संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.
संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती.
आजच्या धक्काधक्कीच्या दैनंदिन जिवनात मानवाला भेडसावणारी नेहमीची समस्या म्हणजे,उठता बसता जाणवनारी सांध्यांची कुरकुर,कोणाचे गुडघे दुखत असतात,कोणाची कंबर, तर कोणाची मान दुखत असते,आपल्याकडेच नव्हे तर जगात सगळीच कडे या दररोजच्या वेदनांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते अथवा तात्पुरती वेदनाशामक औषधे घेतली जातात,आणी हाच प्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अत्यंत त्रासदायक ठरतो.व कुंथत कुंथत आयुष्य जगण्याची वेळ आणतो.जर सुरुवातीसच म्हणजे ज्यावेळेस सांध्यांच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात त्याच वेळी जर योग्य उपचार केले तर हा आजार फक्त आटोक्यातच नाही तर पुर्ण बरा करता येवु शकतो.यासाठी मात्र पुढील त्रिसुत्रीची आवश्यकता आहे.
योग्य आहार + योग्य उपचार + योग्य व्यायाम = निरामय जीवन.
पुढील लेखात आपण आता सांध्यांचे आजार, मनक्याचे आजार व पक्षाघात(बोलीभाषेत पॅरालिसिस) यांची सामान्य लक्षणे व त्या अनुशंगाने उपचार यांची माहिती घेवुयात.
*मणक्याचे विकार(Spondylosis) - (स्पॉन्डिलायसिस) मणक्यामध्ये गॅप, मणक्याची झीज,मणका सरकणे,हातापायाची आग होणे,हात व पायाला मुंग्या येणे,जड होणे.
*गुडघेदुखी व संधीवात(Arthritis) - गुढघ्यात पाणी होणे,आवाज येणे,हाडांची झीज होणे.कुर्चांची झीज होणे. सतत सांधे दुखणे,सांधे सुजणे.
*आमवात(Rh.Arthritis) - एकाच वेळी अनेक सांधे राहुन राहुन दुखणे,सुजणे. एक झाला दुसरा सांध्याला त्रास होणे.
*वातरक्त (Gout) – पायाच्या बोटाच्या सांध्यांपासुन वेदना,आरक्तता व सुज सुरु होते.आणी हळु हळु घोटा, गुडघा यांच्या पर्यंत जावुन पोहजते. रक्ताचा अनुबंध असल्याने दाह(आग)असते.
*कंपवात (Parkinson’s Disease) -सामान्यतः उतारवयात हात,पायाची थरथर होणे.सामान्य हालचालीवरील नियंत्रण नष्ट होणे अथवा कमी होणे.स्नायुंची ताकत कमी होते,चालणे लकवा मारल्यागत असणे,इ.
*गृध्रसीवात(Sciatica) – कमरेच्या खुब्यापासुन वेदना होणे,मांड्या गुढगा व घोटा यात वेदना,हातात - पायात मुंग्या व चमक भरणे.
*सिरागत वात(Varicose Veins) – सर्वांगास ठणका लागणे,हाता-पायाच्या शिरा मोठ्या होणे.
याचबरोबर सांधे वाकडे होणे तसेच सांधे मुरगळणे इत्यादी लक्षणे दिसणे.
**वातव्याधींची कारणे ः- खरच,दोन पोलादाचे बार एकमेकांवर घासले तरी काही काळाने ते उगाळुन गुळगुळीत होतात परंतु मणक्याच्या अथवा सांध्यांच्या बाबतीत अस घडत नाही कारण शरीरातील पोषक घटकांकडुन ही झीज भरुन येत असते.
मग हाडांची झीज का होते ?
१)अस्थी पोषक तत्वाचा अभाव व २)पोषण करणा-या मार्गात येणारा अडथळा या दोनच गोष्टींनी हाडाची झीज व मणक्यातील चकत्यांची झीज होते. या गोष्टी सुधारल्या तर इतर हाडांप्रमाणे मणक्याच्या हाडांची झीज भरुन काढाता येते.
पॅरालिसिस अथवा पक्षाघात
*शरीराच्या ठराविक एका किंवा दोन्ही बाजुंची हालचाल संवेदना जाते,तो भाग जड वाटतो,वाकडा-लुळा होणे.
*स्नायुंमध्ये बळ राहात नाही,शेवटी अवयव सुकुन जातो.*बोलणे बंद किंवा अडखळत बोलणे,तोंड वाकडे होते.,याच अवस्थेत रुग्णाला संपुर्ण आयुष्य घालावावे लागते.
कारणेः- मेंदूचे विकारः-मेंदूची गाठ,रक्तस्राव होणे,मेंदूवर दाब येणे.इत्यादी.
अपथ्यकर आहार विहार,बी.पी वाढल्याने/कमी झाल्याने इतर आजाराचा उपद्रव या स्वरुपात.
** संयुक्त उपचार पद्धती **
(ठराविक दिवसांचा संयुक्त उपचार पद्धतीने रुग्णात लक्षणीय सुधारणा होते.)
*आयुर्वेदीय औषधी उपचार- वाढलेल्या वाताला नियंत्रीत करणारी वनस्पतीजन्य व सिध्द रसौषधी व सिध्द तैल द्रव्ये.
*आयुर्वेदीय आहार उपचार- दैनंदिन आहार,विहार जो वाढलेले दोष कमी करेल व शरीराचे योग्य पोषण करेल.
*विशेष पंचकर्म उपचार-
१)सर्वांग स्नेहन- विशिष्ठ प्रकारच्या औषधी तेलाने मसाज उपचार पद्धती,ज्यामुळे वाढलेला वात कमी होतो.स्नायू रिलॅक्स होण्याकरिती व स्नायूंना बल मिळावण्याकरीता.
२)सर्वांग स्वेदन- वातघ्न द्रव्यांची औषधी वाफ ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते,व वेदना कमी होतात,तसेच मालिश केलेली तेला त्वचेवरिल रोमरंध्रे खुली झाल्यामुळे स्नायुपर्यंत पोहचतात.
३)बस्ती उपचार(enema)-आयुर्वेदातील अर्धी उपचार पद्धती.या उपचाराने मणक्याच्या गॅप,संधीवात,मेंदूची विकृती सुधारते,संवेदना आणणे,हाडांची झीज भरुन काढणे.व वाताच्या इतर सर्व आजारात उपयोगी.
४)कटीबस्ती/मन्याबस्ती/जानुबस्ती- वेदना असणा-या भागावर पाळे करुन कोमट तेल भरणे व जिरवणे.यामुळे तेल खोलवर पोहचुन,आखडलेले स्नायूबंध खुले होतात व वेदना कमी होतात.
५)लेप- औषधी वनस्पती द्रव्यांचा लेप मांसाच बळ वाढवितो,संवेदना येतात,सुकलेला शरीरभाग सुधारतो.
६)रक्तमोक्षण-ठणकणा-या भागावर जळु लावुन दुषित रक्त काढणे त्यामुळे त्या भागाचे रक्ताभिसरण सुधारते.
७)नस्य – मेंदूच्या पेशींचे बळ सुधारते.
*Chinese Therapy
1)Acupuncture- स्नायू व सांधे यांच्या वेदना त्वरीत दूर करणारे उपचार.
2)Cupping: Vaccum कप मसाज व्दारे स्नायू मोकळे करणे.
3)Scrapping: Chinase stone मसाजव्दारे सांध्यातील वेदना घालवणे.
4)Moxa: सांध्यास व खोलवरील स्नायूस शेक देणे.
*physiotherapy- स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती.
*** वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरी १० ते ३० दिवस पंचकर्म करावे लागेल,पोटातुन औषधी साधारणतः २ ते ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.
*** योग्य आहार,योग्य व्यायाम व योग्य उपचार यांच्या सहाय्याने आपण नक्कीच व्याधीमुक्त होवु शकतो.
डॉ.प्रशांत दौंडकर पाटील.
http://www.ayurvedandpanchakarma.com/
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगली माहिती.
चांगली माहिती
उपयुक्त माहिती.
अत्यंत उपयुक्त लेख!
खूपच उपयुक्त लेख आहे. चांगली
वाचतिये हो डॉक्टर!
अत्यंत उपयोगी लेख
+१
माझी एक शंका आहे डॉक्टर.
आयुर्वेद ही अनुभवजन्य चिकित्सा आहे.
जळवेला बरोबर दूषित रक्तच
आयुर्वेदात जळुने रक्तमोक्षणाकरिता...
माझ्या उजव्या पायाला सायटिका