Skip to main content

साहित्यिक

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 27/12/2015 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतले आपण, आपले आपले. गुलाब काढा, मोगरा लावा मोगरा काढा, मरवा लावा, मरवा काढा, सुगंध ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला सुगंध आपला आपला. खुर्ची काढा, झोपाळा लावा, झोपाळा काढा, चटई टाका, चटई काढा, मोकळीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतली स्पेस आपली आपली. काचा काढा, गज लावा गज काढा, पडदे लावा, पडदे काढा, उघडीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला प्रकाश आपला आपला. असणे नको, नसणे नको, आता कुठला ध्यास नको, कुठे फुलला, कुठे अडकला, असला मिळमिळ श्वास नको, मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला श्वास आपला आपला.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 22/12/2015 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते. "वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले." सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली. "आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत." ग्रेगने आपला ग्लास उंचावला! "ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!" ग्रेगने मनिषकडे बघितले! मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला. "तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!" आर.एम.

घोस्टहंटर-४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 19/12/2015 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या कडेला एक जुनाट हॉटेल होती.बघणारा तिथे कधी गेलाच नसता. एक माणूस शांतपणे सिगार पीत होता! बाहेर कार येऊन थांबली. कारमधून उतरणारा सरळ हॉटेल मध्ये आला! "मनिष तुला हजारदा सांगितलंय की इथे येण्यासाठी कार वापरायची नाही!" "सॉरी ग्रेग." "तू मी दिलेले कागद वाचलेस?" "हो आणि ग्रेग ही खूपच विचित्र केस आहे." "म्हणून मी तुला इथे यायला लावलं." मनिषने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो शांतपणे बोलू लागला. "पण मला याचा मार्ग सापडला आहे!" ग्रेग उडालाच! "मी जोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये मनिष!" "मी जोक करत नाहीये.तुला ती अन्ड्रिआ कुठे भेटेल हे बघायच होतं ना!" "हो आणि?" "ती तुला भेटेल, मात्र एकच ठिकाणी!" कुठे?

घोस्टहंटर-३

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 18/12/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
१६६५! इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले! काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता! ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता! मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती! आंद्रे!!!!! "ब्रॅक्स्टन!" "कोण?" "मी लाओ!" लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता. "बोल लाओ." "ईशान्येला सैन्य हलवा!" ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही! ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला! आणि लाओने पहिला जीव घेतला.

अहिराणीच्या निमित्ताने बोलींचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/12/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक कानाकोपर्‍यात ती बोलली जाते. मात्र यापैकी काही बोलीभाषा आज नामशेष झाल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात, हा बदल आपल्याला ज्ञातच आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच वापरली जात होती. परंतु आज तीच भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावलेली दिसून येते.

विज्ञान लेखमाला : आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 15/12/2015 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शशक स्पर्धा, श्री गणेश लेखमाला अशा यशस्वी उपक्रमांनंतर आम्ही घेऊन येत आहोत : विज्ञान लेखमाला. आधीच्या दोन उपक्रमांप्रमाणेच याही उपक्रमाला तुमच्या सहभागाशिवाय शोभा येणार नाही. तुमच्या भरघोस आणि उत्साही प्रतिसादाची आस धरून आज आम्ही ही घोषणा करत आहोत. जगभरातले शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान परंपरा, वहिवाटीपेक्षा वेगळ्या विज्ञान कक्षा, विज्ञानातल्या गंमतीजंमती अशा अनेक विविध विषयांवर आम्हाला लेखन अपेक्षित आहे.

कडेमनी कंपाऊंड

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/12/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कलत्या उन्हात, कोण अंगणात? तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण आकाशात? फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण झाडात? झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण उरात? एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण गॅलरीत? असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!

काहीसे ललित.....

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 04/12/2015 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर आता शोध लागल्या सारखा वाटतो ! पण तसं नसतं, खूप लांब असलेलं धेय, अगदी जवळ आल्या सारखं वाटत, तसा अंधारात चालताना मी सावध असतो, पण अंधार त्याहूनही सावध, फक्त घनदाट काळोख दाखवतो, मग स्वप्ने तुमची तुम्हीच पहा, रात्र आणि स्वप्ने हे गणित तुमच्यासाठी, स्वप्नांना काय ? तुम्ही रात्री बघा नाही तर दिवसा, टाळु म्हणता न टाळता, काट्याची वाट धरायची, काटा का ये म्हणतो ? तरी पण जाणून न जणल्यासारखे करायचे, भांपकपणा दुसरे काय ! आता मला काय वाटते आणि शरीराला काय वाटते ? ह्याचा विचार मी करायचा की शरीराने ?