मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाते अग्निशी

शब्दानुज ·

शब्दानुज Fri, 05/09/2014 - 10:15
मागील वेळेस वयासाठी गजहब झाला होता --काहींनी म्हशींसाठी स्वप्ने बघितली!!! म्हणुन सांगतो १९

In reply to by शब्दानुज

च्यायला, ९१ ला सुद्धा अशी कविता सुचणं कर्मकठीण! यावरनं एक ज्योक आठवला. एक नवकवी अशाच धगधगत्या कविता कविसंमेलनात सादर करतो पण प्रतिसाद मिळत नाही. मग तो विचारतो `माझ्या कवितेतली आग तुम्हाला जाणवत नाही का?' श्रोते कोरसमधे उत्तरतात ` अजिबात नाही' यावर नाऊमेद होऊन तो विचारतो `माझ्या कवितेत आग येण्यासाठी मी काय करु?' मागनं एकजण म्हणतो `आगीत घाला'

In reply to by जेनी...

शब्दानुज Sat, 05/10/2014 - 19:51
ही हुंड्यात बळी पड्लेल्या एका स्त्रीची कथा आहे तिचे अग्निशी असलेले नाते कसे बदलत गेले हे सांगितले आहे पहिल्यांना अग्निशी असलेले नाते संहारक होते.. ती ज्याला परमेश्वर मानले त्याच पतिने तिला जाळ्ले नंतर हे नाते अंगारात बदलले.. शेवटी सामांन्यांनी उठाव केला आणि त्यास फासावर लावले त्यावेळी तिने बंडाच्या रुपाचे अग्नीरुप घेतले शेवटी जेव्हा पतिला चीतेवर पाहिले तेव्हा तिचे मन गहिरवले आणि चितेवरच्या अग्निचे रुप घेउन पतिस आपल्यात सामावुन घेतले आता पुन्हा कविता वाचुन बघा..... प्रतिसादासाठी धन्यावाद........

शरीरावर माझ्या बालांचे नर्तन चालले बारात मी बालांशी नाते प्रस्थापिले माझ्याच बेवडेगिरीने लिव्हर जाळले गेले रुपारूपातील यौवन मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ झिंगेतुन उरले पोटातील धगधगते अंगारे तरी पिण्यास आतुरले जनलोकांच्या बॉटलमध्ये बंदी मी, स्वर्णरुपात प्रगटले अखेरीस तुमच्यामधुन मी, उरलेल्या पेगांवर भागवले शेवटक्षणी मात्र मी 'सोडण्यासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी रस्त्यावर मिठित घेतले

In reply to by संजय क्षीरसागर

शब्दानुज Sat, 05/10/2014 - 19:52

१९ व्या वर्षी सामान्य व्यक्ती प्रेम वगैरे करते आणि अत्यंत अवखळ असते. काव्यविषय काल्पनिक असला तरी दारुण आहे. पतीनं दहन केलेली पत्नी, तो फासावर गेल्यावर, त्याच्या सरणावर अग्नीरुप घेऊन त्याला मिठी कशाला (झक मारायला) घालेल? आधीच इतका लफडा झाल्यावर त्याला आपल्यात कशाला सामावून घेईल? विधायक विचार करा, चांगले साहित्य वाचा, सकाळी उठून व्यायम करा, समोर ध्येय ठेवून आभ्यास नीट करा म्हणजे विचारात अशी निगेटिवीटी येणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शब्दानुज Sat, 05/10/2014 - 23:55
एखाद्या कडव्यावरुन कोणाचे विचार कसे आहेत हे कळले शक्य नाही वरच्याच विडंबनेतुन मग मी कोणता अर्थ घ्यावा?????? एखाद्या गोष्टीत ईतरांची मते वेगळी असु शकतात शेवट्चा मुद्दा एकवेळ चुकीचा असेलही!! अजुन लहान आहे, नवीन आहे मी!! एवढ्यात रागवु नका तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे

In reply to by शब्दानुज

आनन्दिता Sun, 05/11/2014 - 08:02
कवितेची पार्श्वभुमी आधी लिहिली असती अथवा शिर्षकात काही हिंट दिली असती तर बरं झालं असतं. पार्श्वभुमी वाचल्यानंतर मात्र अर्थ लागतायत. आवडली कविता..:) लिहीत रहा.!

लेखनविषय:
शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले

पोरका

शब्दानुज ·
लेखनविषय:
आई घेना मला कुशीत दुसरे मी काही नाही मागत जग हे मला पोरका म्हणवते उसने अश्रु आणून हळह्ळते रोज तुझ्यासाठी फाट्क पोतरं टाकतो उपेशेने ते का विणु पाह्तो वाट बघत मी झोपी जातो पुन्हा तुला स्वप्नातच पाह्तो

९० डिग्री साऊथ - ७

स्पार्टाकस ·
९० डिग्री साऊथ - ६ ३० नोव्हेंबरला अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन वाटचाल करता अ‍ॅमंडसेनची तुकडी बर्फाच्या टेकड्या आणि त्यांना लागूनच असलेल्या खोल द-या अश्या परिसरात येऊन पोहोचली. या प्रदेशातून मार्ग काढणं अतिशय जिकीरीचं होतं. कित्येकदा वेगवेगळ्या दिशांनी मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ होत होते. अखेरीस एका टेकडीवरुन जाणारा बर्फाचा पूल त्यांना आढळला. एकावेळी जेमतेम एक स्लेज जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा तो पूल होता ! दोन्ही बाजूला खोल द-या पसरलेल्या होत्या.

असे का होते मला..??

बाप्पू ·

तुमचा अभिषेक Fri, 05/09/2014 - 00:23
मला नेहमी स्वताहूनच काहीतरी घाणेरडे, वाईट, अपघात, घातपात, मृत्यु वगैरे घडलेय असे इमॅजिन करून पुढे काय काय संकटे येतील आपल्यावर वा आपली काय हालत होईल असे स्वप्नरंजन करायची सवय आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, ट्रेनने पूलावरून जाताना हि ट्रेन खाडीत कोसळली तर, मला पोहताही येत नाही, काय हालत होईल माझी... बिछान्यावर झोपले असताना वाटते की वरचा पंखा गरगरत माझ्या अंगावर कोसळला तर, पायाला किती जोराचा फटका बसेल, वा भूकंप होऊन बिल्डींगच पत्त्याप्रमाणे कोसळली तर, मी कायमचा अधू झालो तर मी उर्वरीत आयुष्य कसा जगेन, मला नोकरीधंद्यासाठी काय किती कष्ट घ्यावे लागतील, जर का मी उद्या अचानक आंधळा झालो तर ते आयुष्य मला जमेल का, घरात सशस्त्र दरोडेखोर घुसले आणि त्यांचा सामना मला करायची वेळ आली तर वगैरे वगैरे बरेच काही आणि सतत हे असले विचार चालूच असतात.. वरवर पाहता हे तुमच्यासारखेच आहे असे वाटेल, मात्र मी या कल्पना करताना त्यात छानपैकी गुंततो, ना मला कसले टेंशन येत ना छातीतील धडधड वाढते. जसे एके काळी आवडणार्‍या मुलीला गुंफुन मनातल्या मनात एखादी कथा रचली जायची तसे अगदी सहज घडते. विचारमालिका खंडीत झाल्यावर मात्र तेवढे वाटते, शी काय हे आपण अभद्र विचार करत होतो.. पण ठिक आहे, मला तरी हा काही आजार नाहीये, विचार चांगले संतुलितच करतो मी. बायकोच्या मते प्रचंड समजूतदार व्यक्तीमत्व.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 01:45
हो खरेच स्वप्नाळू, (किंवा आपल्याच तंद्रीत असणारा म्हणू शकता.) म्हणजे ध्येय अचीव करायची महत्वाकांक्षी स्वप्ने नाहीत, तर ही अशी वेळ चांगला वाईट घालवणारी.. एका वयात, म्हणजे अगदी कालपरवापर्यंत लग्न व्हायच्या आधीपर्यंत जी कोणी मुलगी आवडत असायची तिच्या विचारांत रात्र रात्र मजेत जागवायचो, किंबहुना त्याच साठी म्हणून मी सतत कोणत्या ना कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलेलोच असायचो. घरी मात्र रोज खूप शिव्या खाव्या लागतात या तंद्री लागण्यामुळे. कारण ती २४ गुणिले ७ लागलेलीच असते. आजवर मी एकदाही मला मारलेल्या हाकेला पहिल्याच प्रयत्नात ओ दिला नाही. एखादा प्रश्न मला चारवेळा विचारून झाल्यावर पाचव्यांदा समोरून कोणी ओरडून विचारतो तेव्हाच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. मला बहिरा म्हणतात घरी. आमचे आडनाव नाईक म्हणून मामाकडचे बहिर्जी नाईक चिडवतात. बायको सुद्धा त्रागा करते, कधी हसते तर कधी हताश होऊन हात टेकते.. पण मी माझ्या तंद्रीतच असतो. तिला मी यावर एक उपाय सांगितला आहे, काहीही मला सांगायच्या आधी मला हाक मारून माझे लक्ष वेधून घे, मी तुझे ऐकतोय हे कन्फर्म कर आणि मग काय ते सांगायला घे, म्हणजे रिपीट करायचा त्रास कमी होईल. अर्थात हे कसे नेहमीच शक्य होणार. पण बस्स चाललाय संसाराचा गाडा, आणि या एकाच सवयीपोटी `मीच ती म्हणून तुला झेलतेय' हे दिवसभरातून सतर्‍यांदा ऐकावे लागतेय. :(

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 23:30
जी कोणी मुलगी आवडत असायची तिच्या विचारांत रात्र रात्र मजेत जागवायचो, किंबहुना त्याच साठी म्हणून मी सतत कोणत्या ना कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलेलोच असायचो.
ही मुलींची तंद्री फार मस्त असते नाही ? भयानक टाइमपास होतो. पण पोरगी पटल्यावर मात्र बरेचदा आपल्या रोम्यांटीसीजमच्या पातळीवर ती पोचु शकली नाही तर मात्र प्रचंड मुड ऑफ होतो... :(

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 01:43
खरेच भयानक टाईमपास होतो. तसेही हल्ली टाईमपास म्हणत मोबाईलचे अ‍ॅडिक्शन लागलेल्या लोकांपेक्षा हे लाख गुणा बेटर. बाकी मूड ऑफ म्हणाल तर ज्या मुलींच्या मी खरोखरच प्रेमात असायचो त्या कधीच पटल्या नाहीत हे दुर्दैव. आणि माझा प्रेमविवाह झाला ते कोणीतरी मला पटवल्याने ;) बाकी खात्रीने म्हणालात म्हणजे आपलेही अनुभव आहेत तर याबाबत :)

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Sun, 05/11/2014 - 02:15
माझा प्रेमविवाह झाला ते कोणीतरी मला पटवल्याने
अर्थातच. अन्यथा मूड ऑफ होत होत अरेंज मेरेजच झाले असते ;)
बाकी खात्रीने म्हणालात म्हणजे आपलेही अनुभव आहेत तर याबाबत
काय करु सन्मुन सैन दोन्ही कर्क :)

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 23:23
आपली रास कर्क व नक्षत्र पुष्य वाटते. स्वप्नाळुपणा व स्वतःच्या धुंदीत जगणे. कुटुंबावर अतिशय प्रेम असणे, भावनाप्रधान, हुशार, कलासक्त, विश्वासु (जो पर्यंत ठेच लागत नाही) वगैरे वगैरे वगैरे...!

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 01:39
हो, सारेच वगैरे वगैरे अगदी खरे पेपरातली रास कधी आजवर वाचली ना मानली, मात्र कर्क राशीच्या लोकांचे जे स्वभावगुण आहेत ते चांगलेच जुळतात माझ्याशी. तसेच हि कर्क रास मुलांपेक्षा मुलींना जास्त शोभते असेही ऐकलेय लहानपणी. असो, विषय राशींचा नसल्याने फारसा विषयांतर नको..

पैसा Fri, 05/09/2014 - 09:26
हे लिखाण खरेच गंभीरपणे लिहिलंय का तुम्ही? "सल्ला" मधे लिहिलंय म्हणून एकदम कसंतरीच झालं. जर खरंच असा काही प्रॉब्लेम असेल तर हे काही कारणाने आलेले नैराश्य (डिप्रेशन) किंवा इतर काही मानसिक आजार असू शकेल. ताबडतोब एखाद्या कौन्सेलर किंवा सायकिअ‍ॅट्रिस्टला भेटा. मनाचा आजार ही काही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. डॉक्टरचा सल्ला/औषधोपचार घ्या. लवकर बरे वाटेल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

In reply to by पैसा

बाप्पू Fri, 05/09/2014 - 17:38
हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे हे लिखाण केले आहे मी. हे काही नेहमीच होते असे नाही. पण मी जेव्हा जेव्हा कामातून फ्री आसतो तेव्हा येणारे विचार हे नेहमी नेगटीव च असतात. जेव्हा मी एखाद्या कामात गुंतलेलो असतो तेव्हा हे विचार फार कमी होतात किंवा निघून देखील जातात. सायकिअ‍ॅट्रिस्टला भेटलो होतो एका. पण तो बहुतेक नवशिका असावा. किंवा असेच कोणता तरी क्रॅश कोर्स केलेला असावा. कारण काहीच फरक नाही पडला. आपल्याला जर एखादे चांगले डॉक्टर माहीत असतील तर सांगा. तुमच्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद.

In reply to by बाप्पू

पैसा Fri, 05/09/2014 - 18:28
तुम्ही कुठे रहाता ते सांगितलंत तर लोक माहिती देतील. मला मुंबई-पुण्याच्या डॉक्टर्सची माहिती नाही. पण हल्लीच आलेल्या शुचीच्या धाग्यावर काहीजणांनी मुंबई पुण्यातील काही सायकिअ‍ॅट्रिस्टची नावे दिली होती.

In reply to by बाप्पू

विजुभाऊ Sun, 05/11/2014 - 02:02
बाप्पू याचा अर्थ तुम्ही खरे पुणेकर नाही आहात. कशाचा तरी जाज्वल्य अभिमान वाळगा आपोआप जमेल मग सगळे. ( किमानपक्षी तुमच्या घराजवळच्या चौकात सकाळी डबे घेऊन उभे असणार्‍या पोहेवाल्याचा तरी अभिमान बाळगा ).

In reply to by बाप्पू

रेवती Sat, 05/10/2014 - 01:11
अरेवा! तुम्ही आमच्यासारखेच दिसता. फरक पडला तो तुम्हाला नसून त्या सायकियाट्रिस्टला! मी पोहायला शिकाण्यासाठी गेले पण मला येणं राहू देत, इंस्ट्रक्टर पोहणे विसरला अशी वदंता होती. गंभीर लिखाण नका हो करत जाऊ.

ऑ हा प्रश्न तुम्हाला कसा काय पडला बुवा. कारण तुमचा पहिल्या धाग्यात तुम्ही जो संभाजी राजे यांच्यावर ऊहापोह केला आहे त्याने तुमचे वाचन आवड दांडगी आहे हे दर्शवते. असो सर्व प्रथम त्या कोषातुन बाहेर येण्यासाठी चांगली पुस्तके वाचा. मनात विचार यायला लागला की मन या पुस्तकांच्या वाचनात की किंवा गाणी ऐकणे, यांत गुंतवुन ठेवा. पुस्तकांच्या यादीसाठी मि.पावर आशु जोग यांचा धागा आहे किंवा मिपाचे जुने लेख/धागे वाचायला सुरवात करा. आणि आता तुम्हाला सल्ला हवाच असेल तर मि.पावर मा. माहितगार, मा. कंजुस, मा. मुक्त विहारी, या मा. गवि साहेब आणि बरेच जण आहेत यांना व्यनि करा. जे तुम्हाला नक्किच मार्गदर्शन करतील. तुम्हाला पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा! *good* धन्स

In reply to by प्रमोद देर्देकर

बाप्पू Fri, 05/09/2014 - 17:40
हो आजकाल वाचन काढावले आहे. तसेच आंतरजालवर देखील काही ना काही सकारात्मक वाचत आसतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मदनबाण Fri, 05/09/2014 - 11:00
ताण/तणाव हे आता कॉमन प्रॉब्लेम झाले आहेत... त्यामुळे त्यापासुन घाबरुन जाण्यात कोणताच फायदा होत नाही, तोटा मात्र नक्कीच होउ शकतो.त्यामुळे मनावर आणि शरीरावर परिणाम होउ शकतो/ होते. मग काय करावे ? आपल्या पेक्षा हालाखीचे आयुष्य जगणार्‍यांकडे पहावे,त्यांच्या आयुष्याकडे पहावे... मग स्वतःलाच विचारावे की यांच्या पेक्षा मी नक्कीच जास्त सुखी नाही का ? कोणाला अपंगत्व असते कोणाला जगायला आधार नसतो तरी सुद्धा ते सरव्हाइव्ह करत नसतात का ? करतात ना ? मग आपण धडधाकट असताना येणार्‍या परिस्थीतीशी का लढु नये ?समोर येणार्‍या प्रत्येक परिस्थीला मी सामोरे जाइन... लढीन मग भलेही परिणाम काही असो ! Try मनात टोकाचे निगेटिव्ह येउ शकतात हे मान्य, पण जर निगेटिव्ह विचार येउ शकतात तर मग पॉसिटिव्ह विचार का येउ शकत नाही ? हा प्रश्न सुद्धा आपण आपल्यालाच विचारावा.तुमच्या आयुष्यातल्या मागच्या भागाचा थोडा विचार करा आणि पहा की त्या परिस्थीती पेक्षा आता तुम्ही आहात त्या परिस्थीत फरक पडला आहे ना ? मग येणार्‍या काळात सुद्धा परिस्थीतीत बदल घडेलच. स्वतःवर विश्वास ठेवा, आणि स्वतःला कधीही इतरांपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न सुद्धा करु नका. The whole secret of existence is to have no fear. Never fear what will become of you, depend on no one. Only the moment you reject all help are you freed. Swami Vivekananda

मनाची विक्षिप्तता तीन प्रकारे आपल्यावर ताबा मिळवू शकते. भीती, श्वासाचा कोंडमारा आणि वर्तमानाशी नातं तोडणं. एकदा मनाची ही कार्यप्रणाली समजली की पुढे सगळं सोपं आहे. १) मन सक्रीय होण्यासाठी श्वासाची आवश्यकता आहे. एकदा आपलं श्वासावर नियंत्रण आलं की मन ताब्यात येतं. ज्या क्षणी नेगटीव विचार सुरु होतील त्या क्षणी जाणीवपूर्वक उत्छ्वास बाहेर सोडा. जितका जाणीवपूर्वक श्वास तुम्ही बाहेर सोडाल तितक्याच वेगानं श्वास पुन्हा आत येईल, तो एकाग्रतेनं भरुन घ्या. त्या एनर्जीनं पुन्हा उत्छ्वास बाहेर सोडा म्हणजे जोमदार श्वास आत येईल. मूळ अवधान श्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडण्यावर ठेवा म्हणजे संपूर्ण श्वास-प्रश्वासावर तुमचं नियंत्रण येईल. ही क्रिया कुठेही आणि केव्हाही करता येईल. जमेल तोपर्यंत ही क्रिया चालू ठेवा. एकदा सराव झाला की नेगटीव विचार सुरु होता क्षणी, तुमची जाणीवपूर्वक श्वासाची क्रिया चालू होईल आणि नेगटिवीटी तुम्हाला घेरू शकणार नाही. नित्यनियम म्हणून, सकाळी जाग आल्यावर ही प्रक्रिया सुरु करा आणि रात्री निजण्यापूर्वी पुन्हा एकदा लक्षात ठेवून श्वास-प्रश्वास करा. सकाळी नेगटीविटी तुमचा ताबा घेऊ शकणार नाही आणि रात्री शांत झोप लागेल. उत्छ्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडणं हे क्रियेचं गमक आहे. बाकी सगळं आपोआप होईल. २) अशा प्रकारे श्वास मोकळा झाला की मन तुम्हाला कॉर्नर करु शकणार नाही (तुमचा कोंडमारा होऊ शकणार नाही). यामुळे हळूहळू तुमची भीती दूर होईल. तुमच्या लक्षात येईल की मनाची पॉवर केवळ नेगटीव विचार निर्माण करुन भय निर्माण करण्यात आहे. श्वास कोंडला की भीती वाटायला सुरुवात होते आणि भयानं अधिकाधिक भेदक विचार सुरु होतात. एकदा श्वास ताब्यात आला की भय टेकोव्हर करु शकत नाही. ३) वरच्या दोन्ही गोष्टी साधल्या की एक नवीन उलगडा, तुम्हाला आपसूक होईल. आपण वर्तमानात आहोत! हे वर्तमानात असणं; वर्तमानाशी संलग्न असणं, परम स्वास्थ आहे. मनाचं अस्वास्थ्य म्हणजे आपण वर्तमानापासून अलग होणं. मग एखाद्या निवांत क्षणी तुम्हाला जे. कृष्णमूर्तींच्या या अद्भूत वक्तव्याचा अर्थ उलगडेल : Present is the ultimate security! वर्तमान ही परम सुरक्षितता आहे. सध्या या वाक्यावर विचार करु नका. ती शेवटची स्टेप आहे. ते विधान वैचारिक उहापोह करायची गोष्ट नाही, अनुभवाची गोष्ट आहे. जस्ट वेट अँड फॉलो द प्रसिजर आय हॅव टोल्ड, रिझल्ट विल फॉलो.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 14:37
माझ्याकडे ऑथोरिटी नाही म्हणुन म्हणुन क्याटेगोराइज करणार नाही पण आत्मसन्मानाचा आभाव आणि अनेक अपुर्या इच्छा (and counting) याच्या मिश्रणातुन हे रसायन निर्माण झाले आहे. जे मांडले आहे तेव्हडाच त्रास असेल तर सकृत दर्शनी विशीष्ट औषधानी त्वरित गुण येइल. साय्केट्रिक्ट गाठावा. अतिशय निर्व्यसनी व्यक्ति समोर हे छोटे छोटे त्रास विक्राळ स्वरूपात उभे राहतात. ते कारण असेल तरी व्यसनी व्हा असे सुचवणार नाही. जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 01:50
जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल. जेवढे मी याबद्दल ऐकून आहे मलाही वाटते की या केस मध्ये नक्कीच विपश्यना काम करून जाईल. कारण यातील मनापासून करणे हि अट तुमच्याकडून आपसूकच पाळली जाईल. करा आणि (किंवा केलाच तर) आपला अनुभव देखील इथे लिहा. :)

शिद Fri, 05/09/2014 - 18:08
किंवा आर्धा किलो वजन जरी कमी झाले तरी चिंता
आमचे ह्या बाबतीत अगदी उलटे आहे... *smile* साहेब, बायको-पोरांबरोबर (अर्थात लग्न झाले असेल तर...) किंवा मित्र / मैत्रिणींबरोबर बाहेर फेरफटका मारायला जात जा. मस्त खा, प्या आणि मज्जा करा. *dance4* उगाच विचार करत बसलं की मुंग्याच्या वारुळातुन जसं एक-एक करुन मुंग्याची रांग बाहेर पडते तसं मनात भलतेसलते निगेटिव विचारांची रांग लागते आणि मग डोके भंजाळते. *crazy*

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 19:00
बहुतेक हंबल सुरुवात होऊन नंतर माणसाला सगळे काही मिळाले कि असे विचार येतात. अशा मनांच्या मोकांना संपत्ती असून चिंता न करता आयुष्यभर आरामात राहायची सवय नसते म्हणून.

In reply to by बाप्पू

जेनी... Sat, 05/10/2014 - 00:54
मनोविकार तज्ञ गाठा .. त्याला हे सगळे सांगा .. तो अऊशध देइल मग तुम्ही बरे व्हाल . बरे होण्यासाठी अऊशध खा . पण मनोविकार तज्ञ छान दिलासा देतात .. बस्स पण एकदम विश्वास बसुन जातो त्यांच्यावर ... इथले सगळे सल्ले वाचा .. आचरणात आणा पण डॉक्टरकडे जाणे टाळु नका ... वेळीच दाखवलात तर ठीक

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 00:09
आपण मिपावर ज्या क्षणी आलात त्या क्षणापासून, तुमचा आजार तुम्हाला सोडायला लागेल. आयला, हे मिपा नावाचे भूत फार शक्तीमान आहे. जमल्यास, भटकंती वाचा,,, पा.क्रु. वाचा. फावल्या वेळात, एखादा पदार्थ करून बघण्यासारखा उपाय नाही.बिघडला तर बिघडला.निदान तुमचे मन तर गुंतून राहील. एक साधा आणि सोपा उपाय देतो. तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते, ती जवळ ठेवा. (ईथे गोष्ट म्हणालो आहे. व्यसने नाही...नाहीतर तुम्ही सिगरेट्,तंबाखू आणि दारु जवळ ठेवाल अन उगाच आम्हाला शिव्या द्याल.) संगीत ऐका.बाथरूम मध्ये गा. (आय अ‍ॅम अ बाथरूम सिंगर.मला मनापासून गायला आवडते.ऐकणार्‍याने कान बंद करावेत.)ऑफीस मध्ये असाल तर, फावल्या वेळात मित्रांबरोबर चेष्टा-मस्करी करा.२/४ मिनीटे मित्रांबरोबर बोलल्याने, बॉस बोंबलत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे सुट्टीच्या दिवशी मस्त मैफील जमवा. तुमच्या सुदैवाने, तुम्ही पुण्याला राहता, वल्लींना गाठा (वल्लींचे नांव , त्यांना न विचारता घेत आहे, वल्ली साहेब सॉरी.) त्यांच्या बरोबर एखादी पिकनिक करा.अत्रुप्त आत्म्यांच्या बरोबर रविवारी पुण्यातला जुना बाजार बघा. पुण्यात लई भारी भारी मिपाकर आहेत.त्यांची गाठभेट घ्या. एक आपला असा मस्त कंपू जमवा.अन करा कट्टा. (बाद्वे, आमचा यानबूवली तला कट्टा काल सुखरूप पार पडला.व्रुत्तांत लवकरच.)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/11/2014 - 00:33
दुर्दैवाने हे असे घडूनही मनोदशेत फार फरक पडत नसतो. असो, हे वैयक्तीक मत आहे. वस्तुस्थितीदायक निरीक्षणांती नोंदवले आहे. फार काही यावर बोलण्यासारखे नाही.

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 00:47
व्यक्ती तितक्या प्रक्रुती.... आम्हाला माणसे प्रिय आणि संगीत त्यातूनही प्रिय...शिवाय वेळ मिळालाच तर खायला करायाला आणि खिलवायला पण आमची ना नसते.फावला वेळ कुणी कसा सत्कारणी लावायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्र्न. आणि मुळात त्यांनी हीच गोष्ट सांगीतली, की फावल्या वळात त्यांना त्रास होतो.म्हणूनच मी फावल्या वेळा संबंधी लिहीले... आणि तसेही कुणीतरी म्हटले आहेच.... "मन करा रे प्रसन्न, सर्व चित्तीचे साधन." आम्ही , आम्हाला जे योग्य वाटले ते लिहीले.चुकीचे असेल ही,,,, पण वाईट नक्कीच नाही.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/11/2014 - 00:54
पण वाईट नक्कीच नाही.
चांगले वाइट हा विचार करणे त्यांना नक्किच अभिप्रेत नाही. उपयोगी आहे काय ? ते महत्वाचे आहे त्यांना. आणी इथे एका मिपाकराचे असे मी उदाहरण बघीतले असल्याने मी आपला सल्ल्या धुडकावायचा सल्ला दिलाय. कोण मिपाकर हे जाणून घ्ययचे असेल तर व्यनी सुवीधा आहे.

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 01:08
मग कुठला सल्ला मानावा आणि कुठला नाही, हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या की. आपण कशाला रक्त आटवायचे? बर्‍याच लोकांनी बरेच सल्ले दिले आहेत.मला जे योग्य वाटले ते मी दिले. आणि तसेही, मिपा मुळे आयुष्य उध्वस्त झालेला मनुष्य माझ्या पाहण्यात नाही.(किंबहूना माझ्या आखातातील रटाळ दिवसांत मिपा हेच माझे ओअ‍ॅसिस आहे.मला जसा मिपाचा फायदा झाला आणि होत आहे, तसाच त्यांना पण होवू शकतो.) संगीतामुळे किंवा भटकंती मुळे किंवा पाककले मुळे पण असे होत नाही. मन प्रसन्न करणारे, कुठलेही उपक्रम फायदेशीरच ठरतात.उद्या जर धागाकर्त्याला कुठल्या बाबांच्या किंवा स्वामींच्या दर्शनाने बरे वाटत असेल, तर मला त्यात आनंदच आहे.

म्हैस Mon, 06/09/2014 - 15:45
चांगल्या मनोरोग तज्ञाला दाखवा . तुमची झोप पूर्ण होते का ? अर्धवट झोपेमुळे फार प्रोब्लेम्स निर्माण होतात . पूर्ण झोप घ्या . प्राणायाम करा . डोक्याला आणि फुफुसाला हवेचा योग्य पुरवठा झाला कि फ्रेश आणि उत्साही वाटतं . घरातल वातावरण प्रसन्न ठेवा . सुगंधी धूप, अगरबत्ती जाळून प्रसन्नता निर्माण करता येईल . आपल्या आवडत्या देवाचं स्तोत्र मोठ्याने म्हणा .

मराठे Mon, 06/09/2014 - 23:22
तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्धल इथे लिहिलं आहेत हीच उपचाराची पहिली पायरी आहे. याचा अर्थ तुम्ही उपचार घेण्याबाबत सिरियस आहात हे स्पष्ट होतं. आता वरती लोकांनी सांगीतल्याप्रमाणे चांगल्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्याल याची खात्री आहे.

समीरसूर Tue, 06/10/2014 - 14:56
अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते. आणि मग सुरु होतो अनिश्चिततेचा आणि मानसिक आंदोलनांचा खेळ! सगळं तसं पाहिलं तर नियमाप्रमाणे पुढे सरकत असतं पण आपलं मन त्या भयाने जागच्या जागी थांबून राहतं. हे असं भय बहुधा सगळ्यांनाच कधीतरी ग्रासतं. याची कारणे काहीही असू शकतात. नोकरी/धंद्यातली अनिश्चितता, गरीबी, मोठे अपयश, व्यवसायातले नुकसान, घरात कलह-तंटे, व्यसनाधीनता, कुणी जीवाभावाचं एकदम जाणं, जबर नुकसान (आर्थिक, मानसिक), कुठल्यातरी कारणाने आलेली अपराधी भावना, काहीतरी हातून निसटून गेल्याची चूटपूट आणि खंत, कामाच्या ठिकाणी कलह, एखाद्या व्यक्तीच्या (ओळखीची किंवा अनोळखी) विशिष्ट वागणूकीमुळे होणारा मनःस्ताप, अतिविचार करणे, भविष्याची चिंता, एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी चिंता, इत्यादी कुठलीही कारणे अशा भयगंडाला कारणीभूत ठरू शकतात. अगदी क्षुल्लक गोष्टी देखील कधी कधी मनाला त्रास देतात. हजारो-लाखो रुपयांचे नुकसान हसत-हसत पचवणारा कधी कधी एका क्षुल्लक पेन्सिलीच्या हरवण्याने कमालीचा अस्वस्थ होतो. प्रत्येक घटनेविषयी, व्यक्तीविषयी, सवयींविषयी, आणि प्रत्येक गोष्टीविषयी आपले स्वतःचे असे खास मजबूत विचारसंच किंवा दृष्टीकोन असतात. त्याला धक्का लागला की मनाची अस्वस्थता वाढते. ती जास्त वाढली की मग भयगंड येतो; आत्मविश्वास, उत्साह उतरणीला लागतात. त्यातून अधिक चिंता वाढते. असे हे दुष्टचक्र असते. बसमध्ये कंडक्टरकडून सुट्टे तीन रुपये घेण्याची आठवण सगळ्या प्रवासात सतत उराशी ठेवणारा प्रवासी दुसर्‍या दिवशी टपरीवर चहा पितांना एखाद्या गरीब भिकार्‍याला अगदी सहजपणे दहा-वीस रुपये देऊन टाकतो किंवा त्याला दहा-पंधरा रुपयांचा वडा-पाव आणि चहा विकत घेऊन देतो. आदल्या दिवसाच्या प्रवासात मात्र तो मजेत प्रवासाचा आनंद लुटू शकत नाही कारण सुट्टे तीन रुपये एवढ्याभोवतीच त्याचे जग त्यावेळी फिरत असते. असे होत असते. आणि आयुष्यात असे टप्पे येतच असतात. त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता या समस्येवर तोडगा काढणे महत्वाचे. खालील काही उपाय फायद्याचे ठरू शकतील असे वाटते: १. श्वास - वर सांगीतलेला श्वासाशी संबधित उपाय चांगला आहे. उच्छवासासोबत निराशावादी विचार झटकून टाकणे प्रयत्नांती शक्य होते. २. व्यायाम - रोज न चुकता ३०-४० मिनीटे व्यायाम, वेगात चालणे इत्यादी आपल्याला उत्साह प्रदान करते. विचार स्थिर ठेवण्यास याचा निश्चितपणे उपयोग होतो. सतत बसून राहणे, लोळत असणे, नुसताच निरुद्देश टीव्ही बघत राहणे आपल्या मनाला मंद आणि आळशी बनवते. घरात देखील छोटी-छोटी कामे करत राहणे फायदेशीर असते. ३. वाचन - वाचनासारखा छंद नाही. आपल्याला जे आवडते ते वाचावे. वाचनामुळे माहिती प्रोसेस करण्याची कला अवगत होते. प्रसंगी यथोचित व्यक्त होणे आणि विचारांमध्ये प्रगल्भता असणे हे महत्वाचे बदल चांगल्या वाचनाने साध्य होतात. भाषा आणि विचार समृद्ध होतात. सामान्यतः लोकं माहितीलाच ज्ञान समजतात. माहितीला योग्य रीतीने प्रोसेस केल्याने ज्ञान प्राप्त होते. हे कौशल्य वाचनाने टोकदार होत जाते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायलाच हवे. ४. छंद - जीव ओवाळून टाकावा इतक्या प्राणपणाने एखादा छंद जोपासल्यास आयुष्याला नवीन झळाळी येते. आणि मग त्यातून मिळणारा उत्साह, आत्मविश्वास टिकाऊ असतो. ५. शिकणे - आपल्या कामाच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकणे नवा आत्मविश्वास कमवण्यात उपकारक ठरते. ६. करमणूक - चित्रपट, एखादी चांगली मालिका, मित्रांसोबत अड्डा, कुटुंबातल्या सदस्यांसोबत गप्पांचा फड, सहली, एखाद्या दिवशी कामाला दांडी मारून नुसते भटकणे, पावसात भिजणे, रात्री मस्त जेवण करून तब्येतीत पान जमवून एखादा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम एंजॉय करणे, भरपूर खेळणे, या गोष्टी अत्यावश्यक आहेत. एक वेगळाच उत्साह देतात या गोष्टी. ७. स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. ८. विवेकबुद्धी शाबूत ठेवणे - सगळ्यांशी चांगले वागणे आणि आपण काही चुकीचे करत नाही आहोत हा ठाम विश्वास बाळगणे आवश्यक आहे. ९. सौहार्द - सौहार्द, मृदू भाषा, मने जिंकून घेण्याची हातोटी ही कौशल्ये जबरदस्त साथ देतात. स्वत:चे मनःस्वास्थ व्यवस्थित ठेवणे या कौशल्यांमुळे सोपे होते. शिवाय यामुळे नवीन ओळखी पटकन होतात, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे इसका मतलब ये नही की प्रत्येक ठिकाणी पडते घ्यावे. गरज असेल तिथे ठामपणे 'नाही' म्हणणे आणि वेळप्रसंगी बाह्या सरसावणे आपल्या इथे आवश्यक ठरते. समोरची व्यक्ती पंगा घेतांना दहावेळा विचार करेल अशी प्रतिमा केव्हाही फायदेशीर ठरते. अरे ला कारे करता येणे जमले पाहिजे. १०. जास्त भावनाप्रधान नसणे - अतिभावनाप्रधान असण्याचे असंख्य तोटे असतात. आपण कशाततरी गुंतून पडतो आणि जमाना सुळ्ळकन पुढे निघून जातो. हे कटाक्षाने टाळता यायला हवे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. ११. ऊर्जेचा योग्य वापर - योग्य ठिकाणी ऊर्जा खर्ची घालणे जास्त फायदेशीर ठरते. जिथे गरज नाही तिथून लक्ष काढून योग्य त्या ठिकाणी फोकस करणे जमले पाहिजे. पुस्तक लिहिणे हे ध्येय असेल तर टीव्ही बघणे, टंगळमंगळ करणे कटाक्षाने टाळता आले पाहिजे. मुख्य कामाला जास्त वेळ ठेऊन दुय्यम कामे चटकन उरकणे श्रेयस्कर ठरते. मुख्य काम कोणते आणि दुय्यम कामे कुठली हे ज्याचे त्याने ठरवायचे. १२. अतिविचार टाळणे - अतिविचार केल्याने मन पोखरले जाते. कुठला विचार केव्हा आवश्यक आहे हे ओळखता आले पाहिजे. आणि एका ठराविक मर्यादेनंतर विचार सोडून देता आले पाहिजे. 'जो होगा सो देखा जायेगा' ही बेफिकीरी कधी कधी माणसाला तगवते. जिथे आपले नियंत्रण नाही त्याबाबतीत अतिविचार टाळणे आवश्यक आहे. १३. तुलना टाळणे - त्याच्याकडे होंडा सिटी आहे; माझ्याकडे ऑल्टोच आहे; त्याला माझ्यापेक्षा ५०००० पगार जास्त आहे अशी तुलना सतत करणे टाळता आले पाहिजे. प्रत्येकाचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन भिन्न असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातली वळणे आणि स्पीडब्रेकर्स निराळी असतात. आपले ध्येय काय आहे आणि आपल्याला ते कसे अचिव्ह करायचे आहे ही माहिती असणे यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ऑफ कोर्स, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुलना असणे आवश्यकच असते. त्यामुळे तुमची तहान कायम राहते. पण ही तहान जीवघेणी ठरू न देणे महत्वाचे. १४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. हे उपाय प्राथमिकता देऊन अमलात आणल्यास फायदा होईल. पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड मात्र आवश्यक आहे. काही काही माणसे जन्मतःच आनंदी, उत्साही, कमालीची आत्मविश्वासपूर्ण, व्यवस्थित विचार करून योजना आखून आयुष्य जगणारी असतात. मोठे मोठे निर्णय घेणे, ते अमलांत आणणे, कुठेही भावनाप्रधान न होता आपली ध्येये साध्य करणे, स्थिर चित्ताने आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकुच करत राहणे, दु:ख आणि संकटकाळातदेखील शांत राहून थंड डोक्याने विचार करणे या गोष्टी अशा माणसांना लीलया जमतात. ज्यांना हे जमत नाही त्यांना मनाची सतत मशागत करत राहणे आवश्यक ठरते. त्यासाठी वरील उपाय कामात येतील असे वाटते. मानसोपचारतज्ञाची गरज असेल तरच ती मदत घ्यावी. रोजच्या जगण्यातल्या ताणतणावांसाठी आणि छोट्या-मोठ्या कुरबुरींसाठी मानसोपचारतज्ञाची आवश्यकता नाही असे वाटते. त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता देखील असते. आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. शिवाय मानसोपचारतज्ञ आता आपल्याला पूर्ण बरे करेल; म्हणजे आपल्याला काहीच करावे लागणार नाही अशी भावना होते. स्वमदतीशिवाय जगातला कुठलाच मानसोपचारतज्ञ मदत करू शकत नाही. अगदीच स्किझोफ्रेनियासारखे आजार असतील तर औषधोपचार आणि तज्ञांची मदत अपरिहार्य ठरते; परंतु साध्या साध्या समस्यांसाठी आपण स्वत:च मशागत केली तर उपचारांची गरज भासत नाही असे वाटते. विपश्यनाचा १० दिवसांचा कार्यक्रम मी इगतपुरीला केलेला आहे. अंतर्मुख लोकांसाठी कदाचित या कार्यक्रमाचा उपयोग होत असावा परंतु ज्यांना खूप बोलायला आणि स्वच्छंद आयुष्य जगायला आवडते त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेविषयी माझ्या मनात शंका आहेत. व्यक्तीश: मला या कार्यक्रमाचा शून्य उपयोग झाला. दहा दिवस अजिबात न बोलणे, श्वासावर लक्ष नियंत्रित करणे, नेहमीच अगदी साधे जेवण घेणे, रोज पहाटे ५ वाजता उठून डायरेक्ट ध्यानधारणेत घुसणे वगैरे मला काही झेपले नाही. शेवटी दिवस पर्सिस खंबाटाला बघण्यात कसे बसे घालवले (होय, त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस पर्सिस खंबाटा आलेली होती). कित्येक लोकं या कार्यक्रमात चक्क झोपून जात असत. तिथून सुटल्यावर जीव भांड्यात पडला होता. असो. हा विचार ज्याने त्याने करायचा. शेवटी आपले सूर, मगदूर, आणि सुरूर महत्वाचे. आपली गाण्याची पट्टी कोणती, आपली झेप घेण्याची कुवत किती, आणि आपल्यामध्ये कौशल्ये, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, जिद्द यांचे वादळ आहे की फक्त एक छानशी झुळूक आहे हे तपासणे महत्वाचे. ते एकदा ओळखले की मग सगळे व्यवस्थित होत जाते. त्यामुळे टेंशन घेऊ नका. सगळे नीट होईल हा विश्वास ठेवा आणि आपल्या परीने मनाची मशागत करत रहा. त्रास खूप वाढला तर मात्र मानसोपचारतज्ञाची मदत अवश्य घ्या. मी वर लिहिलेले सगळे करतो असे नाही. जे जितके जमते तितके करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. सगळे मला जमत नाही. कुवत अपुरी पडते. विचारांची प्रगल्भता कमी पडते. हे सगळे केल्याने नक्कीच फायदा होईल असे वाटते.

लेखनप्रकार
असे का होते मला..?? लिहु की नको . असा बराच वेळ विचार केला. पण शेवटी मनात आले की कोणी हसले तर हसू देत पण ह्या प्रॉब्लेम वर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे म्हणून लिहायला घेतले. तर या प्रॉब्लेम ची सुरवात झाली गेल्या काही 8-10 महिने किंवा गेल्या वर्षभरापासून पाहीले तर मला स्वतः मध्ये काहीतरी बदल जाणवतोय.. तो म्हणजे कोणत्याही अनामिक गोष्टी बद्दल भीती वाटत राहणे आणि सतत निगेटीव विचार येत राहणे. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आजचीच गोष्ट. माझे मोबाइल चे सिम कार्ड हरवले. त्यामुळे मी नवीन सिम कार्ड घेतले त्याच नंबर चे. पण आता मनात गोंधळ चालू आहे की कदाचित जे हरवलेले सिम आहे ते पण चालू अससेल तर..???

पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!

जेनी... ·

In reply to by प्यारे१

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 20:41
छान कविता ! रच्याकने सध्या नेमका कुठला महिना सुरु आहे???? य्वढं खोच्क काय विचार्ताय? हा वळवाचा पाउस नसू शकतो का? किवा गेल्या वर्षीच्या जुलैचा पाउसही नसू शकतो का? ऑं? ;) आजून आप्शन हैत. पन गुलदस्त्यात ठेव्लेत. :)

In reply to by यसवायजी

प्यारे१ Fri, 05/09/2014 - 14:32
अहो महामहिम एसवायजी, पावसाची कविता वाचली. तीव्र उन्हाचा मे महिनाच सुरु आहे ना असं विचारायचं होतं हो! आता कुठं हुंगाहुंग सुरु करताय तुम्ही ;) ?

जेपी गुरुवार, 05/08/2014 - 20:51
काही वर्षपुर्वि केलेली"म्रुदुगंध उमटला आले म्रुगनक्षत्र , चालली अवेळी ओली ती अपरात्र, वाकली जरासी पिळताना ओला पदर ,आतुन जरासे हलले अर्धे दार" आठवले. बायदवे लातुरात आज पाऊस पडल्यामुळे आवडल.

अनुप ढेरे गुरुवार, 05/08/2014 - 21:56
मस्तं!
तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण सारेच माझ्या विरुद्ध, कारस्थान रचत असावेत बहुदा, कारण तुझ्या मिठीत येण्याशिवाय, मला काही पर्यायच न उरावा !
या ओळी खासच...

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 21:57
नाजूक हळवे थेंब माझ्या ओठांवर बरसावे, थेंबांना त्या तुझ्या ओठांचा स्पर्श व्हावा, पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ! वळवाचा पाउस पडणार तर !

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना Fri, 05/09/2014 - 08:22
आत्मुस छत्रीत एकटेच काय बागडताय? जेनी तिन्टिम्बे पहा कश्या मुद्दाम साडी बीडी नेसुन.... जाऊ दे ! साल! आताश्या पाऊस म्हंटल की पडसं आठवत. जेनी तीन्टिम्बे रेषा धुसर असतात लक्षात घ्या.

In reply to by दिनेश सायगल

प्यारे१ Fri, 05/09/2014 - 14:30
पुरुष विभाग स्पेषल झाला तर त्या विभागात कवयित्रीना 'अलोउड' असणार काय? उगाच महा जनांच्या कविता व्हायच्या नैतर ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 05/09/2014 - 14:32
पुरुष विभाग स्पेषल झाला तर त्या विभागात कवयित्रीना 'अलोउड' असणार काय?
अ‍ॅट लीस्ट वन ऑफ अस शुड हॅव अ‍ॅन ओपन माइंड ;) (काडी टाकली पळा पळा)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 05/09/2014 - 14:48
>>>अ‍ॅट लीस्ट वन ऑफ अस शुड हॅव अ‍ॅन ओपन माइंड आणि पुरुषांच्या मणांवर वैट्ट परिणाम झाले म्हन्जे????? ;)

काव्यरस
थंड वाऱ्याची झुळूक यावी, हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही, लाजेची सीमा पार करायला घाबरावा ! तुझा तो स्पर्श, तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा, शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा ! मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी .. त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !! नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत, ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस ! तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण सारेच माझ्य

परवशता

मीराताई ·

जेपी गुरुवार, 05/08/2014 - 17:57
+1 बाकी नावावरुन बिकाचा "परवशता पाश दैवे" हा लेख आठवला. (मोबल्या वरुन प्रतिसाद देत असल्याने बिकांच्या धाग्याची लिंक देता येत नाय)

स्पंदना गुरुवार, 05/08/2014 - 18:15
वास्तव म्हणता येइल याला. आवडली कथा. उगा मुक्त होउन तो भरार्‍या घेउ लागला वगैरे कथेतच ठिकाय. चारा पाणी आयत मिळणार्‍याला काय जमणार मुक्त आयुष्य! अन सगळे तर्क शेवटी भुकेपुढे, अन जीवाच्या संरक्षणापुढे मान टाकतात.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/08/2014 - 23:53
सुरेख रंगवलीय वाचताना पोपटाच्या भावविश्वातूनच विचार होत होता. जसे स्टुअर्ट लिटिल सिनेमा बघताना आपण त्या उंदराच्या भावविश्वाशी एकरूप होतो तसे झाले. शक्य असल्यास पोपटाला परत न आणता याच हळूवार शैलीत हि कथा पुढे घेऊन जा, कथानक सुचत गेले तर छान जमेल..

अमित खोजे गुरुवार, 05/08/2014 - 22:40
सुरुवातीपासून नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार करणारा पोपट, त्याला आलेल्या पुढच्या अडचणी आणि शेवटी त्याने घेतलेली माघार असेच जाणवत राहिले. शक्य आहे! आणि हा असा विचार करणे सुद्धा चुकीचे नाही. शेवटी बायको पोरांची पोटं तर भरायची जबाबदारी आपल्यावर आहेच. अगदीच पोपटाचे चुकले असेही मी म्हणणार नाही. पण अजून एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नव्हती. म्हणजे दार उघडायची नाही तर अजून एखादा दिवस बाहेर राहून बघायला हरकत नव्हती. दार काही आता परत लवकर उघडले जाइल याची शाश्वती नाही. त्यामुळे थोडी अजून मजा करता आली असती म्हणतो :)

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 23:16
कायम पिंजर्‍यात रहायची सवय झाली की तेच नशीब बनून जातं आणि सुरक्षित रहाणं हेच खरं आयुष्य वाटायला लागतं. त्या बिचार्‍याला मुक्त कसं रहायचं हे कुणी शिकवलं नाही तर तो तरी काय करणार? मात्र एकदा स्वातंत्र्य जरासं अनुभवलं तरी आता त्याचं राहिलेलं पिंजर्‍यातलं आयुष्य आणखी दु:खी होणार हे नक्की.

In reply to by पिवळा डांबिस

नगरीनिरंजन Fri, 05/09/2014 - 04:44
अगतिकतेची दया आली. बिचार्‍याला सगळ्यांसारखं पिंजरा हेच जग आणि पिंजर्‍याबाहेर आयुष्य शक्य नाही हे आधीच पटवून दिलं असतं तर ही वेळ आली नसती असे वाटते. आता सुखासीन आयुष्यात जन्मभराचे दु:ख वागवणे आले.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 21:49
म्हणनारे उण्टा वरील शहाणे असावेत अथवा प्रतिसादाची घाई घडली असावी. पोपट बंदिवान होता. असे असुनही संधी मिळ्ता त्याने जोखीम पत्करली& ही गेव हिज बेस्ट शॉट. प्रयत्न न करता तो परतलेला नाही. खरे तर प्रतिसादाकांनी स्वताला पोपटात बघू नये. मलाही सुरुवातीला पोपट जोखीम टाळणारा वाटला पण सूक्ष्म निरिक्षण करता पॉप्टाणे जोखीम पत्करली आहे असेच दिसते. तो परतला पण यात दोन सुरेख शक्यता त्याने निर्माण केल्या 1 पुन्हा मुक्त विहाराची 2 दूसरी परत येतो म्हटल्यावर मालकहि त्याला कायम बंदिस्त ठेवणार नाही याची.

खिडकीत टांगलेल्या पिंजऱ्यात तो पोपट सुखेनैव राहात होता. कधीपासून तो तिथे असा राहात होता ते त्यालाही सांगता आलं नसतं. पण तो निवांत, निश्चिंत होता, मजेत होता, सुखात होता एवढं नक्की! पिंजऱ्यात बसून ओली डाळ खात असताना एकदा त्याने पाहिलं, रानातून आलेल्या राव्यांचा एक थवा मुक्त कंठाने चित्कार करत या झाडावरून त्या झाडावर, विजेच्या तारांवरून मंदिराच्या उंच घुमटावर सुरकांडया मारत होता. त्या रानपाखरांचे ते चित्कार, त्या मुक्त लकेरी ऐकून तो चकित झाला. त्याला तर फक्त 'मिठू मिठू' म्हणायचंच माहिती होतं. त्यांच्या त्या भराऱ्या आणि त्या भरारीचा वेग पाहूनही तो चक्रावला.

फेक

फुंटी ·
लेखनविषय:
मी दहा कोटी आहेत म्हणे....१० कोटी फेक मी ...कुणी कबूल करणार नाही... माझीपण आहे एक सेक्सी प्रोफाईल....जुगाड वाली....ट्राय मारतो मी पण खूप ....नाही लागत गळाला कुणी....साला विश्वास कोणावर ठेवावा...मेल जेन्डर असल म्हणून पुरुषच असेल कशावरून.....कमालीची गुप्तता सगळीच....असुरक्षित ...तरीही आतून येणारी नैसर्गिक उर्मी...चोरटेपणाची सुप्त ओढ....खोल खोलवर खरा मी सापडतच नाहीये...१० फेक अकौंट असले तरीही ..प्रश्न उरतोच मी कोण??

भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग २.

सुधांशुनूलकर ·

गणपा गुरुवार, 05/08/2014 - 12:50
वाह साहेब सुंदर माहिती. पहिल्या भागही आवडला होता पण सांगायचं रहुन गेलं होतं. शेवटचे काही फोटो मात्र दिसले नाहीत. ;)

प्रचेतस गुरुवार, 05/08/2014 - 13:21
मस्त वृत्तांत. नुकतेच आंबा घाटानजीकच्या घनदाट जंगलात आणि तिथल्या देवराईत भ्रमंती केल्यामुळे जंगलाशी जवळून परिचय झालाच आहे. हा सिकाडा म्हणजे दिवसकिडा ना? हे दिवसभर किर्र किर्र करत असतात. गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप सुंदर आहे. तिथल्या झाडावंर एक विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते. ऐन पावसाळ्यात रात्री ह्या जंगलात गेलं तर ही बुरशी लागलेली झाडे प्रकाशमान झालेली आढळतात. बाकी नागफणीवर जाऊन का नाही आलात? तिथे उभे राहून सह्यकडे न्याहाळण्यात विलक्षण सुख लाभते.

In reply to by प्रचेतस

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 16:47
गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप सुंदर आहे. तिथल्या झाडावंर एक विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते. ऐन पावसाळ्यात रात्री ह्या जंगलात गेलं तर ही बुरशी लागलेली झाडे प्रकाशमान झालेली आढळतात.
यप, मी तर इतका भारव्ला होतो की आजू बाजू ला ब्लुस्किन पीपल दिसतील की काय शंका मनाला चाटून गेली. थोड़ सावरल्यावर लक्षात आले ते लोक फक्त जेम्स केमेरों च्या मूवी मधेच आजुबाजुला आलेले दिसतात ;)

भाते गुरुवार, 05/08/2014 - 13:37
सगळे फोटो आवडले. विशेषत: तो फुलपाखराचा फोटो छानच आहे. खादाडीचे फोटो बघुन अजिबात जळजळ झाली नाही. जेवण आवडले.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:41
मिपा परंपरेला पाईक राहून खादाडीचे फ़ोटो टाकल याबद्दल विशेष आभार. अन्यथा धागा मध्यवर्ती ठिकाणी मारावा काय विचार होता.

स्पंदना गुरुवार, 05/08/2014 - 18:33
शेकरु मी दोनदा पाहिली आहे. अन दोन्हीवेळा महाबळेश्वर!! सुरेख माहीती. पिठलं.....असोच. मजा केलात ना? बास! आम्ही त्यातच सुखी. मिपाकर असे एकमेकांना भेटत राहोत. मस्तीत राहोत अशीच शुभेच्छा!!

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/08/2014 - 19:25
सर्व खायचे पदार्थ पाहून http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif आणि परचं.............ड जळजळल्याही गेले आहे! :-/ शिवाय...करवंद-द्रोण-हल्ल्यानी गतप्राण होऊन..मम आत्मा वरंध घाटात भटकायला http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gifगेला आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 05/08/2014 - 20:07
मम आत्मा वरंध घाटात भटकायला गेला आहे
वरंध घाटातच का? इथे जवळच ताम्हिणी घाटात कचकून करवंदं आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 20:45
झाड ला पण अवतरण चिन्ह " .." टाकावं ही णम्र विणंती. सुधांशू जी अभ्यासू वृत्तांत खूप आवडला. कृपया खादाडीच्या फोटोंना गुप्त करावं.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@झाड बहुतेक वरंध घाटात असेल>>> =)) व्हय जी व्हय..पयलं करवंद वरंद घाटातच खाल्लं! =))

केदार-मिसळपाव गुरुवार, 05/08/2014 - 21:25
"शेवटी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. खरं तर मिसळपाव हे महाजालावरचं एक संकेतस्थळ, आभासी (व्हर्चुअल). पण जिंदादिल मिपाकरांमुळे ते केवळ आभासी न राहता कट्टे, प्रत्यक्ष भेटी अशा माध्यमातून मिपाकर एकमेकांच्या जवळ आले, हे मला फार अद्भुत वाटतं." अगदी हेच म्हणतो.

सखी गुरुवार, 05/08/2014 - 21:32
छान भटकंती वृत्तांत, दोन्ही भाग आवडले. भाग १ मधला नीलमोहोरही आणि यामधला रानमेवा खासच. मिपाचे भ्रमणमंडळ असेच भटकंती करत राहो.

येडगावकर गुरुवार, 05/08/2014 - 22:05
कायेकी तुर्तास काही कारणांमुळे आमची भटकंती हे फक्त 'येडगाव ते डोंबोली' येवढीच मर्यादित झालेली आहे! म्हणुन तुमच्यासारख्या मंडळींनी केलेली भटकंती एनजॉयतोय! बायदवे ते हाटील आमच्या एक्दम जवळ! गावाला गेलं की एकतरी फेरी होतेच तिथे! तिथे मिळणारी सगळ्यात जबरी गोष्ट म्हणजे 'अन् लिमिटेड लसुन चटणी'! आहाहा... आयला पुढच्या फेरीला अजुन १० दिवस आहेत!

सुधांशुनूलकर Sun, 05/11/2014 - 12:29
सर्व प्रतिसादांसाठी आभार. @ वल्ली, आत्मशून्य, शैलेन्द्र - ज्योतवंतीबद्दल नवी माहिती मिळाली. आता ती बघायला पावसाळ्यात भीमाशंकरला जाणं आलंच! कोणी मिपाकर येणार का? जून-जुलैमध्ये कोयना अभयारण्यात जायचा बेत आहे. बरोबर यायची इच्छा असलेल्या मिपाकरांचे सहकुटुंब स्वागतच असेल.

In reply to by सुधांशुनूलकर

प्रचेतस Sun, 05/11/2014 - 19:37
मी तर येणारच. जून जुलै मध्ये कोयना अभयारण्यात अगदी धो धो पाऊस असेल. इतक्या पावसात कोयना अभयारण्यात जाणे योग्य ठरेल काय?

In reply to by आत्मशून्य

सुधांशुनूलकर Mon, 05/12/2014 - 21:04
जूनच्या तिसर्‍या-चौथ्या आठवड्यात प्रयत्न करतो आहे, तेव्हा फार पाऊस नसेल. जुलै-ऑगस्टमध्ये मात्र भरपूर पाऊस असेल, हे खरं. नाहीतर पाऊस ओसरल्यावर सप्टेंबरनंतर बघू...

mdmagar Sun, 05/11/2014 - 15:08
हॉटेलचे दर लिहायला हि मंडळी का बरं विसरतात !!

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/30/2017 - 15:17
लेखन वर काढल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! लेखपाहुन आमच्याही मिपाकरांसोबत केलेल्या भीमासंकरच्या ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या . गुप्त भीमा शंकरच्या वाटेवर जाताना आम्हाला तर शेकरु इतक्या जवळुन दिसला होता की अक्षरशः त्याला मांडीवर घेवुन मांजरासारखे कुरवाळता आले असते ! आता परत एकदा भीमा शंकरला जाणे आले !

भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग १
वनभटकंती
भीमाशंकर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं, तसंच पर्यावरणदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये निसर्गाला देवाशी अनेकविध मार्गांनी जोडलेलं आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘देवराई’ (देवासाठी राखून ठेवलेलं रान). देवराईमध्ये कोणीही शिकार अथवा वृक्षतोड करत नाही. त्यामुळे तिथल्या स्थलविशिष्ट (endemic) वनस्पतींचं आणि प्राणिसृष्टीचं संरक्षण आणि संवर्धन होतं. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेलं ‘शेकरू’ म्हणूनच इथे तग धरून आहे.

पडघम २०१४-भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात

क्लिंटन ·

पैसा Wed, 05/07/2014 - 23:34
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. गुजरातमधे कोणाला बोलण्यासारखे फार काही राहलेय असे आता वाटत नाही! ;)

विकास Wed, 05/07/2014 - 23:43
गुजरात मधे अंदाज काय आहेत हे माहीत असले तरी त्यासंदर्भाने केलेले बाकी सर्व माहितीपूर्ण विश्लेषण आवडले.

दुश्यन्त गुरुवार, 05/08/2014 - 01:06
गुजरातबद्दल साधारण असेच अंदाज (भाजप-२३, कॉंग्रेस- ३) सर्वत्र दाखवले जात आहेत. माझ्यामते कदाचित भाजप एखादी जागा आणखी जिंकू (२४) शकेल. मात्र आपण दिलेला अंदाज योग्य वाटत आहे. जवळपास सर्वच सर्व्हेमध्ये या निवडणुकीत भाजपला गुजरातपेक्षाही मोठे यश मध्य प्रदेश आणि कदाचित राजस्थानमध्येही मिळेल असे दाखवले जात आहे ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे.या निवडणुकीपुरत बोलायचं झाल्यास आपल्या राज्याचा माणूस पंतप्रधान होण्यासाठी कॉंग्रेसचे परंपरागत मतदारही चांगली प्रमाणात भाजपकडे वळतील अन्यथा गुजरातमध्ये कॉंग्रेस अगदीच मृतावस्थेत नाही हे स्पष्ट होते.

In reply to by श्रीगुरुजी

शिद गुरुवार, 05/08/2014 - 21:00
२६-०
खुपच अवास्तव अपेक्षा नाही वाटत का तुम्हाला? *unknw* बाकी क्लिंटन रावांचे विश्लेषण नेहमी प्रमाणेच मुद्देसुद आणि छान.

In reply to by शिद

थॉर माणूस Fri, 05/09/2014 - 09:12
नशीब २७- -१ वगैरे नाही आलं. भाजपा - २७२+ किंवा एनडीए - ४००+ वगैरे ऐकून झालंय. अशा अवास्तव अपेक्षांमुळेच पुढे घोळ होतील की काय असं मधे एकदा वाटून गेलं होतं. (एकदा तर एका कार्यकर्त्याच्या वल्गना ऐकून खरंच यांना मत द्यावं का असा प्रश्न ही पडला होता. पण सध्या फारसे पर्यायही उपलब्ध नाहीत. :| )

In reply to by श्रीगुरुजी

सहमत. चाणक्य वाल्यांचा अंदाजही खरा झाला म्हणायचा. गुजरात २६-० राजस्थानात तसेच, दिल्लीतही तसेच.

सौंदाळा Fri, 05/09/2014 - 10:20
मस्तच सुरु आहे लेखमाला. आता १६ तारखेच्या आत तुमचा संपुर्ण भारताबद्दलचा अंदाज वाचण्याची प्रचंड उत्सुकता आहे.

राष्ट्रवाद- एक उन्माद !

मारवा ·

धन्या Wed, 05/07/2014 - 17:58
एक वेगळाच विचार मांडला आहे तुम्ही. राष्ट्रवाद ही त्या मानाने खुपच व्यापक संकल्पना आहे. इथे तर प्रांतवादही नको ईतका फोफावला आहे. अस्मितेच्या नावाखाली आपल्याच "राष्ट्र"बांधवांना परप्रांतीय असे नामाभिधान चिकटवून त्यांना सळो की पळो केले जात आहे.

पगला गजोधर Wed, 05/07/2014 - 18:01
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 18:45
'विप्लवा ' या अरूण साधू यानी लिहिलेल्या कादंबरीची आठवण झाली. परग्रहावरची काही माणसे इथे येतात मोठ्या आशेने की त्याना त्यांच्या पेक्षा प्रगत मानसिकता दिसेल.पण येथील लढाया, शत्रूत्वे पाहून ते व्यथित होतात. राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन Wed, 05/07/2014 - 18:50
राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.
राष्ट्र काय किंवा धर्म काय, लोकसमुदाय एकवटण्याची साधने आहेत. ती जर नसली तर पशू आणि माणूस यात काहीच फरक नाही. आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.

In reply to by बॅटमॅन

सुबोध खरे Wed, 05/07/2014 - 19:53
सकृतदर्शनी राष्ट्रवाद हा अतिरेकी वाटतो आणि वसुधैव कुटुंबकम हे छान वाटते. पण जेंव्हा परका माणूस तुमच्या स्वार्थावर घाला घालत असेल तर परमार्थ सुचेल कसा? जर मुंबईत येणारे बांगलादेशी घुसखोर तुमची सर्व व्यवस्था कोलमडून टाकणार असतील तर त्यांना अटकाव करणे हा रास्थ्र्वाद स्वार्थी असेल तरीही बरोबर आहे. तुम्हाला रोज पाण्य्साठी वणवण करायला लागली तर त्याच लोकांना तुम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणून या म्हणणार आहात काय? स्वार्थ हा संकुचित असला तरी तो प्राणीमात्राच्या जगण्याचे प्रयोजन आहे हि वस्तुस्थिती असते. मी, माझे कुटुंब, माझे आप्त, माझे जाती/धर्म बांधव , माझे राष्ट्र बांधव अशी वर्तुळे असतात यात केंद्रस्थानी स्वतः ठेवून माणूस जगात असतो. जोवर केंद्राला धक्का लागणार नाही तोवर वर्तुळ तो मोठे करू शकतो किंवा इच्छितो. पण जर केंद्राला धक्का लागणार असेल त्याचा तो जोरदार विरोध करू लागतो. राखीव जागात म्हणूनच दुसर्या जातीचा अंतर्भाव करायला त्यामुळेच मोठा विरोध उफाळून येतो. उच्च विचारसरणी हि शेवटी विचार्वांतानाच झेपणारी असते सर्वसामान्य माणसाना नाही. दोन ऐवजी चार वेळेस जेवून ढेकर दिल्यावर उच्च विचारसरणी ठीक आहे.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 19:55
लोक एकवटण्यासाठी कॉमन स्वार्थ हेच साधन असते. म्हणून युनो ची ही स्थापना झाली आहे, नाटोची आणि नामची सुद्धा ! या राष्ट या संकल्पनेपेक्षाही प्रगत संकल्यना आहेत .तरीही त्या मानवसंहार थांबवू शकलेल्या नाहीत. मग राष्ट्र या संकल्पनेची वा धर्म या संकल्पनेची काय कथा ? कुरघोडी हा पाशवी जगताचा स्थायीभाव आहे. मानव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 13:17
नव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.
अपरंपार नरसंहार जरी झाला असला तरी ज्याला संस्कृती इ.इ. म्हणतो ती विकसित होण्यामागे या दोन खुळांचा बराच वाटा आहे. राष्ट्र म्ह. युरोपियन अर्थानेच पाहिजे असे नाही. राजकीय संघटनेचा कुठलाही आविष्कार असे समजू. जर तसा समाज एकवटायचा प्रयत्न कुणी केला नसता तर आजही आपण जंगलात अर्धनग्न अवस्थेत प्राण्यांपासून जगत फिरलो असतो. एक अवस्था दुसरीपेक्षा सर्वार्थाने चांगली नसली म्हणून तिचे महत्त्व आजिबात कमी होत नै.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा गुरुवार, 05/08/2014 - 17:06
आपण जंगलातून समाजात आलो याला धर्म व राष्ट्र कारणीभूत नाही झाले. आपण जंगलचाच कायदा वापरून राह्यला लागलो तर मोठी कठीण अवस्था होईल म्हणून काही नियम मानवी समाजाने घालून घेतले. धर्म व राष्ट्र या संकल्पना त्यावेळी टोळ्यांच्या टकुर्‍यातही नव्हत्या. संस्कृति चा पाहिला उदगार निघाला मग धर्माचा. हळूहळू काही प्रमाणात युरोपात " वसुधैव " चा प्रयोग होउ लागला आहे.वैज्ञानिक शोधाच्या उपयोगीतेचे वाटप व्हायला फार पूर्वीच सुरूवात झाली होती. ते काय राष्ट्र वा धर्म यानी घडवून आणलेले नाही. मानवी समाजाचेही एक मन असते.ते उत्क्रांत होत आहे. वेळ लागेल. काही शतकेही जातील पण जगाच्या इतिहासात धर्म व राष्ट्र या कल्पना उन्मळून पडतील. पण...... पण त्यापूर्वीच या दोन घातक कल्पनांनी मानवी जगाचा बळी घेतला तर ,,,?

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 23:11
धर्म अन राष्ट्र या संकल्पनांना लिटरली पाहू नका. पोलिटिकल संघटनेचा एक आविष्कार म्हणून राष्ट्राकडे पहा. ते नसतं तर समाज कुठे गेला असता? असो, परत कधीतरी बोलूच विस्ताराने या विषयावर.

In reply to by बॅटमॅन

आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.
>>> आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 05:46
या सुभाषितातला धर्म आणि हिंदू-मुसलमानादि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. बाकी चालू द्या.

सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते.
हे तर एकदम लोल आहे =)))) एकदा जरा न्याय-अन्याय, कर्म-अकर्म-विकर्म-कुकर्म, सत्य-असत्य , व्याख्या तपासुन घेतल्यात तर भगवद्गीता समजुन घेताना असले गैरसमज होणार नाहीत ! वाढीव अभ्यासासाठी शुभेच्छा !!

In reply to by मूकवाचक

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2014 - 10:48
वर खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे विचारवंती वसुधावाद (राष्ट्रवादाच्या विरुद्ध टोक) ही ४ वेळा सुखाने जेऊन दिल्यावर द्यायची ढेकर आहे.

पैसा Wed, 05/07/2014 - 19:54
हे लिहिलेलं वाचताना छान वाटतंय. पण यावर विश्वास ठेवून उद्या जर का आपल्याला सैन्य नको असं कोणी म्हणाला तर हेच तत्त्वज्ञान पाकिस्तान्यांना कळणार का हा मोठ्ठा प्रश्न आहे. बाकी या लेखावरही हिब्रू आणि तमिळ भाषेतले बरेच संवाद वाचायला मिळतील याची खात्री आहे! *mail1*

In reply to by पैसा

विकास Wed, 05/07/2014 - 21:07
להס ஒப்புக்கொள்கிறேன் त्या कम्युनिस्टांनी देखील "जगातल्या कामगारांनो एक व्हा" म्हणून पाहीले. पण नाही जम्या! बाकी माझे म्हणणे तर अजून पुढचे आहे, सैन्य तर नकोच, पण कड्या-कुलपे देखील नकोत. विशेष करून बँकांना. किंवा पैसा (आयडी नाही) हा प्रकारच नको! कारण धर्मा इतकेच पैशामुळे वर्गीकरण होते. मिसळपाव मालकांना एक विनंती: या आदर्श (का अ‍ॅनार्कीस्ट?) जगण्याची सुरवात करण्यासाठी म्हणून मिसळपाव वरील आयडी ही संकल्पनाच रद्द करा. सगळे एकच. लेखक-प्रतिसादक-संपादक-सल्लागार आणि हो मालक देखील. *biggrin* *pleasantry*

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 19:01
इथे तर आधीच अनाहिताची वेगळी चूल आहे
ह्यावरुन एक कविता सुचत आहे >>> चाल : मी कात टाकली मी चुल मांडली ...मी चुल मांडली , मी वेगळ्या अनाहिताची बै चुल मांडली =)))) (अपुर्ण)

In reply to by पैसा

होकाका Fri, 05/09/2014 - 14:01
अरे काय चालू आहे हे? वास्तवाची दखल न घेता ढगात हरवून जाऊन लोकांना शहाणपणा शिकवणं हेच विचारवंतांचं खरं लक्षण असतं हे माहीत नाही का आपल्याला?

यसवायजी Wed, 05/07/2014 - 21:19
Imagine no possessions I wonder if you can No need for greed or hunger A brotherhood of man याला औषध नाही. अन्ड सो डू राष्ट्रवादाला. आणी मग दुसरा पर्याय काय?

असाच पंचशीलचाही उदोउदो करत सैन्य मोडीत काढावे असा विचार चालला होता काही वर्षांपूर्वी आणि काय इतिहास घडला त्याची आठवण आली. सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करून असा एकांगी विचार सुचणे हे एखाद्या संरक्षित राष्ट्रात चार वेळ भरपेट खावून ढेकर देत देतच शक्य असते. शिवाय अश्या राष्ट्रात असे विचार करण्याचे स्वातंत्र्यही असतेच म्हणा ! तेव्हा चालू द्या !! (मला का उगाचच संशय येत आहे की हा लेख उपहासपूर्ण आहे?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास Wed, 05/07/2014 - 22:57
चिनी हल्ल्या आधीची गोष्ट आहे. तत्कालीन गांधीवादी आणि काँग्रेसनेते शंकरराव देव (ते देखील पंचा नेसायचे), हे देखील नेहरूंच्या मागे लागले होते की गांधीजींच्या भारताला सैन्याची गरज नाही. त्याचा परमार्ष घेताना अत्रे म्हणाले, की "सैन्य नको म्हणणे हे त्या महात्म्याला शोभले असेल, पण उद्या चीन्यांनी हल्ला केला तर त्यांचे सैन्य काय शंकररावांच्या पंच्यात गुंडाळायचे का? "*fool*

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 22:52
राष्ट्रवाद जर Xenophobia चं उत्क्रांत रूप असेल तर तो मानवनिर्मीत असुन देखील अटळ म्हणावा लागेल. इन फॅक्ट मानव 'निर्मीत' न म्हणता 'घटीत' म्हणावा लागेल. इथुन तिथुन प्रश्न एकच उरतो कि माणुस आपली बुद्धी विनाशकारी कृत्ये करण्यात का घालवतो. हि विध्वंसक वृत्ती बाजुला काढली तर राष्ट्रवाद देखील बहुविधतेचा अविष्कार  म्हणुन गोंजारल्या जाईल.

नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 05:50
राष्ट्रवाद हा मोठ्याप्रमाणावरचा टोळीवाद आहे आणि टोळ्या करून राहणे हा माणसाचा सहजधर्म आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचे प्रमाण उपलब्ध ऊर्जा संसाधनांना झेपणार नाही तेव्हा आपोआप संपेल आणि विघटन होत होत पुन्हा छोट्या-छोट्या टोळ्या होतील. आपली सहजप्रवृत्ती सोडून माणूस आधीच राष्ट्रवाद सोडेल इतकी माणसाची माणूस म्हणून प्रगती झालेली नाही आणि होणारही नाही. पण लेख आवडला. पुलेशु.

फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 10:05
पाश्चात्य देशांतील विचारवंतांच्या दृष्टिकोनातून हे मांडलेले दिसते. हिटरलच्या काळात जर्मनीचे व सध्याच्या काळात पुतिन च्या रशियाचे उदाहरण बघता काही विचारवंतांना त्यात का धोका दिसतो हे ही समजण्यासारखे आहे. पण भारताचे याच्या विरूद्ध जाणारे ढळढळीत उदाहरण याबाबतीत का घेतले जात नाही? स्वातंत्र्यानंतर सुमारे ६५ वर्षांच्या इतिहासात भारताने राष्ट्रवाद प्रबळ असूनही इतर कोणत्याही देशावर हल्ला वगैरे केलेला नाही. किंबहुना पहिली १५ वर्षे हीच तत्त्वे अनुसरण्याचा प्रयत्न केलेला असताना चीनकडून झालेल्या विश्वासघातामुळे शस्त्रसज्ज होण्याशिवाय पर्याय राहिला नाही, नाहीतर आस्तित्वाचाच प्रश्न होता. पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत. तेव्हा निव्वळ राष्ट्रवाद धोकादायक नाही. मात्र एखादा देश स्वतःला सुपरपॉवर समजू लागतो तेव्हा मात्र जगातील परिस्थिती आपल्या इंटरेस्ट मधे असली पाहिजे या हट्टातून इतर ठिकाणी काड्या करणे चालू होते.

In reply to by फारएन्ड

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:09
पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत.
हेच तर चुकलय ना.. बसा आता त्यां चिमुरड्यांना चिनला आसरा देताना बघत. धाक म्हणून नाही कुणाचा कशावर :(

बाळ सप्रे गुरुवार, 05/08/2014 - 10:24
राष्ट्र, राज्य, प्रांत, जिल्हा, तालुका... अशी रचना प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा राष्ट्रवाद, प्रांतवाद हा असणारच. फक्त त्याचा अतिरेक नको. राज्य राष्ट्र विस्ताराची/ विघटनाची तीव्र लालसा ही अशाप्रकारच्या अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालते.. त्यातही धर्माधारीत राष्ट्ररचना असल्यास द्वेष आणखी वाढतो व सामंजस्याने तोडगा काढण्याची शक्यता फार कमी होते.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:31
प्रांतवाद भाषावाद म्हणुन एक प्रश्न आहे... एका मराठी व्यक्तीला दुसरी मराठी व्यक्ती कधीच कुल/ओसम का वाटत नाही ? (पण इतर भाषक मात्र तसे वाटु शकतात ?)

आतिवास गुरुवार, 05/08/2014 - 10:34
माणसांचा उन्माद कमी व्हायला हवा ही गोष्ट मान्य. राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंसा होते हेही मान्य. पण समाजातील विविध घटकांचा आपापसातील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रवादाचं नाणं राजकीय नेते वापरतात हे वारंवार दिसून येतं. आपण आपला समाज एकसंध कसा राखणार हा खरा प्रश्न आहे. आणि तो एकसंध राखताना एक गट वर्चस्ववादी बनून अन्य गटांचे शोषण करणार नाही याची खात्री कशी देणार हा प्रश्न आहे. समाजातल्या विविध घटकांचे हित एका वेळी साधता येते की ते एकमेकांच्या विरोधी असते हा खरा प्रश्न आहे .... असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्याची युक्ती आपल्याला कळली तर कदाचित उन्मादी राष्ट्रवादाची गरज आपल्याला राहणार नाही!

क्लिंटन गुरुवार, 05/08/2014 - 13:54
लेख आणि मते भयंकर गंडलेली आहेत. हे असले तत्वज्ञान इथे येऊन लिहू नका.इथल्या कोणालाही भारत देशावर प्रेम म्हणजे इतरांचा द्वेष असा सिनॉनिमस अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही (आणि तसा असेल तर ते चुकीचे आहे).ही असली मते भारतातच कशी फोफावतात कोणाला माहिती. सगळे जग एकत्र यावे, देशांमधील सीमा हा प्रकार इतिहासजमा व्हावा इत्यादी सगळ्या गोष्टी झाल्या तर ते मलाही नक्कीच आवडेल पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? फार दूर नको जायला.अगदी आपल्या दिवट्या शेजार्‍याशी संबंध सुधारावे म्हणून आपण काय कमी प्रयत्न केले काय?तरीही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच.आपले पंतप्रधान बस घेऊन लाहोरला गेले तर तीच बस त्यांनी कारगीलला नेली.आग्रा शिखर परिषद झाल्यावर सहा महिन्यांच्या आत आपल्या संसदेवरच हल्ला झाला (आणि त्यातल्या मुख्य सुत्रधाराला फाशी दिल्यानंतर बिनडोक मानवाधिकारवाल्यांनी केलेले आकांडतांडव इतर कोणी विसरले असेल तरी मला तरी ते विसरणे अशक्य आहे).मागे ओर्कूटवर भारत-पाक फ्रेंडशीप क्लब म्हणून एक प्रकार होता. हल्ली ओर्कूट मागे पडल्यामुळे तो क्लब अजूनही अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही पण २००७ मध्ये मी जेव्हा ते वेबपेज बघितले होते त्यावेळी त्यातले ९०% पेक्षा जास्त सदस्य भारतीयच होते.तुम्ही स्वतःला लाख मानवतेचे पुजारी म्हणवत असाल पण जोपर्यंत आपल्या दिवट्या शेजारी देशात भारत देश हा 'काफिरांचा' म्हणून आपले अस्तित्वच खुपणारे लोक आहेत तोपर्यंत ते तुम्हाला भारतीय आणि काफिर म्हणूनच ओळखणार एवढी साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही हेच समजत नाही. तेव्हा हे असले दिवास्वप्नी तत्वज्ञान इथे पाजळू नका.आम्हाला कोणावरही विनाकारण हल्ला करायचा नाही.मैत्रीचे भरते पहिल्यांदा त्यांच्याकडून येऊ दे मग सुरवातीला भारत आणि पाकिस्तानमधली सीमा पुसू आणि तीच प्रक्रीया सगळ्या जगभर पुढे नेऊ.
राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात.
हे अगाध तत्वज्ञान नक्की कुठून शिकलात हो? तुमच्या भाषेत माणसं मारणारे सैनिक तिथे सीमेवर नसते तर तुम्ही घरी बसून आरामात असले लिहू शकलात का?
सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.
धन्य.
राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे.
आणि राष्ट्रवाद नाकारणार्‍या डाव्या विचारसरणीने त्याहूनही अधिक माणसांचा बळी घेतला आहे. असो. याविषयी अधिक चर्चा रंगल्यास निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच भाग घेईन. अगदीच राहवले नाही म्हणून आताच एवढे लिहिले.

In reply to by क्लिंटन

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 15:44
महात्मा गांधी अंहिसेचेच समर्थक होते पण सोबत राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यांचे उत्तर साधे सोपे होते. इतरांशी संवादाकरता माझ्या घराला खिडक्या दरवाजे असतील पण माझ्या घराला भिंतींची गरज आहे. आमच घर इतरांनी येऊन चालवण्या पेक्षा आम्ही आमच घर चालवतो. स्वतःच घर स्वतः चालवण यात दुसर्‍यांच्या द्वेषाचा संबंध नाही. बाकी सवडी नुसार लिहू (सध्या आमची जांभई आणि चुटकी).

In reply to by क्लिंटन

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:15
बर्ट्रांड रसेल ची लिंक वाचण्याची तसदी घेतली असती तरी मला वाटत माझा पॉइंट ऑफ़ व्ह्यु लक्षात यायला हरकत नव्हती. असो आता उदाहरणार्थ जॉर्ज ऑरवेल ला घेउया ( हा रसेल शी अनेक ठीकाणी डायगोनली अपोझीट आहे खास करुन कम्युनिझम संदर्भात ) तर दुरगामी खोलवर विचार करणारया विचारवंतांच्या विचारांची एक खासियत असते ती अशी की अनेक वर्षांनंतर ही त्यांचे विचार समकालीन स्थितीचा व मानसिकतेचा अचुक वेध घेतात. उदा. जॉर्ज ऑरवेल यांनी अनेक वर्षापुर्वी कीती विलक्षण अचुकतेने राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याचे नेमके वर्णन केलेले आहे. हा परीच्छेद राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते या संदर्भात क्लिंटन यांच्या प्रतिसादा च्या संदर्भात बघावा. क्लिंटन यांच्यावीषयी नितांत आदराची भावना माझ्या मनात आहे. त्यांच्या मानसिकतेचा उल्लेख अत्यंत नम्रपणे केवळ चिकीत्से साठी व ऑरवेल च्या राष्ट्रवादी व्यक्तीच्या मानसिकते संदर्भात च कृपया बघावा ही कळकळीची विनंती ! तर खालील परीच्छेद मुळ ऑरवेल चा व जेथे जेथे क्लिंटन यांचा निर्देश मराठी त केलेला आहे तो माझा. As nearly as possible, no nationalist (क्लिंटन) ever thinks, talks, or writes about anything except the superiority of his(क्लिंटनच्या) own power unit. It is difficult if not impossible for any nationalist (क्लिंटन) to conceal his (क्लिंटनच्या) allegiance. The smallest slur upon his (क्लिंटनच्या ) own unit, or any implied praise of a rival organization, fills him with uneasiness which he (क्लिंटन) can relieve only by making some sharp retort. If the chosen unit is an actual country, such as Ireland or India, he(क्लिंटन) will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. He(क्लिंटन) will show great sensitiveness about such things as the correct display of flags, relative size of headlines and the order in which different countries are named. All nationalists (क्लिंटन) consider it a duty to spread their own language to the detriment of rival languages, जॉर्ज ऑरवेल क्लिंटन यांचा प्रतिसाद अतिशय बोलका आणि उत्स्फ़ुर्त आहे. हा प्रतिसाद एका राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याची चिकीत्सा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. विशेषत: ऑरवेल जे म्हणतो स्मॉलेस्ट स्लर कींवा अगदी विरोधकाची इम्प्लाइड प्रेज जरी असली तरी राष्ट्रवादी व्यक्तीला ही स्तुती १- fills him with uneasiness ( क्लिंटन यांच्या प्रतिसादातील अस्वस्थता बघावी) २- can relieve only by making some sharp retort (क्लिंटन यांचा तीव्र रीटॉर्ट बघावा) वरील दोन अवलोकनार्थ होते इतर मुद्दे उदा. ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. इतर राष्ट्रवादी प्रतिसांदा मध्ये ही आढळुन येतात उदा. श्री. फ़ारएन्ड यांचा प्रतिसाद अभ्यासावा. तर जॉर्ज ऑरवेल यांनी अचुकतेने मांडलेली राष्ट्रवादी मानसिकता आपण आज इथे या प्रतिसांदा मध्ये ही अभ्यासु शकता. कृपया व्यक्तीगत घेउ नये माझ्या प्रतिसादाचा हेतु अभ्यासात्मक आहे व्यक्तीगत नाही.

In reply to by मारवा

फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 21:45
माझ्या ज्या प्रतिसादाचा उल्लेख केलाय त्यात वरची #३ ची लक्षणे कोठे आहेत? ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. >>> माझा प्रतिसाद व हा मुद्दा याची कशी सांगड घातलीत ते विचारतो आहे. माझा मुद्दा तुम्हाला मान्य आहे की नाही तेही कळाले नाही.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:51
सर मोड़ ऑन खेळा पासून संभोगा पर्यंत सर्व मानवी जीवन उन्मादानेच व्यापीयले असा. पण मुळात उन्माद ही एक प्रक्रिया आहे, वस्थिस्थिति न्हवे याचे आकलन एकदा तुमच्या मनाला झाले की हां लेख टाकायचे प्रयोजन उरत नाही. सर मोड़ ऑफ

In reply to by आत्मशून्य

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 15:00
म्हणजे काय? आणि याचा उच्चार कसा करायचा? (राँर्बट याचा उच्चार आता मला करता येतो). *ROFL*

कवितानागेश गुरुवार, 05/08/2014 - 16:04
माझा जरा गोंधळ होतोय... 'राष्ट्र संकल्पना' वेगळे न मानणारे, एकाच देवाला मानणारे लोक्स, आणि त्याच 'तत्त्वज्ञाना'चा हिंसेच्या सहाय्यानी जगभर प्रचार करणारे, जगात फक्त आपण सर्व समान देवानी पाळलेले 'ठराविक प्रकारचे पाळीव पशू' किंवा देवाचे गुलाम वगरै समजणारे लोक्स जास्त उन्मादात असतात असं माझे आजपर्यंतचे निरिक्षण आहे.

In reply to by कवितानागेश

राघव Sat, 05/10/2014 - 23:56
अगो माय, साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद यामधे सगळा घोळ झालाय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. वर चौरा म्हणतात त्याप्रमाणे जंगलातून माणूस आला. त्यात उत्क्रांतीच्या अनेक पायर्‍या पार केल्यानंतर आत्ताची वेळ दिसते आहे. आता ही राष्ट्र संकल्पना काय लोकांनी गांजा पिऊन मांडली काय? दोन राष्ट्रांत युद्ध नको म्हणून राष्ट्र संकल्पनाच रद्द करून टाकली तर कित्ती छान? माझे घर अन् दुसर्‍याचे घर यामुळे सगळे वाद होतात.. घरेच पाडून टाकू.. वाद मिटला.. हाय काय अन् नाय काय?? अर्रे जरी वसुधैव कुटुंबकम् याचा अर्थ सगळे एक कुटुंब असा होतो.. तरी सध्या एकत्र कुटुंब हीच संकल्पना मोडीत निघते आहे त्याचे काय? बरं सोबत राहू म्हणजे एकाच घरात एकाच खोलीत सगळ्या कुटुंबानं राहायचं असं चालेल काय? सध्या जे असे राहतात त्यात तसे राहण्याची इच्छा असणारे किती अन् दुसरा पर्याय नसल्यानं तसे राहणारे किती?? आणि वसुधैव कुटुंबकम् याचा भावार्थ असा घेतला की सगळे एकमेकांचा आदर करत, एकमेकांना मदत करत आनंदानं राहू तर चुकलं कुठे? तो चाणक्य आज असता ना तर डोक्यात जाणारी नसती जळमटं काढून फेकल्याशिवाय शेंडीला गांठ मारणार नाही अशी काहीशी प्रतिज्ञा केली असती त्यानं !!

असंका गुरुवार, 05/08/2014 - 18:52
आपण एक विचार देत आहात की कसलातरी प्रचार करत आहात? कारण आपली भाषा नि:पक्षपाती वाटत नाही. विचार हा साकल्याने -साधक बाधक अशा दोन्ही अंगाने करायचा असतो. आणि हा विचार आपल्या वाचकाला केंद्रस्थानी ठेवून मांडला पाहिजे. आपण एकांगीपणे वरील विचार मांडला आहे, असे वाटते. एखादे मत आपण कसे तयार केले, हेही सांगणे योग्य आहे. उदा. कुठलाही संदर्भ न देता काही विशिष्ट विचारसरणीला आपण अनेकवेळा नकारात्मक वगैरे ठरवले आहे. ती नकारात्मक कशी, हे सांगणे भाग असूनही ते आपण सरळ गृहित धरले आहे, आणि वाचकानेही गृहित धरावे अशी अपेक्षा केली आहे. पराकोटीच्या अन्यायातून एखादा समाज उठू बघतो, अन्यायाला वाचा फोडतो, अगदी सशस्त्र प्रतिकार करतो, यात नकारात्मक काय आहे? आपला तर्क दिलात तर आपण माडलेल्या या विचारांवर विचार करण्यात अर्थ आहे.

In reply to by असंका

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:20
मारवांजींच्या आधीच्या समतोल लेखनाच्या भरवशावर हा धागा उघडला होता. मारवाजींच्या नेहमीच्या समतोल लेखनशैलीला हा धागा लेख जरासा अपवाद वाटतोय. या वेळी प्रचाराकी हेतु आला आहे का किंवा असे अचानक काय झाले हे मारवाजीच सांगू शकतील.

In reply to by माहितगार

असंका Fri, 05/09/2014 - 12:06
आम्हाला कधीतरी इतिहासाच्या तासाला "युरोपातील राष्ट्रवाद वाढीला लागला" (-कुठल्यातरी कालखंडात!) असे शिकवले गेले. राष्ट्रवाद या शब्दाशी तो माझा पहिला परीचय होता. राष्ट्रवाद म्हणजे काय हे तेव्हा कळले नाही. ते न कळण्याची कारणे काय ते जाऊ द्या. कदाचित मी पुरेसा अभ्यास केला नसेल, किंवा मला पुरेशी समज नसेल. पण ते मागे राहिलेले कधीतरी समजून घ्यायची इच्छा आहे. ते नीट सांगतील तर इथे ऐकायची तयारी आहे. विचार करायचीही तयारी आहे. माझं चुकतं कुठे हे कळलं तर चूक मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. पण ते ज्या पद्धतीने सांगत आहात ती पद्धत थोडी बदलली तर बरं होइल असं वाटतं. १. ते अनेक गोष्टी एकाच वेळी सांगत आहेत. क्रांतिकारी विचार थोडक्यात मांडायला हवा. नाहितर मग लक्ष कशावर केंद्रीत करायचं तेच लवकर कळत नाही. २. एका भाषेतून (मराठी) दुसर्‍या भाषेत(इंग्रजी) जात आहेत. खरे म्हणजे एकदाही असे केल्याने वाचण्यात अडथळा येतो. त्यांनी तर अनेक वेळा तसे केले आहे. ३. मध्येच कवितेच्या ओळी देत आहेत. हे काय भाषण आहे का? ४. मध्येच इतरांची मते देत आहेत. व इतरांनी तीही मुळापासून वाचावी अशी अपेक्षा ठेवत आहेत. विचार साहेब स्वतः मांडत आहेत. अभ्यास करून इथे ते थोडक्यात मांडणे त्यांचे काम आहे. इतरांनी का तसदी घ्यायची? वादात शेवटचा शब्दा माझा हवा इतकाच उद्देश असेल तर असे करणे ठिक आहे- तेव्हा या पद्धतीने वागता येते. कारण मग लोक वाद सोडून देतात - म्हणतात, कोण ती लिंक वाचत बसेल! त्यांची ही अपेक्षा असेल का?

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:22
INDIFFERENCE TO REALITY. All nationalists have the power of not seeing resemblances between similar sets of facts. A British Tory will defend self-determination in Europe and oppose it in India with no feeling of inconsistency. Actions are held to be good or bad, not on their own merits, but according to who does them, and there is almost no kind of outrage--torture, the use of hostages, forced labour, mass deportations, imprisonment without trial, forgery, assassination, the bombing of civilians--which does not change its moral colour when it is committed by 'our' side. The Liberal NEWS CHRONICLE published, as an example of shocking barbarity, photographs of Russians hanged by the Germans, and then a year or two later published with warm approval almost exactly similar photographs of Germans hanged by the Russians. It is the same with historical events. History is thought of largely in nationalist terms, and such things as the Inquisition, the tortures of the Star Chamber, the exploits of the English buccaneers (Sir Francis Drake, for instance, who was given to sinking Spanish prisoners alive), the Reign of Terror, the heroes of the Mutiny blowing hundreds of Indians from the guns, or Cromwell's soldiers slashing Irishwomen's faces with razors, become morally neutral or even meritorious when it is felt that they were done in the 'right' cause. If one looks back over the past quarter of a century, one finds that there was hardly a single year when atrocity stories were not being reported from some part of the world; and yet in not one single case were these atrocities--in Spain, Russia, China, Hungary, Mexico, Amritsar, Smyrna--believed in and disapproved of by the English intelligentsia as a whole. Whether such deeds were reprehensible, or even whether they happened, was always decided according to political predilection.

In reply to by मारवा

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:34
(मारवाजी माझ्याकरता जॉर्ज ऑर्वेल आणि हा विषय दोन्ही अंगांनी बर्‍या पैकी (यापुर्वी इतरत्र) चघळून झालाय. या विशीष्ट उन्हाळ्याच्यावेळी हा धागा विषय म्हणजे गार ताकही पाहीजे पिले तर खोकला होईल नाही पिलेतर गरमी , ताकाला(धाग्याला) जायचे पण बिचकत बिचकत भांडे लपवणे असा नाहीएना असला तर असू द्यात बापडे मी कोण सांगणारा. :) बाकी भारतीय लोकशाही चांगली प्रबळ आहे आपोआप समतोल साधते. खूप काळजीही करू नका जस्ट रिलॅक्स एवढेच म्हणू शकेन.)

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:33
मी कोणाचा प्रचार करत आहे असे वाटत असल्यास मी इतकेच म्हणेन की मी तरी कुणाचा प्रचार करीत नाहीये हे मी माझ्या बाजुने स्पष्ट करतो. (आणि आश्चर्य म्हणजे माझे मत इतक्या स्पष्टपणे व विरोध कशाला आहे ते इतके उघड असुनही तो कशाचा प्रचार आहे असे कुणाला वाटते याचच मला आश्चर्य वाटत आहे व विशेष बाब म्हणजे मी नेमका कशाचा प्रचार करत आहे याचा उल्लेख कोणीही केलेला नाहीये ) मी कशाचा प्रचार करत आहे असे आपल्याला म्हणायचे आहे कृपया स्पष्ट करा माझ्या माहीतीप्रमाणे मी केवळ राष्ट्रवाद या उन्मादाला विरोध करीत आहे. असो.

In reply to by मारवा

असंका Fri, 05/09/2014 - 11:20
प्रचार शब्द वरती मी वापरला होता. मला असं म्हणायचं होतं की, आपण जे लिहिलं आहे, त्याच्या मागचा तर्क पुरेसा विकसित न करता, इथे तो तर्कसंगत विचार न मांडता आपण थेट आपला विचार सर्वोत्तम असल्याचा प्रचार चालू केला आहे. आपण आपला विचार पहिले स्पष्ट करा. तो विचार सर्वोत्तम कसा, त्याच्या आड कुठल्या गोष्टी (आक्षेप) येत होत्या, त्याला समर्पक उत्तरे कुठली (आक्षेपांचे निराकरण) हे सांगा. नुसते संघर्षाला नकारात्मक ठरवून कसे चालेल? आपण अनेक वेळा असे थेट निष्कर्षाला पोचले आहात वरच्या लेखात. आणखी सांगायचे तर अर्जुनाला युद्धावेळी जे विचार मनात आले त्याला आपण विवेक म्हणून मोकळे झालात. आजवर त्याला आम्ही संभ्रम मानत आलो. जर आपण त्या विचारांना विवेक म्हणू इच्छिता, तर ते कसे हे सांगणे भाग आहे. ते न सांगता आपण निष्कर्ष काढला आहे की अर्जुनाला विवेक सुचला आणि कृष्णाने जे केले ते म्हणजे ब्रेनवॉशिंग. असे कसे गृहित धरायचे हो साहेब आम्ही?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Fri, 05/09/2014 - 12:10
माणसाला माणूस न कळण्याचे कारण माणसाला राष्ट्र व प्रशासन एक आहे असे वाटते. पण तेसे नाही. प्रशासनाशिवाय समूहाला पर्याय नाही व प्राणीमात्राला समूहाशिवाय पर्याय नाही. मिपा हे एक राष्ट्र नाही पण ते चालते.विनाशाविना चालते कारण त्यातील वादाची शत्रूत्वात रूपांतर व्हायची सोय नाही. मिपा हे राष्ट्र नाही तरीही इथे प्रशासन आहे. यंत्रणा आहे. मिपाचे व मायबोलीचे व ऐसी अक्षरेचे वैर नाही कारण त्यांचे प्रमुख राष्ट्र प्रमुखाप्रमाणे प्रजांमधे आपल्या स्वर्थासाठी वैर निर्माण करीत नाहीत. दोन प्रजांमधे राजेच वैर निर्माण करतात कोतवाल वा सेनानी नाही. व्यापारी वा नाभिक तर नाहीच नाही.

अन्या दातार गुरुवार, 05/08/2014 - 22:55
घर म्हणलं की १-२ खोल्या भिंतींनी/पार्टिशनने वेगळ्या होतातच. नुसत्याच ४ भिंती बांधल्या तर धर्मशाळा होते! अख्ख्या जगाला सीमामुक्त कसे करावयाचे??

आयुर्हित Fri, 05/09/2014 - 02:23
वरील लेख हा खोटा/नकली(pseudo)राष्ट्रवादावरचा आहे. वरील लेख हा अमेरिकेत, पाकिस्तानात किंवा बांग्लादेशात जावून तेथल्या लोकांना वाचून/समजवून सांगावा अशाच अर्थाचा आहे, कारण वरील लेखात सांगितलेला राष्ट्रवाद(?) पाळणारे हे तिन्ही घाणेरडे देश आहेत. तथाकथित विचारवंतांचे(की विचारजंताचे?) विचार वाचून "राष्ट्रवाद" या शब्दाचीच ठासली आहे असे दिसते. राष्ट्रवाद म्हणजे इतर देशांवर(राष्ट्रांवर किंवा राष्ट्रहितांवर)हल्ला असा त्याचा कधीही अर्थ होत नाही. राष्ट्रवाद एक विश्वास, पन्थ या राजनीतिक विचारधारा है जिसके द्वारा व्यक्ति अपने गृह राष्ट्र के साथ अपनी पहचान बनाता या लगाव व्यक्त करता है। यह एक ऐसी अवधारणा है जिसमें राष्ट्र को सबसे अधिक प्राथमिकता दी जाती है। लहानपणी वाचलेली एक सत्यघटना आठवते. दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी(उच्च अधिकारी)व्यक्ती भारतात येते, तीला भारतीय(राष्ट्रपती वा उच्च अधिकारी)व्यक्ती आंबा खायला देते. तेव्हा ती व्यक्ती ते नाकारते व म्हणते मी आंबा खाणार नाही कारण जपानमध्ये आंबे पिकवले जात नाही. जर मी आंबा खाल्ला आणि तो मला आवडला तर मला तो नेहमी खावासा वाटेन. व नंतर मी आंब्यासाठी माझे येन(जपानी चलन/Japanese Yen)त्यासाठी खर्च करेन. आणि हे माझ्या गरीब देशाला मुळीच परवडणार नाही. त्यावेळी अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर अणुस्फोट करून जपान बेचिराख करण्यात आला होता! याचा अर्थ अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही राष्ट्राचे हित जपणे याला म्हणतात राष्ट्रवाद! लेखकाला नम्र विनंती की असे काही उच्च दर्जाचे लेख चुकीच्या पद्धतीने लिहायचे असेल तर अमेरिकेत किवा पाकिस्तानात जावून राहावे. लेखकाचे विचार आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे नाहीत. भारतात अशी चूक खपवून घेतली जाणार नाही!

In reply to by आयुर्हित

मारवा Fri, 05/09/2014 - 07:45
आपण च वर दिलेल्या राष्ट्रवाद या दुव्यातुन एक महाख्यान के तौर पर राष्ट्रवाद छोटी पहचानों को दबा कर पृष्ठभूमि में धकेल देता है। अंग्रेज़ों के ख़िलाफ़ चले राष्ट्रवादी आंदोलन के दौरान रवींद्रनाथ ठाकुर जैसी हस्तियाँ इस विचार को संदेह की निगाह से देखती थीं। आपण च वर दिलेल्या प्रतिसादातुन १-कारण वरील लेखात सांगितलेला राष्ट्रवाद(?) पाळणारे हे तिन्ही घाणेरडे देश आहेत. २-तथाकथित विचारवंतांचे(की विचारजंताचे?) विचार वाचून ३-भारतात अशी चूक खपवून घेतली जाणार नाही! आपल्याच स्वाक्षरीतुन कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ रवींद्रनाथ ठाकुर यांचे विचार त्यांना व्यक्त करु देण्यासाठी व त्यांना भारतातच राहु देण्यासाठी आपले अनेक आभार !

मारवा Fri, 05/09/2014 - 07:56
I am not against one nation in particular, but against the general idea of all nations. What is the Nation? It is the aspect of a whole people as an organized power. This organization incessantly keeps up the insistence of the population on becoming strong and efficient. But this strenuous effort after strength and efficiency drains man's energy from his higher nature where he is self-sacrificing and creative. For thereby man's power of sacrifice is diverted from his ultimate object, which is moral, to the maintenance of this organization, which is mechanical. Yet in this he feels all the satisfaction of moral exaltation and therefore becomes supremely dangerous to humanity. He feels relieved of the urging of his conscience when he can transfer his responsibility to this machine which is the creation of his intellect and not of his complete moral personality. By this device the people which loves freedom perpetuates slavery in a large portion of the world with the comfortable feeling of pride of having done its duty; men who are naturally just can be cruelly unjust both in their act and their thought, accompanied by a feeling that they are helping the world in receiving its deserts; men who are honest can blindly go on robbing others of their human rights for self-aggrandizement, all the while abusing the deprived for not deserving better treatment. We have seen in our everyday life even small organizations of business and profession produce callousness of feeling in men who are not naturally bad, and we can well imagine what a moral havoc it is causing in a world where whole peoples are furiously organizing themselves for gaining wealth and power. Nationalism is a great menace. It is the particular thing which for years has been at the bottom of India's troubles. And inasmuch as we have been ruled and dominated by a nation that is strictly political in its attitude, we have tried to develop within ourselves, despite our inheritance from the past, a belief in our eventual political destiny.

In reply to by मारवा

मारवा Fri, 05/09/2014 - 08:26
वरील विचार ज्या मुळ निबंधातील आहेत तो रवींद्रनाथ ठाकुर यांचा मुळ निबंध वाचण्यासाठी व रवींद्रनाथ ठाकुर यांच्या इतरही अनेक विषयांवरील सुंदर लेखासाठी ही वेबसाइट अतिशय सुंदर आहे. कविता गाणी तर फार च सुंदर आहेत बरेच मटेरीयल बंगालीत असले तरी इंग्रजी त ही आहे. एकवेळ अवश्य भेट द्या. http://tagoreweb.in/Render/ShowContent.aspx?ct=Essays&bi=72EE92F5-BE50-40D7-8E6E-0F7410664DA3&ti=72EE92F5-BE50-4A47-2E6E-0F7410664DA3&ch=1

दिपोटी Fri, 05/09/2014 - 09:31
उत्तम विचार मांडणारा एक उत्तम लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! मारवा यांचे विचार आजच्या घडीला अंमलात आणताना येणार्‍या अनेक अडचणी वर अनेकांनी आपापल्या प्रतिसादात मांडल्या आहेत. त्यांच्याशी पण निश्चित सहमत आहे, पण मात्र यामुळे मारवा यांच्या विचारांना सरळ हिणवणे वा केराची टोपली दाखवणे उचित होणार नाही. काहीजणांनी वर 'विचार चांगला वा आदर्श आहे पण आजच्या काळात अंमलात आणता येणार नाही' असा काहीसा निराशावादी सूर लावला आहे. माझ्या मते या विचाराकडे एक आदर्श असे अंतिम साध्य (ideal target/goal) म्हणून बघावे. याचा अर्थ आज लगेच ही विचारप्रणाली पूर्णपणे अंमलात आणावी असे नाही, पण भविष्यात ही आदर्श विचारसरणी - हळूहळू का होईना - अनुसरण्यासाठी जागतिक पातळीवर जी विचारांची परिपक्वता लागेल, ती आपापल्या मनात बिंबवण्याची सुरुवात - या परिवर्तनाची फक्त एक सुरुवात (start of the transition process) - आज करणे तर नक्कीच शक्य आहे. 'आदर्श' शब्द वापरल्यावर लगेच 'not practical' असा सूर येऊ शकतो ... पण आपले साध्य हे नेहमीच आदर्श असायला हवे, मग त्या साध्यापर्यंत आपण १००% न पोहोचता जरी ८०-९०% पोहोचले तरी एकंदर परिस्थितीमध्ये ती सुधारणाच असेल. We do not ditch a solution to a problem just and only because we see obstacles in implementing the solution. Obstacles are meant to be overcome. 'येणार्‍या संभाव्य अडचणींमुळे मूळ चांगला विचारच सोडून देणे' आणि 'येणार्‍या संभाव्य अडचणींचा काहीही विचार न करता एखाद्या चांगल्या विचाराची सरधोपट अंमलबजावणी करणे' दोन्ही पर्याय घातकच ठरतील. याउलट संभाव्य अडचणींवर मात करुन व त्यातून मार्ग काढून सर्वांच्या हिताच्या अशा एका आदर्श व अंतिम साध्याच्या दिशेने वाटचाल करणे ही आपली प्रगती-उत्क्रांती होईल. राष्ट्रवाद मोडून काढण्याने होणारे फायदे (प्रचंड मनुष्यसंहार, विस्थापित कुटुंबे, संरक्षणावर होणारा अमाप खर्च व त्यामुळे इतर विधायक व मूलभूत गरजेच्या प्रकल्पांना न मिळणारा निधी, द्वेष-तिरस्कार या सर्व नकारात्मक गोष्टींना मिळणारा चाप) पहाता 'राष्ट्रवाद मोडून काढण्यात येंणार्‍या संभाव्य अडचणींवर मात करणे' हा पर्याय 'राष्ट्रवाद पोसत बसणे' या पर्यायापेक्षा मानवजातीसाठी जास्त हिताचा ठरतो. 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेला विचारजंती वा चार वेळा जेवून ढेकर देताना मांडलेला विचार असे म्हणुन उडवून लावणे अगदी सोपे आहे, पण अंतिमतः आपापले वैविध्य-वैशिष्ट्य जोपासून एकत्र रहाणे (to co-exist within a culturally diverse environment) ही विचारसरणीच आपल्याला पुढे नेईल ही वस्तुस्थिती मागे उरते. - दिपोटी

In reply to by दिपोटी

चौकटराजा Fri, 05/09/2014 - 13:33
राष्ट्र वा धर्म यानी मानव समाज एक आणला की त्यानी त्याची छकले केली ते सगळ्यानाच ठाउक आहे. अनेकाना असे वाटते की या कल्पना नाश पावणे शक्य नाही. पण मला ते शक्य वाटते. जाती निर्मूलन जनांच्या मनात वसत असताना त्यांची पुनः पुन्हा स्थापना आजकालचे " राजे रजवाडे' करीत आहेत. या राजांनीच विटनाम चे युद्ध विनाकारण खेळले.शीतयुद्धाची मजा चाखली. तिथे एक राजा उदयाला आला म्हणाला " अरे आपल्या पासून आठ हजार मैलापलिकडील राजाशी आपल्याला शत्रूत्व हवे आहे की टूथपेस्ट ?

पोटे Fri, 05/09/2014 - 12:34
राष्ट्र, धर्म आणि प्रांत या विषयावर भोळ्या माणसांना लढवून लबाड माणसे मजा मारतात.

गुलाम Fri, 05/09/2014 - 13:57
सर्वप्रथम तुमचं अभिनंदन एवढा वेगळा विचार इथे मांडण्याचं धाडस दाखवल्याबद्दल!! पण आपला (म्हणजे फक्त भारताचा नव्हे) समाज अजुन हा विचार समजण्याएवढा नक्कीच प्रगल्भ नाहिये. मिपासारख्या तुलनेने प्रगल्भ संस्थळावरच्या या तिखट प्रतिक्रीया पाहून तर याची खात्री पटते. पण हा विचार मांडायला सुरुवात तर केलीच पाहिजे तेही विरोध होणार हे गृहीत धरुन. आपल्याकडे देशप्रेम नेहमीच पवित्र गाय (होली काऊ) मानल्यामुळे त्याच्याविरोधात काहिही ऐकुन घेणं अवघड जातं. शिवाय आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर आंतरदेशीय संबंधात भारत नेहमीच रिसिव्हींग एण्डवर राहिला असल्यामुळे राष्ट्रवादात काही चुकीचं आहे असं आपल्याला वाटतच नाही किंबहुना होस्टाईल शेजारी देशांमुळे तो आवश्यक बनतो. पण याच राष्ट्रवादामुळे जर्मनीने जगावर महासंहारक दुसरं महायुध्द लादलं किंवा अलिकडे अमेरिकेने व्हिएतनाम, ईराक वगैरेवर हल्ला चढवला हे आपल्या लक्षात येत नाही आणि आलंच तरी त्याबद्दल कौतुकच वाटतं. याच राष्ट्रवादाच्या पायात अगणित माणसे आणि उर्जा आत्तापर्यंत खर्च झालीय आणि अजूनपण होत राहील. ती उर्जा मानवतेच्या कल्याणासाठी वापरली गेली असती तर जगात कधीच कुणाला उपाशी झोपावं लागलं नसतं. मला मान्य आहे की हा विचार अत्यंत आदर्शवादी आहे आणि जमिनीवरची वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे. पण हा विचार भरल्यापोटी करायचा विचार आहे हे मात्र मला अजिबात मान्य नाही. कारण कुठल्याही युध्दात पहिला (डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट) बळी जातो तो अर्धपोटी गरिबांचाच. उद्या जर भारताने पाकिस्तान विरुध्द युध्द पुकारले आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाट लागून महागाई वाढली तर त्याचा परिणाम मध्यमवर्गीय विचारवंतांवर जास्त होईल की हातावर पोट असलेल्या गरिब मजुरावर??

दिनेश सायगल Fri, 05/09/2014 - 14:14
राष्ट्रवादाने बळी घेतले, हे मान्य करतो. अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात बळी धर्मयुद्धातून, क्रुसेड्समधून घेतले गेले आहेत. धर्म सर्वात आधी, देश त्यानंतर अशी किंवा तत्सम शिकवण मानणार्‍या आणि त्याचे निमित्त करून संहार करणार्‍या धर्मांधांना तुम्ही हा विचार कसा पटवून देणार आहात? 'दार उल इस्लाम' आणि 'दार उल हरब' अशी जगाची विभागणी करणार्‍यांना तुम्ही कोणता संदेश देणार आहात?

मारवा Fri, 05/09/2014 - 15:39
कन्फ़्युज्ड अकाउंटंट मी माझी मते सुत्ररुपात मांडण्याचा एक प्रयत्न करतो. पण यात सर्व मते कव्हर झालेली नाहीत. कदाचित याने मला नेमक काय म्हणायचय ते स्पष्ट होण्यास मदत होइल. बघा ट्राय करुन ! १ राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे. त्यात नैसर्गिक वा दैवी असा कुठलाही भाग नाही. हीच्या मुळाशी माणसाच्या स्व=(वंश-वर्ण-जमात-धर्म-संस्कृती इ.) च श्रेष्ठ आहेत व त्यासाठी हा असलेल्या माणसांच्या समुहाचे (टोळीचेच) स्वतंत्र राष्ट्र असण्याचा आग्रह आहे. व त्याच बरोबर त्या वैशिष्ट्याच्या वर्चस्वासाठी चा ही आग्रह आहे. झेनोफ़ोबीया म्हणजे च जे वरील प्रमाणे स्व=(वंश-वर्ण इ.) नसलेले “इतर” आहेत त्यांच्याप्रति असलेली भीती व द्वेष ही अजुन एक नकारात्मक प्रेरणा या मागे आहेत. २ राष्ट्रवाद मुळात माणसांना माणसांपासुन तोडण्याचे काम करतो. स्व-वर्चस्व वा स्व-संरक्षण या दोन्ही प्रेरणांनी प्रत्येक राष्ट्र सैन्य निर्मीती व युद्ध सज्जतेवर अमुल्य प्रचंड अशी मानवी व इतर संसाधनांची गुंतवणुक करतात. जी बहुतांश शिक्षण/आरोग्य/विकास या अत्यंत निकडीच्या क्षेत्रांना डावलुन च होते. ३ व्यक्तीगत स्तरावर माणुस जो विवेक सर्वसाधारणपणे बाळगतो तो राष्ट्र या संकल्पने च्या नावाखाली पायदळी तुडवला जातो. माणुस माणसाला मारायला एका पायावर तयार होतो. मारण्या मरण्यासाठी एक आग्रही प्रोत्साहन व बधिरतेने आदेशाचे पालन करण्याचा आग्रह सैनिका ला केला जातो. राष्ट्रवाद एक असे लायसन्स टु कील सैनिकाला देते की जे पुर्णपणे अनैतिक असे असते. ४ राष्ट्रवादा ची चौकट एकदा मिळाली की वंश-वर्ण-धर्म-संस्कृती हा केवळ एक स्वाभाविक वेगळेपणा न राहता वा जीवनशैली न राहता ही एक इतरांवर वर्चस्व गाजविण्याची वा इतरांपासुन संरक्षण करण्याची बाब बनते. या साठी मग हिंसाचार हा नैतिक व कायदे संमत होतो. व “इतर” जे आहेत ते शत्रु बनतात. ५ राष्ट्रवाद हा मुळात मानवनिर्मीत व कृत्रीम असल्यानेच त्याला राष्ट्रीय( झेंडा-चलन-पशु-पक्षी-सील-भाषा) आदिंची निर्मीती/जोपासना व महत्वाचं म्हणजे प्रचार करणे ही एक अत्यंत गरजेची अशी बाब बनते. या सर्व प्रतिकांना पावित्र्य बहाल करणं हा आवश्यक असा उपचार बनतो. वरील सर्व घटकांचा एकत्रीत परीणाम मनावर ( गारुड) झाल्यावर एक राष्ट्रवादा चा मनावर खोलवर परीणाम करणारा उन्माद निर्माण होतो. ६ दुहेरी नकली नीतीमुल्ये राष्ट्रवाद निर्माण करतो. एखादी गोष्ट तथ्यात्मक पातळीवर योग्य की अयोग्य हे विवेक बुद्धीप्रामाण्य नैतिकता आदि कसोटींवर घासुन न पाहता ते प्रथम विशीष्ट राष्ट्राच्या संदर्भात कशी आहे यावर निर्णय घेतला जातो. हा नैतिक निर्णयांचा क्रायटेरीया जाणीवपुर्वक संकुचीत केला जातो जे पुर्णपणे चुकीचे व अ-मानवीय असे आहे. गुलामगीरी संदर्भातील वसाहतवाद्यांची भुमिका बघावी. यात अनेक विरोधाभास जे दिसतात त्याच्या मुळाशी राष्ट्रवादा ने निर्माण केलेली दुहेरी नीतीमुल्ये च आहेत. ७ मुलत: अहंकाराधिष्ठीत असलेला राष्ट्रवाद (टोळीवाद) हा कॉम्पीटीशन स्पर्धे वर आधारीत असलेल्या मानवतेचे खुरटे रुप दाखवितो. मात्र सर्वात वाईट बाब म्हणजे प्रेमाधिष्ठीत को-ऑपरेशन सहकार यावर आधारीत असलेल्या मानवी सर्जनशीलतेच्या कळ्यांना तो पुर्णपणे फ़ुलु देत नाही. परस्पर मानवी सहकार, सिनर्जी यांची अगदी छोटी झलक आपल्याला सर्न ने अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने केलेल्या विश्वनिर्मीतीचे गुढ उकलु पाहणारया असामान्य प्रयोगात, संयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड हेरीटेज च्या संदर्भात अवघ्या विश्वाचा वारसा असणारया गोष्टींना जपण्याच्या प्रयत्नात दिसुन येते.

In reply to by मारवा

असंका Fri, 05/09/2014 - 18:07
आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळलं. मला आपलं म्हणणं असं आहे असं वाटतं- १. एकसंध मानवसमाज हे आपले दीर्घकालीन उद्दीष्ट/स्वप्न हवे. त्यात राष्ट्र ही संकल्पना हा एक अडथळा आहे/ठरेल. मूळात राष्ट्र ह्या संकल्पनेत काहीही दैवी नसल्याने त्याविरुद्ध जाणे हे शक्य आहे. तसेच त्या संकल्पनेत निसर्गाच्या नियमांचा काहीही सहभाग नसल्याने, ही संकल्पना जेव्हा मानवसमाज सोडेल, तेव्हा ते अनैसर्गिक असणार नाही. २. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सद्ध्याच्या व्यवस्थेतील तोटे/दोष यांची यादी आपण दिली आहे. हा लेख चांगला मुद्देसूद आणि भावनांना कमीत कमी उत्तेजित करणारा असा होता. सारांश : अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम| उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम...|| (बघा आम्ही भारतीय किती श्रेष्ठ- पूर्वीपासूनच हेच सांगत नव्हतो? ;-) ) (या दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!)

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 18:21
श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. आता मानवी संस्कृती प्रगत असावी कि नसावी? तंत्रज्ञानाच्या प्रगतीला मानवाच्या कल्याणासाठी वापरले जावे कि नाही?(मी १०,००० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत म्हणतोय.)Rephrasing, what I want to ask is whether cutural and scientific advancedment should be there in first place and if yes, should it be put to use for benevolent ends. या प्रश्नांची उत्तरे नि:शंकपणे हो अशी असावीत असे मानू. आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या - १. राष्ट्रे नसली तर, आजच्या मानवतेसाठी, कोणत्याही प्रकारचे प्रशासनच आवश्यक आहे का? मानवजात प्रशासित असावी कि अप्रशासित? आजघडीच्या मानवी आंतरसंबंधांची किचकटता पाहता कोणतेही प्रशासन नको व कोणत्याही मुद्द्यावर कितीही प्रमाणात एकत्र आलेला एक गट (जसे एक कंपनी) आणि असाच दुसरा गट (जसे तिचे सप्लायर वा ग्राहक) मध्यस्थांच्या अभावी (in the absence of a government or similar recognized body)सहजजीवन करू शकतात असे आपणांस वाटते काय? बहुधा नसावे. २. मग प्रश्न येतो ज्याला केंद्रिय म्हणता येईल असे जगात एकच सरकार असावे. या सरकारमधे सत्तेचे (न्यायिक, वैधानिक, प्रशासकीय अधिकारांचे) विकेंद्रीकरण झालेले नसावे असे आपल्याला म्हणायचे आहे का? सारे निर्णय राजधानीत घेतले पाहिजेत? बहुधा नसावे. ३. म्हणजे पुन्हा अशा जगात भिन्न सत्ताशक्ती असणारी वर्तुळे निर्माण करणे आले. यात केंद्राच्या अखत्यारित काय काय असावे? समजा असे जगत्सरकार लंडनमधून चालले. जगातल्या सर्व लोकांनी (आपण ते सगळे चांगले मतदाते आहेत असे मानू) मिळून, उदाहरणादाखल, भारताबद्दल काय काय ठरवावे? नकाशा? भाषा? झेंडा? आदरस्थाने? आज केंद्र सरकारला जे जे अधिकार आहेत ते सारे असावेत असे म्हणत असाल तर सवत्याने प्रतिसाद देईन. ४. सर्व राज्यकर्त्यांचा नि सर्वमतदात्यांचा सदुद्देश असूनही, असे सरकार, जगातल्या लोकांच्या राजकीय इच्छा पूर्ण करेल काय? सदुद्देश नसला तर? ५. असे सरकार कसे निवडावे? कोणती राज्यपद्धती असावी? कोणती चयनपद्धती असावी? टुंड्रामधल्या लोकांनी भारत वा ईंडीया हे नाव देखिल ऐकलेले नसताना त्यांनी भारतावर, भारताच्या लोकांवर प्रचंड परिणाम करणारे सरकार निवडावे का? ६. प्रचंड मानवतावाद पुढे ठेउन मतदान करणारे ते प्रचंड पॅरोकियल मतदान करणारे असे लोक असतील. त्यांचे रिलेटिव प्रमाण काय असेल? कोणते मुद्दे एखादे सरकार बनण्याचे 'खरे कारण' असतील? (इथे सरकार म्हणजे सरकारच नाही, पण कोणतीही निती बनवणारी नि राबवणारी संस्था.) इथे नवेच, आजपेक्षा भयानक राजकारण होणार नाही, असे आपणांस वाटते काय? अशी खात्री आहे का? ७. जगातल्या प्रत्येक देशात स्थानिक माणूस आपापल्याला सर्वात सुरक्षित महसूस करतो. वरच्या मॉडेलमधे आंतरिक सुरक्षेचे काय? कोणीही कोणत्याही जाऊ लागला (सैन्य नाही म्हणत मी, टोळ्यापण नाही, फक्त गुंड लोक, एकट्याने, ४-५ च्या गटांत) तर देश सुरक्षित उरतील का? ८. अवांतर नको म्हणून फालतू उदाहरण देत आहे. समजा अ ठिकाणी बूट घालणे पाप मानतात. ब ठिकाणी मोठे पुण्य मानतात. मग कायदा काय असावा? उलटसुलट असेल तर त्यामागचे कारण काय म्हणून सांगावे? ९. बाकी सगळे ठिक मानू. म्हणजे जे नियम, संस्था काढून फेकता येतात, त्या आरामात करू. आता हे पाहा. आज काय कमी आहे? १. युद्धे - जगात किती देश आहेत. ३०० माना. तर ३००*२९९ इतक्या शत्रूंच्या जोड्या आहेत का? २. व्यापार - व्यापार, संपत्ती, इ चा मुद्दा घेतला तर जग जवळजवळ एक देशच आहे. भारताचा ट्रेड जीडीपी रेशो ४०% आहे!!! ३. सीमा नसणे - इतिहासातही नि आजही सीमा जलदछायेप्रमाणे बदलतात. १५-०८-४७ पासून भारतातच किती सीमाबदल चालू आहेत? २०-३० तरी असतील. यातले बरेच शांतीपूर्ण नव्हते हे मान्य आहे. आजही भारत नि बांगलादेश स्थानिकांच्या सुखासाठी त्यांचे नागरिकत्व बदलण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत नाही आहेत का? ४. इमिग्रशन - भारतीय जगभरात कुठे कुठे, किती किती नि कसे कसे जगत आहेत हे पहा. राष्ट्रवादाने काय बिघडावले? ५. संपत्ती - जगातल्या नागरिकांची इतर देशातील संपत्तीची क्रॉस होल्डिंग चकित करणारी आहे. ६. नागरिकत्व - फारच इच्छा असेल तर (आखात इ वगळता) कुठेही जाऊन पिढ्यान पिढ्या राहता येते. ७. लोकभावना - राजनेत्यांच्या शत्रूभावनेला लोक सहसा तितकीशी दाद देत नाहीत. ८. संस्कृती - लोकांनी स्वतःच्याही नकळत जगातलं कूठलं काय काय घेतलं आहे याला सीमा नाही. बहुधा माणसाच्या मुक्तभावनेची वलये असतात. म्हणून कुटुंबासह माणूस कडी कुलूप लावून घरात राहतो. मग तो पोलिसांच्या सुरक्षेखाली नगरात वावरतो. तिथे त्याचे वलय अजून मोठे झालेले असते. त्यानंतर मात्र सैन्याचे वलय गरजेचे असते. कारण बर्‍याच गोष्टी सुरक्षित ठेवायच्या असतात. लक्षात घ्या - १. जिथे युद्धेच होत नाहीत तिथे सीमेवर सैनिक बिड्या फुकत (सॉरी, बिअर पीत) पडलेले असतात. जगातल्या बहुतांश सीमा अश्याच आहेत. २. ताण कमी झाला कि सैनिक कमी केले जातात. ३. जिवित हानी, तिही सिविल, कमीत कमी असावी हा संकेतच नसून, नियम आहे. ४. शस्त्रे बनवायची नि विकायची याची वाणिज्यिक लॉबी आहे. ती वापरायची नाहीत हा ही संकेत आहे. ५. मानवतेत एक "किमान विकृतेतेचे प्रमाण" तसेच "किमान गुन्हेगारीचे प्रमाण" असते. कोणतीही पद्धत आणा, ते दिसणारच. त्याचे खापर असलेल्या 'व्यवस्थेवरच' फोडू नये. शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्‍या आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत.

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 18:39
ज्या वाचकांना इतके मोठे प्रतिसाद वाचायची सवय नाही - राष्ट्र ही संकल्पनाच कचर्‍यात काढणे अव्यवहार्य, कठिण वा कदाचित असंभव असावे, पक्षी 'आंतरराष्ट्रीय संबंध' कसे जास्त सलोख्याचे असतील यावर फोकस असावा.

In reply to by arunjoshi123

मारवा Sat, 05/10/2014 - 18:01
अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. अशी एक प्राचीन चायनीज म्हण आहे. व स्टीफ़न कोव्हे हे विख्यात लेखक त्यांच्या टाइम मॅनेजमेंट च्या सिद्धांताला एक नाव देतात. फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट. तर मला अस म्हणावयाचे आहे की एक एक मुद्दा क्रमा क्रमा ने शिस्तीत लयीत घेत पुढे सरकलो तरच आपल्या चर्चेला काही अर्थ आकार येउ शकतो व ती काही निर्णायक बिंदु वर पोहोचु शकते. हाच कुठल्याही चांगल्या चर्चेचा हेतु असतो असे मला वाटते. कीमान आपण त्या दिशेने प्रयास तरी करायलाच हवा. मी आपला जुना वाचक आणि चाहता आहे .आपल्या व्यासंगाच्या ,मेहनतीच्या, तळमळीच्या विषयी मी नितांत आदर बाळगुन ही माझे एक मत निर्भीड व प्रांजळपणे मांडतो की आपला प्रतिसाद १-अत्यंत विस्कळीत आहे. २-अनेक परस्पर विरोधी विधानांनी युक्त असा आहे. ३-ज्याचा परीणाम मुळ विषय भरकटवण्यात व कन्फ़्युजन निर्माण करण्यात होतो. माझ्या वरील विधानांच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या प्रतिसादातील एक उदाहरण घेउ आपल्या प्रतिसादाची सुरुवातच आपण या विधानाने करतात विधान क्र.१ श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. अरुण जी नंतर अनेक वळणे घेत आपले खालील दुसरे विधान येते. विधान क्र.२ शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. अरुण जी या विरोधाभासाची कृपया अगोदर विल्हेवाट लावु या म्हणजे तुमची राष्ट्रवादा वरची भुमिका नेमकी काय आहे ते मला स्पष्ट कळेल. तसेच आणखी काही गुढ अनाकलनीय विधाने तुमच्या प्रतिसादात आहेत उदा. हे विधान घेउ या विधान क्र,३ मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्याा आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत. अरुण जी या संकल्पना खरया कशा ? नैसर्गिक कशा ? रेंजबाउंड अर्थाने म्हणजे नेमक काय व आवश्यक कशा ? हे मला तरी अतिशय गुढ असे विधान वाटते अध्यात्मिक निर्वाण वा माया अशा संकल्पनांसारखे कृपया अगोदर हे क्लिअर करावे वरील गोष्टी क्लिअर करण ही मला वाटत आपल्या दोघांसाठी टु पुट फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट असेल, आणि आपल्या थाउजंड माइल्स जर्नी मधील पहीली च स्टेप आहे. अगोदर ही स्टेप ओलांडु या. मग कीतीही वेळ का लागेना. एकंदरीत प्रतिसादातुन व मुळ लेखातुन आपल्या हे लक्षात आलेलेच असेल की मुळात राष्ट्रवाद हा एक उन्माद आहे या पहील्या स्टेप लाच कीती रेसीस्टन्स आहे. अजुन पुढे सरकायला बराच अवकाश आहे. आपण राष्ट्रवाद हा मुळात काय कसा आहे छान छान आहे की वाइट आहे आवश्य्क की अनावश्यक आहे या निश्चीतीच्या पहील्या केवळ पहील्या पायरी वरच घट्ट पाय रोवुन चर्चा करत आहोत. या पहील्याच पायरीला योग्य न्याय दिल्याशीवाय पुढे जाणं सरकणं हे करु शकतो मात्र ते कीती निरर्थक व निरुपयोगी आहे. हे उघड आहे. अगदी गावठी उदाहरण म्हणजे एखादा अट्टल मद्यपी माझ्या ड्रींक चा काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही उगाचच बाउ करताय इतक्याशा ने काही होतच नसतं इतक्या प्राथमिक डीनायल( ल्कोहोलिक्स अनोनिमस फ़ेम) स्टेज मध्ये आहे. त्याला या पुढील स्टेजेस विषयी बोलण्यात काही अर्थ आहे का अनलेस तो हे मान्य करतो की येस अल्कोहोल इज एव्हील आणि मी त्याच्या गर्तेत अडकलोय. काही प्रश्न ही कुटील असतात जसे ब्रिटीश भारतीयांना स्वातंत्र्या च्या मागणीच्या प्रत्युत्तरात विचारत की तुम्ही अगोदर हे सांगा की आम्ही गेल्यावर तुम्ही हा देश चालवणार कसा ? मग तुमच्या स्वातंत्र्याच काय ते बघु. इथे सर्वात कुटील भाग असा होता की प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामागे तेव्हाची स्वातंत्र्याची जी अत्यंत न्याय्य अशी मागणी होती ते देण्याच्या जबाबदारी पासुन हात झटकण्याचा होता. मुळ मागणी कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष=अवहेलना=टाळण=भरकटवणं असा होता. तुम्ही असे कुटील आहात असे मी म्हणत नाहीये कृपया गैरसमज नसावा. ते प्रश्न पुढील पायरीचे आहेत. इथे अजुन पहीली वरच मारामारी खुप आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की ते प्रश्न अनावश्यक वा चुकीचे आहेत मात्र अस्थानी व चुकीच्या क्रमाने अगोदर उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे ही निश्चीतच देण व त्यावर विचार मंथन होण ही मात्र निश्चीतच पुढील पायरी आहे. पण कृपया हे बघा की मुळ विचार अगोदर क्लिअर होण मान्य होण हेच कीती कठीण व तितकच अत्यावश्यक आहे. अरुण जी आपण संवेदनशीलतेने माझ्या भावना व्यक्तीगत न घेता समजुन घ्याल या खात्रीसहीत आपला मारवा

In reply to by arunjoshi123

मारवा Sat, 05/10/2014 - 18:02

कवितानागेश Fri, 05/09/2014 - 19:20
मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे. आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. 'राष्ट्र' त्यातूनच निर्माण होतं. 'वाद' निर्माण होतो, तो "काही" लोकांच्या सत्तापिपासू वृत्तीतून होतो. आणि कुठलाही सत्तापिपासू माणूस ती लालसा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या कुठल्याही भावनेला हात घालू शकतोच. कधी राष्ट्र, कधी धर्म, कधी वर्ण, कधी रक्त, कधी विचार ....

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे Fri, 05/09/2014 - 19:35
आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे
जन्मभूमी कुठपर्यंत.. गाव, शहर, जिल्हा,जिथे आपण वावरलो त्या भागाबाबत नैसर्गिक आहे.. पण जिथे कधी आयुष्यात पाउल टाकलं नाही, किंवा भविष्यात टाकायची शक्यता नाही.. त्याभूमीबाबत जन्मभूमी म्हणून प्रेम इतकं आत्यंतिक कसं होउ शकतं..

In reply to by कवितानागेश

आयुर्हित Sat, 05/10/2014 - 00:31
बाळ सप्रेंच्या पुस्तकातील प्रतिज्ञा अशी होती: पुणे(जिल्हा)माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव आहेत. माझ्या पुण्यावर माझे प्रेम आहे. पुणे देशातील सर्व नागरिकांवर माझे प्रेम आहे. माझ्या पुण्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पेठांचा(!) मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता(?)माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझे पुणे आणि माझे पुणेकर देश बांधव यांच्याशीच निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मनोरंजन,पर्यटन,देवदर्शन,व्यवसाय,नोकरीसाठी मी माझ्या पुणे देशातच राहीन व येथे नोकरी न मिळाल्यास इतर देशांकडे ढुंकूनही पाहणार नाही. मी पुणे सोडून कधीही बाहेरच्या मुंबई,सातारा,सांगली,कोल्हापूर,गोवा या इतर देशात पायही ठेवणार नाही. आणि माझ्या पुढच्या पिढीलाही पाय ठेवू देणार नाही! जय पुणे! जय जय पुणे!!

In reply to by आयुर्हित

विकास Sat, 05/10/2014 - 20:02
प्रतिज्ञेसंदर्भात एकच प्रश्न पडला आहे: मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. यातील सौजन्याने म्हणजे नक्की काय आणि कसे? ;)

In reply to by विकास

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 20:51
सकाळी ९ ते १ आणि ४ ते ९ ह्या वेळेत दृष्टी आणि चेहरा क्षितीजाशी समांतर ठेवणं (इतर वेळी २२अंश आकाशाकडं), बोलताना पूर्ण वाक्यात बोलणं, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणं ऐकून घेणं, जमल्यास क्वचित प्रसंगी ओठांना दोन्ही बाजूंनी वरच्या दिशेनं ७.२५ अंशात वळवणं ह्या सगळ्यास सौजन्य म्हणत असावेत.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Sat, 05/10/2014 - 19:22
मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे.
इतिहास पाहिला तर वरील वाक्य किती चुकीचे आहे ते वेगळे सांगायला नको. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

मारवा Sat, 05/10/2014 - 19:57
बॅटमॅन जी आपण जे म्हणताय त्याचा किंचीत विस्तार करुन इतिहासातील एखादे उदाहरण देउन मांडल्यास आपणास नेमके काय म्हणायचे आहे याचे आकलन सुलभ होइल.

पोटे Sat, 05/10/2014 - 10:33
राज्य धर्म देव या संकल्पना या देशात लबाड लोकांनी भोळ्या लोकांना फसवण्यासाठीच वापरलेल्या आहेत. अगदी रामायण महाभारत काळातही सत्यवतीने भीष्माला ब्रह्मचारी ठेवणं , कैकेयीने कुणाला तरी वनवास घडवणं , धृवाच्या सावत्र आईने त्याला जंगलात ( की डयरेक्ट स्वर्गात पाठवून देवानं वर पाठवला अशी हूल उठवणं ) , हस्तिनापूरसाठी झालेला संग्राम ... अशा घटनांमधून हेच दिसतं की राष्ट्र चालवून त्यात्ण नफा मिळवणे, आणि ऐषो आरामात जगणे, हाच राजघराण्यांचा धंदा होता. अगदी मोघल , मोघलांना आधी दहा पिढ्या सलाम करणारे आणि नंतर स्वतःची टीचभर राज्ये स्थापन करणारे ... या सगळ्यातून राज्य करणे आणि गोळा होणारा ट्याक्स स्वतःच्या खजिन्यात भरणे इतकेच साध्य केले गेले आहे. जनता मात्र राष्ट्र प्रेम, धर्म प्रेम इ इ च्या नावानं झुंजत राहिली, पण राजाला जाब विचारायचे स्वातंत्र्य जनतेला नव्हते.

विकास Sat, 05/10/2014 - 20:05
वर श्री. मारवा यांनी म्हणले आहे की: अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. तर मग आता पहीले पाऊल काय असावे, ते आपण (म्हणजे मारवा) कसे आचरणात आणत आहोत आणि इतरांनी देखील त्याचे कसे अनुकरण करावे, हे पण त्यांनी सांगितले तर या विषयाला अजून सक्रीय चालना मिळेल.

मारवा Mon, 05/12/2014 - 10:36
बंटवारे के दो-तीन साल बाद पाकिस्तान और हिंदुस्तान की हुकूमतों को ख़याल आया कि सामान्य क़ैदियों की तरह पागलों का भी तबादला होना चाहिए, यानी जो मुसलमान पागल हिंदुस्तान के पागलख़ानों में हैं, उन्हें पाकिस्तान पहुँचा दिया जाए और जो हिंदू और सिख पाकिस्तान के पागलख़ानो में हैं, उन्हें हिंदुस्तान के हवाले कर दिया जाए। मालूम नहीं, यह बात माक़ूल थी या गै़र माकूल़, बहरहाल दानिशमंदों के फ़ैसले के मुताबिक़ इधर-उधर ऊँची सतह की कान्फ़ेंस हुई और बिल आख़िर पागलों के तबादले के लिए एक दिन मुक़र्रर हो गया। अच्छी तरह छानबीन की गई - वे मुसलमान पागल जिनके संबंधी हिंदुस्तान ही में थे, वहीं रहने दिए गए, बाक़ी जो बचे, उनको सरहद पर रवाना कर दिया गया। पाकिस्तान से चूँकि क़रीब-क़रीब तमाम हिंदू-सिख जा चुके थे, इसलिए किसी को रखने-रखाने का सवाल ही पैदा नहीं हुआ, जितने हिंदू-सिख पागल थे, सबके-सब पुलिस की हिफ़ाज़त में बॉर्डर पर पहुँचा दिए गए। उधर का मालूम नहीं लेकिन इधर लाहौर के पागलख़ाने में जब इस तबादले की ख़बर पहुँची तो बड़ी दिलचस्प गपशप होने लगी। एक मुसलमान पागल जो बारह बरस से, हर रोज़, बाक़ायदगी के साथ 'ज़मींदार' पढ़ता था, उससे जब उसके एक दोस्त ने पूछा, "मौलवी साब, यह पाकिस्तान क्या होता है?" तो उसने बड़े गौरो-फ़िक्र के बाद जवाब दिया, "हिंदुस्तान में एक ऐसी जगह है जहाँ उस्तरे बनते हैं!" यह जवाब सुनकर उसका दोस्त संतुष्ट हो गया। इसी तरह एक सिख पागल ने एक दूसरे सिख पागल से पूछा, "सरदार जी, हमें हिंदुस्तान क्यों भेजा जा रहा है, हमें तो वहाँ की बोली नहीं आती।" दूसरा मुस्कराया, "मुझे तो हिंदुस्तोड़ों की बोली आती है, हिंदुस्तानी बड़े शैतानी आकड़ आकड़ फिरते हैं।" एक दिन, नहाते-नहाते, एक मुसलमान पागल ने 'पाकिस्तान ज़िंदाबाद' का नारा इस ज़ोर से बुलंद किया कि फ़र्श पर फिसलकर गिरा और बेहोश हो गया। बाज़ पागल ऐसे भी थे जो पागल नहीं थे, उनमें बहुतायत ऐसे क़ातिलों की थी जिनके रिश्तेदारों ने अफ़सरों को कुछ दे दिलाकर पागलख़ाने भिजवा दिया था कि वह फाँसी के फंदे से बच जाएँ, यह पागल कुछ-कुछ समझते थे कि हिंदुस्तान क्यों तक़्सीम हुआ है और यह पाकिस्तान क्या है, लेकिन सही वाक़िआत से वह भी बेख़बर थे, अख़बारों से उन्हें कुछ पता नहीं चलता था और पहरेदार सिपाही अनपढ़ और जाहिल थे, जिनकी गुफ़्तगू से भी वह कोई नतीजा बरामद नहीं कर सकते थे। उनको सिर्फ़ इतना मालूम था कि एक आदमी मुहम्मद अली जिन्नाह है जिसको क़ायदे-आज़म कहते हैं, उसने मुसलमानी के लिए एक अलहदा मुल्क बनाया है जिसका नाम पाकिस्तान है, यह कहाँ हैं, इसकी भौगोलिक स्थिति क्या है, इसके मुताल्लिक़ वह कुछ नहीं जानते थे - यही वजह है कि वह सब पागल जिनका दिमाग पूरी तरह बिगड़ा हुआ नहीं हुआ था, इस मखमसे में गिरफ़्तार थे कि वह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, अगर हिंदुस्तान में हैं तो पाकिस्तान कहाँ हैं, अगर वह पाकिस्तान में हैं तो यह कैसे हो सकता है कि वह कुछ अर्से पहले यहीं रहते हुए हिंदुस्तान में थे। एक पागल तो हिंदुस्तान और पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान और हिंदुस्तान के चक्कर में कुछ ऐसा गिरफ़्तार हुआ कि और ज़्यादा पागल हो गया। झाडू देते-देते वह एक दिन दरख्त़ पर चढ़ गया और टहने पर बैठकर दो घंटे मुसलसल तक़रीर करता रहा, जो पाकिस्तान और हिंदुस्तान के नाज़ुक मसले पर थी, सिपाहियों ने जब उसे नीचे उतरने को कहा तो वह और ऊपर चढ़ गया। जब उसे डराया-धमकाया गया तो उसने कहा, "मैं हिंदुस्तान में रहना चाहता हूँ न पाकिस्तान में, मैं इस दरख़्त पर रहूँगा।" बड़ी देर के बाद जब उसका दौरा सर्द पड़ा तो वह नीचे उतरा और अपने हिंदू-सिख दोस्तों से गले मिल-मिलकर रोने लगा - इस ख़याल से उसका दिल भर आया था कि वह उसे छोड़कर हिंदुस्तान चले जाएँगे। एक एम.एस-सी. पास रेडियो इंजीनियर में जो मुसलमान था और दूसरे पागलों से बिलकुल अलग-थलग बाग की एक खास पगडंडी पर सारा दिन ख़ामोश टहलता रहता था, यह तब्दीली ज़ाहिर हुई कि उसने अपने तमाम कपड़े उतारकर दफादार के हवाले कर दिए और नंग-धड़ंग सारे बाग में चलना-फिरना शुरू कर दिया। चियौट के एक मोटे मुसलमान ने, जो मुस्लिम लीग का सरगर्म कारकुन रह चुका था और दिन में पंद्रह-सोलह मर्तबा नहाया करता था, एकदम यह आदत तर्क कर दी - उसका नाम मुहम्मद अली था, चुनांचे उसने एक दिन अपने जंगले में एलान कर दिया कि वह क़ायदे-आज़म मुहम्मद अली जिन्नाह है, उसकी देखा-देखी एक सिख पागल मास्टर तारा सिंह बन गया - इससे पहले कि खून-ख़राबा हो जाए, दोनों को ख़तरनाक पागल क़रार देकर अलहदा-अलहदा बंद कर दिया गया। लाहौर का एक नौजवान हिंदू वकील मुहब्बत में नाकाम होकर पागल हो गया था, जब उसने सुना कि अमृतसर हिंदुस्तान में चला गया है तो उसे बहुत दुख हुआ। अमृतसर की एक हिंदू लड़की से उसे मुहब्बत थी जिसने उसे ठुकरा दिया था मगर दीवानगी की हालत में भी वह उस लड़की को नहीं भूला था - वह उन तमाम हिंदू और मुसलमान लीडरों को गालियाँ देने लगा जिन्होंने मिल-मिलाकर हिंदुस्तान के दो टुकडे कर दिए हैं, और उसकी महबूबा हिंदुस्तानी बन गई है और वह पाकिस्तानी। जब तबादले की बात शुरू हुई तो उस वकील को कई पागलों ने समझाया कि वह दिल बुरा न करे, उसे हिंदुस्तान भेज दिया जाएगा, उसी हिंदुस्तान में जहाँ उसकी महबूबा रहती है - मगर वह लाहौर छोड़ना नहीं चाहता था, उसका ख़याल था कि अमृतसर में उसकी प्रैक्टिस नहीं चलेगी। युरोपियन वार्ड में दो एंग्लो इंडियन पागल थे। उनको जब मालूम हुआ कि हिंदुस्तान को आज़ाद करके अंग्रेज़ चले गए हैं तो उनको बहुत सदमा हुआ, वह छुप-छुपकर घंटों आपस में इस अहम मसले पर गुफ़्तगू करते रहते कि पागलख़ाने में अब उनकी हैसियत किस किस्म की होगी, योरोपियन वार्ड रहेगा या उड़ा दिया जाएगा, ब्रेक-फास्ट मिला करेगा या नहीं, क्या उन्हें डबल रोटी के बजाय ब्लडी इंडियन चपाटी तो ज़बरदस्ती नहीं खानी पड़ेगी? एक सिख था, जिसे पागलख़ाने में दाखिल हुए पंद्रह बरस हो चुके थे। हर वक्त उसकी जुबान से यह अजीबो-गरीब अल्फ़ाज़ सुनने में आते थे, "औपड़ दि गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मूँग दि दाल ऑफ दी लालटेन!" वह दिन को सोता था न रात को। पहरेदारों का यह कहना था कि पंद्रह बरस के तबील अर्से में वह एक लहज़े के लिए भी नहीं सोया था, वह लेटता भी नहीं था, अलबत्ता कभी-कभी किसी दीवार के साथ टेक लगा लेता था - हर वक्त खड़ा रहने से उसके पाँव सूज गए थे और पिंडलियाँ भी फूल गई थीं, मगर जिस्मानी तकलीफ़ के बावजूद वह लेटकर आराम नहीं करता था। हिंदुस्तान, पाकिस्तान और पागलों के तबादले के मुताल्लिक़ जब कभी पागलख़ानों में गुफ़्तगू होती थी तो वह गौर से सुनता था, कोई उससे पूछता कि उसका क्या ख़याल है तो वह बड़ी संजीदगी से जवाब देता, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान गवर्नमेंट!" लेकिन बाद में 'आफ दि पाकिस्तान गवर्नमेंट' की जगह 'आफ दि टोबा टेक सिंह गवर्नमेंट' ने ले ली, और उसने दूसरे पागलों से पूछना शुरू कर दिया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जहाँ का वह रहनेवाला है। किसी को भी मालूम नहीं था कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, जो बताने की कोशिश करते थे वह खुद इस उलझाव में गिरफ़्तार हो जाते थे कि सियालकोट पहले हिंदुस्तान में होता था, पर अब सुना है कि पाकिस्तान में हैं, क्या पता है कि लाहौर जो आज पकिस्तान में हैं, कल हिंदुस्तान में चला जाए या सारा हिंदुस्तान ही पाकिस्तान बन जाए और यह भी कौन सीने पर हाथ रखकर कह सकता है कि हिंदुस्तान और पाकिस्तान, दोनों किसी दिन सिरे से गायब ही हो जाएँ! इस सिख पागल के केश छिदरे होकर बहुत मुख्त़सर रह गए थे, चूँकि बहुत कम नहाता था, इसलिए दाढ़ी और सिर के बाल आपस में जम गए थे जिसके बायस उसकी शक्ल बड़ी भयानक हो गई थी, मगर आदमी हिंसक नहीं था - पंद्रह बरसों में उसने कभी किसी से झगड़ा-फ़साद नहीं किया था। पागलख़ाने के जो पुराने मुलाज़िम थे, वह उसके मुताल्लिक़ इतना जानते थे कि टोबा टेक सिंह में उसकी कई ज़मीनें थी, अच्छा खाता-पीता ज़मींदार था कि अचानक दिमाग उलट गया, उसके रिश्तेदार उसे लोहे की मोटी-मोटी ज़ंजीरों में बाँधकर लाए और पागलख़ाने में दाखिल करा गए। महीने में एक बार मुलाक़ात के लिए यह लोग आते थे और उसकी खैर-ख़ैरियत दरयाफ़्त करके चले जाते थे, एक मुश्त तक यह सिलसिला जारी रहा, पर जब पाकिस्तान, हिंदुस्तान की गड़बड़ शुरू हुई तो उनका आना-जाना बंद हो गया। उसका नाम बिशन सिंह था मगर सब उसे टोबा टेक सिंह कहते थे। उसको यह बिलकुल मालूम नहीं था कि दिन कौन-सा है या कितने साल बीत चुके हैं, लेकिन हर महीने जब उसके निकट संबंधी उससे मिलने के लिए आने के क़रीब होते तो उसे अपने आप पता चल जाता, चुनांचे वह दफादार से कहता कि उसकी मुलाकात आ रही है, उस दिन वह अच्छी तरह नहाता, बदन पर ख़ूब साबुन घिसता और बालों में तेल डालकर कंघा करता, अपने वह कपड़े जो वह कभी इस्तेमाल नहीं करता था, निकलवाकर पहनता और यों सज-बनकर मिलनेवालों के पास जाता। वह उससे कुछ पूछते तो वह ख़ामोश रहता या कभी-कभार 'औपड़ दि गड़ गड़ अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी लालटेन' कह देता। उसकी एक लड़की थी जो हर महीने एक उँगली बढ़ती-बढ़ती पंद्रह बरसों में जवान हो गई थी। बिशन सिंह उसको पहचानता ही नहीं था - वह बच्ची थी जब भी अपने आप को देखकर रोती थी, जवान हुई तब भी उसकी आँखों से आँसू बहते थे। पाकिस्तान और हिंदुस्तान का किस्सा शुरू हुआ तो उसने दूसरे पागलों से पूछना शुरू किया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जब उसे इत्मीनानबख्श़ जवाब न मिला तो उसकी कुरेद दिन-ब-दिन बढ़ती गई। अब मुलाक़ात भी नहीं होती थी, पहले तो उसे अपने आप पता चल जाता था कि मिलनेवाले आ रहे हैं, पर अब जैसे उसके दिल की आवाज़ भी बंद हो गई थी जो उसे उनकी आमद की ख़बर दे दिया करती थी - उसकी बड़ी ख़्वाहिश थी कि वह लोग आएं जो उससे हमदर्दी का इज़हार करते थे और उसके लिए फल, मिठाइयाँ और कपड़े लाते थे। वह आएँ तो वह उनसे पूछे कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, वह उसे यकीनन बता देंगे कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में - उसका ख़याल था कि वह टोबा टेक सिंह ही से आते हैं जहाँ उसकी ज़मीनें हैं। पागलख़ाने में एक पागल ऐसा भी था जो खुद़ को ख़ुदा कहता था। उससे जब एक रोज़ बिशन सिंह ने पूछा कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में तो उसने हस्बे-आदत कहकहा लगाया और कहा, "वह पाकिस्तान में हैं न हिंदुस्तान में, इसलिए कि हमने अभी तक हुक्म ही नहीं दिया!" बिशन सिंह ने उस ख़ुदा से कई मर्तबा बड़ी मिन्नत-समाजत से कहा कि वह हुक़्म दे दें ताकि झंझट ख़त्म हो, मगर ख़ुदा बहुत मसरूफ़ था, इसलिए कि उसे और बे-शुमार हुक़्म देने थे। एक दिन तंग आकर बिशन सिंह खुद़ा पर बरस पड़ा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ वाहे गुरु जी दा खालस एंड वाहे गुरु जी दि फ़तह!" इसका शायद मतलब था कि तुम मुसलमानों के ख़ुदा हो, सिखों के खुद़ा होते तो ज़रूर मेरी सुनते। तबादले से कुछ दिन पहले टोबा टेक सिंह का एक मुसलमान जो बिशन सिंह का दोस्त था, मुलाक़ात के लिए आया, मुसलमान दोस्त पहले कभी नहीं आया था। जब बिशन सिंह ने उसे देखा तो एक तरफ़ हट गया, फिर वापस जाने लगा मगर सिपाहियों ने उसे रोका, "यह तुमसे मिलने आया है, तुम्हारा दोस्त फज़लदीन है!" बिशन सिंह ने फज़लदीन को एक नज़र देखा और कुछ बड़बड़ाने लगा। फज़लदीन ने आगे बढ़कर उसके कंधे पर हाथ रखा, "मैं बहुत दिनों से सोच रहा था कि तुमसे मिलूँ लेकिन फ़ुरसत ही न मिली, तुम्हारे सब आदमी ख़ैरियत से हिंदुस्तान चले गए थे, मुझसे जितनी मदद हो सकी, मैंने की तुम्हारी बेटी रूपकौर..." वह कहते-कहते रुक गया। बिशन सिंह कुछ याद करने लगा, "बेटी रूपकौर..." फज़लदीन ने रुक-रुककर कहा, "हाँ, वह, वह भी ठीक-ठाक है, उनके साथ ही चली गई थी!" बिशन सिंह खामोश रहा। फज़लदीन ने फिर कहना शुरू किया, "उन्होंने मुझे कहा था कि तुम्हारी ख़ैर-ख़ैरियत पूछता रहूँ, अब मैंने सुना है कि तुम हिंदुस्तान जा रहे हो, भाई बलबीर सिंह और भाई वधावा सिंह से मेरा सलाम कहना और बहन अमृतकौर से भी, भाई बलबीर से कहना कि फज़लदीन राजीखुशी है, दो भूरी भैंसे जो वह छोड़ गए थे, उनमें से एक ने कट्टा दिया है, दूसरी के कट्टी हुई थी, पर वह छ: दिन की होके मर गई और मेरे लायक जो खिदमत हो, कहना, मैं हर वक्त तैयार हूँ, और यह तुम्हारे लिए थोड़े-से मरोंडे लाया हूँ!" बिशन सिंह ने मरोंडों की पोटली लेकर पास खड़े सिपाही के हवाले कर दी और फज़लदीन से पूछा, "टोबा टेक सिंह कहाँ है?" फज़लदीन ने कदरे हैरत से कहा, "कहाँ है? वहीं है, जहाँ था!" बिशन सिंह ने फिर पूछा, "पाकिस्तान में है या हिंदुस्तान में?" "हिंदुस्तान में, नहीं, नहीं पाकिस्तान में!" फज़लदीन बौखला-सा गया। बिशन सिंह बड़बड़ाता हुआ चला गया, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान एंड हिंदुस्तान आफ दी दुर फिटे मुँह!" तबादले की तैयारियाँ मुकम्मल हो चुकी थीं, इधर से उधर और उधर से इधर आनेवाले पागलों की फ़ेहरिस्तें पहुँच चुकी थीं और तबादले का दिन भी मुक़र्रर हो चुका था। सख्त़ सर्दियाँ थीं जब लाहौर के पागलख़ाने से हिंदू-सिख पागलों से भरी हुई लारियाँ पुलिस के रक्षक दस्ते के साथ रवाना हुई, संबंधित अफ़सर भी हमराह थे - वागह(एक गाँव) के बॉर्डर पर तरफीन (दोनों तरफ़) के सुपरिटेंडेंट एक-दूसरे से मिले और प्रारंभिक कार्रवाई ख़त्म होने के बाद तबादला शुरू हो गया, जो रात-भर जारी रहा। पागलों को लारियों से निकालना और उनको दूसरे अफ़सरों के हवाले करना बड़ा कठिन काम था, बाज़ तो बाहर निकलते ही नहीं थे, जो निकलने पर रज़ामंद होते थे, उनको सँभालना मुश्किल हो जाता था, क्योंकि वह इधर-उधर भाग उठते थे, जो नंगे थे, उनको कपड़े पहनाए जाते तो वह उन्हें फाड़कर अपने तन से जुदा कर देते - कोई गालियाँ बक रहा है, कोई गा रहा है क़ुछ आपस में झगड़ रहे हैं क़ुछ रो रहे हैं, बिलख रहे हैं - कान पड़ी आवाज़ सुनाई नहीं देती थी - पागल औरतों का शोर-शराबा अलग था, और सर्दी इतनी कड़ाके की थी कि दाँत से दाँत बज रहे थे। पागलों की अक्सरीयत इस तबादले के हक़ में नहीं थी, इसलिए कि उनकी समझ में नहीं आ रहा था कि उन्हें अपनी जगह से उखाड़कर कहाँ फेंका जा रहा है, वह चंद जो कुछ सोच-समझ सकते थे, 'पाकिस्तान : जिंदाबाद' और 'पाकिस्तान : मुर्दाबाद' के नारे लगा रहे थे, दो-तीन मर्तबा फ़साद होते-होते बचा, क्योंकि बाज मुसलमानों और सिखों को यह नारे सुनकर तैश आ गया था। जब बिशन सिंह की बारी आई और वागह के उस पार का मुताल्लिक़ अफ़सर उसका नाम रजिस्टर में दर्ज करने लगा तो उसने पूछा : "टोबा टेक सिंह कहाँ है, पाकिस्तान में या हिंदुस्तान में?" यह सुनकर बिशन सिंह उछलकर एक तरफ़ हटा और दौड़कर अपने बचे हुए साथियों के पास पहुँच गया। पाकिस्तानी सिपाहियों ने उसे पकड़ लिया और दूसरी तरफ़ ले जाने लगे, मगर उसने चलने से इनकार कर दिया, "टोबा टेक सिंह यहाँ है!" और ज़ोर-ज़ोर से चिल्लाने लगा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी टोबा टेक सिंह एंड पाकिस्तान!" उसे बहुत समझाया गया कि देखो, अब टोबा टेक सिंह हिंदुस्तान में चला गया है, अगर नहीं गया है तो उसे फौरन वहाँ भेज दिया जाएगा, मगर वह न माना! जब उसको ज़बर्दस्ती दूसरी तरफ़ ले जाने की कोशिश की गई तो वह दरमियान में एक जगह इस अंदाज़ में अपनी सूजी हुई टांगों पर खड़ा हो गया जैसे अब उसे कोई ताकत नहीं हिला सकेगी, आदमी चूँकि सीधा था, इसलिए उससे ज़्यादा ज़बर्दस्ती न की गई, उसको वहीं खड़ा रहने दिया गया, और तबादले का बाक़ी काम होता रहा। सूरज निकलने से पहले शांत पड़े बिशन सिंह के हलक के एक गगन भेदी चीख़ निकली। इधर-उधर से कई दौड़े आए और उन्होने देखा कि वह आदमी जो पंद्रह बरस तक दिन-रात अपनी टाँगों पर खड़ा रहा था, औंधे मुँह लेटा है - उधर खरदार तारों के पीछे हिंदुस्तान था, इधर वैसे ही तारों के पीछे पाकिस्तान, दरमियान में ज़मीन के उस टुकड़े पर जिसका कोई नाम नहीं था, टोबा टेक सिंह पड़ा था।

विटेकर Tue, 05/13/2014 - 16:45
बरीच गडबड आहे संकल्पना समजावून घेण्यात असे वाटते ! राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात , राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे,आणि म्हणून राष्ट्र्वाद हा शब्द संस्कृतीवाचक आहे ! मात्र राज्याला सीमा असतात, असायला हव्यात.राज्य अथवा देश हे प्रशासकीय सोयीसाठी बनविलेले असतात. बाकी सारी पृथ्वी ( विश्व ) एकच आहे आपण अशी प्रार्थना देखील करतो ....पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळीती.... असो टंकायचा कंटाळा आला...... उदा. युरोप हे एक राष्ट्र ( देश नाही ) असू शकेल पण एक राज्य नव्हे ! आपण रुढार्थाने भारतीय उपखंड असे ज्याला म्हणतो ते रुढार्थाने भारत - राष्ट्र आहे.

मारवा Tue, 05/13/2014 - 19:17
देश=राष्ट्र=कंट्री=नेशन उदा. भारत-फ्रान्स-चीन इ. देश म्हणा राष्ट्र म्हणा नेशन म्हणा कंट्री म्हणा या संदर्भात वरील विवेचन आहे हे नमुद करतो. तुम्ही म्हणता राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत मान्य मी राज्य या संकल्पने संदर्भात चकार शब्द ही काढत नाही महाराष्ट्र गुजरात बंगाल आदि राज्य आहेत अशी माझी माहीती आहे त्यांचे मिळुन एकत्र बनलेला भारत हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे. या राष्ट्र संदर्भात वरील मांडणी आहे. उदा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे त्यातील राज्ये टेक्सास इ. मिळुन तो बनला आहे. देशीवाद असे म्हणावयाचे टाळले कारण तो नेटीव्हीझम अथवा साहीत्यातील देशीवाद या संकल्पनेशी गल्लत गैरसमज करु शकतो म्हणुन राष्ट्रवाद हा शब्द नेशनलिझम या अर्थाने वापरला. या नेंतर आपण म्हणतात की राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात आता यावर काय बोलायच याने सुन्न झालोय बधिर झालोय हा धक्का पचण फारच अवघड आहे. असो

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 12:53
तुम्ही तुमच्या प्रतिसादात म्हट्ले आहे त्याप्रमाणे .. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे असू शकते.. कारण तो अनेक संस्कृतींनी बनलेला देश आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी असले काही अस्तित्वात च नव्हते. १८७६ ( चू. भू द्या.घ्या) नंतर हा " देश" म्हणून जन्माला आला.. सोयीसाठी म्हणून! असो. जर तुम्ही झी मराठी वरची मालीका 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' पहात असाल तर त्यातील कृत्रिम कुटुंबासारखी.. परस्परांच्या सोयी ने एकत्र आलेले.. अश्या लोकांचे राष्ट्र नसते.. राष्ट्र बनण्याची प्रक्रिया ही काही हजार वर्षांची असावी लागते... भारताचे ( अथवा ग्रीक , युनान ,रोमन)तसे नाही . अनादी अनंत कालापासून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. राजकीय आक्रमणामुळे काही तुकडे पड्ले. काही स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले - हे अर्थात आजच्या संदर्भात !कदाचित पुढच्या २-५०० वर्षात ते पुन्हा एक होतील ही ! कारण या सार्यांचा "आत्मा" एक आहे. एका समान सांस्कृतिक धाग्याने हे सारे बांधलेले आहेत. आणि म्हनून युनायटेड स्टेत्स ऑफ भारत असा शब्दप्रयोग केला जात नाही. कारण तो चुकीचाच आहे. धर्म हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. ( धर्म म्हणजे उपासना पद्धती ( रिलीजन ) नव्हे , तो वैयक्तिक भाग आहे !) धर्म हा समाजाची धारणा करतो. धर्म आणि राष्ट्र हे दोन शब्द राजकारणी अतिशय मुक्त हस्ते वापरतात आणि त्यामुळे ते वापरुन अतिशय गुळगुळीत झाले आहेत ! आणखी एक उदाहरण म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम .. असो अशी अनेक उदाहरणे असतील. जाता- जाता : महाराष्ट्रातील " राष्ट्रवादी " या शब्दाचा वापर करणार्‍या राजकीय पक्षाचा आणि राष्ट्रवादाचा सुतराम संबंध नाही!! त्यांना ' राष्ट्र-खा-खा-खाती " हे नांव अधिक संयुक्तिक आहे ! असो, काही शब्दाचा वापर करण्यावर कायद्याने बंदी आणायला हवी आहे ! (निळी अक्षरे संपादित करायला हरकत नाही..धरण भरु शकणारे दादा आणि त्यांचे हस्तक अफाट ताकदीचे आहेत,ते मिपावर पोहोचू शकतात !)

राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत.