बारावा दिवस. १४ किमीवरील जॉलिंगकाँग; म्हणजेच आदिकैलास-पार्वती सरोवर. उंची १५,७०० फूट. आधी चहा, नंतर बोर्नव्हीटा आणि आलूपराठ्यांचा नाश्ता करून सहा वाजता निघालो यात्रेच्या सांगतेकडे. वाटेत दोन ग्लेशियर पार करावे लागले, पण आता आम्ही अनुभवाने शहाणे झालो होतो. अगदी सहज पार झालो. कठीण चढ-उतार आहेत, पण फुलांच्या गालिच्यांचे सान्निध्य थकवा जाणवू देत नाही. पहाडाच्या भिंतींवर छोटी छोटी बिळे बनलेली पांडेजीनी दाखवली. जोरात वारा वाहतो, त्याच्या घर्षणाने अशी बिळे तयार होतात, असे म्हणाले पांडेजी. या बिळांमध्ये पक्षी घरटी बनवतात. आम्हांला त्या बिळांतून ये-जा करणारे चिमुकले पक्षीगण बघायला मिळाले.
क्रुपया
हो माझं पहिल्या भागापसुन हेच म्हणणं आहे
In reply to हो माझं पहिल्या भागापसुन हेच म्हणणं आहे by दिपक.कुवेत
फोटो.
बाकि एकदा तुमची लेखमाला संपली कि मग सावकाशीने
धन्यवाद
....उत्तम लेखमाला.....!!!!!
वाचतेय हो खुषि ताई.
मस्त
छान.:)
सुंदर लिखाण, आणखीन लिहा,