झी-जिंदगी
लेखनप्रकार
पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.
असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.
ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.
वाचने
9573
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
सध्या
कलेला जात धर्म इ.ची बंधने
पाकिस्तानी मराठी शिरियला
हे चॅनल बंद करायला हवं.
पाकिस्तनि ?
In reply to पाकिस्तनि ? by hemants.gokhale
वाहीनी हिंदुस्तानी आहे हो.
मूल्याधारित तुलनेत उजवे व सकस असे काही असेल
In reply to मूल्याधारित तुलनेत उजवे व सकस असे काही असेल by काउबॉय
कारण काही गोष्टी पैशापेक्षा मौल्यवान असतात.
In reply to कारण काही गोष्टी पैशापेक्षा मौल्यवान असतात. by काउबॉय
तुम्ही जो खर्च करता आहात तो
In reply to तुम्ही जो खर्च करता आहात तो by प्रसाद१९७१
म्हणुनच सावध व मर्यादा व सकसता हे शब्द वापरले आहेत
In reply to म्हणुनच सावध व मर्यादा व सकसता हे शब्द वापरले आहेत by काउबॉय
नाही नाही, बघाचहो तुम्ही त्या
In reply to नाही नाही, बघाचहो तुम्ही त्या by काळा पहाड
जरुर तुम्ही मात जस्ट फोलो द मनी
In reply to जरुर तुम्ही मात जस्ट फोलो द मनी by काउबॉय
पण ते सगळं करायला आपण
In reply to पण ते सगळं करायला आपण by काळा पहाड
थोडंच आहे ?
In reply to थोडंच आहे ? by काउबॉय
रच्याकाने मी कोठेहि
In reply to रच्याकाने मी कोठेहि by काउबॉय
पण मी अशा पायरेटेड सीडी
In reply to पण मी अशा पायरेटेड सीडी by काळा पहाड
मला त्यांची (व पारंपारिक युरोपिअन्स ची) संस्कृतिक सभ्यता आवडते
In reply to मला त्यांची (व पारंपारिक युरोपिअन्स ची) संस्कृतिक सभ्यता आवडते by काउबॉय
सांस्कृतिक सभ्यतेची माझी
In reply to नाही नाही, बघाचहो तुम्ही त्या by काळा पहाड
भारतीय वाहिनीवरच त्या पहात
तुमच्या वर्णना नुसार ह्या
माझे
कविता ताई आणि त्यांच्या
In reply to कविता ताई आणि त्यांच्या by प्रसाद१९७१
जकातीचा रेट काय असतो? ५%च्या
In reply to जकातीचा रेट काय असतो? ५%च्या by आदूबाळ
असा रेट नाहिय, पण साधारणपणे २
In reply to कविता ताई आणि त्यांच्या by प्रसाद१९७१
ओह
In reply to ओह by कविता१९७८
हा प्रतिसाद
४ दिवस सासुचे ही पूर्वी इ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sourcesअल कायदा ची शाखा
कोणी मरो अथवा जगो आम्हास काय त्याचे ???
In reply to कोणी मरो अथवा जगो आम्हास काय त्याचे ??? by आसुड
ही वाहीनी भारतीय आहे की ,
एका सीरीयल चे सुत्र संचालन
In reply to एका सीरीयल चे सुत्र संचालन by प्रसाद१९७१
प्रसाद भाउ १९७१ , तुम्ही
In reply to प्रसाद भाउ १९७१ , तुम्ही by कविता१९७८
हो मीच तो. नाहीतर तोच
In reply to हो मीच तो. नाहीतर तोच by प्रसाद१९७१
ओह
In reply to ओह by कविता१९७८
एक हि मारा पर क्या सोल्लिद
In reply to एक हि मारा पर क्या सोल्लिद by पिंपातला उंदीर
:D
In reply to ओह by कविता१९७८
असलोच तर नक्की देशप्रेमीच
In reply to असलोच तर नक्की देशप्रेमीच by प्रसाद१९७१
टोचाभाउ
In reply to टोचाभाउ by कविता१९७८
तसेही
In reply to असलोच तर नक्की देशप्रेमीच by प्रसाद१९७१
अस कस प्रसाद राव ? तुमचा
In reply to अस कस प्रसाद राव ? तुमचा by पिंपातला उंदीर
अचानक भगतसिंग राजगुरू आठवायला
In reply to असलोच तर नक्की देशप्रेमीच by प्रसाद१९७१
तुमचे एक बरे आहे.
In reply to तुमचे एक बरे आहे. by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही केला की चमत्कार,
In reply to ओह by कविता१९७८
माझं वेगळ मत...
आम्ही इथ चालु आहेत त्या बघत
त्याचाच बदला घेण्यासाठी....
झी कुणाचं चॅनेल आहे बरं? आणि
In reply to झी कुणाचं चॅनेल आहे बरं? आणि by प्यारे१
बाकी सीरियल बघून देशकार्य
हा धागा पाहून तूनळीवर एक भाग
व्वा!!! मस्त!!!!! छान!!!!!!
आधे अधूरे