क्षमतेकडे बघून येणाऱ्या नकारात्मकतेने घेतलेला ध्यास असतो.
मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल.
मदमस्त लीडरशीपमुळे अनागोंदी होईल. (उदा. विजय माल्या). - (मुमुक्षू) सोकाजी

कॉमी Wed, 08/13/2025 - 22:14
लेखातले स्त्रियांविषयक विचार निव्वळ TRP साठी लिहिलेले वाटले. उगी ओढून ताणून. तसा फारसा लेखाच्या मूळ विषयाशी संबंध नाही. आता स्त्रीला कामेच्छा जास्त का पुरुषाला ह्यावर परिच्छेद पाडण्याचे प्रयोजन समजले नाही. त्यामुळे इंटरनेट वर ज्याला रेजबेट म्हणतात तसले लिखाण वाटले. एक उदाहरण बघू-
१. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! (...)अनेक मित्रांमध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि आजवर तरी लोकांनी एकच पहिल्या पर्यायाची निवड केलेली आहे. दुसरा पर्याय निवडणारा अजुनतरी मला कोणी भेटालेला नाही. असो.
ह्या असो नंतर वरचा स्त्री का पुरुष जास्त कोण कामुक हा थ्रेड पूर्णपणे फेकून दिला आहे आणि मूळ टायटल वाला रिपू खाली काही वाक्यात संपवला. बरेचसे विचार हास्यास्पद आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कामुक असतात हे उदाहरण म्हणून घ्या.

विंजिनेर Wed, 08/13/2025 - 22:55
काय रे गोडबोल्या, स्त्री-पुरूषांच्या कामेच्छांची मोजणी करायला तू काय तिथे कंदील पकडून उभा होतास की काय? झालंच तर मत्सर - दोन-चार सासु-सुनेचे पिक्चर पाहून आणि चार दिवस न्युयॉर्क मध्ये राहुन हिरवा माज दाखवला की "मत्सराची भावना पुरूषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी असते" अश्या पिंका टाकायला मोकळा झालास वाट्टं? तीच गोष्ट लोभाची - तूला तुझ्या आयुष्यात असलेल्या (किंवा येतील अशी लोभी आशा असलेल्या) स्त्रियांची हवी ती हौस-मौज पुरवता पुरवता जेरीस आल्यानंतर इथे येऊन त्यांच्या नावाने खडे फोडतोस होय? शिवाय मत्सराचा संबंध कामुक समाधानाशी जोडतोयस - तुझं बोळा तुंबलेला दिसतोय - चिल मार, अंमळ प्रतिसाद आणि ट्यर्र्पीसाठी उगाच प्रक्षोभक आचरट लेख पाडायचा अन् काय. उगीच मिपावर लेख लिहून आपण योगी महर्षि असल्याचा आव आणू नकोस.

In reply to by विंजिनेर

धाग्यातील विषयांवर स्वतःची मते मांडायचे सोडुन , वैयक्तिक टिप्पणी , तीही खालच्या थराला जाऊन केलेली आहे स्पष्ट . हे मिसळपावच्या धोरणात बसत नाही. बाकी संपादक कारवाई करतील योग्य ती. तुम्ही तुमची संस्कृती दाखवुन दिलीत हे मात्र एक झाले ! २

In reply to by प्रसाद गोडबोले

विंजिनेर Wed, 08/13/2025 - 23:44
स्वतःची मते मांडायचे स्वतःची मते मांडायचे
प्रतिसादात वैयक्तिक सोडून इतरांची मतं मांडत नाही मी
खालच्या थराला जाऊन केलेली आहे
लेखाच्या थराला जाऊन टिप्प्णी केली असं म्हणायचंय का? माझ्या संस्कृती मिपावरच्या सवंग लेखाला शाब्दिक चपराक देऊन ठरण्याइतकी उथळ नाही रे....

सुबोध खरे गुरुवार, 08/14/2025 - 10:08
विंजिनेर साहेब पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते मग कर्कश्य बोलावे काय निमित्य? वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही. षड्रिपू नसलेली माणसं एक तर संत असतात किंवा मनोरुग्ण. सामान्य माणूस नव्हे. आपण या दोन्हीत नाही तेंव्हा हा विषय काथ्याकुटासाठी उत्तम आहे. प्रगो यांची बरीचशी मते मला सुद्धा पटत नाहीत. त्यात अध्यात्म जास्त आहे आणि सत्य कमी आहे. त्याचे खंडन सहज करता येईल. पण त्यासाठी वैयक्तिक पातळीवर उतरणे बरोबर नाही

In reply to by सुबोध खरे

सोत्रि गुरुवार, 08/14/2025 - 15:49
वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही.
डॉक, नक्की ना? - (युयुत्सूंच्या धाग्यांवरील प्रतिसादात सभ्यपणा शोधणारा ) सोकाजी

In reply to by सोत्रि

सुबोध खरे गुरुवार, 08/14/2025 - 19:45
माझा असभ्य खालच्या पातळीचा प्रतिसाद ससंदर्भ दाखवून द्या हि नम्र विनंती आहे. याउलट त्यांनी अनेक वेळेस पातळी सोडून माझ्यावर टीका केली आहे तरी मी संयम च बाळगलेला आहे.

मारवा Sun, 08/17/2025 - 20:00
लोभ आणि मोह हे एकच आहेत त्यात धर्मशास्त्र लिहिणारे जे कोणी होते त्यांची पुनरुक्ती झालेली आहे असे नेहमी वाटते. फरक स्पष्ट स्वच्छ काटेकोर नाही. अर्थात काही फरक त्याने पडत नाही अजून एक विरोधाभास एकीकडे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे असा ही गौरव आहे. हाच काम रिपु म्हणजे शत्रू पण आहे आणि पुरुषार्थ ही आहे. एकूण धार्मिक साहित्यात विसंगती आणि पुनरुक्ती अतार्किकता असल्याशिवाय ते धर्मग्रंथ या पदाला प्राप्त होत नाही. दुसरे टिळक हे अत्यंत सनातनी मागास विचार करणारे होते हे त्यांनी त्यांच्या काळाच्या आसपास जगलेल्या सुधारकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरून घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. त्याहून रोचक.म्हणजे टिळक स्वतः खोत होते खोती संदर्भातील टिळकांची भूमिका तर चक्क स्वार्थी म्हणावी इतकी संकुचित होती. पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत असो अजून एक क्रोध काम यांना एक मोठे उत्क्रांतीमूल्य आहे. अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. सदरील काम क्रोध या मानवी नॉर्मल भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि नकारात्मक आहे . स्वधर्म यांनी टिळकांचा दाखवलेला दाखला अचूक आहे .

In reply to by मारवा

अप्पा जोगळेकर Wed, 08/20/2025 - 17:14
अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. - उत्क्रांतीवाद हि थिअरी (मराठी शब्द?)आहे, सिद्धांत नाही. अशा बऱ्याच वेगवेगळ्या थिअरीज आहेत. शेतीचा शोध ८००० वर्षाम्पूर्वी लागला अशीसुद्धा एक थिअरी आहे. मास्क लावला कि कोविड पासून बचाव होतो अशीसुद्धा एक थिअरी सांगितली गेली होती. सिद्धांत proven असतो. उदा - पृथ्वी सुर्याभोवती फिरते.

In reply to by मारवा

सुबोध खरे Wed, 08/20/2025 - 19:35
"पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत" आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते. आणि तसे केल्यास आपल्याकडे अस्मितेची गळवे ठसठस करू लागतात. मामला दंगलीपर्यंत जाऊ शकतो यातून लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, भगतसिंह, गांधीजी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून श्रीमती इंदिरा गांधी, श्री नरसिम्ह राव, अटळ श्री बिहारी वाजपेयी डॉ मनमोहन सिंह आणि श्री नरेंद्र मोदी यांचीही सुटका झालेली नाही. आणि आपली रेष मोठी करण्यासाठी दुसरी रेष लहान आहे दाखवण्यातही अहमहमिका असते. आपण मिठाई खावी, कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. - श्री व्यंकटेश माडगूळकर

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Wed, 08/20/2025 - 20:43
हा खरा खरे डॉक्टरांचा प्रतिसाद. उमदा, अनुभवी, सर्वांगिण आणि लॉजिकल. आम्हाला हेच डॉक्टर चांगले माहितेत. . डॉक्टरसाहेब नका ते बरनॉल आणि इनो वाटप केंद्र चालवू. प्रतिसादातूनही उगा वस्सकन अंगावर आल्यासारखे वाटता. ;)

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Sat, 08/23/2025 - 09:52
मला असे प्रतिसाद देण्याची अजिबात हौस नाही. परंतु मिपावर तीन चार व्यक्तिमत्वे अशी आहेत कि ज्यांना कोणत्याही गोष्टीत मोदीद्वेष आणल्याशिवाय जेवण जात नाही. अशा लोकांना केवळ अशीच भाषा समजते. क्लिंटन हे फार सहनशीलतेने अशा लोकांच्या प्रतिसादाला मुद्देसूद उत्तरे देत असतात. पण हे लोक सुधारण्यातले नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण people will accept what they want to accept. कालच एक बाई आल्या होत्या ज्यांना पाळीचा त्रास होता. मागच्या डिसेंबर मध्ये आपल्याला कर्करोग होण्याची बरीच शक्यता आहे असे जीव तोडून सांगितले असताना सुद्धा त्या गेले ८ महिने होमिओपॅथीची औषधे घेत होत्या त्याचा काहीही फायदा झाला नाही म्हणून काल परत आल्या. आता जी शक्यता होती ती वस्तुस्थितीत रूपांतरित झालेली आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. कालही त्यांना परत स्त्रीरोगतज्ञाकडे जायला सांगितले आहे. पुढचे त्यांच्या नशिबावर ! इतके स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगूनही लोक ऐकत नाहीत याची आता सवय झाली आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते.
आयडी हॅक झाला की काय.. =)) -दिलीप बिरुटे

# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय
षड्रिपु - एक चिंतन
रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु. आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. १. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! पण काम ह्या शब्दाचे बोली भाषेतील भाषांतर सेक्स अर्थात संभोगाची इच्छा असे केल्याने त्यातील मूळ अर्थ काहीसा अलभ्य होउन जातो.

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

मार्गी ·

मार्गी Sat, 08/23/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा Mon, 08/25/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी Wed, 02/04/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस Wed, 02/04/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी गुरुवार, 02/12/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.

सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती‌ होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.

आव्वाज कुणाचा?

राजेंद्र मेहेंदळे ·

कर्नलतपस्वी Fri, 08/08/2025 - 20:00
संपूर्ण इतीहास थोडक्यात मांडलाय. खरेतर याला संवादिनी ची बखर म्हणतत येईल . १९८७ मधे महू ,म प्र मधे होतो. दहा नंतर एस टि डी स्वस्त म्हणून शनिवारी लाईन लावायचो.

गवि Fri, 08/08/2025 - 21:01
अतिशय उत्तम आढावा.. हा काळ, त्या काळातले सर्वकाही आणि त्यापूर्वीचे आणि आजपर्यंतचे सर्वकाही नुसतेच वापरणे नव्हे तर त्यात काही ना काही योगदान देत आलेली एकमेवाद्वितीय पिढी म्हणजे Gen X.. आमची.. एकाच पिढीत आणि एकाच आयुष्यात सर्वाधिक जास्त बदल पाहिलेली. तूर्त पोच. आणखी बरेच काही आठवले या निमित्ताने.

अभ्या.. Fri, 08/08/2025 - 22:47
तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले. थोडा ग्याप पडला सर. म्हणजे एक पायरी राहिल्यासरखी वाटली. १९९८ ला रात्री एस्टीडी बुथवर मीटर बघत बोलाय्यचे लोक तेंव्हा काहीजण घरात अँटेना लावून ते ५ कीमी च्या अंतरात चालणारे कॉर्डलेस बाळगायचे. आणि त्याच वर्षी मुंबईच्या पेपरात "कोल्हापूरचे प्रसिध्द उद्योगपती संजय घोडावत(स्टार उद्योग) ह्यांचा मोबाईल फोन (पोलिसांच्या वीऑकीटॉकीसारखा दिसणारा, मोटोरोला कंपनी) हरवला आहे, आणून देणार्‍यास योग्य बक्षीस" अशी जाहिरात वाचल्याचे स्मरते. नंतर एटीअँडटी (जो नंतर बिर्ला टाटा अ‍ॅन्ड एटीअ‍ॅन्ड टी झाला, नामकरण आयडीया चिटचॅट झाले. आणि एअरटेल आणि मग बीपीएल( नंतर हच , मग व्होडाफोन, आता व्ही आय मधली व्ही) ह्या कंपन्यांचे कार्डस आणि त्यांचे पेपर व्हावचर्स चालले. इनकमिंगला पैसे घेणारा हा काळ होता. हॅन्डसेट हे सिमेन्स, सोनी एरिकसन, मोटोरोला, पॅनासॉनिक आणि नंतर नोकीयाचे आले. काही पोस्टपेड प्लान्स नी इनकमिंग फ्री दिले मात्र रिम (रिलायन्स इंडीया मोबाईल) आल्यानंतर इनकमिंग सगळ्यांचेच फ्री झाले. मधला काही काळ टाटा आणि रिलायन्सच्या वॉकी सारख्या वायरलेस डब्बा फोनने पण गाजवला. व्हर्जिन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल अशा सर्व्हिस पण येऊन गेल्या. बहुतांशी सगळ्या जीएसएम होत्या. हा काळ २००५ पर्यंत चालला. सिंगल कलर डिस्प्ले पासून कलर डिस्प्ले पर्यंत मोबाईल प्रवास होताना सॅमसंगचे बाडा ओएस वर आधारित टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग ऑडिओ, व्हिडीओ, इमेज, रिंगटोन असे ट्रान्सफर ब्ल्युटूथ किंवा आयआर ने केले जाई किंवा दुकानात जाउन डायरेक्ट केबल जोडून भरले जाई. ज्यावेळी स्मार्टफोन आणि व्हाटसप आले २०१०/११ ला तेंव्हापासून कनेक्टिव्हीटी आणि डेटा ह्याचा धबधबा सुरु झाला.

In reply to by अभ्या..

ही माहितीची भर घातल्याबद्दल धन्यवाद!! माझ्यामते स्थळ काळानुसार हे तपशील बदलत असतात. म्हणजे एखादा शहरी माणुस आणि गावाकडचा माणुस यांच्या अनुभवात फरक पडु शकतो. काही ट्रेंड्स ईथे असतात, तिथे नाही वगैरे. शिवाय मी साधारण २००१ पासुनचा काळ घेतला आहे, तोही एक फरक. पुन्हा धन्यवाद

सोत्रि Sat, 08/09/2025 - 04:14
पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय?
इलॅान मस्कची न्युरालिंक कंपनी अशा चीपवर काम करत आहे. टेलीपथी हा ट्रेडमार्क रजिस्टर करून त्या नावाने चीप इंन्प्लांट करण्याचे प्रॅाडक्ट कंपनी विकते आहे. डिसक्लेमर>जाहिरात VoIP वरून माझा एक जुना लेख आठवला! - (तंत्रज) सोकाजी

In reply to by सोत्रि

मी ही हा लेख लिहिताना नायक्विस्ट नियम वगैरे तांत्रिक बाजु लिहावी का या विचारात होतो, पण आळस केला आणि फक्त स्मरण रंजनापुरते लिहिले. पण आता वाटतेय बरेच केले.

चित्रगुप्त Sun, 08/10/2025 - 08:22
माझा मोबल्या मला दिवसातून तीनचार वेळा तरी हुडकावा लागतो, कारण तो मी खिशात कधीच ठेवत नाही. बाहेर जाताना ब्यागेत आणि घरी असताना इकडेतिकडे कुठेतरी. कायप्पासकट सगळे मला लॅपटॉपवर करायला बरे वाटते. मोठा पडदा आणि कीबोर्ड, प्रकाश सहजपणे कमीजास्त करत लेखन-वाचन, विडियो बघणे, बँकेचे काम, वगैरे निवांत करता येते. एका वेळी अनेक टॅब- मुख्यतः यूट्यूब, चॅटजीपीटी, पिंटरेस्ट, मिपा, गूगल ड्राईव्ह वगैरे उघडून ठेऊन मधुनच हे तर मधुनच ते असे सहज करता येते. आवडलेली चित्रे, फोटो गूगल ड्राईव्हवर साठवता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे (विशेषतः मॅकबुकवर) अनेक तास बसले तरी डोळे शिणावत नाहीत.... वगैरे. मोबल्याचा उपयोग फोन करायला, ओटीपीसाठी आणि फोटो काढायला चांगला होतो. -- माझ्यासारखे आणखी आहेत का कोणी लॅपटॉप प्रेमी ?

काय सुंदर लिहिलं आहे ! ह्या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती सोबत आपल्या आयुष्याचा प्रवास ही डोळ्यासमोर तरळून गेला. दीड रुपये पर मिनिट कॉलिंग होतं त्या दिवसात एकेक रुपया साठवून प्रेयसी सोबत केलेले संवाद स्मरले. नंतर whatsapp वर केलेले तासनतास व्हिडिओ कॉल आठवले. कोव्हिडच्या काळात फॅमिली सोबत गप्पा टप्पा करत एकामेकाला आधार देणारे ग्रुप कॉल आठवले. नॉस्टॅल्जिक केले राव तुम्ही.

कपिलमुनी Mon, 08/11/2025 - 14:44
एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस>> इथून पुढे १-२ वर्षात रीयल टाईम ओन्लाइन भाषांतर होईल .. हव्या त्या भाषेतून अप्ल्याला हव्या त्या भाषेत होइल

"पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? " ईथे "पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कानातच एखादी चिप बसवतील काय? असा बदल करायचा आहे.

नमस्कार मंडळी हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच. तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता.

चित्तचक्षु चमत्कारी..

आजी ·

कर्नलतपस्वी Fri, 08/08/2025 - 12:02
खग्रास सूर्यग्रहणाचा. चोवीस ऑक्टोबर १९९५ ला हे ग्रहण झालं. ते आम्ही ही घटना घडली तेव्हां मी अलवर, राजस्थान मधे कार्यरत होतो. संपुर्ण घटना मी व बायको,मुलींनी घरातून बघीतली. अद्भुत अनुभव होता आजही सर्व जसेच्या तसे लक्षात आहे. दुसरी घटना, सध्या मी जिथे रहातो ते घर पहिल्या मजल्यावर आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब माझ्या बेडरूमच्या पलंगाजवळ बरोबर ब्रह्ममुहुर्तावर पडते. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली तेव्हाः सौं ना म्हणलो बघ आपल्या घरात दोन चंद्र दिसत आहेत. तेव्हांपासून न चुकता कोजागीरीला दुधाची वाटी त्या ठिकाणी ठेवतो. तिसरी घटना, सूर्योदय आणी सुर्यास्त सुद्धा अप्रतिम दिसतो. जरूर बघा.लेख अवडला हे वेगळे सांगायला नको.प्रची अगदी तसेच आहेत जसे मी बघीतले. https://youtu.be/UnH6jJgTLKo?si=lEw9M6dWu-yUq175

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. Fri, 08/08/2025 - 13:00
सौं ना म्हणलो बघ आपल्या घरात दोन चंद्र दिसत आहेत. तीन नाहीयेत का? का इंदुलेखाचे वरदान आहे? . हलकेच घ्या फौजीसाहेब. ;)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. Fri, 08/08/2025 - 13:30
आम्ही त्याला आल्बर्ट पिंटो टोपी म्हणायचो. नुसती टोपी बघितलीय पण संस्पेडर्स आणि त्यावर तसली टोपी वापरणारा इसम सार्वजनिक जीवनात अद्याप भेटायचाय.

श्वेता व्यास Fri, 08/08/2025 - 13:14
"चित्तचक्षुचमत्कारी" अतिशय योग्य शब्द वापरलात या अनुभवांसाठी. बाकी इकडे पुण्यात कधी अविस्मरणीय ग्रहणे पाहिल्याचं आठवत नाही, नेहमी ढगाळ आकाशच असते ग्रहणावेळी.

स्वधर्म Fri, 08/08/2025 - 17:08
ग्रहण खूपदा बघितलंय पण ते अनुभव तुंम्ही तुमच्या शैलीने इतके सुंदर केलेत, की मी आत्तापर्यंत ग्रहण पाहिलंच नाही, असं वाटलं. आणखी लिहा.

कंजूस Fri, 08/08/2025 - 19:35
लेख आवडला. मीसुद्धा तिकडे कन्याकुमारीला सूर्यग्रहण बघायलाच गेलो होतो. विवेकानंद स्मारकासाठी होडीची रांग असते त्यात उभा राहून ग्रहण पाहिले. प्रेझंट बांधायला जो एक चकचकीत चंदेरी कागद वापरतात त्याच्या तीन घड्या करून एक फिल्टर बनवला होता. त्यातून छान दिसतो सूर्य. त्या वेळी आकाशात अभ्रे होती त्यामुळे फायदाच झाला. ( असा स्वस्त फिल्टर फक्त दोन चार सेकंदच वापरावा. सतत सूर्याकडे बघू नये.) ठाण्याच्या एका सहल आयोजकांने या सहलीचे ( कन्याकुमारी एक्स्प्रेसने अडीच दिवसांचा प्रवास करून जाणे येणे आणि कन्याकुमारीत दोन दिवस ) भाडे चार हजार सांगितले होते. मग मी स्वतंत्र पुणे त्रिशूर ते कन्याकुमारी पाच दिवस राहून खाऊन चार हजारांत जमवलं होतं. अगदी पंधरा दिवस अगोदर गरीब रथ गाडीची तिकिटेही मिळाली होती. दुसरे दिवशीचे पेपर विकत घेतले. चांगले फोटो त्यात होते. ते जपून ठेवले. अशा काही विशेष घटनांचे वर्णन डायरीत लिहून फोटोही चिकटवण्याचे उद्योग पूर्वीची पिढी करत असे. डिजिटल माध्यमाने या छंदाकडे दुर्लक्ष होत आहे.

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 08/21/2025 - 14:16
फोटो आणि वर्णन खूपच छान. खंडग्रास सूर्यग्रहण १-२ वेळेला बघितले आहे पण खग्रास बघायचा योग काही अजून आला नाहीये. प्रचंड इच्छा आहे बघायची.

आपल्या आयुष्यात आपल्याला असे काही लोकविलक्षण,इहलोकाच्या पलिकडचे, पार्थिवतेच्या पलिकडचे, निर्गुण निराकार तत्वाचा अंशतः साक्षात्कार घडविणारे, अभूतपूर्व अनुभव येतात की ते आपण आमरणान्त विसरु शकत नाही. असे मला आलेले अनुभव मी आज तुम्हांला सांगणार आहे. या अनुभवासाठी मी एक विशेषण वापरले आहे. "चित्तचक्षुचमत्कारी".. पंधरा जानेवारी २०१० ही तारीख मी कधीच विसरणार नाही. तो माझ्यासाठी "सोनियाचा दिनु"होता.

लघुसहल : क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक

चौथा कोनाडा ·

सौंदाळा गुरुवार, 08/07/2025 - 17:28
तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मी पण घरी येणार्‍या बर्‍याच नातेवाईकांना इकडे नेले आहे. नूतनीकरणानंतर मात्र अजून गेलो नाही, एकदा जाण्यासाठी निघालो पण बाकी कामे करुन पोचेपर्यंत ४.५५ झाले होते त्यामुळे आत सोडले नाही. असो. लेख आणि फोटो आवडले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा Sun, 08/10/2025 - 19:41
भेट देण्याचे योग लवकर येवोत. आणि शक्यतो समुहाने जावा... ती मजा वेगळीच.

कर्नलतपस्वी गुरुवार, 08/07/2025 - 19:32
एक मिपाकट्टा चिंचवड येथे होऊन जाऊद्या. मोरया गोसावी मंदिर, चाफेकर वाडा आणी प्रसिद्ध चित्रकारांचे चित्रदालन. लेख,प्रची आवडली.

आमच्या तारांगण सोसायटीतल्या उत्साही युवकांनी .. अर्थातच तारांगण ज्येष्ठ नागरिक चमूनं अचानक ठरवलं की क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक आपल्या पासून जवळच आहे पण अजून भेट द्यायचा योग आला नाही हे काय बरं नाही. स्मारकाचे उदघाटन तर एप्रिल महिन्यातच झाले .... तीन महिने झाले तरी नाही पाहिलं हे योग्य आहे का हे तुम्हीच सांगा. जगदीश अंकल लैच पेटले अन जाहीर करून टाकले " उद्या दुपारी दोन वा. सोसायटीच्या बाहेरच्या बस स्टॉप वर मी उभा राहणार... ज्यांना कुणाला स्मारक बघायचंय त्यांनी तिथं उपस्थित राहावे." म्हणून लगेच व्हाट्सअप ग्रुपवर यादी करायलाही घेतली. ५ - ७ जण जमले सुद्धा म्हणे.

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

मन ·

मन Wed, 08/06/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि Wed, 08/06/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti Wed, 08/06/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन Mon, 01/05/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा Wed, 08/06/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन Tue, 08/19/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.

अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

मार्गी ·

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कुमार जावडेकर Wed, 08/06/2025 - 23:30
फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा Tue, 08/05/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

कानडाऊ योगेशु Wed, 08/06/2025 - 09:58
परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे Wed, 08/06/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे Wed, 08/06/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि गुरुवार, 08/07/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे गुरुवार, 08/07/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि गुरुवार, 08/07/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ Wed, 08/06/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु Wed, 08/06/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी Wed, 08/06/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि गुरुवार, 08/07/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.

नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

कुमार जावडेकर ·

कुमार जावडेकर Mon, 08/04/2025 - 23:45
या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

कर्नलतपस्वी Tue, 08/05/2025 - 05:55
महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

कुमार जावडेकर Tue, 08/05/2025 - 22:36
अमरेन्द्र आणि कर्नलतपस्वी, धन्यवाद! ही सिरियल मला माहिती नव्हती. बघायचा प्रयत्न करेन. - कुमार

माहितगार Sat, 08/16/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा

समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

शाप की आशीर्वाद?

युयुत्सु ·

गवि Mon, 08/04/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि Mon, 08/04/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

कानडाऊ योगेशु Mon, 08/04/2025 - 18:43
हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका Wed, 08/06/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm Mon, 08/04/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.

शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.