✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

ड
डॉ. भूषण काळुसकर यांनी
Fri, 05/09/2014 - 12:37  ·  लेख
लेख
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात. शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
25043 वाचन

💬 प्रतिसाद (162)

प्रतिक्रिया

साताक्का, मला खोड्या वगैरे

यशोधरा
Sun, 05/11/2014 - 12:40 नवीन
साताक्का, मला खोड्या वगैरे काही काढायच्या नाहीत गं. पण होमिओपथी लेखावर तुझ्या कमेंट्स तिकडे तशाच आहेत. टोन खिल्लीवजा आहे, म्हणून आश्चर्य वाटले होते आणि अजूनही वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर

प्रकाश घाटपांडे
Sun, 05/11/2014 - 12:41 नवीन
मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर प्रवक्ता म्हणुन बोलावल पाहिजे ब्वॉ! होमिओपॅथी वाल्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार या बातमीचे पुढे काय झाले ते कळाले नाही. नुकतेच माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा फोन नं ९८२२०१०३४९, किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मी सगळ्या प्याथ्यांवर विश्वास

रेवती
Fri, 05/09/2014 - 18:54 नवीन
मी सगळ्या प्याथ्यांवर विश्वास ठेवते (कधीकधी सगळेच निरुपयोगी वाटते पण ते सांगत नाही). तुमचे मिपावर स्वागत आहे डॉक्टर.
  • Log in or register to post comments

कोणतीही पथी तितकीच चांगली

सुबोध खरे
Fri, 05/09/2014 - 20:33 नवीन
कोणतीही पथी तितकीच चांगली असते. सर्वात चांगली सिम्पथी सर्वात वाईट एपथि (हे इंग्रजीत जास्त चांगले वाटते) all pathys are good, the best is sympathy and the worst is apathy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/10/2014 - 09:02 नवीन
मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो लेख वाचताना तुमची आठवण आली. स्वगत- चला आमच्यातही बदल होताहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जरा आपण इम्पोसिबल क्युअर हे

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 12:14 नवीन
जरा आपण इम्पोसिबल क्युअर हे पुस्तक देखील वाचून पहावे. लेखक आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आज्जेशी सहमत ! डॉक चे स्वागत.

मदनबाण
Mon, 05/12/2014 - 11:51 नवीन
आज्जेशी सहमत ! डॉक चे स्वागत. :) {कधी वाटल्यास अल्फाअल्फा टॉनिक घेणारा} ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

फक्त थंडीताप येतोय आणी पोट

जेपी
Fri, 05/09/2014 - 19:49 नवीन
फक्त थंडीताप येतोय आणी पोट आवळुन दुखतय. या दोन लक्षणावर गावातल्या होमीयोपॅथी डागदर न मलेरीया आहे सांगितल. क्लोरोक्विनच्या डोस आणी 20/- फीस मध्ये तिन दिवसात बरा झालो. (कुठल्याही टेस्टविना)
  • Log in or register to post comments

माझ्या कडे एक माणूस आला होता.

सुबोध खरे
Fri, 05/09/2014 - 19:56 नवीन
माझ्या कडे एक माणूस आला होता. त्याच्या मुलाला पोटात दुखत होते. मी तपासून त्याला सांगितले कि तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत. त्यावर तो म्हणाला डॉक्टर जन्तांसाठी शौचाची तपासणी करायची का? मी त्याला शांतपणे म्हटले तुम्हाला पैसे(१५० रुपये) खर्च करायची हौस असेल तर करा. मला विचारलं तर ८ रुपयाची बेन्डेक्स( आलबेंडाझोल- जंतांचे औषध)ची गोळी मुलाला द्या आणि थंड बसा.
  • Log in or register to post comments

अगायाया

कपिलमुनी
Fri, 05/09/2014 - 19:58 नवीन
मिपाकरांनो .. टेम्पो मधे बसवू नका डागदरांना..
  • Log in or register to post comments

स्वागत आहे. पुढल्या वेळेस

सूड
Fri, 05/09/2014 - 20:08 नवीन
स्वागत आहे. पुढल्या वेळेस थोडं पाणी टाकून वाढवा !! ;)
  • Log in or register to post comments

डॉक्टर!

अमित खोजे
Fri, 05/09/2014 - 21:34 नवीन
डॉक्टर! मिपा वर हार्दिक स्वागत. मिपाच्या डॉक्टर कंपू मध्ये भर पडली हे पाहून आनंद झाला. असेच तुमचे लेख येत राहूदेत. डॉक्टर लोकांचे अनुभव वाचण्यासारखे असतात असे आत्ता पर्यंतचा अनुभव आहे. तुमचेही येउद्यात!
  • Log in or register to post comments

म्हशीस चालते का हो तुमची

आनन्दिता
Fri, 05/09/2014 - 22:59 नवीन
म्हशीस चालते का हो तुमची होमिओपदी? ;) हळु घ्या..
  • Log in or register to post comments

निश्चितच

डॉ. भूषण काळुसकर
Sat, 05/10/2014 - 10:53 नवीन
निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले. होमिओपॅथी म्हणजे प्लासिबो असा गैरसमज असणार्‍यांनी हे अवश्य वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

होमिओपथीचा वैयक्तिक अनुभव

यशोधरा
Sat, 05/10/2014 - 11:15 नवीन
होमिओपथीचा वैयक्तिक अनुभव अतिशय चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

उत्तर मिळालं.

साती
Sat, 05/10/2014 - 12:08 नवीन
बरं झालं , पुलंच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे बापरे!

साती
Sat, 05/10/2014 - 12:10 नवीन
अरे बापरे, हा उपप्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली यायला हवा होता. चुकून तुमच्या प्रतिसादाखाली आला. वेगळाच अर्थं ध्वनित होत असल्याने 'सॉरी' सं. मं., वरचा प्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली येईल असं कायतरी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

होता हय, होता हय.

यशोधरा
Sat, 05/10/2014 - 14:16 नवीन
होता हय, होता हय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

अगागागागागागा

बॅटमॅन
Sat, 05/10/2014 - 18:59 नवीन
अगागागागागागा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा

प्यारे१
Sat, 05/10/2014 - 20:46 नवीन
साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा काय्ये तुमचा? ;) डाक्टर डाक्टरांच्या 'पद्यां'मधे पण लई राडे असतात नै? आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आणि ह्यांच्या डोक्यावर अ‍ॅलोपथी...! अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर डॉक्टर आणि बाकीचे तसे नाहीत असं काही असतंय तर. मिपावरच्या 'ब्लिस्ड गुराख्या'चं मत तर असंच आहे बहुतेक ;) बाकी एएफएमसी वाले डॉ. खरे एम बी बी एस असले तरी ते सैनिकांचे असल्यानं सिव्हीलियन्स ना उपयोगी नसतील नै ;) (सगळ्यांनी हलकं घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

लाजू नका.

आनंदी गोपाळ
Sun, 05/11/2014 - 12:31 नवीन
नाव घ्यायला लाजायचं कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्यारे!

साती
Sun, 05/11/2014 - 13:58 नवीन
प्यारे, पॉईंटाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे शिकलात ती प्रॅक्टीस करा. मी उगाच कूणाला काढे नी मात्रा नी भस्मं नी नक्स वोमिका देत नाही तर तुम्ही उगाच आमच्या पॅथीची औषधे देऊ नका. आम्ही एखाद्याला एम आर आय लिहून देतो तेव्हा एम बी बी एस च्या पाच आणि पीजीच्या तीन वर्षांत एम आर आय कसा वाचावा हे शिकलेले असतो. असंख्य लेक्चर्समध्ये. उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? त्याहूनही जर तुमच्या आयुर्वेदिक फिजिऑलॉजीत प्राणवायू वैगेरे वेगळ्याच सर्कीटमधून फिरतो तर मग तुम्ही एक्स रे आणि आर्टेरीयल डॉप्लर वैगेरे करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय पहायचं अस्तं? पींगळा की सुषुम्ना? आणि आनंदी गोपाळकाकांना काही बोलू नका हं ते माझे मित्रं आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आयला,

संजय क्षीरसागर
Sun, 05/11/2014 - 15:20 नवीन
लेखक पदार्पणालाच बावरले असतील नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

त्यांच्याकडं 'साबुदाण्याच्या

प्यारे१
Sun, 05/11/2014 - 15:36 नवीन
त्यांच्याकडं 'साबुदाण्याच्या गोळ्या' असतील की 'बावरण्या'वर. =)) होमिपदीवाले हलकं घ्या हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

या वाक्यानं

संजय क्षीरसागर
Sun, 05/11/2014 - 16:10 नवीन
ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
आणि इतकी अगाध चर्चा वाचून, त्यांना स्वतःचा MRI काढायची वेळ नाही आली म्हणजे मिळवली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ह ह ह !

आत्मशून्य
Mon, 05/12/2014 - 15:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझं मत

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 20:35 नवीन
ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?- हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. MRI अथवा Imaging technique हे वापरण्याचा अधिकार हा फक्त अ‍ॅलोपॅथी वाल्यांनाच आहे, हा फार मोठा गैरसमज आहे. मला वाटतं की कुठली टेस्ट करायला सांगायची हे आलेला पेशंट अथवा त्याचा आजार यावरुन ठरल पाहीजे, पॅथी वरुन नव्हे. कारण पेशंटच हित सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच कोणतही नुकसान होता कामा नये. ज्या केसेस मधे खरोखर MRI, 2D Echo करणं गरजेच आहे, त्या केस मधे तो केलाच गेला पाहीजे. मी अमुक पॅथीचा डॉ. आहे म्हणून अथवा मला तो वाचता येत नाही म्हणून मी MRI सांगणार नाही हे act of negligence(गुन्ह्यासमान) ठरेल. एकतर हल्ली ९९% पेशंट छापील रिपोर्ट घेउनच येतात. आणि त्यातही रिपोर्ट न घेता कोणी आलाच तर त्याला, जो ही प्लेट पाहून रिपोर्ट बनवेल, त्याच्या एक्सपर्ट कडे पाठवायचे. त्यात काय अहंकार/पॅथी आड येता काम नये. तसही विविध चाचण्यांच्या काम हे निदान होई पर्यंतच, एकदा रिपोर्ट आल्यावर जे काय निदान होइल त्यावरुन जो तो आपापल्या पॅथीची औषधं द्यायला आहेच की मोकळा. आपण होमिओपॅथीची औषध एकवेळ देत नसाल, पण माझ्या पाहण्यात अनेक MD/MS आहेत की जे बरीच होमिओपॅथीची औषध सर्रास वापरतात. माझं म्हणणं एवढच आहे की सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

सर्व पॅथींनी उगाच भांडत न

मदनबाण
Mon, 05/12/2014 - 21:14 नवीन
सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे. डॉक एकदम सही बोलरेला हय ! {अती सर्दी झाली की युनानी ची छिंकणी वापरणारा} Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

@प्रशांत आवले

सुबोध खरे
Tue, 05/13/2014 - 12:18 नवीन
रच्याकने -- माझी पदवी पुणे विद्यापीठाचीच आहे लष्कराची नाही. आणि मी कोणत्याच गोळ्या देत नाही. साबुदाणा नाही कि वटी नाही. मी फक्त फोटो काढतो आणि त्यावर भाष्य करतो. मग पेशंट बरा होवो कि नाही. सानू की ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लैच !!

सूड
Mon, 05/12/2014 - 15:36 नवीन
लैच !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मस्त लेख

मुक्त विहारि
Fri, 05/09/2014 - 23:41 नवीन
आवडला..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

डॉ. भूषण काळुसकर
Sat, 05/10/2014 - 10:56 नवीन
पहिल्याच लेखाला सर्वांच्या भरभरून प्रतिक्रिया पाहून माझ्या अंगावर मुठभर मांस चढले!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चला आणखिन मांस चढवु. ( ह घ्या

जेपी
Sat, 05/10/2014 - 11:37 नवीन
चला आणखिन मांस चढवु. ( ह घ्या) (शतक प्रेमी) जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

अहो हे प्रतिसाद आपल्या

असंका
Sat, 05/10/2014 - 12:03 नवीन
अहो हे प्रतिसाद आपल्या लेखावरचे आहेत असं दिसतंय का आपल्याला? होम्योपदीवाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत हया! आपल्या लेखातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते कळतच नाहिये...जे कळतंय त्यावर सुरुवातीला पाच सात प्रतिक्रीया आल्या, त्या आपल्या लेखाच्या समजा. बाकी तुमचा धागा कधीच हायजॅक झालेला आहे. हवं तर त्याला मार्गावर आणा.... हां नाव आपलंच दिसत राहिल कल्पांतापर्यंत धागाकर्ते म्हणून्....तेव्हा अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

आभारी आहे

डॉ. भूषण काळुसकर
Sat, 05/10/2014 - 12:11 नवीन
त्या ५/७ प्रतिक्रियां बाबतच म्हणत होतो मी!! बाकी म्हणाल तर होमिओपॅथीला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून तर खूपच आनंद झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

इथेही पहा

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/10/2014 - 12:15 नवीन
http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या http://misalpav.com/node/7514 डॊक्टर http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स एकूण हा विषयच वादग्रस्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

घाटपांडेजी, त्या चर्चा वाचून

संजय क्षीरसागर
Sat, 05/10/2014 - 20:44 नवीन
ते अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टीस करायला लागतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

http://www.misalpav.com

प्रकाश घाटपांडे
Sun, 05/11/2014 - 12:48 नवीन
http://www.misalpav.com/comment/580809#comment-580809
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हां नाव आपलंच दिसत

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 10:48 नवीन
आपल्या खात्यातून "अभिनंदन" डेबिट करुन आमच्या खात्यात क्रेडिट केल्याबद्दल धन्यवाद!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

डॉक्टर काका मग तुम्ही त्याला

जेनी...
Fri, 05/09/2014 - 23:52 नवीन
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....
  • Log in or register to post comments

डॉक्टर काका!! अहो फक्त सहा

असंका
Sat, 05/10/2014 - 01:44 नवीन
डॉक्टर काका!! अहो फक्त सहा वर्षांची प्रॅक्टीस आहे हो त्यांची! अगदी कितीही गचके खाल्ले अस्तील तरी जास्तीत जास्त वय तीस्.....त्यांना काका म्हणावं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हो कुन्फु काका ! कै प्रॉब्लेम

जेनी...
Sat, 05/10/2014 - 01:58 नवीन
हो कुन्फु काका ! कै प्रॉब्लेम ? :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

डॉक्टर काका मग तुम्ही त्याला

धन्या
Sat, 05/10/2014 - 07:40 नवीन
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....
ह्येलाच प्लाशिबो म्हन्त्यात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

प्लासिबो

डॉ. भूषण काळुसकर
Sat, 05/10/2014 - 13:04 नवीन
जर होमिओपॅथी हि प्लासिबो असती तर मग ही औषधं- तान्ही बाळं, प्राणी(कुत्री, मांजर इ.) इतकच काय तर झाडांच्या आजरांवर(अ‍ॅग्रो-होमिओपॅथी) कशी उपयोगी पडली असती? त्यांना कुठे असतो प्लासिबो इफेक्ट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय.

धन्या
Sat, 05/10/2014 - 14:28 नवीन
अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय. होमिओपथी ही प्लासिबो इफेक्ट तत्वावर चालते असा लोकांचा आक्षेप असतो. त्यावर तुम्ही सविस्तर लिहावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही इथली चर्चा वाचा. म्हणजे तुम्हाला या विषयाची नेमकी कल्पना येईल आणि तुम्हाला त्यावर भाष्य करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

आमच म्हन्न काय समजा प्लासिबो

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/10/2014 - 15:48 नवीन
आमच म्हन्न काय समजा प्लासिबो आसनं न्हाईत नसन इफेक्ट हाय कि नाय? तेवढ बोला. आता लईच शंकेखोर मान्सांवर ते प्लासिबो काम करत नाय, मंग बसा बोंबलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

इफेक्ट असणारच. त्याशिवाय का

धन्या
Sat, 05/10/2014 - 19:27 नवीन
इफेक्ट असणारच. त्याशिवाय का एव्हढे लोक "आम्हाला गुण आला" म्हणतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

इफेक्ट हाय ना!!!!!

डॉ. भूषण काळुसकर
Sat, 05/10/2014 - 20:29 नवीन
अगदी साध्यातल आणि सोप उदाहरण(साध्यातल आणि सोप हे होमिओपॅथीच्या विविध आजार बर करण्याच्या व्यापक क्षमतेला अनुसरून म्हटले आहे) द्यायच झाल्यास- Thuja या होमिओपॅथीच्या औषधाबद्दल देता येइल. या औषधाच्या वापरामुळे जगभरात लाखो माणसांनी- चामखिळी, कुरुप, मसं, त्वचेवरील निरनिराळ्या गाठी इत्यादी आजारांपासून कायमस्वरुपी मुक्तता मिळवली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

स्वागत आहे डॉक्टर .

अजया
Sat, 05/10/2014 - 09:15 नवीन
स्वागत आहे डॉक्टर . होमेपदीवाले डॉक नव्हते इथे, तुम्ही कसर भरुन काढली !!!
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत आहे डॉक्टर

प्यारे१
Sat, 05/10/2014 - 14:35 नवीन
मिपावर स्वागत आहे डॉक्टर साहेब! धन्याच्या तोंडी नाव ऐकलंय बहुधा. तेच का रे हे धन्या?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा