जेएनयूतला अराज्यवाद (?)
- डॉ. सुधीर रा. देवरे
9 फेब्रुवारी 2016 ला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेची चित्रफित मी 10 फेब्रुवारीला पाहिली! विद्यार्थ्यांच्या देशाविरूध्द जोशातल्या घोषणा ऐकून खूप अस्वस्थ झालो. दुसर्ंया दिवशी विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या- ऐकल्यात तर अजून चक्रावलो. हा काय प्रकार आहे? काय लिहावे. लिहू का नको वाटले. पण आत खदखदत राहिलो. 10 फेब्रुवारीला दाखवली गेलेली चित्रफित खोटी होती म्हणे. म्हणून सुधारीत 11 फेब्रुवारीला प्रसारीत केलेली चित्रफित पाहिली. घोषणांचा आशय तोच होता. जेएनयूतले काही विद्यार्थी बदलले तरी घोषणा भडकाऊ होत्याच.
मिसळपाव