Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शब्दानुज on Fri, 05/09/2014 - 09:46
शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले

Submitted by शब्दानुज on Fri, 05/09/2014 - 09:48

Permalink

प्रतिसाद

वाट तुमच्या प्रतिसादाची!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दानुज on Fri, 05/09/2014 - 10:15

Permalink

माझे वय

मागील वेळेस वयासाठी गजहब झाला होता --काहींनी म्हशींसाठी स्वप्ने बघितली!!! म्हणुन सांगतो १९
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 05/10/2014 - 01:23

In reply to माझे वय by शब्दानुज

Permalink

१९ ?

च्यायला, ९१ ला सुद्धा अशी कविता सुचणं कर्मकठीण! यावरनं एक ज्योक आठवला. एक नवकवी अशाच धगधगत्या कविता कविसंमेलनात सादर करतो पण प्रतिसाद मिळत नाही. मग तो विचारतो `माझ्या कवितेतली आग तुम्हाला जाणवत नाही का?' श्रोते कोरसमधे उत्तरतात ` अजिबात नाही' यावर नाऊमेद होऊन तो विचारतो `माझ्या कवितेत आग येण्यासाठी मी काय करु?' मागनं एकजण म्हणतो `आगीत घाला'
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Fri, 05/09/2014 - 22:59

Permalink

शब्दु काका छाने कविता पण

शब्दु काका छाने कविता पण कुनाचे नाते अग्निशी ते शेवटपर्य्न्त नै कळले ...
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दानुज on Sat, 05/10/2014 - 19:51

In reply to शब्दु काका छाने कविता पण by जेनी...

Permalink

अर्थ कवितेचा

ही हुंड्यात बळी पड्लेल्या एका स्त्रीची कथा आहे तिचे अग्निशी असलेले नाते कसे बदलत गेले हे सांगितले आहे पहिल्यांना अग्निशी असलेले नाते संहारक होते.. ती ज्याला परमेश्वर मानले त्याच पतिने तिला जाळ्ले नंतर हे नाते अंगारात बदलले.. शेवटी सामांन्यांनी उठाव केला आणि त्यास फासावर लावले त्यावेळी तिने बंडाच्या रुपाचे अग्नीरुप घेतले शेवटी जेव्हा पतिला चीतेवर पाहिले तेव्हा तिचे मन गहिरवले आणि चितेवरच्या अग्निचे रुप घेउन पतिस आपल्यात सामावुन घेतले आता पुन्हा कविता वाचुन बघा..... प्रतिसादासाठी धन्यावाद........
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 05/10/2014 - 01:08

Permalink

कश्याचा पायपोस कश्यात नाही!

शरीरावर माझ्या बालांचे नर्तन चालले बारात मी बालांशी नाते प्रस्थापिले माझ्याच बेवडेगिरीने लिव्हर जाळले गेले रुपारूपातील यौवन मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ झिंगेतुन उरले पोटातील धगधगते अंगारे तरी पिण्यास आतुरले जनलोकांच्या बॉटलमध्ये बंदी मी, स्वर्णरुपात प्रगटले अखेरीस तुमच्यामधुन मी, उरलेल्या पेगांवर भागवले शेवटक्षणी मात्र मी 'सोडण्यासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी रस्त्यावर मिठित घेतले
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दानुज on Sat, 05/10/2014 - 19:52

In reply to कश्याचा पायपोस कश्यात नाही! by संजय क्षीरसागर

Permalink

अर्थ कवितेचा

ही हुंड्यात बळी पड्लेल्या एका स्त्रीची कथा आहे तिचे अग्निशी असलेले नाते कसे बदलत गेले हे सांगितले आहे पहिल्यांना अग्निशी असलेले नाते संहारक होते.. ती ज्याला परमेश्वर मानले त्याच पतिने तिला जाळ्ले नंतर हे नाते अंगारात बदलले.. शेवटी सामांन्यांनी उठाव केला आणि त्यास फासावर लावले त्यावेळी तिने बंडाच्या रुपाचे अग्नीरुप घेतले शेवटी जेव्हा पतिला चीतेवर पाहिले तेव्हा तिचे मन गहिरवले आणि चितेवरच्या अग्निचे रुप घेउन पतिस आपल्यात सामावुन घेतले आता पुन्हा कविता वाचुन बघा..... प्रतिसादासाठी धन्यावाद........
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 05/10/2014 - 20:32

In reply to अर्थ कवितेचा by शब्दानुज

Permalink

बसल्या बसल्या काहीही विचार करणं चालू आहे!

१९ व्या वर्षी सामान्य व्यक्ती प्रेम वगैरे करते आणि अत्यंत अवखळ असते. काव्यविषय काल्पनिक असला तरी दारुण आहे. पतीनं दहन केलेली पत्नी, तो फासावर गेल्यावर, त्याच्या सरणावर अग्नीरुप घेऊन त्याला मिठी कशाला (झक मारायला) घालेल? आधीच इतका लफडा झाल्यावर त्याला आपल्यात कशाला सामावून घेईल? विधायक विचार करा, चांगले साहित्य वाचा, सकाळी उठून व्यायम करा, समोर ध्येय ठेवून आभ्यास नीट करा म्हणजे विचारात अशी निगेटिवीटी येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 05/10/2014 - 21:07

In reply to बसल्या बसल्या काहीही विचार करणं चालू आहे! by संजय क्षीरसागर

Permalink

>>>विचारात अशी निगेटिवीटी

>>>विचारात अशी निगेटिवीटी येणार नाही. जौ द्या ना सर! कशाला ?????????
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 05/10/2014 - 23:15

In reply to बसल्या बसल्या काहीही विचार करणं चालू आहे! by संजय क्षीरसागर

Permalink

कंट्रोल संजय सर कंट्रोल...!

इतकी निगेटीवीटी बरी न्हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 05/11/2014 - 09:46

In reply to कंट्रोल संजय सर कंट्रोल...! by आत्मशून्य

Permalink

खरंय, मागल्या कवितेत पाणी,

खरंय, मागल्या कवितेत पाणी, मडके आता डायरेक जाळ. काय खरं नाय बाबा. हिरवळ नाय का रे तिकडे?
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दानुज on Sat, 05/10/2014 - 23:55

In reply to बसल्या बसल्या काहीही विचार करणं चालू आहे! by संजय क्षीरसागर

Permalink

तोच सर्वात सकारात्मक मुद्दा!

एखाद्या कडव्यावरुन कोणाचे विचार कसे आहेत हे कळले शक्य नाही वरच्याच विडंबनेतुन मग मी कोणता अर्थ घ्यावा?????? एखाद्या गोष्टीत ईतरांची मते वेगळी असु शकतात शेवट्चा मुद्दा एकवेळ चुकीचा असेलही!! अजुन लहान आहे, नवीन आहे मी!! एवढ्यात रागवु नका तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Sun, 05/11/2014 - 08:02

In reply to अर्थ कवितेचा by शब्दानुज

Permalink

कवितेची पार्श्वभुमी आधी

कवितेची पार्श्वभुमी आधी लिहिली असती अथवा शिर्षकात काही हिंट दिली असती तर बरं झालं असतं. पार्श्वभुमी वाचल्यानंतर मात्र अर्थ लागतायत. आवडली कविता..:) लिहीत रहा.!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sat, 05/10/2014 - 18:58

Permalink

विडंबन

=))
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sat, 05/10/2014 - 20:55

Permalink

आयला मोह आवरला नाय . सकाळी

आयला मोह आवरला नाय . सकाळी उठल्यावर कुटला व्यायम करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 05/11/2014 - 05:59

In reply to आयला मोह आवरला नाय . सकाळी by जेपी

Permalink

@ सकाळी उठल्यावर कुटला व्यायम

@ सकाळी उठल्यावर कुटला व्यायम करावा.>>> रोज कोणालातरी कुटत जा! =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 05/11/2014 - 07:13

In reply to @ सकाळी उठल्यावर कुटला व्यायम by अत्रुप्त आत्मा

Permalink

क ह र.

  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 05/11/2014 - 09:48

In reply to @ सकाळी उठल्यावर कुटला व्यायम by अत्रुप्त आत्मा

Permalink

>>> सकाळी उठल्यावर कुटला

>>> सकाळी उठल्यावर कुटला व्यायम करावा.>>> आत्मुस, सुर्यनमस्कार विसरलास काय रे?
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2657 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com