Skip to main content

साहित्यिक

< < < < मजबूरी हय > > > >

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

समरस व्हावे ऐसे

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/05/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/05/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्र‍तिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही.

मी अश्व!!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 21/04/2016 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

तू फूल कुणाचे देखणे?

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/04/2016 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

साथ : एक आकलन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/04/2016 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
साथ : एक आकलन - डॉ. सुधीर रा. देवरे साथ हा रस्त्यावरचा दीप क्षीण तेजात तेवतो एकटा भीषण काळोखात - तिष्ठते कुणि तरी समोरच्या खिडकीत ; केव्हढी तयाची सोबत आणिक साथ. - इंदिरा संत साथ! श्रीमती इंदिरा संत यांची ही कविता. फक्‍त आठ ओळींची आणि दोन कडव्यांची आहे. या कवितेतला प्रत्येक शब्द महत्वाचा असून कविता आस्वादण्यापूर्वी तिच्या शब्दांचा – म्हणजेच तिचा भाषिक पसारा पाहू : हा - कोणताही दीप नव्हे. विशिष्ट दीप.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 13/04/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

गच्ची

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/04/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो. उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही.

२. सु.शिं.चे मानसपुत्र- दारा बुलंद

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 07/04/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
१. सु.शिं.चे मानसपुत्र

दारा बुलंद

मागच्या काही भेटीमध्ये सुगंधा काकूंनी (सुगंधा सुहास शिरवळकर) त्यांच्या आठवणी सांगताना एक अशीच आठवण सांगितली. जी बहुदा सुहास शिरवळकर: असे आणि तसे मध्येही आली आहे. सु.शिं.ना भेटायला त्यांचे अनेक फॅन्स महाराष्ट्र , देशभरातून आणि परदेशातून यायचे. त्यातल्या काही मुली खास करून दारा बुलंदला भेटायचे म्हणून सु.शि. आणि काकूंकडे हट्ट धरायच्या. मग त्यांची समजूत काढता काढता शिरवळकर द्वयींच्या नाकी नऊ यायचे.