ढग, पाउस, आठवणी आणि भावना यांच्यात काही नाते आहे का?
औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली. मग काम बंद करून बाहेर येउन बसलो.एरवी मला लहानपण, शाळा, पाऊस यांच्याविषयी बोलणं भावनाप्रधान आणि मूर्खपणाच वाटतं पण या प्रचंड शहरात, माणसांच्या गर्दीत, आठ-आठ दहा-दहा मजली इमारतींमध्ये, आपण येउन पडलो हे वाईट कि चांगले हे कळायला मार्ग नाही.
हि झाडं, जमीन, माती, पक्षी, प्राणी, घरातल्या साखरेच्या डब्ब्याला लागलेल्या मुंग्या यांनाही माझ्यासाराखच श्वास कोंडल्यासारखं वाटत नसेल का हा विचारही मनाला चाटून गेला. खरं तर आपणही या निसर्गाचाच एक भाग.. अगदी या नारळाच्या झाडासारखं पण याच्यात आणि आपल्यात एक फरक आहेच, हे माझ्यापेक्षा कितीतरी निरागस आहे, लहान मुलासारखं. राग, लोभ, मत्सर, वासना, तिरस्कार, एकटेपणा, धिक्कार, स्वाभिमान, दुख, आनंद, इच्छा, अपेक्षा, दया असल्या कितीतरी अर्थशून्य आणि अस्सल मानवी भावना आपला पिच्छा स्वप्नातही सोडत नाहीत.
जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात जपून ठेवलेला, लहानपणीचा रम्य गाव नुकत्याच उगवलेल्या गवताच्या हिरवट पोपटी पात्यांसारखा डोळ्यासमोर येऊ लागतो. आई, आजी, भाऊ, शेणाने सारवलेल्या ओसरीत बसून पेरणीची चर्चा करणारे काका आणि आजोबा, घरातला स्वयंपाकाचा धूर, धगधगणारी चूल, घरात आणि पटांगणात वावरणाऱ्या त्यावेळच्या भावाबहिणींचे चेहरे, शेजारपाजारच्या आज्या, एकत्र जमून पापड्या, कुरडया, शेवया करणाऱ्या प्रेमळ बाया, उगाच माझा गालगुच्चा घेऊन मला चिडवणारी त्यावेळची ती अनोळखी बाई, गावातल्या मारुतीच्या पारावर जमणारी माणसे आणि त्याचं हसणं खिदळणं..असं ते नितांत सुंदर आणि शुद्ध पवित्र असं जग चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे येत
खरं म्हणजे या निवडक आठवणी सोडल्या तर आपल्याजवळ काहीच नाही, मग कशाला हा लहानपणीचा भव्य डोलारा डोळ्यासमोर आणून आठवून आठवून बाटवून टाकायचा? तापेक्ष्या त्याला जपून ठेवावा.. आठवणींच्या सुन्न काळोखात... झाडांच्या मुळासारख आणि त्यापासून ओलावा घेत जगत राहावं या असल्या भावनेचा दुष्काळ असलेल्या दरिद्री शहरातले निरर्थक उपद्व्याप करत...
तासभरनंतर परत उन पडायला सुरवात झाली आणि राहिलेलं काम करण्यासाठी हातातला थंड झालेला कपभर चहा संपवून परत कामात बुडून गेलो..
(शीर्षक सुचत नव्हते.. म्हणून शेवटच्या क्षणी जे सुचले ते टाकले)
वर्गीकरण
सुंदर रे भावा........
चांगलं लिहिलंय
In reply to चांगलं लिहिलंय by पैसा
मान्य आहे..
In reply to मान्य आहे.. by निशांत_खाडे
मला ओलम्हणायचे होते :-)
In reply to मान्य आहे.. by निशांत_खाडे
मला ओल म्हणायचे होते :-)
मोकळ्या माळातुनी वाहतो वारा
गावात तेव्हां लाईट गेली होती.
गावाकडची एक संध्याकाळ... ढग
मनाचं आणि निसर्गाचं काही नातं नसतं
धन्यवाद
मनाचं आणि निसर्गाचं नातं असतं
In reply to मनाचं आणि निसर्गाचं नातं असतं by विजय पुरोहित
हाहा
In reply to मनाचं आणि निसर्गाचं नातं असतं by विजय पुरोहित
नातं नसतं
In reply to नातं नसतं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डीबी अण्णा...
In reply to डीबी अण्णा... by विजय पुरोहित
असं का बुवा ?
In reply to असं का बुवा ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to नातं नसतं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वावा! प्राध्यापक डॉक्टर संपादक दिलीप बिरुटे साहेब!
डी.बी. सर काय तुम्हीपण नवीन
In reply to डी.बी. सर काय तुम्हीपण नवीन by विजय पुरोहित
कुत्सित नाही
In reply to कुत्सित नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब!
In reply to प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब! by निशांत_खाडे
अरे यार झोपू की नको.
In reply to अरे यार झोपू की नको. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वावा! प्रतिसाद आवडला!
In reply to वावा! प्रतिसाद आवडला! by निशांत_खाडे
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे असे म्हणा हो..
हो
In reply to हो by सतिश गावडे
पटले पटले!
In reply to हो by सतिश गावडे
कसं काय होत असावं हे सगळं? नै
In reply to हो by सतिश गावडे
काहो गावडे साहेब,एक सांगा
In reply to काहो गावडे साहेब,एक सांगा by श्री गावसेना प्रमुख
प्रेयसीची आठवण येऊ द्या नायतर
In reply to प्रेयसीची आठवण येऊ द्या नायतर by जेपी
तेव्हाच तर बिरुटे साहेब
In reply to प्रेयसीची आठवण येऊ द्या नायतर by जेपी
जेपीशी सहमत आहे. एखादी
In reply to जेपीशी सहमत आहे. एखादी by सतिश गावडे
म्हणजे प्रेयसी ही भीतिदायक
In reply to म्हणजे प्रेयसी ही भीतिदायक by श्री गावसेना प्रमुख
ते ढग कुठल्या दिशेने येतात
In reply to ते ढग कुठल्या दिशेने येतात by सतिश गावडे
आणि पाऊस पडलाच नै तर?
In reply to आणि पाऊस पडलाच नै तर? by प्रचेतस
आठवणी येणार नाहीत; ओल्या
In reply to आठवणी येणार नाहीत; ओल्या by सतिश गावडे
कोरडं कोरडंच वाटून राहील का
In reply to कोरडं कोरडंच वाटून राहील का by प्रचेतस
होय...
In reply to होय... by सतिश गावडे
=))
In reply to होय... by सतिश गावडे
किंवा
In reply to किंवा by नाखु
नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या
In reply to किंवा by नाखु
नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या
In reply to नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या by प्रचेतस
च्छ्या
In reply to च्छ्या by नाखु
तुमच्या चारोळ्यांमुळे तुम्ही
In reply to तुमच्या चारोळ्यांमुळे तुम्ही by प्रचेतस
आम्च्या साध्या
In reply to जेपीशी सहमत आहे. एखादी by सतिश गावडे
सतिश गावडे - Thu, 25/02/2016
सतिश गावडे - Thu, 25/02/2016 - 09:51 जेपीशी सहमत आहे. एखादी प्रेयसी करून स्वतःच अनुभव घ्या. ;डोळे ओलावले..;)In reply to सतिश गावडे - Thu, 25/02/2016 by जेपी
जेपी तात्या तुम्हाला
भावना आणि व्याकरण यांच्यात काही नाते आहे का?
In reply to भावना आणि व्याकरण यांच्यात काही नाते आहे का? by वेल्लाभट
प्रयत्न सुरूच आहेत.