मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

डॉ. भूषण काळुसकर ·

असंका Fri, 05/09/2014 - 13:03
"एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात." आपण घटनांची अशी सुसंगती का लावायला बघता? आपल्याला स्वतःला माहित आहे की आपण जे लिहिलं आहे ते खरं नाही. कदाचित पेशंट्ला MRI नॉर्मल येण्याचं महत्त्व कळत नसेल, पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही.(अर्थात त्याला काहीतरी दुखत आहे हे मी गृहित धरत आहे....) मी स्वतः दोनच दिवसांपूर्वी MRI काढलेला आहे. माझाही रीपोर्ट नॉर्मल आला. त्यावेळच्या भावना म्हणजे MRI काढेपर्यंत आणि नंतरच्या अशा एका वाक्यात सांगणे अशक्य आहे! मी खुशच व्हायला पाहिजे हे कळाल्यावर की MRI मध्ये काही नाही, पण तेव्हा कुणाशी बोललो असतो तर काय माहित मी पण असंच म्हणलो असतो- "रीपोर्टमध्ये काही नाही? मग मला झालंय तरी काय?"

In reply to by असंका

बाळ सप्रे Fri, 05/09/2014 - 14:32
एक्झॅक्टली!! हेच म्हणतो.. एक्स-रे झाला, सोनोग्राफी झाली, इ एम जी झाला, एम आर आय झाला सगळं नॉर्मल मग झालय तरी काय?? विटॅमिन गोळ्या घेतल्या, फिजियोथेरपी करुनही दुखतय तर खरं!! हे दु:ख असतं..

In reply to by असंका

काही पेशंटच्या अनुभवातूनच अशी सुसंगती लावली आहे. मग मला झालय तरी काय?या प्रश्नातली अगतिकता समजू शकतो. पण हा प्रश्न पेशंट इतकाच डॉक्टरांना पण(पेशंट बाबत) सतावत असतो.बर्‍याच आजारांच्या बाबतीत (विशेषत: पाठदुखी) अस होत की त्रास तर होत असतो, पण सर्व टेस्ट करुन पण हाती काहीच लागत नाही. पण याचा अर्थ आपले पैसे वाया गेले अथवा काहीच डायग्नोसिस झालं नाही- असा निश्चितच करुन घेऊ नये.

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 13:19
डॉक्टर साहेब मिपा वर स्वागत. असेच अनुभव कायम येत असतात. एक गमतीदार अनुभव मी एशियन हार्ट इन्स्टीट्यूट मध्ये असताना आला. एका उच्च पदस्थ व्यक्ती ने आपले पूर्ण एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप (यात स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डियो ग्राफी पण येते) करून घेतले. मी लोकांशी मोकळेपणाने बोलतो म्हणून तो जाता जाता माझ्या विभागात आला आणि म्हणाला डॉक्टर मी एवढे पाच हजार रुपयाचे एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप करून घेतले.पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मग काय फायदा झाला पाच हजार रुपये फुकट गेले. मी हसत त्यांना म्हटले साहेब तुमचा विमा उतरवला आहे का ? ते म्हणाले हो पन्नास लाखाचा अहे. यावर मी त्यांना परत सांगितले मग साहेब मागच्या वर्षाचा विम्याचा हप्ता फुकट गेला कि.( तुम्ही मेल नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले) यावर ते चमकले आणि एक मिनिटांनी हसत मला म्हणाले डॉक्टर तुमचे बरोबर आहे सर्व काही नॉर्मल आहे हि केवढी दिलासा देणारी गोष्ट आहे. अर्थात आजारासाठी तपासणी करणे आणि हेल्थ चेक अप करणे यात मुलभूत फरक आहे. तरीही बर्याच वेळेस रुग्ण यात गल्लत करतात. म्हणजे पाठदुखी साठी एम आर आय काढला आणि त्यात काही आले नाही तरी त्यांना पैसे फुकट गेले असे वाटत राहाते. अशा एका रुग्णाला मी विचारले कहो तुम्हाला स्लीप डिस्क निघलिअस्ति तर बरे वाटले असते काय ? त्यावर ते खजील होऊन हसले. याबद्दलचा अजून एक किस्सा परत केंव्हातरी.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही पण बरेच वेळेला महागड्या तपासण्या उगाच करायला सांगितल्या जातात. त्यात पुढे सगळे कट प्रॅक्टीस वगैरे वगैरे आले. ही खिन्नता त्यामुळे तर नसेल ?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 19:20
तुम्ही म्हणता यात बरेच तथ्य आहे. समाजाला कीड लागलेली असताना केवळ एकच व्यवसाय त्यापासून वेगळा राहील काय? अर्थात याला दुसरा पैलू पण नक्कीच आहे. एक साधे उदाहरण म्हणून सांगतो माझी पत्नी पण डॉक्टर आहे दोन वर्षापूर्वी मलेरिया होत असे तेंव्हा रुग्णाला तापाबरोबर नुसता कोरडा खोकला होत असे. एक रुग्ण आमच्या पाठीमागे तिची अक्कल काढताना पाहीला कि "अहो खोकला आहे तर मलेरिया चे औषध दिले इतकी पण अक्कल नाही का? सुदैवाने त्याच्या मित्राला तसाच ताप होता आणि तो मलेरियाची औषधे घेऊन बरा झाला होता. त्यामुळे त्याने याला सांगितले कि अहो त्या डॉक्टर बरोबर औषध देतात. अर्थात हाही रुग्ण बरा झाला पण आम्ही यात एक गोष्ट शिकलो. कि तुमचा अनुभव कितीही दांडगा असो. हल्ली रुग्णाचे पैसे वाचविण्याचा प्रयत्न करायचा कि नाही हा विचार प्रथम करावा लागतो. जास्त शहाणे रुग्ण स्वतःच सुचवतात कि अमुक तमुक रक्ततपासणी करूया. आणि हेच लोक नंतर उलटून बोलतात कि एवढ्या तपासण्या केल्या. काहीच निघाले नाही.

डॉक्टर साहेब मिपावर स्वागत आहे, आपल्या क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव वाचायला आवडतील...!!! (आणि फुकट सल्लेही द्यालच अशी अपेक्षाही बाळ गतो) :) दिलीप बिरुटे

पैसा Fri, 05/09/2014 - 13:55
बर्‍याच जणांना आपल्याला काहीतरी झालं आहे ही भावना जास्त कम्फर्टेबल वाटत असावी! ;) दोन्ही डॉक्टर लोकांचे अनुभव मजेशीर आहेत!

तुम्ही मेला नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले
.... ही सुबोधजींची निर्विवाद विचारसरणी! आणि
पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही
... ही कन्फ्युज्ड अकौंटंटची क्लॅरिटी!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका Fri, 05/09/2014 - 15:27
(अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स बद्दल बोलत आहेत. त्यांना एण्डावमेंट बद्दल सांगूया का? मेलं नाही तरी पैसे वाया जात नाहीत अशाही स्कीम आहेत म्हणावं!

In reply to by असंका

क्लेम नाही म्हणून प्रिमीअम बाद ठरत नाही. तद्वत, रिपोर्ट नॉर्मल म्हणून पैसे वाया गेले नाही. बाकी आपला दृष्टीकोन योग्य आहेच. नाही तर एखादा वैतागलेला पेशंट म्हणायचा, गरज नव्हती तर MRI कशाला (झक मारायला) करायला लावला? तुम्हाला क्लिनीकल डायग्नॉसिसवरनं लक्षात आलं नाही का?

In reply to by असंका

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 18:14
साहेब , एण्डावमेंट स्कीम मध्ये तर "जिवंतपणी आणी मेल्यावर "दोन्ही वेळा पैसे वाया जातात. फायदा फक्त विमा कंपनी आणी एजंतचा होतो मला एक तरी स्कीम सांगा जी टर्म इन्शुरन्स + सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) पेक्षा जास्त पैसे देते? आजतागायत मला एकही वित्त सल्लागार किंवा विमा एजंट हे दाखवू शकलेला नाही. आपण दाखवू शकाल तर मी ते मान्य करेन.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 05/09/2014 - 19:08
वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर परत एकदा वाचताना मलाही लक्षात आलं होतं की "पैसा वाया जात नाही" हे मीच लिहिलं तरी ते चुकीचं आहे. (मी स्व्तःच माझी पॉलीसी सरेंडर करायचा विचार करत आहे). पण तो विनोदी म्हणून दिलेला प्रतिसाद होता, म्हणून राहू दिला. शिवाय माझंच मी किती तुण्तुणं वाजवू म्हणूनही दुर्ल्क्ष केलं. आपलं म्हणणं खरं आहे. टर्म इन्शुरन्स हाच मीही यापुढे चालु ठेवणार आहे.

In reply to by असंका

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:28
कंफ्युज्ड अकौंटंट असे म्हणू नका हो. तुम्ही दोन्हीही प्रतिसाद राहून दिलेत हे बरेच केले. बर्याच पैशांबद्दल च्या गोष्टी अजून समजत नाहीत. आता तुमच्या आणि सुबोध खरेंच्या प्रतिसादातून मलाही जरा माहिती मिळाली कि या इन्शुरंस पॉलिसी मध्ये थोडी मेख असते. माझ्याही पॉलिसी आता मी तपासून पाहणार आहे. माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले मला आठवते - 'तसं पाहिलं तर' (हे 'तसं पाहिलं तर' महत्वाचे आहे - त्याचा अर्थ पारंपारिक विचारांपेक्षा एक वेगळा विचार असा घेता येईल) इन्शुरंस पॉलिसी किवा मेडिकल पॉलीसी घेण्यात काहीच अर्थ नसतो. तेच हफ्त्याचे पैसे जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले तर त्याचा परतावा योग्य मिळतो जो तुम्हाला तुमच्या अचानक उद्भवणाऱ्या आजारामध्ये / अपघातामध्ये भरपूर मदत करू शकतो. इन्शुरन्स कंपन्यांच्या 'डिस्क्लेमर' (जे दुर्बीण लावून पण वाचता येत नाही) मध्ये अडकण्या पेक्षा स्वतःचा रोख पैसा कधीही उपयोगाचा. आता या गोष्टीवर माझा स्वतःचा विचार अजून चालू आहे. एम बी अे करत असताना आम्हाला एक संज्ञा होती - 'time value of money ' ती मला पूर्णपणे कळाली आहे असे मी म्हणणार नाही परंतु ती संज्ञा लक्षात घेता करता माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले अगदीच चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही. बाकी डॉक्टर खरेंचे उदाहरण बरोबर आहे. विमा पॉलीसी च्या ऐवजी गाडीचा इन्शुरन्स घेऊन बघा. गाडीला अपघात झाला नाही तर त्या महिन्याच्या हफ्त्याचे पैसे तसे पाण्यात बुडाल्या सारखेच आहेत.

In reply to by अमित खोजे

असंका Sat, 05/10/2014 - 01:24
असा जो प्रिमिअम संपत जातो, त्या प्रकारालाच "लाइफ इन्शुरन्स" मध्ये "टर्म इन्शुरन्स" म्हणतात. टर्म संपली (एक वर्ष) की इन्शुरन्स संपला. त्या मुदतीत जर आपल्याला काही क्लेम करता आला तर ते प्रिमिअमचे पैसे वसूल, नाही तर सगळे बुडाले!! खरे साहेब म्हणत होते की पैसे बुडाले, म्हणून खरे साहेब हे टर्म इन्शुरन्स बद्द्ल बोलत आहेत असं मी म्हणालो. ते खरंच बोलत होते. मी गमतीने (चेष्टेने नाही!) म्हणालो ते त्यांना नाही, संजय क्षीरसागर यांना....तेही अवांतर असल्याचे लेबल लावून! पण खरे साहेबांना पटलं नाही आणि त्यांनी माझं माप मला परत केलं...आणि मीही ठेवून घेतलं! आपणही अगदी फक्त अर्धा तास हिशेब मांडले तरी खरे साहेब म्हणतात त्याच निष्कर्षाला याल. इन्शुरन्स जर गुंतवणूक म्हणून करू जाल, तर शेवटी फायदा होण्याची शक्यता कमी आहे. इन्शुरन्स हा इन्शुरन्स म्हणूनच घ्यावा. जेवढी रक्कम आपल्याला आपल्यामागे हातात यावीशी वाटते, त्या रकमेसाठीचा प्रिमिअम विचारायचा आणि तेवढे पैसे भरून ते पैसे बुडाले असे समजायचे. त्यावर परताव्याची अपेक्षाच नको!! आपल्यामागे मनाची शांती हेच उद्दीष्ट असेल तर ते या मार्गाने अधिक परीणामकारक पद्धतीने पूर्ण होते.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 14:12
5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!
हां अनुभव माझा स्वताचा आहे. पैसे पाण्यात गेले राव माज्या ब्रेन एम् आर आय चे, विशेषत: डिफ्यूसड़ वेट इमेजिंग शोज नो आय्स्कामिक रिजन वाचल्यावर वाटल होतं , यूरेका यूरेका पण कसलं काय पैसे पाण्यात गेले. मेंदू फिजिकली व्यवस्थित आहे. :(

In reply to by आनंदी गोपाळ

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 00:23
म्हणून तर काळ्या ढगाला रुपेरी किनार या न्यायाने काहीसा आनंदही वाटला. :) पण पुन्हा फक्त ते समजायसाठी आयएनाआर ५००० वाया म्हणजे ते प्रश्नचिन्ह अजुनही कायमच आहे :)

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे Sat, 05/10/2014 - 10:19
आत्मशून्य साहेब, डिफ्युजन वेटेड इमेजिंग हे माणसाला मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद झाल्याने येणारा पक्षाघाताचा झटका पहिल्या सहा तासात निदान करू शकतो. या काळात जर रुग्णावर योग्य उपचार झाले तर मेंदूला अजिबात हानी न पोहोचता(no residual damage) रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. आपला एम आर आय हा नॉर्मल आला हि अतिशय उत्तम गोष्ट आहे. पण एक ( आगाऊ) शंका हा स्कॅन का केला होता? जर आपल्या मेंदूला रक्त पुरवठा मर्यादित काळासाठी (TIA transient ischemic attack (http://en.wikipedia.org/wiki/Transient_ischemic_attack) / RIND) खंडित होऊन चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे अशा काही कारणासाठी केला असेल तर आपण आपल्या डॉक्टरना दाखवून पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. कारण असे लहान लहान झटके हे पुढे येणाऱ्या तीव्र झट्क्यांची आगाऊ सूचना देत असतात. तसे नाही याची खात्री करून घ्या एवढेच आपल्याला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 22:29
डॉक्टरांच्या सल्यानेच जेंव्हा ब्रेन MRI ही केला होता त्याच्याच रिपोर्टमधे फाउंड नो आयस्कॅमीक रिजन वाचल्यावर काहीतरी मिसींग आहे असे वाटले होते. पण डॉक्टरांनी तो डाउटही रक्त न पोचणारा विभाग सापडला नाही असेच काहीसे सांगुन क्लीअर केला होता व सर्व नॉर्मल आहे असे सांगीतले होते. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे यासारखा गंभीर नाही पण काहीसा विचीत्र प्रॉब्लेम आहे माझा व कारण अजुनही सापडेले नाहीये. मला मसल्स स्टीफनेसचा त्रास आहे. थोडक्यात माझ्या शरीरातील सर्व स्नायु आपोआप काहीसे घट्ट व्हायची/रहायची प्रवृत्ती राखतात. यावर संमोहन तज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मनोशारीरीक विकार तज्ञ, पुष्पाउशधी, होम्योपेठी, न्युरोलोगीस्ट, आयुर्वेद वैद्य ते अगदी फिजीओ थेरेफिस्ट वगैरे वगैरे वगैरे सर्व उपचार दिर्घकाळ घेउन पाहिले आहेत कोणालाही अजुन निदान करता आलेले नाही. उम्मीद पे दुनीया कायम है. आपल्या प्रतिसादासाठी मनःपुर्वक धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

याच्यावर एकच उपाय ,फडतरेची डबलतिखट मिसळ खाऊन या व त्यावर लगेचच कडक चहा प्या. स्टीफनेस येण्यासाठी औषधे घ्यावी लागतील.

स्पंदना Fri, 05/09/2014 - 17:31
परवा रात्री शेजारणीचा नवरा छातीत दुखतय म्हणुन रात्री तीन वाजता अ‍ॅम्ब्युल्न्स वगैरे बोलवुन अ‍ॅडमिट झाला होता. आज त्याला भेटायला गेले. म्हंटल काय ब्वा? तर इतका रिलॅक्स होता. सगळ ठिक आहे. म्हणुन. साहेबाला या आधी दोन हार्ट अ‍ॅटॅक येउन गेलेत. अन त्या अनुभवाने सगळ नॉर्मल या शब्दांवर स्वारी खुष होती. आज पहिल्यांदाच तो बोलत असताना त्याच्या निळ्या निळ्या डोळ्यात एक वेगळी रंग छटा जाणवली. किती निर्मळ आनंद होता त्याच्या डोळ्यात. झाल होत काय बागकाम करताना जड कुंदी उचल्ल्याने छातीचा मसल दुखावला गेला म्हणे. हात लावला की दुखतय म्हणुन सांगत होता. पठ्ठ्या बिफशिवाय काही खात नाही अस हेलन (त्याची बायको) सांगते. मग मी आज भाज्यांच सूप देउन वर धमकी देउन आले. बघु आता. पण दोन रात्री पुर्वीचा तो अन आजचा तो याची आठवण हा धागा वाचताना आली.

साती Fri, 05/09/2014 - 17:53
मिपा डॉक्टर कंपूत स्वागत. आता जरा तुमची स्पेश्यालिटी कुठली , डिग्री कुठली ते ही लिहा ना. मी एम डी मेडीसीन आहे. आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत. ;)

In reply to by साती

नमस्कार आणि धन्यवाद. मी पुण्यातील एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. सिंहगड रोड, आनंदनगर येथे मागील ६ वर्षे प्रॅक्टिस करत आहे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

असंका Fri, 05/09/2014 - 18:44
तुमी होम्योपदीवाले? आता तुमचं काही खरं नाही इथे!! पण बघा, खरं सांगतोय विश्वास ठेवा. वर जे केले असं लिहिलं आहे मी, त्याचबरोबर, मी आपल्या गोड गोळ्याही चघळत होतो- ११०/- रुपयाची बेलाडोना २०० ची बाटली- जी खरं म्हणजे १०/१२ रुपयात सहसा मिळते-पण आम्ही जिकडे रहातो, तिकडे दुकानच नाही म्हणून आम्हाला महागात ऑर्डर देऊन आणावी लागते- तर तिच्यातील एका डोसने मला तात्काळ आराम मिळाला. अगदी १५ मिनिटात. (+ग्लोनाइन ३० च्याही एका डोसने, पण हा डोस बहुधा निरुपयोगी असावा, कारण पूर्वीपण घेतला होता- एकट्याने काही उप्योग झाला नाही) . एवढे विस्ताराने अवांतर केले कारण गोष्ट अगदी गेल्या २-३ दिवसातली आहे. तोवर आधीचे ६ दिवस मी कामालाच गेलो नव्हतो इतका कामातून गेलो होतो. अगदी मजबूर मधला अमिताभ झक मारेल असे एक्स्प्रेशन्स देत होतो. (फार वैयक्तिक झालं का? एस डब्बल ओ आर वाय.... ) होम्योपदी झिंदाबाद...!

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

बाळ सप्रे Mon, 05/12/2014 - 20:12
अहो आमच्यासारखे लोक कडु आहेत म्हणून सोडुन देउ साखरगोळ्या घेणं.. तुमच्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न आहे. अशा शंकांचं निरसन होणं जरुरी आहे.. का नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर तरुन जायची अपेक्षा ठेवायची.. ज्योतिष्यांप्रमाणे..

In reply to by बाळ सप्रे

जरुर, मी माझ्या परीने शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करेन.. पण मी एक निश्चित सांगू इछितो, की नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर एखादी पॅथी इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

बाळ सप्रे Wed, 05/14/2014 - 09:39
इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?
ही झाली तुमची श्रद्धा.. माझ्यामते केवळ श्रद्धेवर (चिकित्सेअभावी) अनेक निरर्थक गोष्टी हजारो वर्ष चालू शकतात.. आता शंकाच निरसन येउ द्या..

In reply to by साती

धन्या Fri, 05/09/2014 - 18:24
आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत.
वा. फक्त साबुदाण्याच्या गोळ्या देणारे वैद्यच इकडे नव्हते. ती कसर डॉ. काळूसकरांनी भरुन काढली. जोक्स अपार्ट, डॉ. काळूसकर होमिओपाथीबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करतील, "प्लासिबो ईफेक्ट" वर काही लिहितील अशी आशा करण्यात हरकत नाही. :)

In reply to by धन्या

जेनी... Fri, 05/09/2014 - 23:26
वॉव साबुदान्याच्या गोळ्या ! :) मला खुप खुप आवडतात . माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होत होता तेव्हा एका डॉक्टरने दिल्या होत्या .. आई म्हणाली नुसत्या गोड गोड लागताय्त .. मी मागितल्या तर द्यायची नाहि .. म्हणुन मग मी चोरुन चोरुन खायची .. ़काय मस्त लागतात म्हणुन मला साबुदाना गोळ्यावाले डॉक्टर खुप खुप आवडतात ...

In reply to by यशोधरा

साती Sat, 05/10/2014 - 00:12
यशोधरा आज्जी जरा नीट वाचा, मी विचारेपर्यंत डॉक्टरसाहेबांनी आपली डिग्री, स्पेश्यालिटी काहीच इथे किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिले नव्हते हो. आताच समजले. बाकी मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. ;)

In reply to by साती

यशोधरा Sat, 05/10/2014 - 08:56
अच्छा, अच्छा! म्हंजे कंपूत निमंत्रणाची घाई केली का? ;) मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. > साताक्का, खरंच का? एकदा तिथले तुमचेच प्रतिसाद वाचून या बरं! ;)

In reply to by यशोधरा

साती Sun, 05/11/2014 - 12:20
आज्जी तुम्हीच वाचून या. होमिओपथीला विरोध आहे. होमिओपॅथ शत्रू असे कुठेच लिहिलेले नाही. मला तर ते गरीब बिच्चारे वाटत्तात. शिकतात होमिओपथी आणि मग ९०% हून जास्त लोक अ‍ॅलोपथीची प्रॅक्टीस करतात. यात त्यांचा काहीच दोष नाही अर्थात. सरकारची पॉलिसीच चुकीची आहे. हे सुद्धा मी मायबोलीवर वेळोवेळी लिहिल्येय. अर्थात तुला खोड्याच काढायच्यात तर मी काय बोलणार? ;)

In reply to by साती

यशोधरा Sun, 05/11/2014 - 12:40
साताक्का, मला खोड्या वगैरे काही काढायच्या नाहीत गं. पण होमिओपथी लेखावर तुझ्या कमेंट्स तिकडे तशाच आहेत. टोन खिल्लीवजा आहे, म्हणून आश्चर्य वाटले होते आणि अजूनही वाटते आहे.

In reply to by साती

मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर प्रवक्ता म्हणुन बोलावल पाहिजे ब्वॉ! होमिओपॅथी वाल्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार या बातमीचे पुढे काय झाले ते कळाले नाही. नुकतेच माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा फोन नं ९८२२०१०३४९, किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे

In reply to by रेवती

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 20:33
कोणतीही पथी तितकीच चांगली असते. सर्वात चांगली सिम्पथी सर्वात वाईट एपथि (हे इंग्रजीत जास्त चांगले वाटते) all pathys are good, the best is sympathy and the worst is apathy

In reply to by सुबोध खरे

मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो लेख वाचताना तुमची आठवण आली. स्वगत- चला आमच्यातही बदल होताहेत

जेपी Fri, 05/09/2014 - 19:49
फक्त थंडीताप येतोय आणी पोट आवळुन दुखतय. या दोन लक्षणावर गावातल्या होमीयोपॅथी डागदर न मलेरीया आहे सांगितल. क्लोरोक्विनच्या डोस आणी 20/- फीस मध्ये तिन दिवसात बरा झालो. (कुठल्याही टेस्टविना)

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 19:56
माझ्या कडे एक माणूस आला होता. त्याच्या मुलाला पोटात दुखत होते. मी तपासून त्याला सांगितले कि तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत. त्यावर तो म्हणाला डॉक्टर जन्तांसाठी शौचाची तपासणी करायची का? मी त्याला शांतपणे म्हटले तुम्हाला पैसे(१५० रुपये) खर्च करायची हौस असेल तर करा. मला विचारलं तर ८ रुपयाची बेन्डेक्स( आलबेंडाझोल- जंतांचे औषध)ची गोळी मुलाला द्या आणि थंड बसा.

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:34
डॉक्टर! मिपा वर हार्दिक स्वागत. मिपाच्या डॉक्टर कंपू मध्ये भर पडली हे पाहून आनंद झाला. असेच तुमचे लेख येत राहूदेत. डॉक्टर लोकांचे अनुभव वाचण्यासारखे असतात असे आत्ता पर्यंतचा अनुभव आहे. तुमचेही येउद्यात!

In reply to by आनन्दिता

निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले. होमिओपॅथी म्हणजे प्लासिबो असा गैरसमज असणार्‍यांनी हे अवश्य वाचावे

In reply to by साती

साती Sat, 05/10/2014 - 12:10
अरे बापरे, हा उपप्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली यायला हवा होता. चुकून तुमच्या प्रतिसादाखाली आला. वेगळाच अर्थं ध्वनित होत असल्याने 'सॉरी' सं. मं., वरचा प्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली येईल असं कायतरी करा.

In reply to by साती

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 20:46
साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा काय्ये तुमचा? ;) डाक्टर डाक्टरांच्या 'पद्यां'मधे पण लई राडे असतात नै? आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आणि ह्यांच्या डोक्यावर अ‍ॅलोपथी...! अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर डॉक्टर आणि बाकीचे तसे नाहीत असं काही असतंय तर. मिपावरच्या 'ब्लिस्ड गुराख्या'चं मत तर असंच आहे बहुतेक ;) बाकी एएफएमसी वाले डॉ. खरे एम बी बी एस असले तरी ते सैनिकांचे असल्यानं सिव्हीलियन्स ना उपयोगी नसतील नै ;) (सगळ्यांनी हलकं घ्या)

In reply to by आनंदी गोपाळ

साती Sun, 05/11/2014 - 13:58
प्यारे, पॉईंटाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे शिकलात ती प्रॅक्टीस करा. मी उगाच कूणाला काढे नी मात्रा नी भस्मं नी नक्स वोमिका देत नाही तर तुम्ही उगाच आमच्या पॅथीची औषधे देऊ नका. आम्ही एखाद्याला एम आर आय लिहून देतो तेव्हा एम बी बी एस च्या पाच आणि पीजीच्या तीन वर्षांत एम आर आय कसा वाचावा हे शिकलेले असतो. असंख्य लेक्चर्समध्ये. उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? त्याहूनही जर तुमच्या आयुर्वेदिक फिजिऑलॉजीत प्राणवायू वैगेरे वेगळ्याच सर्कीटमधून फिरतो तर मग तुम्ही एक्स रे आणि आर्टेरीयल डॉप्लर वैगेरे करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय पहायचं अस्तं? पींगळा की सुषुम्ना? आणि आनंदी गोपाळकाकांना काही बोलू नका हं ते माझे मित्रं आहेत. ;)

In reply to by प्यारे१

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
आणि इतकी अगाध चर्चा वाचून, त्यांना स्वतःचा MRI काढायची वेळ नाही आली म्हणजे मिळवली!

In reply to by साती

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?- हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. MRI अथवा Imaging technique हे वापरण्याचा अधिकार हा फक्त अ‍ॅलोपॅथी वाल्यांनाच आहे, हा फार मोठा गैरसमज आहे. मला वाटतं की कुठली टेस्ट करायला सांगायची हे आलेला पेशंट अथवा त्याचा आजार यावरुन ठरल पाहीजे, पॅथी वरुन नव्हे. कारण पेशंटच हित सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच कोणतही नुकसान होता कामा नये. ज्या केसेस मधे खरोखर MRI, 2D Echo करणं गरजेच आहे, त्या केस मधे तो केलाच गेला पाहीजे. मी अमुक पॅथीचा डॉ. आहे म्हणून अथवा मला तो वाचता येत नाही म्हणून मी MRI सांगणार नाही हे act of negligence(गुन्ह्यासमान) ठरेल. एकतर हल्ली ९९% पेशंट छापील रिपोर्ट घेउनच येतात. आणि त्यातही रिपोर्ट न घेता कोणी आलाच तर त्याला, जो ही प्लेट पाहून रिपोर्ट बनवेल, त्याच्या एक्सपर्ट कडे पाठवायचे. त्यात काय अहंकार/पॅथी आड येता काम नये. तसही विविध चाचण्यांच्या काम हे निदान होई पर्यंतच, एकदा रिपोर्ट आल्यावर जे काय निदान होइल त्यावरुन जो तो आपापल्या पॅथीची औषधं द्यायला आहेच की मोकळा. आपण होमिओपॅथीची औषध एकवेळ देत नसाल, पण माझ्या पाहण्यात अनेक MD/MS आहेत की जे बरीच होमिओपॅथीची औषध सर्रास वापरतात. माझं म्हणणं एवढच आहे की सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

मदनबाण Mon, 05/12/2014 - 21:14
सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे. डॉक एकदम सही बोलरेला हय ! {अती सर्दी झाली की युनानी ची छिंकणी वापरणारा} Chhinakani

In reply to by प्यारे१

सुबोध खरे Tue, 05/13/2014 - 12:18
रच्याकने -- माझी पदवी पुणे विद्यापीठाचीच आहे लष्कराची नाही. आणि मी कोणत्याच गोळ्या देत नाही. साबुदाणा नाही कि वटी नाही. मी फक्त फोटो काढतो आणि त्यावर भाष्य करतो. मग पेशंट बरा होवो कि नाही. सानू की ?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

असंका Sat, 05/10/2014 - 12:03
अहो हे प्रतिसाद आपल्या लेखावरचे आहेत असं दिसतंय का आपल्याला? होम्योपदीवाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत हया! आपल्या लेखातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते कळतच नाहिये...जे कळतंय त्यावर सुरुवातीला पाच सात प्रतिक्रीया आल्या, त्या आपल्या लेखाच्या समजा. बाकी तुमचा धागा कधीच हायजॅक झालेला आहे. हवं तर त्याला मार्गावर आणा.... हां नाव आपलंच दिसत राहिल कल्पांतापर्यंत धागाकर्ते म्हणून्....तेव्हा अभिनंदन!!

In reply to by असंका

त्या ५/७ प्रतिक्रियां बाबतच म्हणत होतो मी!! बाकी म्हणाल तर होमिओपॅथीला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून तर खूपच आनंद झाला

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या http://misalpav.com/node/7514 डॊक्टर http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स एकूण हा विषयच वादग्रस्त आहे

जेनी... Fri, 05/09/2014 - 23:52
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....

लेखनविषय:
लेखनप्रकार
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला.

संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.

बाबा पाटील ·

जेपी Fri, 05/09/2014 - 13:21
चांगली माहिती. सविस्तर प्रतिसाद देईनच नंतर. एक प्रश्न - पक्षाघात होणे अनुवंशिक असते का ?

पैसा Fri, 05/09/2014 - 14:49
आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून खूपच उपयोगी माहिती आहे. माझ्या आईला वयानुसार गुडघ्याच्या सांध्यातील वंगण कमी झाल्यामुळे (याला निश्चित वैद्यकशास्त्रीय संज्ञा मला माहित नाही.)खूप वेदना होत होत्या. इथल्या एका आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणार्‍या वैद्याने काही सोपे व्यायाम करायला सांगितले आणि वरून लावायला एक लेपगोळी दिली होती. त्याच्या वापरानंतर तिच्या वेदना आणि सूज खूपच कमी झाली होती.

स्पंदना Wed, 05/14/2014 - 07:57
माझी एक शंका आहे डॉक्टर. हे जे तेल जीरवणं असतं,त्यात तेल त्वचेच्या खाली त्या दुखर्‍या भागापर्यंत खरंच पोहोचत का? कारण शोषुन घेण्याचे काम फक्त त्वचे मार्फतच होत. त्यापुढे जाउन ते तेल सांध्यांपर्यंत पोहोचत का? तुम्हे दिलेली माहीती खरच उपयुक्त आहे. पंचकर्माबद्दल मला फार औस्त्युक्य आहे.

In reply to by स्पंदना

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 00:22
मालिशने खरतर आखडलेले स्नायुबंध खुले होतात,वातव्याधी मुख्यत्वे रुक्षत्व अत्याधिक प्रमाणात असते त्यामुळे त्याठिकाणी स्थानिक स्नेहनाची आवश्यकता असते व्यवहारात देखिल प्रत्यक्ष प्रमाण म्हणुन एक सोप्पा उपाय करुन पहा.घरात कोनाचाही एखादा सांधा दुखत असेल तर बाजारात सहज उपलब्ध होणारे क्युअर ऑन सारख्या तेलाने मालिश करुन शेकावे,एक दोन दिवसात लगेच आराम मिळतो.दुर्देवाने आयुर्वेदाचे प्रमाणीकरण झालेले नाही परंतु अनुभवजन्य ग्यान च्या आधारे ही पद्धती निच्छितच अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे.(अवांतर-बाजारात मिळणार्‍या आधुनिक शास्त्रातील वेदनाशामक मलमांच्या मध्ये तरी वेगळी कोनती कन्सेप्ट असते.)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/15/2014 - 02:47
जळवेला बरोबर दूषित रक्तच सापडतं असं तर वाटत नाही. ट्रेक करणाऱ्या अनेकांना, नको तिथे जळवा लागल्याचे अनुभव अन्यथा आले नसते. जळू लावताना रुग्ण आणि/किंवा वैद्यांना घाण वाटत नाही का? त्यापेक्षा स्वच्छ सुई खुपसून रक्त उपसून घेणं सोयीचं, कमी कटकटीचं, हायजेनिक आणि किमान किळसवाणं वाटत नाही का, याबद्दल मला 'औस्त्युक्य' आहे. (अवतरणातला शब्द संबंधितांनी ह. घेणे.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 00:33
निरक्षिर विवेक हा सिद्धांत मान्य केला आहे.प्रत्यक्षात ज्या वेळेस वेदनेच्या ठिकाणी रक्तदोषाचा अनुबंध असेल त्याच वेळेस जलौकाचरण केले जाते,एकांगिक अथवा क्षयजन्य किंवा अवरोधजन्य संम्प्राप्तीमध्ये नाही.हा सर्वस्वी त्या त्या अनुभवी वैद्याचा निर्णय असतो.दुसरे जळुच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचे तत्व सापडते की जे रक्त साकाळु देत नाही त्यामुळे जळु लावलेल्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारते व वेदनाशमन होण्यास मदत होते. जलौकाचरण हे फक्त स्थानिक दुष्टी असेल तरच केले जाते इतर वेळी सिरागत रक्तमोक्षणच केले जाते. बाकी तुमच अनहायजनिक अथवा किळसवाण प्रकार- कुठल्याही डॉक्टर अथवा वैद्याचे कामच लोकांची घाण साफ करण आहे,कुनीतरी हे काम केलेच पाहिजे,त्याची किळस वाटणारा प्राणी वैद्यकिय पेशाच्या लायकीचा नसतो.

कंजूस गुरुवार, 05/15/2014 - 09:14
माझ्या उजव्या पायाला सायटिका झालेली .नारायणतेल लावून गुण नाही आला .अर्जुनारिष्ट आणि बलारिष्ट( दोनशे एमेल प्रत्येकी)रोज थोडे सात दिवस घेऊन गुण आला .दुसऱ्या कोणत्याही अॅलोपथी गोळ्या घेतल्या नाहीत .ब्रफेनपण नाही .

संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती. आजच्या धक्काधक्कीच्या दैनंदिन जिवनात मानवाला भेडसावणारी नेहमीची समस्या म्हणजे,उठता बसता जाणवनारी सांध्यांची कुरकुर,कोणाचे गुडघे दुखत असतात,कोणाची कंबर, तर कोणाची मान दुखत असते,आपल्याकडेच नव्हे तर जगात सगळीच कडे या दररोजच्या वेदनांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते अथवा तात्पुरती वेदनाशामक औषधे घेतली जातात,आणी हाच प्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अत्यंत त्रासदायक ठरतो.व कुंथत कुंथत आयुष्य जगण्याची वेळ आणतो.जर सुरुवातीसच म्हणजे ज्यावेळेस सांध्यांच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात त्याच वेळी जर योग्य उपचार केले तर हा आजार फक्त आटोक्यातच

नाते अग्निशी

शब्दानुज ·

शब्दानुज Fri, 05/09/2014 - 10:15
मागील वेळेस वयासाठी गजहब झाला होता --काहींनी म्हशींसाठी स्वप्ने बघितली!!! म्हणुन सांगतो १९

In reply to by शब्दानुज

च्यायला, ९१ ला सुद्धा अशी कविता सुचणं कर्मकठीण! यावरनं एक ज्योक आठवला. एक नवकवी अशाच धगधगत्या कविता कविसंमेलनात सादर करतो पण प्रतिसाद मिळत नाही. मग तो विचारतो `माझ्या कवितेतली आग तुम्हाला जाणवत नाही का?' श्रोते कोरसमधे उत्तरतात ` अजिबात नाही' यावर नाऊमेद होऊन तो विचारतो `माझ्या कवितेत आग येण्यासाठी मी काय करु?' मागनं एकजण म्हणतो `आगीत घाला'

In reply to by जेनी...

शब्दानुज Sat, 05/10/2014 - 19:51
ही हुंड्यात बळी पड्लेल्या एका स्त्रीची कथा आहे तिचे अग्निशी असलेले नाते कसे बदलत गेले हे सांगितले आहे पहिल्यांना अग्निशी असलेले नाते संहारक होते.. ती ज्याला परमेश्वर मानले त्याच पतिने तिला जाळ्ले नंतर हे नाते अंगारात बदलले.. शेवटी सामांन्यांनी उठाव केला आणि त्यास फासावर लावले त्यावेळी तिने बंडाच्या रुपाचे अग्नीरुप घेतले शेवटी जेव्हा पतिला चीतेवर पाहिले तेव्हा तिचे मन गहिरवले आणि चितेवरच्या अग्निचे रुप घेउन पतिस आपल्यात सामावुन घेतले आता पुन्हा कविता वाचुन बघा..... प्रतिसादासाठी धन्यावाद........

शरीरावर माझ्या बालांचे नर्तन चालले बारात मी बालांशी नाते प्रस्थापिले माझ्याच बेवडेगिरीने लिव्हर जाळले गेले रुपारूपातील यौवन मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ झिंगेतुन उरले पोटातील धगधगते अंगारे तरी पिण्यास आतुरले जनलोकांच्या बॉटलमध्ये बंदी मी, स्वर्णरुपात प्रगटले अखेरीस तुमच्यामधुन मी, उरलेल्या पेगांवर भागवले शेवटक्षणी मात्र मी 'सोडण्यासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी रस्त्यावर मिठित घेतले

In reply to by संजय क्षीरसागर

शब्दानुज Sat, 05/10/2014 - 19:52

१९ व्या वर्षी सामान्य व्यक्ती प्रेम वगैरे करते आणि अत्यंत अवखळ असते. काव्यविषय काल्पनिक असला तरी दारुण आहे. पतीनं दहन केलेली पत्नी, तो फासावर गेल्यावर, त्याच्या सरणावर अग्नीरुप घेऊन त्याला मिठी कशाला (झक मारायला) घालेल? आधीच इतका लफडा झाल्यावर त्याला आपल्यात कशाला सामावून घेईल? विधायक विचार करा, चांगले साहित्य वाचा, सकाळी उठून व्यायम करा, समोर ध्येय ठेवून आभ्यास नीट करा म्हणजे विचारात अशी निगेटिवीटी येणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शब्दानुज Sat, 05/10/2014 - 23:55
एखाद्या कडव्यावरुन कोणाचे विचार कसे आहेत हे कळले शक्य नाही वरच्याच विडंबनेतुन मग मी कोणता अर्थ घ्यावा?????? एखाद्या गोष्टीत ईतरांची मते वेगळी असु शकतात शेवट्चा मुद्दा एकवेळ चुकीचा असेलही!! अजुन लहान आहे, नवीन आहे मी!! एवढ्यात रागवु नका तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे

In reply to by शब्दानुज

आनन्दिता Sun, 05/11/2014 - 08:02
कवितेची पार्श्वभुमी आधी लिहिली असती अथवा शिर्षकात काही हिंट दिली असती तर बरं झालं असतं. पार्श्वभुमी वाचल्यानंतर मात्र अर्थ लागतायत. आवडली कविता..:) लिहीत रहा.!

शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले

पोरका

शब्दानुज ·
लेखनविषय:
आई घेना मला कुशीत दुसरे मी काही नाही मागत जग हे मला पोरका म्हणवते उसने अश्रु आणून हळह्ळते रोज तुझ्यासाठी फाट्क पोतरं टाकतो उपेशेने ते का विणु पाह्तो वाट बघत मी झोपी जातो पुन्हा तुला स्वप्नातच पाह्तो

९० डिग्री साऊथ - ७

स्पार्टाकस ·
९० डिग्री साऊथ - ६ ३० नोव्हेंबरला अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन वाटचाल करता अ‍ॅमंडसेनची तुकडी बर्फाच्या टेकड्या आणि त्यांना लागूनच असलेल्या खोल द-या अश्या परिसरात येऊन पोहोचली. या प्रदेशातून मार्ग काढणं अतिशय जिकीरीचं होतं. कित्येकदा वेगवेगळ्या दिशांनी मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ होत होते. अखेरीस एका टेकडीवरुन जाणारा बर्फाचा पूल त्यांना आढळला. एकावेळी जेमतेम एक स्लेज जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा तो पूल होता ! दोन्ही बाजूला खोल द-या पसरलेल्या होत्या.

असे का होते मला..??

बाप्पू ·

तुमचा अभिषेक Fri, 05/09/2014 - 00:23
मला नेहमी स्वताहूनच काहीतरी घाणेरडे, वाईट, अपघात, घातपात, मृत्यु वगैरे घडलेय असे इमॅजिन करून पुढे काय काय संकटे येतील आपल्यावर वा आपली काय हालत होईल असे स्वप्नरंजन करायची सवय आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, ट्रेनने पूलावरून जाताना हि ट्रेन खाडीत कोसळली तर, मला पोहताही येत नाही, काय हालत होईल माझी... बिछान्यावर झोपले असताना वाटते की वरचा पंखा गरगरत माझ्या अंगावर कोसळला तर, पायाला किती जोराचा फटका बसेल, वा भूकंप होऊन बिल्डींगच पत्त्याप्रमाणे कोसळली तर, मी कायमचा अधू झालो तर मी उर्वरीत आयुष्य कसा जगेन, मला नोकरीधंद्यासाठी काय किती कष्ट घ्यावे लागतील, जर का मी उद्या अचानक आंधळा झालो तर ते आयुष्य मला जमेल का, घरात सशस्त्र दरोडेखोर घुसले आणि त्यांचा सामना मला करायची वेळ आली तर वगैरे वगैरे बरेच काही आणि सतत हे असले विचार चालूच असतात.. वरवर पाहता हे तुमच्यासारखेच आहे असे वाटेल, मात्र मी या कल्पना करताना त्यात छानपैकी गुंततो, ना मला कसले टेंशन येत ना छातीतील धडधड वाढते. जसे एके काळी आवडणार्‍या मुलीला गुंफुन मनातल्या मनात एखादी कथा रचली जायची तसे अगदी सहज घडते. विचारमालिका खंडीत झाल्यावर मात्र तेवढे वाटते, शी काय हे आपण अभद्र विचार करत होतो.. पण ठिक आहे, मला तरी हा काही आजार नाहीये, विचार चांगले संतुलितच करतो मी. बायकोच्या मते प्रचंड समजूतदार व्यक्तीमत्व.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 01:45
हो खरेच स्वप्नाळू, (किंवा आपल्याच तंद्रीत असणारा म्हणू शकता.) म्हणजे ध्येय अचीव करायची महत्वाकांक्षी स्वप्ने नाहीत, तर ही अशी वेळ चांगला वाईट घालवणारी.. एका वयात, म्हणजे अगदी कालपरवापर्यंत लग्न व्हायच्या आधीपर्यंत जी कोणी मुलगी आवडत असायची तिच्या विचारांत रात्र रात्र मजेत जागवायचो, किंबहुना त्याच साठी म्हणून मी सतत कोणत्या ना कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलेलोच असायचो. घरी मात्र रोज खूप शिव्या खाव्या लागतात या तंद्री लागण्यामुळे. कारण ती २४ गुणिले ७ लागलेलीच असते. आजवर मी एकदाही मला मारलेल्या हाकेला पहिल्याच प्रयत्नात ओ दिला नाही. एखादा प्रश्न मला चारवेळा विचारून झाल्यावर पाचव्यांदा समोरून कोणी ओरडून विचारतो तेव्हाच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. मला बहिरा म्हणतात घरी. आमचे आडनाव नाईक म्हणून मामाकडचे बहिर्जी नाईक चिडवतात. बायको सुद्धा त्रागा करते, कधी हसते तर कधी हताश होऊन हात टेकते.. पण मी माझ्या तंद्रीतच असतो. तिला मी यावर एक उपाय सांगितला आहे, काहीही मला सांगायच्या आधी मला हाक मारून माझे लक्ष वेधून घे, मी तुझे ऐकतोय हे कन्फर्म कर आणि मग काय ते सांगायला घे, म्हणजे रिपीट करायचा त्रास कमी होईल. अर्थात हे कसे नेहमीच शक्य होणार. पण बस्स चाललाय संसाराचा गाडा, आणि या एकाच सवयीपोटी `मीच ती म्हणून तुला झेलतेय' हे दिवसभरातून सतर्‍यांदा ऐकावे लागतेय. :(

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 23:30
जी कोणी मुलगी आवडत असायची तिच्या विचारांत रात्र रात्र मजेत जागवायचो, किंबहुना त्याच साठी म्हणून मी सतत कोणत्या ना कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलेलोच असायचो.
ही मुलींची तंद्री फार मस्त असते नाही ? भयानक टाइमपास होतो. पण पोरगी पटल्यावर मात्र बरेचदा आपल्या रोम्यांटीसीजमच्या पातळीवर ती पोचु शकली नाही तर मात्र प्रचंड मुड ऑफ होतो... :(

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 01:43
खरेच भयानक टाईमपास होतो. तसेही हल्ली टाईमपास म्हणत मोबाईलचे अ‍ॅडिक्शन लागलेल्या लोकांपेक्षा हे लाख गुणा बेटर. बाकी मूड ऑफ म्हणाल तर ज्या मुलींच्या मी खरोखरच प्रेमात असायचो त्या कधीच पटल्या नाहीत हे दुर्दैव. आणि माझा प्रेमविवाह झाला ते कोणीतरी मला पटवल्याने ;) बाकी खात्रीने म्हणालात म्हणजे आपलेही अनुभव आहेत तर याबाबत :)

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Sun, 05/11/2014 - 02:15
माझा प्रेमविवाह झाला ते कोणीतरी मला पटवल्याने
अर्थातच. अन्यथा मूड ऑफ होत होत अरेंज मेरेजच झाले असते ;)
बाकी खात्रीने म्हणालात म्हणजे आपलेही अनुभव आहेत तर याबाबत
काय करु सन्मुन सैन दोन्ही कर्क :)

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 23:23
आपली रास कर्क व नक्षत्र पुष्य वाटते. स्वप्नाळुपणा व स्वतःच्या धुंदीत जगणे. कुटुंबावर अतिशय प्रेम असणे, भावनाप्रधान, हुशार, कलासक्त, विश्वासु (जो पर्यंत ठेच लागत नाही) वगैरे वगैरे वगैरे...!

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 01:39
हो, सारेच वगैरे वगैरे अगदी खरे पेपरातली रास कधी आजवर वाचली ना मानली, मात्र कर्क राशीच्या लोकांचे जे स्वभावगुण आहेत ते चांगलेच जुळतात माझ्याशी. तसेच हि कर्क रास मुलांपेक्षा मुलींना जास्त शोभते असेही ऐकलेय लहानपणी. असो, विषय राशींचा नसल्याने फारसा विषयांतर नको..

पैसा Fri, 05/09/2014 - 09:26
हे लिखाण खरेच गंभीरपणे लिहिलंय का तुम्ही? "सल्ला" मधे लिहिलंय म्हणून एकदम कसंतरीच झालं. जर खरंच असा काही प्रॉब्लेम असेल तर हे काही कारणाने आलेले नैराश्य (डिप्रेशन) किंवा इतर काही मानसिक आजार असू शकेल. ताबडतोब एखाद्या कौन्सेलर किंवा सायकिअ‍ॅट्रिस्टला भेटा. मनाचा आजार ही काही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. डॉक्टरचा सल्ला/औषधोपचार घ्या. लवकर बरे वाटेल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

In reply to by पैसा

बाप्पू Fri, 05/09/2014 - 17:38
हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे हे लिखाण केले आहे मी. हे काही नेहमीच होते असे नाही. पण मी जेव्हा जेव्हा कामातून फ्री आसतो तेव्हा येणारे विचार हे नेहमी नेगटीव च असतात. जेव्हा मी एखाद्या कामात गुंतलेलो असतो तेव्हा हे विचार फार कमी होतात किंवा निघून देखील जातात. सायकिअ‍ॅट्रिस्टला भेटलो होतो एका. पण तो बहुतेक नवशिका असावा. किंवा असेच कोणता तरी क्रॅश कोर्स केलेला असावा. कारण काहीच फरक नाही पडला. आपल्याला जर एखादे चांगले डॉक्टर माहीत असतील तर सांगा. तुमच्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद.

In reply to by बाप्पू

पैसा Fri, 05/09/2014 - 18:28
तुम्ही कुठे रहाता ते सांगितलंत तर लोक माहिती देतील. मला मुंबई-पुण्याच्या डॉक्टर्सची माहिती नाही. पण हल्लीच आलेल्या शुचीच्या धाग्यावर काहीजणांनी मुंबई पुण्यातील काही सायकिअ‍ॅट्रिस्टची नावे दिली होती.

In reply to by बाप्पू

विजुभाऊ Sun, 05/11/2014 - 02:02
बाप्पू याचा अर्थ तुम्ही खरे पुणेकर नाही आहात. कशाचा तरी जाज्वल्य अभिमान वाळगा आपोआप जमेल मग सगळे. ( किमानपक्षी तुमच्या घराजवळच्या चौकात सकाळी डबे घेऊन उभे असणार्‍या पोहेवाल्याचा तरी अभिमान बाळगा ).

In reply to by बाप्पू

रेवती Sat, 05/10/2014 - 01:11
अरेवा! तुम्ही आमच्यासारखेच दिसता. फरक पडला तो तुम्हाला नसून त्या सायकियाट्रिस्टला! मी पोहायला शिकाण्यासाठी गेले पण मला येणं राहू देत, इंस्ट्रक्टर पोहणे विसरला अशी वदंता होती. गंभीर लिखाण नका हो करत जाऊ.

ऑ हा प्रश्न तुम्हाला कसा काय पडला बुवा. कारण तुमचा पहिल्या धाग्यात तुम्ही जो संभाजी राजे यांच्यावर ऊहापोह केला आहे त्याने तुमचे वाचन आवड दांडगी आहे हे दर्शवते. असो सर्व प्रथम त्या कोषातुन बाहेर येण्यासाठी चांगली पुस्तके वाचा. मनात विचार यायला लागला की मन या पुस्तकांच्या वाचनात की किंवा गाणी ऐकणे, यांत गुंतवुन ठेवा. पुस्तकांच्या यादीसाठी मि.पावर आशु जोग यांचा धागा आहे किंवा मिपाचे जुने लेख/धागे वाचायला सुरवात करा. आणि आता तुम्हाला सल्ला हवाच असेल तर मि.पावर मा. माहितगार, मा. कंजुस, मा. मुक्त विहारी, या मा. गवि साहेब आणि बरेच जण आहेत यांना व्यनि करा. जे तुम्हाला नक्किच मार्गदर्शन करतील. तुम्हाला पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा! *good* धन्स

In reply to by प्रमोद देर्देकर

बाप्पू Fri, 05/09/2014 - 17:40
हो आजकाल वाचन काढावले आहे. तसेच आंतरजालवर देखील काही ना काही सकारात्मक वाचत आसतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मदनबाण Fri, 05/09/2014 - 11:00
ताण/तणाव हे आता कॉमन प्रॉब्लेम झाले आहेत... त्यामुळे त्यापासुन घाबरुन जाण्यात कोणताच फायदा होत नाही, तोटा मात्र नक्कीच होउ शकतो.त्यामुळे मनावर आणि शरीरावर परिणाम होउ शकतो/ होते. मग काय करावे ? आपल्या पेक्षा हालाखीचे आयुष्य जगणार्‍यांकडे पहावे,त्यांच्या आयुष्याकडे पहावे... मग स्वतःलाच विचारावे की यांच्या पेक्षा मी नक्कीच जास्त सुखी नाही का ? कोणाला अपंगत्व असते कोणाला जगायला आधार नसतो तरी सुद्धा ते सरव्हाइव्ह करत नसतात का ? करतात ना ? मग आपण धडधाकट असताना येणार्‍या परिस्थीतीशी का लढु नये ?समोर येणार्‍या प्रत्येक परिस्थीला मी सामोरे जाइन... लढीन मग भलेही परिणाम काही असो ! Try मनात टोकाचे निगेटिव्ह येउ शकतात हे मान्य, पण जर निगेटिव्ह विचार येउ शकतात तर मग पॉसिटिव्ह विचार का येउ शकत नाही ? हा प्रश्न सुद्धा आपण आपल्यालाच विचारावा.तुमच्या आयुष्यातल्या मागच्या भागाचा थोडा विचार करा आणि पहा की त्या परिस्थीती पेक्षा आता तुम्ही आहात त्या परिस्थीत फरक पडला आहे ना ? मग येणार्‍या काळात सुद्धा परिस्थीतीत बदल घडेलच. स्वतःवर विश्वास ठेवा, आणि स्वतःला कधीही इतरांपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न सुद्धा करु नका. The whole secret of existence is to have no fear. Never fear what will become of you, depend on no one. Only the moment you reject all help are you freed. Swami Vivekananda

मनाची विक्षिप्तता तीन प्रकारे आपल्यावर ताबा मिळवू शकते. भीती, श्वासाचा कोंडमारा आणि वर्तमानाशी नातं तोडणं. एकदा मनाची ही कार्यप्रणाली समजली की पुढे सगळं सोपं आहे. १) मन सक्रीय होण्यासाठी श्वासाची आवश्यकता आहे. एकदा आपलं श्वासावर नियंत्रण आलं की मन ताब्यात येतं. ज्या क्षणी नेगटीव विचार सुरु होतील त्या क्षणी जाणीवपूर्वक उत्छ्वास बाहेर सोडा. जितका जाणीवपूर्वक श्वास तुम्ही बाहेर सोडाल तितक्याच वेगानं श्वास पुन्हा आत येईल, तो एकाग्रतेनं भरुन घ्या. त्या एनर्जीनं पुन्हा उत्छ्वास बाहेर सोडा म्हणजे जोमदार श्वास आत येईल. मूळ अवधान श्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडण्यावर ठेवा म्हणजे संपूर्ण श्वास-प्रश्वासावर तुमचं नियंत्रण येईल. ही क्रिया कुठेही आणि केव्हाही करता येईल. जमेल तोपर्यंत ही क्रिया चालू ठेवा. एकदा सराव झाला की नेगटीव विचार सुरु होता क्षणी, तुमची जाणीवपूर्वक श्वासाची क्रिया चालू होईल आणि नेगटिवीटी तुम्हाला घेरू शकणार नाही. नित्यनियम म्हणून, सकाळी जाग आल्यावर ही प्रक्रिया सुरु करा आणि रात्री निजण्यापूर्वी पुन्हा एकदा लक्षात ठेवून श्वास-प्रश्वास करा. सकाळी नेगटीविटी तुमचा ताबा घेऊ शकणार नाही आणि रात्री शांत झोप लागेल. उत्छ्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडणं हे क्रियेचं गमक आहे. बाकी सगळं आपोआप होईल. २) अशा प्रकारे श्वास मोकळा झाला की मन तुम्हाला कॉर्नर करु शकणार नाही (तुमचा कोंडमारा होऊ शकणार नाही). यामुळे हळूहळू तुमची भीती दूर होईल. तुमच्या लक्षात येईल की मनाची पॉवर केवळ नेगटीव विचार निर्माण करुन भय निर्माण करण्यात आहे. श्वास कोंडला की भीती वाटायला सुरुवात होते आणि भयानं अधिकाधिक भेदक विचार सुरु होतात. एकदा श्वास ताब्यात आला की भय टेकोव्हर करु शकत नाही. ३) वरच्या दोन्ही गोष्टी साधल्या की एक नवीन उलगडा, तुम्हाला आपसूक होईल. आपण वर्तमानात आहोत! हे वर्तमानात असणं; वर्तमानाशी संलग्न असणं, परम स्वास्थ आहे. मनाचं अस्वास्थ्य म्हणजे आपण वर्तमानापासून अलग होणं. मग एखाद्या निवांत क्षणी तुम्हाला जे. कृष्णमूर्तींच्या या अद्भूत वक्तव्याचा अर्थ उलगडेल : Present is the ultimate security! वर्तमान ही परम सुरक्षितता आहे. सध्या या वाक्यावर विचार करु नका. ती शेवटची स्टेप आहे. ते विधान वैचारिक उहापोह करायची गोष्ट नाही, अनुभवाची गोष्ट आहे. जस्ट वेट अँड फॉलो द प्रसिजर आय हॅव टोल्ड, रिझल्ट विल फॉलो.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 14:37
माझ्याकडे ऑथोरिटी नाही म्हणुन म्हणुन क्याटेगोराइज करणार नाही पण आत्मसन्मानाचा आभाव आणि अनेक अपुर्या इच्छा (and counting) याच्या मिश्रणातुन हे रसायन निर्माण झाले आहे. जे मांडले आहे तेव्हडाच त्रास असेल तर सकृत दर्शनी विशीष्ट औषधानी त्वरित गुण येइल. साय्केट्रिक्ट गाठावा. अतिशय निर्व्यसनी व्यक्ति समोर हे छोटे छोटे त्रास विक्राळ स्वरूपात उभे राहतात. ते कारण असेल तरी व्यसनी व्हा असे सुचवणार नाही. जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 01:50
जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल. जेवढे मी याबद्दल ऐकून आहे मलाही वाटते की या केस मध्ये नक्कीच विपश्यना काम करून जाईल. कारण यातील मनापासून करणे हि अट तुमच्याकडून आपसूकच पाळली जाईल. करा आणि (किंवा केलाच तर) आपला अनुभव देखील इथे लिहा. :)

शिद Fri, 05/09/2014 - 18:08
किंवा आर्धा किलो वजन जरी कमी झाले तरी चिंता
आमचे ह्या बाबतीत अगदी उलटे आहे... *smile* साहेब, बायको-पोरांबरोबर (अर्थात लग्न झाले असेल तर...) किंवा मित्र / मैत्रिणींबरोबर बाहेर फेरफटका मारायला जात जा. मस्त खा, प्या आणि मज्जा करा. *dance4* उगाच विचार करत बसलं की मुंग्याच्या वारुळातुन जसं एक-एक करुन मुंग्याची रांग बाहेर पडते तसं मनात भलतेसलते निगेटिव विचारांची रांग लागते आणि मग डोके भंजाळते. *crazy*

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 19:00
बहुतेक हंबल सुरुवात होऊन नंतर माणसाला सगळे काही मिळाले कि असे विचार येतात. अशा मनांच्या मोकांना संपत्ती असून चिंता न करता आयुष्यभर आरामात राहायची सवय नसते म्हणून.

In reply to by बाप्पू

जेनी... Sat, 05/10/2014 - 00:54
मनोविकार तज्ञ गाठा .. त्याला हे सगळे सांगा .. तो अऊशध देइल मग तुम्ही बरे व्हाल . बरे होण्यासाठी अऊशध खा . पण मनोविकार तज्ञ छान दिलासा देतात .. बस्स पण एकदम विश्वास बसुन जातो त्यांच्यावर ... इथले सगळे सल्ले वाचा .. आचरणात आणा पण डॉक्टरकडे जाणे टाळु नका ... वेळीच दाखवलात तर ठीक

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 00:09
आपण मिपावर ज्या क्षणी आलात त्या क्षणापासून, तुमचा आजार तुम्हाला सोडायला लागेल. आयला, हे मिपा नावाचे भूत फार शक्तीमान आहे. जमल्यास, भटकंती वाचा,,, पा.क्रु. वाचा. फावल्या वेळात, एखादा पदार्थ करून बघण्यासारखा उपाय नाही.बिघडला तर बिघडला.निदान तुमचे मन तर गुंतून राहील. एक साधा आणि सोपा उपाय देतो. तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते, ती जवळ ठेवा. (ईथे गोष्ट म्हणालो आहे. व्यसने नाही...नाहीतर तुम्ही सिगरेट्,तंबाखू आणि दारु जवळ ठेवाल अन उगाच आम्हाला शिव्या द्याल.) संगीत ऐका.बाथरूम मध्ये गा. (आय अ‍ॅम अ बाथरूम सिंगर.मला मनापासून गायला आवडते.ऐकणार्‍याने कान बंद करावेत.)ऑफीस मध्ये असाल तर, फावल्या वेळात मित्रांबरोबर चेष्टा-मस्करी करा.२/४ मिनीटे मित्रांबरोबर बोलल्याने, बॉस बोंबलत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे सुट्टीच्या दिवशी मस्त मैफील जमवा. तुमच्या सुदैवाने, तुम्ही पुण्याला राहता, वल्लींना गाठा (वल्लींचे नांव , त्यांना न विचारता घेत आहे, वल्ली साहेब सॉरी.) त्यांच्या बरोबर एखादी पिकनिक करा.अत्रुप्त आत्म्यांच्या बरोबर रविवारी पुण्यातला जुना बाजार बघा. पुण्यात लई भारी भारी मिपाकर आहेत.त्यांची गाठभेट घ्या. एक आपला असा मस्त कंपू जमवा.अन करा कट्टा. (बाद्वे, आमचा यानबूवली तला कट्टा काल सुखरूप पार पडला.व्रुत्तांत लवकरच.)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/11/2014 - 00:33
दुर्दैवाने हे असे घडूनही मनोदशेत फार फरक पडत नसतो. असो, हे वैयक्तीक मत आहे. वस्तुस्थितीदायक निरीक्षणांती नोंदवले आहे. फार काही यावर बोलण्यासारखे नाही.

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 00:47
व्यक्ती तितक्या प्रक्रुती.... आम्हाला माणसे प्रिय आणि संगीत त्यातूनही प्रिय...शिवाय वेळ मिळालाच तर खायला करायाला आणि खिलवायला पण आमची ना नसते.फावला वेळ कुणी कसा सत्कारणी लावायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्र्न. आणि मुळात त्यांनी हीच गोष्ट सांगीतली, की फावल्या वळात त्यांना त्रास होतो.म्हणूनच मी फावल्या वेळा संबंधी लिहीले... आणि तसेही कुणीतरी म्हटले आहेच.... "मन करा रे प्रसन्न, सर्व चित्तीचे साधन." आम्ही , आम्हाला जे योग्य वाटले ते लिहीले.चुकीचे असेल ही,,,, पण वाईट नक्कीच नाही.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/11/2014 - 00:54
पण वाईट नक्कीच नाही.
चांगले वाइट हा विचार करणे त्यांना नक्किच अभिप्रेत नाही. उपयोगी आहे काय ? ते महत्वाचे आहे त्यांना. आणी इथे एका मिपाकराचे असे मी उदाहरण बघीतले असल्याने मी आपला सल्ल्या धुडकावायचा सल्ला दिलाय. कोण मिपाकर हे जाणून घ्ययचे असेल तर व्यनी सुवीधा आहे.

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 01:08
मग कुठला सल्ला मानावा आणि कुठला नाही, हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या की. आपण कशाला रक्त आटवायचे? बर्‍याच लोकांनी बरेच सल्ले दिले आहेत.मला जे योग्य वाटले ते मी दिले. आणि तसेही, मिपा मुळे आयुष्य उध्वस्त झालेला मनुष्य माझ्या पाहण्यात नाही.(किंबहूना माझ्या आखातातील रटाळ दिवसांत मिपा हेच माझे ओअ‍ॅसिस आहे.मला जसा मिपाचा फायदा झाला आणि होत आहे, तसाच त्यांना पण होवू शकतो.) संगीतामुळे किंवा भटकंती मुळे किंवा पाककले मुळे पण असे होत नाही. मन प्रसन्न करणारे, कुठलेही उपक्रम फायदेशीरच ठरतात.उद्या जर धागाकर्त्याला कुठल्या बाबांच्या किंवा स्वामींच्या दर्शनाने बरे वाटत असेल, तर मला त्यात आनंदच आहे.

म्हैस Mon, 06/09/2014 - 15:45
चांगल्या मनोरोग तज्ञाला दाखवा . तुमची झोप पूर्ण होते का ? अर्धवट झोपेमुळे फार प्रोब्लेम्स निर्माण होतात . पूर्ण झोप घ्या . प्राणायाम करा . डोक्याला आणि फुफुसाला हवेचा योग्य पुरवठा झाला कि फ्रेश आणि उत्साही वाटतं . घरातल वातावरण प्रसन्न ठेवा . सुगंधी धूप, अगरबत्ती जाळून प्रसन्नता निर्माण करता येईल . आपल्या आवडत्या देवाचं स्तोत्र मोठ्याने म्हणा .

मराठे Mon, 06/09/2014 - 23:22
तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्धल इथे लिहिलं आहेत हीच उपचाराची पहिली पायरी आहे. याचा अर्थ तुम्ही उपचार घेण्याबाबत सिरियस आहात हे स्पष्ट होतं. आता वरती लोकांनी सांगीतल्याप्रमाणे चांगल्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्याल याची खात्री आहे.

समीरसूर Tue, 06/10/2014 - 14:56
अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते. आणि मग सुरु होतो अनिश्चिततेचा आणि मानसिक आंदोलनांचा खेळ! सगळं तसं पाहिलं तर नियमाप्रमाणे पुढे सरकत असतं पण आपलं मन त्या भयाने जागच्या जागी थांबून राहतं. हे असं भय बहुधा सगळ्यांनाच कधीतरी ग्रासतं. याची कारणे काहीही असू शकतात. नोकरी/धंद्यातली अनिश्चितता, गरीबी, मोठे अपयश, व्यवसायातले नुकसान, घरात कलह-तंटे, व्यसनाधीनता, कुणी जीवाभावाचं एकदम जाणं, जबर नुकसान (आर्थिक, मानसिक), कुठल्यातरी कारणाने आलेली अपराधी भावना, काहीतरी हातून निसटून गेल्याची चूटपूट आणि खंत, कामाच्या ठिकाणी कलह, एखाद्या व्यक्तीच्या (ओळखीची किंवा अनोळखी) विशिष्ट वागणूकीमुळे होणारा मनःस्ताप, अतिविचार करणे, भविष्याची चिंता, एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी चिंता, इत्यादी कुठलीही कारणे अशा भयगंडाला कारणीभूत ठरू शकतात. अगदी क्षुल्लक गोष्टी देखील कधी कधी मनाला त्रास देतात. हजारो-लाखो रुपयांचे नुकसान हसत-हसत पचवणारा कधी कधी एका क्षुल्लक पेन्सिलीच्या हरवण्याने कमालीचा अस्वस्थ होतो. प्रत्येक घटनेविषयी, व्यक्तीविषयी, सवयींविषयी, आणि प्रत्येक गोष्टीविषयी आपले स्वतःचे असे खास मजबूत विचारसंच किंवा दृष्टीकोन असतात. त्याला धक्का लागला की मनाची अस्वस्थता वाढते. ती जास्त वाढली की मग भयगंड येतो; आत्मविश्वास, उत्साह उतरणीला लागतात. त्यातून अधिक चिंता वाढते. असे हे दुष्टचक्र असते. बसमध्ये कंडक्टरकडून सुट्टे तीन रुपये घेण्याची आठवण सगळ्या प्रवासात सतत उराशी ठेवणारा प्रवासी दुसर्‍या दिवशी टपरीवर चहा पितांना एखाद्या गरीब भिकार्‍याला अगदी सहजपणे दहा-वीस रुपये देऊन टाकतो किंवा त्याला दहा-पंधरा रुपयांचा वडा-पाव आणि चहा विकत घेऊन देतो. आदल्या दिवसाच्या प्रवासात मात्र तो मजेत प्रवासाचा आनंद लुटू शकत नाही कारण सुट्टे तीन रुपये एवढ्याभोवतीच त्याचे जग त्यावेळी फिरत असते. असे होत असते. आणि आयुष्यात असे टप्पे येतच असतात. त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता या समस्येवर तोडगा काढणे महत्वाचे. खालील काही उपाय फायद्याचे ठरू शकतील असे वाटते: १. श्वास - वर सांगीतलेला श्वासाशी संबधित उपाय चांगला आहे. उच्छवासासोबत निराशावादी विचार झटकून टाकणे प्रयत्नांती शक्य होते. २. व्यायाम - रोज न चुकता ३०-४० मिनीटे व्यायाम, वेगात चालणे इत्यादी आपल्याला उत्साह प्रदान करते. विचार स्थिर ठेवण्यास याचा निश्चितपणे उपयोग होतो. सतत बसून राहणे, लोळत असणे, नुसताच निरुद्देश टीव्ही बघत राहणे आपल्या मनाला मंद आणि आळशी बनवते. घरात देखील छोटी-छोटी कामे करत राहणे फायदेशीर असते. ३. वाचन - वाचनासारखा छंद नाही. आपल्याला जे आवडते ते वाचावे. वाचनामुळे माहिती प्रोसेस करण्याची कला अवगत होते. प्रसंगी यथोचित व्यक्त होणे आणि विचारांमध्ये प्रगल्भता असणे हे महत्वाचे बदल चांगल्या वाचनाने साध्य होतात. भाषा आणि विचार समृद्ध होतात. सामान्यतः लोकं माहितीलाच ज्ञान समजतात. माहितीला योग्य रीतीने प्रोसेस केल्याने ज्ञान प्राप्त होते. हे कौशल्य वाचनाने टोकदार होत जाते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायलाच हवे. ४. छंद - जीव ओवाळून टाकावा इतक्या प्राणपणाने एखादा छंद जोपासल्यास आयुष्याला नवीन झळाळी येते. आणि मग त्यातून मिळणारा उत्साह, आत्मविश्वास टिकाऊ असतो. ५. शिकणे - आपल्या कामाच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकणे नवा आत्मविश्वास कमवण्यात उपकारक ठरते. ६. करमणूक - चित्रपट, एखादी चांगली मालिका, मित्रांसोबत अड्डा, कुटुंबातल्या सदस्यांसोबत गप्पांचा फड, सहली, एखाद्या दिवशी कामाला दांडी मारून नुसते भटकणे, पावसात भिजणे, रात्री मस्त जेवण करून तब्येतीत पान जमवून एखादा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम एंजॉय करणे, भरपूर खेळणे, या गोष्टी अत्यावश्यक आहेत. एक वेगळाच उत्साह देतात या गोष्टी. ७. स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. ८. विवेकबुद्धी शाबूत ठेवणे - सगळ्यांशी चांगले वागणे आणि आपण काही चुकीचे करत नाही आहोत हा ठाम विश्वास बाळगणे आवश्यक आहे. ९. सौहार्द - सौहार्द, मृदू भाषा, मने जिंकून घेण्याची हातोटी ही कौशल्ये जबरदस्त साथ देतात. स्वत:चे मनःस्वास्थ व्यवस्थित ठेवणे या कौशल्यांमुळे सोपे होते. शिवाय यामुळे नवीन ओळखी पटकन होतात, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे इसका मतलब ये नही की प्रत्येक ठिकाणी पडते घ्यावे. गरज असेल तिथे ठामपणे 'नाही' म्हणणे आणि वेळप्रसंगी बाह्या सरसावणे आपल्या इथे आवश्यक ठरते. समोरची व्यक्ती पंगा घेतांना दहावेळा विचार करेल अशी प्रतिमा केव्हाही फायदेशीर ठरते. अरे ला कारे करता येणे जमले पाहिजे. १०. जास्त भावनाप्रधान नसणे - अतिभावनाप्रधान असण्याचे असंख्य तोटे असतात. आपण कशाततरी गुंतून पडतो आणि जमाना सुळ्ळकन पुढे निघून जातो. हे कटाक्षाने टाळता यायला हवे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. ११. ऊर्जेचा योग्य वापर - योग्य ठिकाणी ऊर्जा खर्ची घालणे जास्त फायदेशीर ठरते. जिथे गरज नाही तिथून लक्ष काढून योग्य त्या ठिकाणी फोकस करणे जमले पाहिजे. पुस्तक लिहिणे हे ध्येय असेल तर टीव्ही बघणे, टंगळमंगळ करणे कटाक्षाने टाळता आले पाहिजे. मुख्य कामाला जास्त वेळ ठेऊन दुय्यम कामे चटकन उरकणे श्रेयस्कर ठरते. मुख्य काम कोणते आणि दुय्यम कामे कुठली हे ज्याचे त्याने ठरवायचे. १२. अतिविचार टाळणे - अतिविचार केल्याने मन पोखरले जाते. कुठला विचार केव्हा आवश्यक आहे हे ओळखता आले पाहिजे. आणि एका ठराविक मर्यादेनंतर विचार सोडून देता आले पाहिजे. 'जो होगा सो देखा जायेगा' ही बेफिकीरी कधी कधी माणसाला तगवते. जिथे आपले नियंत्रण नाही त्याबाबतीत अतिविचार टाळणे आवश्यक आहे. १३. तुलना टाळणे - त्याच्याकडे होंडा सिटी आहे; माझ्याकडे ऑल्टोच आहे; त्याला माझ्यापेक्षा ५०००० पगार जास्त आहे अशी तुलना सतत करणे टाळता आले पाहिजे. प्रत्येकाचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन भिन्न असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातली वळणे आणि स्पीडब्रेकर्स निराळी असतात. आपले ध्येय काय आहे आणि आपल्याला ते कसे अचिव्ह करायचे आहे ही माहिती असणे यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ऑफ कोर्स, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुलना असणे आवश्यकच असते. त्यामुळे तुमची तहान कायम राहते. पण ही तहान जीवघेणी ठरू न देणे महत्वाचे. १४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. हे उपाय प्राथमिकता देऊन अमलात आणल्यास फायदा होईल. पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड मात्र आवश्यक आहे. काही काही माणसे जन्मतःच आनंदी, उत्साही, कमालीची आत्मविश्वासपूर्ण, व्यवस्थित विचार करून योजना आखून आयुष्य जगणारी असतात. मोठे मोठे निर्णय घेणे, ते अमलांत आणणे, कुठेही भावनाप्रधान न होता आपली ध्येये साध्य करणे, स्थिर चित्ताने आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकुच करत राहणे, दु:ख आणि संकटकाळातदेखील शांत राहून थंड डोक्याने विचार करणे या गोष्टी अशा माणसांना लीलया जमतात. ज्यांना हे जमत नाही त्यांना मनाची सतत मशागत करत राहणे आवश्यक ठरते. त्यासाठी वरील उपाय कामात येतील असे वाटते. मानसोपचारतज्ञाची गरज असेल तरच ती मदत घ्यावी. रोजच्या जगण्यातल्या ताणतणावांसाठी आणि छोट्या-मोठ्या कुरबुरींसाठी मानसोपचारतज्ञाची आवश्यकता नाही असे वाटते. त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता देखील असते. आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. शिवाय मानसोपचारतज्ञ आता आपल्याला पूर्ण बरे करेल; म्हणजे आपल्याला काहीच करावे लागणार नाही अशी भावना होते. स्वमदतीशिवाय जगातला कुठलाच मानसोपचारतज्ञ मदत करू शकत नाही. अगदीच स्किझोफ्रेनियासारखे आजार असतील तर औषधोपचार आणि तज्ञांची मदत अपरिहार्य ठरते; परंतु साध्या साध्या समस्यांसाठी आपण स्वत:च मशागत केली तर उपचारांची गरज भासत नाही असे वाटते. विपश्यनाचा १० दिवसांचा कार्यक्रम मी इगतपुरीला केलेला आहे. अंतर्मुख लोकांसाठी कदाचित या कार्यक्रमाचा उपयोग होत असावा परंतु ज्यांना खूप बोलायला आणि स्वच्छंद आयुष्य जगायला आवडते त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेविषयी माझ्या मनात शंका आहेत. व्यक्तीश: मला या कार्यक्रमाचा शून्य उपयोग झाला. दहा दिवस अजिबात न बोलणे, श्वासावर लक्ष नियंत्रित करणे, नेहमीच अगदी साधे जेवण घेणे, रोज पहाटे ५ वाजता उठून डायरेक्ट ध्यानधारणेत घुसणे वगैरे मला काही झेपले नाही. शेवटी दिवस पर्सिस खंबाटाला बघण्यात कसे बसे घालवले (होय, त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस पर्सिस खंबाटा आलेली होती). कित्येक लोकं या कार्यक्रमात चक्क झोपून जात असत. तिथून सुटल्यावर जीव भांड्यात पडला होता. असो. हा विचार ज्याने त्याने करायचा. शेवटी आपले सूर, मगदूर, आणि सुरूर महत्वाचे. आपली गाण्याची पट्टी कोणती, आपली झेप घेण्याची कुवत किती, आणि आपल्यामध्ये कौशल्ये, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, जिद्द यांचे वादळ आहे की फक्त एक छानशी झुळूक आहे हे तपासणे महत्वाचे. ते एकदा ओळखले की मग सगळे व्यवस्थित होत जाते. त्यामुळे टेंशन घेऊ नका. सगळे नीट होईल हा विश्वास ठेवा आणि आपल्या परीने मनाची मशागत करत रहा. त्रास खूप वाढला तर मात्र मानसोपचारतज्ञाची मदत अवश्य घ्या. मी वर लिहिलेले सगळे करतो असे नाही. जे जितके जमते तितके करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. सगळे मला जमत नाही. कुवत अपुरी पडते. विचारांची प्रगल्भता कमी पडते. हे सगळे केल्याने नक्कीच फायदा होईल असे वाटते.

असे का होते मला..?? लिहु की नको . असा बराच वेळ विचार केला. पण शेवटी मनात आले की कोणी हसले तर हसू देत पण ह्या प्रॉब्लेम वर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे म्हणून लिहायला घेतले. तर या प्रॉब्लेम ची सुरवात झाली गेल्या काही 8-10 महिने किंवा गेल्या वर्षभरापासून पाहीले तर मला स्वतः मध्ये काहीतरी बदल जाणवतोय.. तो म्हणजे कोणत्याही अनामिक गोष्टी बद्दल भीती वाटत राहणे आणि सतत निगेटीव विचार येत राहणे. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आजचीच गोष्ट. माझे मोबाइल चे सिम कार्ड हरवले. त्यामुळे मी नवीन सिम कार्ड घेतले त्याच नंबर चे. पण आता मनात गोंधळ चालू आहे की कदाचित जे हरवलेले सिम आहे ते पण चालू अससेल तर..???

पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!

जेनी... ·

In reply to by प्यारे१

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 20:41
छान कविता ! रच्याकने सध्या नेमका कुठला महिना सुरु आहे???? य्वढं खोच्क काय विचार्ताय? हा वळवाचा पाउस नसू शकतो का? किवा गेल्या वर्षीच्या जुलैचा पाउसही नसू शकतो का? ऑं? ;) आजून आप्शन हैत. पन गुलदस्त्यात ठेव्लेत. :)

In reply to by यसवायजी

प्यारे१ Fri, 05/09/2014 - 14:32
अहो महामहिम एसवायजी, पावसाची कविता वाचली. तीव्र उन्हाचा मे महिनाच सुरु आहे ना असं विचारायचं होतं हो! आता कुठं हुंगाहुंग सुरु करताय तुम्ही ;) ?

जेपी गुरुवार, 05/08/2014 - 20:51
काही वर्षपुर्वि केलेली"म्रुदुगंध उमटला आले म्रुगनक्षत्र , चालली अवेळी ओली ती अपरात्र, वाकली जरासी पिळताना ओला पदर ,आतुन जरासे हलले अर्धे दार" आठवले. बायदवे लातुरात आज पाऊस पडल्यामुळे आवडल.

अनुप ढेरे गुरुवार, 05/08/2014 - 21:56
मस्तं!
तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण सारेच माझ्या विरुद्ध, कारस्थान रचत असावेत बहुदा, कारण तुझ्या मिठीत येण्याशिवाय, मला काही पर्यायच न उरावा !
या ओळी खासच...

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 21:57
नाजूक हळवे थेंब माझ्या ओठांवर बरसावे, थेंबांना त्या तुझ्या ओठांचा स्पर्श व्हावा, पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ! वळवाचा पाउस पडणार तर !

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना Fri, 05/09/2014 - 08:22
आत्मुस छत्रीत एकटेच काय बागडताय? जेनी तिन्टिम्बे पहा कश्या मुद्दाम साडी बीडी नेसुन.... जाऊ दे ! साल! आताश्या पाऊस म्हंटल की पडसं आठवत. जेनी तीन्टिम्बे रेषा धुसर असतात लक्षात घ्या.

In reply to by दिनेश सायगल

प्यारे१ Fri, 05/09/2014 - 14:30
पुरुष विभाग स्पेषल झाला तर त्या विभागात कवयित्रीना 'अलोउड' असणार काय? उगाच महा जनांच्या कविता व्हायच्या नैतर ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 05/09/2014 - 14:32
पुरुष विभाग स्पेषल झाला तर त्या विभागात कवयित्रीना 'अलोउड' असणार काय?
अ‍ॅट लीस्ट वन ऑफ अस शुड हॅव अ‍ॅन ओपन माइंड ;) (काडी टाकली पळा पळा)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 05/09/2014 - 14:48
>>>अ‍ॅट लीस्ट वन ऑफ अस शुड हॅव अ‍ॅन ओपन माइंड आणि पुरुषांच्या मणांवर वैट्ट परिणाम झाले म्हन्जे????? ;)

काव्यरस
थंड वाऱ्याची झुळूक यावी, हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही, लाजेची सीमा पार करायला घाबरावा ! तुझा तो स्पर्श, तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा, शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा ! मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी .. त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !! नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत, ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस ! तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण सारेच माझ्य

परवशता

मीराताई ·

जेपी गुरुवार, 05/08/2014 - 17:57
+1 बाकी नावावरुन बिकाचा "परवशता पाश दैवे" हा लेख आठवला. (मोबल्या वरुन प्रतिसाद देत असल्याने बिकांच्या धाग्याची लिंक देता येत नाय)

स्पंदना गुरुवार, 05/08/2014 - 18:15
वास्तव म्हणता येइल याला. आवडली कथा. उगा मुक्त होउन तो भरार्‍या घेउ लागला वगैरे कथेतच ठिकाय. चारा पाणी आयत मिळणार्‍याला काय जमणार मुक्त आयुष्य! अन सगळे तर्क शेवटी भुकेपुढे, अन जीवाच्या संरक्षणापुढे मान टाकतात.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/08/2014 - 23:53
सुरेख रंगवलीय वाचताना पोपटाच्या भावविश्वातूनच विचार होत होता. जसे स्टुअर्ट लिटिल सिनेमा बघताना आपण त्या उंदराच्या भावविश्वाशी एकरूप होतो तसे झाले. शक्य असल्यास पोपटाला परत न आणता याच हळूवार शैलीत हि कथा पुढे घेऊन जा, कथानक सुचत गेले तर छान जमेल..

अमित खोजे गुरुवार, 05/08/2014 - 22:40
सुरुवातीपासून नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार करणारा पोपट, त्याला आलेल्या पुढच्या अडचणी आणि शेवटी त्याने घेतलेली माघार असेच जाणवत राहिले. शक्य आहे! आणि हा असा विचार करणे सुद्धा चुकीचे नाही. शेवटी बायको पोरांची पोटं तर भरायची जबाबदारी आपल्यावर आहेच. अगदीच पोपटाचे चुकले असेही मी म्हणणार नाही. पण अजून एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नव्हती. म्हणजे दार उघडायची नाही तर अजून एखादा दिवस बाहेर राहून बघायला हरकत नव्हती. दार काही आता परत लवकर उघडले जाइल याची शाश्वती नाही. त्यामुळे थोडी अजून मजा करता आली असती म्हणतो :)

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 23:16
कायम पिंजर्‍यात रहायची सवय झाली की तेच नशीब बनून जातं आणि सुरक्षित रहाणं हेच खरं आयुष्य वाटायला लागतं. त्या बिचार्‍याला मुक्त कसं रहायचं हे कुणी शिकवलं नाही तर तो तरी काय करणार? मात्र एकदा स्वातंत्र्य जरासं अनुभवलं तरी आता त्याचं राहिलेलं पिंजर्‍यातलं आयुष्य आणखी दु:खी होणार हे नक्की.

In reply to by पिवळा डांबिस

नगरीनिरंजन Fri, 05/09/2014 - 04:44
अगतिकतेची दया आली. बिचार्‍याला सगळ्यांसारखं पिंजरा हेच जग आणि पिंजर्‍याबाहेर आयुष्य शक्य नाही हे आधीच पटवून दिलं असतं तर ही वेळ आली नसती असे वाटते. आता सुखासीन आयुष्यात जन्मभराचे दु:ख वागवणे आले.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 21:49
म्हणनारे उण्टा वरील शहाणे असावेत अथवा प्रतिसादाची घाई घडली असावी. पोपट बंदिवान होता. असे असुनही संधी मिळ्ता त्याने जोखीम पत्करली& ही गेव हिज बेस्ट शॉट. प्रयत्न न करता तो परतलेला नाही. खरे तर प्रतिसादाकांनी स्वताला पोपटात बघू नये. मलाही सुरुवातीला पोपट जोखीम टाळणारा वाटला पण सूक्ष्म निरिक्षण करता पॉप्टाणे जोखीम पत्करली आहे असेच दिसते. तो परतला पण यात दोन सुरेख शक्यता त्याने निर्माण केल्या 1 पुन्हा मुक्त विहाराची 2 दूसरी परत येतो म्हटल्यावर मालकहि त्याला कायम बंदिस्त ठेवणार नाही याची.

खिडकीत टांगलेल्या पिंजऱ्यात तो पोपट सुखेनैव राहात होता. कधीपासून तो तिथे असा राहात होता ते त्यालाही सांगता आलं नसतं. पण तो निवांत, निश्चिंत होता, मजेत होता, सुखात होता एवढं नक्की! पिंजऱ्यात बसून ओली डाळ खात असताना एकदा त्याने पाहिलं, रानातून आलेल्या राव्यांचा एक थवा मुक्त कंठाने चित्कार करत या झाडावरून त्या झाडावर, विजेच्या तारांवरून मंदिराच्या उंच घुमटावर सुरकांडया मारत होता. त्या रानपाखरांचे ते चित्कार, त्या मुक्त लकेरी ऐकून तो चकित झाला. त्याला तर फक्त 'मिठू मिठू' म्हणायचंच माहिती होतं. त्यांच्या त्या भराऱ्या आणि त्या भरारीचा वेग पाहूनही तो चक्रावला.

फेक

फुंटी ·
लेखनविषय:
मी दहा कोटी आहेत म्हणे....१० कोटी फेक मी ...कुणी कबूल करणार नाही... माझीपण आहे एक सेक्सी प्रोफाईल....जुगाड वाली....ट्राय मारतो मी पण खूप ....नाही लागत गळाला कुणी....साला विश्वास कोणावर ठेवावा...मेल जेन्डर असल म्हणून पुरुषच असेल कशावरून.....कमालीची गुप्तता सगळीच....असुरक्षित ...तरीही आतून येणारी नैसर्गिक उर्मी...चोरटेपणाची सुप्त ओढ....खोल खोलवर खरा मी सापडतच नाहीये...१० फेक अकौंट असले तरीही ..प्रश्न उरतोच मी कोण??

भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग २.

सुधांशुनूलकर ·

गणपा गुरुवार, 05/08/2014 - 12:50
वाह साहेब सुंदर माहिती. पहिल्या भागही आवडला होता पण सांगायचं रहुन गेलं होतं. शेवटचे काही फोटो मात्र दिसले नाहीत. ;)

प्रचेतस गुरुवार, 05/08/2014 - 13:21
मस्त वृत्तांत. नुकतेच आंबा घाटानजीकच्या घनदाट जंगलात आणि तिथल्या देवराईत भ्रमंती केल्यामुळे जंगलाशी जवळून परिचय झालाच आहे. हा सिकाडा म्हणजे दिवसकिडा ना? हे दिवसभर किर्र किर्र करत असतात. गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप सुंदर आहे. तिथल्या झाडावंर एक विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते. ऐन पावसाळ्यात रात्री ह्या जंगलात गेलं तर ही बुरशी लागलेली झाडे प्रकाशमान झालेली आढळतात. बाकी नागफणीवर जाऊन का नाही आलात? तिथे उभे राहून सह्यकडे न्याहाळण्यात विलक्षण सुख लाभते.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 16:47
गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप सुंदर आहे. तिथल्या झाडावंर एक विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते. ऐन पावसाळ्यात रात्री ह्या जंगलात गेलं तर ही बुरशी लागलेली झाडे प्रकाशमान झालेली आढळतात.
यप, मी तर इतका भारव्ला होतो की आजू बाजू ला ब्लुस्किन पीपल दिसतील की काय शंका मनाला चाटून गेली. थोड़ सावरल्यावर लक्षात आले ते लोक फक्त जेम्स केमेरों च्या मूवी मधेच आजुबाजुला आलेले दिसतात ;)

भाते गुरुवार, 05/08/2014 - 13:37
सगळे फोटो आवडले. विशेषत: तो फुलपाखराचा फोटो छानच आहे. खादाडीचे फोटो बघुन अजिबात जळजळ झाली नाही. जेवण आवडले.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:41
मिपा परंपरेला पाईक राहून खादाडीचे फ़ोटो टाकल याबद्दल विशेष आभार. अन्यथा धागा मध्यवर्ती ठिकाणी मारावा काय विचार होता.

स्पंदना गुरुवार, 05/08/2014 - 18:33
शेकरु मी दोनदा पाहिली आहे. अन दोन्हीवेळा महाबळेश्वर!! सुरेख माहीती. पिठलं.....असोच. मजा केलात ना? बास! आम्ही त्यातच सुखी. मिपाकर असे एकमेकांना भेटत राहोत. मस्तीत राहोत अशीच शुभेच्छा!!

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/08/2014 - 19:25
सर्व खायचे पदार्थ पाहून http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif आणि परचं.............ड जळजळल्याही गेले आहे! :-/ शिवाय...करवंद-द्रोण-हल्ल्यानी गतप्राण होऊन..मम आत्मा वरंध घाटात भटकायला http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gifगेला आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 05/08/2014 - 20:07
मम आत्मा वरंध घाटात भटकायला गेला आहे
वरंध घाटातच का? इथे जवळच ताम्हिणी घाटात कचकून करवंदं आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 20:45
झाड ला पण अवतरण चिन्ह " .." टाकावं ही णम्र विणंती. सुधांशू जी अभ्यासू वृत्तांत खूप आवडला. कृपया खादाडीच्या फोटोंना गुप्त करावं.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@झाड बहुतेक वरंध घाटात असेल>>> =)) व्हय जी व्हय..पयलं करवंद वरंद घाटातच खाल्लं! =))

केदार-मिसळपाव गुरुवार, 05/08/2014 - 21:25
"शेवटी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. खरं तर मिसळपाव हे महाजालावरचं एक संकेतस्थळ, आभासी (व्हर्चुअल). पण जिंदादिल मिपाकरांमुळे ते केवळ आभासी न राहता कट्टे, प्रत्यक्ष भेटी अशा माध्यमातून मिपाकर एकमेकांच्या जवळ आले, हे मला फार अद्भुत वाटतं." अगदी हेच म्हणतो.

सखी गुरुवार, 05/08/2014 - 21:32
छान भटकंती वृत्तांत, दोन्ही भाग आवडले. भाग १ मधला नीलमोहोरही आणि यामधला रानमेवा खासच. मिपाचे भ्रमणमंडळ असेच भटकंती करत राहो.

येडगावकर गुरुवार, 05/08/2014 - 22:05
कायेकी तुर्तास काही कारणांमुळे आमची भटकंती हे फक्त 'येडगाव ते डोंबोली' येवढीच मर्यादित झालेली आहे! म्हणुन तुमच्यासारख्या मंडळींनी केलेली भटकंती एनजॉयतोय! बायदवे ते हाटील आमच्या एक्दम जवळ! गावाला गेलं की एकतरी फेरी होतेच तिथे! तिथे मिळणारी सगळ्यात जबरी गोष्ट म्हणजे 'अन् लिमिटेड लसुन चटणी'! आहाहा... आयला पुढच्या फेरीला अजुन १० दिवस आहेत!

सुधांशुनूलकर Sun, 05/11/2014 - 12:29
सर्व प्रतिसादांसाठी आभार. @ वल्ली, आत्मशून्य, शैलेन्द्र - ज्योतवंतीबद्दल नवी माहिती मिळाली. आता ती बघायला पावसाळ्यात भीमाशंकरला जाणं आलंच! कोणी मिपाकर येणार का? जून-जुलैमध्ये कोयना अभयारण्यात जायचा बेत आहे. बरोबर यायची इच्छा असलेल्या मिपाकरांचे सहकुटुंब स्वागतच असेल.

In reply to by सुधांशुनूलकर

प्रचेतस Sun, 05/11/2014 - 19:37
मी तर येणारच. जून जुलै मध्ये कोयना अभयारण्यात अगदी धो धो पाऊस असेल. इतक्या पावसात कोयना अभयारण्यात जाणे योग्य ठरेल काय?

In reply to by आत्मशून्य

सुधांशुनूलकर Mon, 05/12/2014 - 21:04
जूनच्या तिसर्‍या-चौथ्या आठवड्यात प्रयत्न करतो आहे, तेव्हा फार पाऊस नसेल. जुलै-ऑगस्टमध्ये मात्र भरपूर पाऊस असेल, हे खरं. नाहीतर पाऊस ओसरल्यावर सप्टेंबरनंतर बघू...

mdmagar Sun, 05/11/2014 - 15:08
हॉटेलचे दर लिहायला हि मंडळी का बरं विसरतात !!

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/30/2017 - 15:17
लेखन वर काढल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! लेखपाहुन आमच्याही मिपाकरांसोबत केलेल्या भीमासंकरच्या ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या . गुप्त भीमा शंकरच्या वाटेवर जाताना आम्हाला तर शेकरु इतक्या जवळुन दिसला होता की अक्षरशः त्याला मांडीवर घेवुन मांजरासारखे कुरवाळता आले असते ! आता परत एकदा भीमा शंकरला जाणे आले !

भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग १
वनभटकंती
भीमाशंकर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं, तसंच पर्यावरणदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये निसर्गाला देवाशी अनेकविध मार्गांनी जोडलेलं आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘देवराई’ (देवासाठी राखून ठेवलेलं रान). देवराईमध्ये कोणीही शिकार अथवा वृक्षतोड करत नाही. त्यामुळे तिथल्या स्थलविशिष्ट (endemic) वनस्पतींचं आणि प्राणिसृष्टीचं संरक्षण आणि संवर्धन होतं. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेलं ‘शेकरू’ म्हणूनच इथे तग धरून आहे.