असे का होते मला..??
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
असे का होते मला..??
लिहु की नको . असा बराच वेळ विचार केला. पण शेवटी मनात आले की कोणी हसले तर हसू देत पण ह्या प्रॉब्लेम वर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे म्हणून लिहायला घेतले.
तर या प्रॉब्लेम ची सुरवात झाली गेल्या काही 8-10 महिने किंवा गेल्या वर्षभरापासून पाहीले तर मला स्वतः मध्ये काहीतरी बदल जाणवतोय.. तो म्हणजे कोणत्याही अनामिक गोष्टी बद्दल भीती वाटत राहणे आणि सतत निगेटीव विचार येत राहणे.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आजचीच गोष्ट. माझे मोबाइल चे सिम कार्ड हरवले. त्यामुळे मी नवीन सिम कार्ड घेतले त्याच नंबर चे. पण आता मनात गोंधळ चालू आहे की कदाचित जे हरवलेले सिम आहे ते पण चालू अससेल तर..??? समजा मला आत्ता एखादा कॉल आला तर माझे बोलणे जुने सिम कार्ड सापडले असणार्या व्यक्तीला पण ऐकू गेले तर...????
मला हे माहीत आहे की असे काही होणे कदापि शक्य नाहीए. पण तरीही माझे डोके सतत हाच विचार करत राहिलेय.
सतत आजारी आहे असे वाटत राहिल्याची भावना.. किंवा आर्धा किलो वजन जरी कमी झाले तरी चिंता. किंवा सतत आपणाला काही मोठा आजार झाला आहे किंवा होईल जसे की कॅन्सर..
ऑफीस मध्ये देखील अश्या बर्याच गोष्टी आहेत की मला सतत निगेटीव विचार येत राहतात.. की काहीतरी कारणामुळे मला प्रमोशन मिळणार नाही, किंवा नोकरी जाण्याची भीती....
तीच गोष्ट घरातील माणसांबद्दल. सतत घरी काहीतरी वाईट होईल असे विचार (जसे की कोणाचा तरी आपघात , आग किंवा आकस्मीत मृत्यु)
सकाळी ऑफीस साठी घरातून बाहेर पडले की लगेच टेन्शन.. आपण गॅस, लाइट, गिझर ची बटने बंद केली की नाही.... आता हे सगळे काम मी करूनच घरातून बाहेर पडलेलो असतो. पण तरीही सारखी भीती वाटत राहते.
आणि हे सगळे एवढ्यावर थांबत नाही तर असे काहीतरी वाईट झाले तर आपले काय होईल किंवा त्यावेळी आपली स्थिती काय आसेल हे जणू काही डोळ्यासमोर दिसू लागते....
असे हे भीती चे आणि नकारात्मक विचार नेहमीच येतात असे नाही. पण याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहेत. कळत नाही हे विचार मनातून कसे घालववेत.? मुक्त आणि स्वछन्दि लाइफ कसे जगावे काहीच कळत नाहीए.....
प्रतिक्रिया
माझे नेमके याउलट आहे (बहुतेक)
:)
हो खरेच स्वप्नाळू, (किंवा
जी कोणी मुलगी आवडत असायची
खरेच भयानक टाईमपास होतो.
माझा प्रेमविवाह झाला ते
कन्या रास
पण माझी कर्क आहे, आणि हि
मी हेच बोलणार होतो.
हो, सारेच वगैरे वगैरे अगदी
अरे बापरे!
हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे
कुठे रहाता?
आम्ही पुणेकर
बाप्पू याचा अर्थ तुम्ही खरे
अरेवा! तुम्ही आमच्यासारखेच
ऑ हा प्रश्न तुम्हाला कसा काय
हो आजकाल वाचन काढावले आहे.
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
खूप खूप धन्यवाद. खूप छान
फक्त तीन गोष्टी करा, एकदम बरे व्हाल
खूप खूप धन्यवाद. नक्कीच
अतृप्त आत्मा हे विशेषण आपल्या वस्तुस्थितियुक्त मनोदशेला वापरेन.
+७८६
जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल.जेवढे मी याबद्दल ऐकून आहे मलाही वाटते की या केस मध्ये नक्कीच विपश्यना काम करून जाईल. कारण यातील मनापासून करणे हि अट तुमच्याकडून आपसूकच पाळली जाईल. करा आणि (किंवा केलाच तर) आपला अनुभव देखील इथे लिहा. :)किंवा आर्धा किलो वजन जरी कमी
बहुतेक हंबल सुरुवात होऊन नंतर
बहुतेक हंबल सुरुवात होऊन
मनोविकार तज्ञ गाठा .. त्याला
सर्वप्रथम....
कृपया हा सल्ला संपुर्णपणे पाळु नका.
अहो..चालायचेच....
तो प्रतिसाद तुमच्या अथवा माझ्याविशयी नाही याची नोंद ठेवावी.
प्रत्येकाचे जग त्याच्या बुध्दीप्रमाणे.
पण वाईट नक्कीच नाही.
अहो...
पुन्हा सांगतो.
चांगल्या मनोरोग तज्ञाला दाखवा
तुम्हाला होत असलेल्या
भय
प्रतिसाद आवडला