असे का होते मला..??
लिहु की नको . असा बराच वेळ विचार केला. पण शेवटी मनात आले की कोणी हसले तर हसू देत पण ह्या प्रॉब्लेम वर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे म्हणून लिहायला घेतले.
तर या प्रॉब्लेम ची सुरवात झाली गेल्या काही 8-10 महिने किंवा गेल्या वर्षभरापासून पाहीले तर मला स्वतः मध्ये काहीतरी बदल जाणवतोय.. तो म्हणजे कोणत्याही अनामिक गोष्टी बद्दल भीती वाटत राहणे आणि सतत निगेटीव विचार येत राहणे.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आजचीच गोष्ट. माझे मोबाइल चे सिम कार्ड हरवले. त्यामुळे मी नवीन सिम कार्ड घेतले त्याच नंबर चे. पण आता मनात गोंधळ चालू आहे की कदाचित जे हरवलेले सिम आहे ते पण चालू अससेल तर..??? समजा मला आत्ता एखादा कॉल आला तर माझे बोलणे जुने सिम कार्ड सापडले असणार्या व्यक्तीला पण ऐकू गेले तर...????
मला हे माहीत आहे की असे काही होणे कदापि शक्य नाहीए. पण तरीही माझे डोके सतत हाच विचार करत राहिलेय.
सतत आजारी आहे असे वाटत राहिल्याची भावना.. किंवा आर्धा किलो वजन जरी कमी झाले तरी चिंता. किंवा सतत आपणाला काही मोठा आजार झाला आहे किंवा होईल जसे की कॅन्सर..
ऑफीस मध्ये देखील अश्या बर्याच गोष्टी आहेत की मला सतत निगेटीव विचार येत राहतात.. की काहीतरी कारणामुळे मला प्रमोशन मिळणार नाही, किंवा नोकरी जाण्याची भीती....
तीच गोष्ट घरातील माणसांबद्दल. सतत घरी काहीतरी वाईट होईल असे विचार (जसे की कोणाचा तरी आपघात , आग किंवा आकस्मीत मृत्यु)
सकाळी ऑफीस साठी घरातून बाहेर पडले की लगेच टेन्शन.. आपण गॅस, लाइट, गिझर ची बटने बंद केली की नाही.... आता हे सगळे काम मी करूनच घरातून बाहेर पडलेलो असतो. पण तरीही सारखी भीती वाटत राहते.
आणि हे सगळे एवढ्यावर थांबत नाही तर असे काहीतरी वाईट झाले तर आपले काय होईल किंवा त्यावेळी आपली स्थिती काय आसेल हे जणू काही डोळ्यासमोर दिसू लागते....
असे हे भीती चे आणि नकारात्मक विचार नेहमीच येतात असे नाही. पण याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहेत. कळत नाही हे विचार मनातून कसे घालववेत.? मुक्त आणि स्वछन्दि लाइफ कसे जगावे काहीच कळत नाहीए.....
वाचने
17544
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे नेमके याउलट आहे (बहुतेक)
:)
In reply to माझे नेमके याउलट आहे (बहुतेक) by तुमचा अभिषेक
हो खरेच स्वप्नाळू, (किंवा
In reply to :) by आत्मशून्य
जी कोणी मुलगी आवडत असायची
In reply to हो खरेच स्वप्नाळू, (किंवा by तुमचा अभिषेक
खरेच भयानक टाईमपास होतो.
In reply to जी कोणी मुलगी आवडत असायची by आत्मशून्य
माझा प्रेमविवाह झाला ते
In reply to खरेच भयानक टाईमपास होतो. by तुमचा अभिषेक
कन्या रास
In reply to माझे नेमके याउलट आहे (बहुतेक) by तुमचा अभिषेक
पण माझी कर्क आहे, आणि हि
In reply to कन्या रास by जातवेद
मी हेच बोलणार होतो.
In reply to पण माझी कर्क आहे, आणि हि by तुमचा अभिषेक
हो, सारेच वगैरे वगैरे अगदी
In reply to मी हेच बोलणार होतो. by आत्मशून्य
अरे बापरे!
हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे
In reply to अरे बापरे! by पैसा
कुठे रहाता?
In reply to हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे by बाप्पू
आम्ही पुणेकर
In reply to कुठे रहाता? by पैसा
बाप्पू याचा अर्थ तुम्ही खरे
In reply to आम्ही पुणेकर by बाप्पू
अरेवा! तुम्ही आमच्यासारखेच
In reply to हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे by बाप्पू
ऑ हा प्रश्न तुम्हाला कसा काय
हो आजकाल वाचन काढावले आहे.
In reply to ऑ हा प्रश्न तुम्हाला कसा काय by प्रमोद देर्देकर
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
खूप खूप धन्यवाद. खूप छान
In reply to जगी सर्व सुखी असा कोण आहे ? by मदनबाण
फक्त तीन गोष्टी करा, एकदम बरे व्हाल
खूप खूप धन्यवाद. नक्कीच
In reply to फक्त तीन गोष्टी करा, एकदम बरे व्हाल by संजय क्षीरसागर
अतृप्त आत्मा हे विशेषण आपल्या वस्तुस्थितियुक्त मनोदशेला वापरेन.
+७८६
In reply to अतृप्त आत्मा हे विशेषण आपल्या वस्तुस्थितियुक्त मनोदशेला वापरेन. by आत्मशून्य
जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल.जेवढे मी याबद्दल ऐकून आहे मलाही वाटते की या केस मध्ये नक्कीच विपश्यना काम करून जाईल. कारण यातील मनापासून करणे हि अट तुमच्याकडून आपसूकच पाळली जाईल. करा आणि (किंवा केलाच तर) आपला अनुभव देखील इथे लिहा. :)किंवा आर्धा किलो वजन जरी कमी
बहुतेक हंबल सुरुवात होऊन नंतर
बहुतेक हंबल सुरुवात होऊन
मनोविकार तज्ञ गाठा .. त्याला
In reply to बहुतेक हंबल सुरुवात होऊन by बाप्पू
सर्वप्रथम....
कृपया हा सल्ला संपुर्णपणे पाळु नका.
In reply to सर्वप्रथम.... by मुक्त विहारि
अहो..चालायचेच....
In reply to कृपया हा सल्ला संपुर्णपणे पाळु नका. by आत्मशून्य
तो प्रतिसाद तुमच्या अथवा माझ्याविशयी नाही याची नोंद ठेवावी.
In reply to अहो..चालायचेच.... by मुक्त विहारि
प्रत्येकाचे जग त्याच्या बुध्दीप्रमाणे.
In reply to तो प्रतिसाद तुमच्या अथवा माझ्याविशयी नाही याची नोंद ठेवावी. by आत्मशून्य
पण वाईट नक्कीच नाही.
In reply to अहो..चालायचेच.... by मुक्त विहारि
अहो...
In reply to पण वाईट नक्कीच नाही. by आत्मशून्य
पुन्हा सांगतो.
In reply to अहो... by मुक्त विहारि
चांगल्या मनोरोग तज्ञाला दाखवा
तुम्हाला होत असलेल्या
भय
प्रतिसाद आवडला
In reply to भय by समीरसूर