घोळक्याने केले जाणारे 'वर्तमानपत्री' लिखाण- आणि नव्या लेखनाविषयीची असहिष्णुता- भाग एक
मिपावर मी दोन दिवसांपूर्वीच आलो आहे. तसे मिपाचे वाचन खूप दिवसांपासून करत आहे. आज आल्या आल्या एक शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले.
प्रथम, वर्तमानपत्री लिखाण याविषयीचा माझा समज म्हणजे निरर्थक ताणून धरलेले आणि मराठी भाषेला परिचयाचे नसलेले किंवा 'रोमांटीक लव' सारख्या पाश्च्यात संकल्पनांना मराठीतल्या शृंगार रसाशी जुळवून मुक्तछंदात लेखन करणारे कवी आणि तत्सम लेखक यांचा लेखन प्रपंच.
याचेच एक उदाहरण म्हणजे फक्त वाचकांना रंजक वाटावी याच हेतूने लिहिली जाणारी आधुनिक प्रकारची धड गद्यही नाही आणि पद्यही नाही अशी कथा. या कथा म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या मराठीतल्या वाचानापैकी सर्वात क्षुद्र वाङमय प्रकारात मोडतील.
काही तरी एक दोन चमत्कृतीपूर्ण किंवा 'शृंगारिक' मानसं किंवा घटना चोळून चोळून चार-पाच पानं क्रमशः धूर्तपणाने लिहिणार्यांची आजकाल खूप गर्दी झाली आहे. एक तर अशा प्रकारच्या तीन चार पानात एवढा कमी भाषीक अवकाश अभिप्रेत असतो कि त्यात फारसे काही सांगता येतच नाही.या जानुबुजून आणलेल्या रंजकपणामुळे अतिशोक्तीकडे कल वाढतो आणि लेखनात चटपटीत पणा हा एक गुण होऊन बसतो अर्थात हा उद्योग वर्तमानपत्रात आणि नियतकालीकातच होतो. सोशल मेडिया हेही एक नवीन साधन आता या लोकांनी हाताळायला सुरुवात केली आहे.
खरे म्हणजे 'कथा' या प्रकारात लिहिण्यासाठी भाषेवर भलताच ताबा असणे महत्वाचे असते, कवितेसारखे. पण हि नवलेखक मंडळी उगाच मानसिक, भावनिक, शृंगारिक किंवा जाणूनबुजून अंधुक ताण मांडतात आणि 'आभाळ भरून आले होते', 'बाहेर उन मी म्हणत होते', असली रटाळ पद्यात्मक वाक्ये वापरून वरील अटीला पद्धतशीर कलाटणी देतात. हा हातखंडा यायला खरच एक अनुभवी वर्तमानपत्री व्हाव लागतं हे मात्र मला मान्य.
याच लेखकातली काही मंडळी वर्तमानपत्रात 'फालतू' समीक्षणे करतात. आणि अमुक नवकवींची कविता हि "प्रत्येक वेळी वाचल्यावर नवा अर्थ सांगते" असली धाडसी विधाने करतात. खरतर हे सगळे लेखक आणि कवी टोळ्यांनी कार्यरत असतात. एकमेकांची स्तुती करून हे मोठेपणा मिळवतील आणि आयुष्यभर फक्त लेखक किंवा कवी म्हणवून घेण्यासाठी हे फुकट लिखाण करतील. मग हेच टोळके म्हातारे होता होता प्रतिष्ठित 'साहित्यिक' होऊन बसतील आणि चांगले लिखाण करणाऱ्या एखाद्या नवख्याला मुर्खात काढतील.
नावाच्या अगोदर 'प्राध्यापक' 'डॉक्टर' 'कवी' किंवा 'साहित्यिक' ह्या पदव्या लावणे यांच्यासाठी साहित्यापेक्षाही महत्वाचे असते. कुणी काही बोलायला जावे तर 'तुम्ही काय समीक्षक आहात काय?' किंवा "हा साहित्याचा एक नवा प्रकार आहे" असली ठराविक ठेवणीतली उत्तरे देऊन मोकळे होतात. च्यायला वाचा म्हणावं एकच कविता वीस वेळा आणि सांगा वीस वेगवेगळे अर्थ.
अजूनही काही लिहायचे आहे पान आता रात्रीचे दीड वाजत आलेत नंतर कधीतरी याच लेखाचा दुसरा भाग आणखीन विस्तारित लिहीन म्हणतोय. राग येऊ द्या हवे तर, पान आपण लिहायाला घाबरत नाही ब्वा!
(मिपाच्या या सोफ्टवेअरचा अनुभव नसल्याने काही शब्द चुकीचे लिहिले गेले आहेत. चू.भू.द्या.घ्या.)
वर्गीकरण
भाग दोन लिहिण्याआधी जरा सबूर!
हे असले "अस्सल" मासिक चालवणारे वर्तमानपत्री लिखाण सोडून इतर काही लिहिण्याच्या (किंवा वाचण्याचा), प्रयत्न करत जा एवढी एकच माझी आपणाला विनंती आहे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब. (माझा असा समज आहे कि तुम्ही "प्राध्यापक" म्हणून मराठी साहित्य किंवा कविता यांचे अध्यापन करत नसाल. आणि तो खरा ठरावा यासाठी मी नवस करतो आहे.)आणि हो 'कमाल राशीद खान' नावाचा एक अतिशय नामांकित अभिनेता आहे. तुम्ही त्यालाच ट्विटर वर फोलो करा आणि त्याचेच लेखन वाचा! तुमची भावनांविशयीची उदासीनता पाहता तेच योग्य ठरेल..प्रा. डाँ ना मी व्यक्तिश: भेटलेलो नाही, पण त्यांचं भावपूर्णच (आणि अगदी साहित्यिक मूल्य वगैरेही असलेलंही) नव्हे तर अभ्यासपूर्णही असलेलं लिखाण मात्र नक्की वाचलेलं आहे. काही दुवे मी खाली देतो आहे, आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा वाचा. पण जिथे लेखक-वाचक (थट्टा-मस्करी करीत का असेना, पण) एकमेकांकडून काही चांगलं वाचायला मिळावं म्हणून अशा संस्थळांवर येतात तिथे असा तिरीमिरीचा संताप सोडलात तर तुमचंच भलं होईल. सर, इतकं जिवापाड प्रेम करु नका! बालकवी अंत:स्थ कोणता मानू मी विठठल? मी अशा वैयक्तिक वादांमध्ये सहसा पडत नाही, पण तुमच्याकडून व्यक्तिशः काही चांगलं वाचायला मिळेल अशी आशा आहे, त्या अपेक्षेवर असले नसते वाद घालून पाणी ओतू नका.In reply to भाग दोन लिहिण्याआधी जरा सबूर! by बहुगुणी
सहमत.
ओ, अच्च जाल्ल खाडे बाबुला
येऊद्या पुढचा भाग.
In reply to येऊद्या पुढचा भाग. by जेपी
=))
In reply to येऊद्या पुढचा भाग. by जेपी
=))
In reply to =)) by पैसा
=))
In reply to =)) by अजया
हणु मोदन
In reply to =)) by अजया
म्हणजे ते भावी संपादक नाहीयेत
अजून येऊ द्या...
In reply to अजून येऊ द्या... by सतिश गावडे
आणि असा आपला समज आहे आणि
In reply to आणि असा आपला समज आहे आणि by प्रचेतस
धन्यवाद...
In reply to आणि असा आपला समज आहे आणि by प्रचेतस
तुम्हाला स्व गवसलेला नाही
In reply to तुम्हाला स्व गवसलेला नाही by मोदक
=))
In reply to तुम्हाला स्व गवसलेला नाही by मोदक
खी खी खी.अगदी अगदी.
In reply to खी खी खी.अगदी अगदी. by प्रचेतस
तुम्हा
कुंथुनाथाय नम :
In reply to कुंथुनाथाय नम : by स्पा
दुधूनाथाय नम :
In reply to दुधूनाथाय नम : by अत्रुप्त आत्मा
अरे क्काय हे...
In reply to अरे क्काय हे... by प्रचेतस
तुम्ही
In reply to अरे क्काय हे... by प्रचेतस
आवरा!! =)) =)) =))
In reply to दुधूनाथाय नम : by अत्रुप्त आत्मा
अरे सत्यनारायणा...
In reply to दुधूनाथाय नम : by अत्रुप्त आत्मा
पुचुपुचुओढायनम :?
In reply to दुधूनाथाय नम : by अत्रुप्त आत्मा
ठरकी आत्मा =)) =)) =))
ते
In reply to ते by बोका-ए-आझम
दू दू दिलिहीलंय की हो वर
लिहीलंय की हो वर स्पावड्याला...दिबहुगुणींच्या प्रतिसादाशी सहमत
धन्यवाद
वर्तमानपत्री' लिखाण-
In reply to वर्तमानपत्री' लिखाण- by महासंग्राम
वरी लिहिलीच आहे कि..
In reply to वरी लिहिलीच आहे कि.. by निशांत_खाडे
मराठी भाषेला परिचयाचे नसलेले
उदाहरणे
वर्तमानपत्री लेखन असंच असणारे