मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

अंदाज अपना अपना....

सरनौबत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पावसाळ्याच्या काळात हवामान खात्यातील कर्मचारी दिवसभर पावसाचे अंदाज वर्तवून कामकाज आटोपून घराकडे निघतात. निघताना कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांना बजावतात,‘रात्री दारं खिडक्या नीट लावून घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो!’. सतत चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान विभाग हा एक विनोदाचा विषय बनून राहिलाय. हवामानाच्या अंदाजाची सतत थट्टा होऊ नये म्हणून आता हवामान खातं वाऱ्यानुसार दिशा बदलतं. अधून-मधून जरा सावध पवित्रा घेतात. दर वर्षी ‘१० जून ला पावसाचे आगमन होण्याची शक्यता’ म्हणायचं. नाही आला तर ‘उशीरा चालू होईल’ सांगायचं.

पुस्तक

शिव कन्या ·
ते पुस्तकच आहे. दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड. एकदा तू वाचलेलं. तू तिथं नसताना मी वाचलेलं. तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही. एकदा तू, नंतर मी. कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली मी तुझे डोळे वाचले. ते पुस्तकच आहे? अजूनही? दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड... -शिवकन्या

लॉटरी

aanandinee ·
लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे ते कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं.

पारिजात मनातला

मनीमोहोर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी . पारिजातकाची अगदी पहिली आठवण खुप लहानपणीची आहे . वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही खूप घरं बदलली . त्या पैकी एका घराच्या अंगणातच खूप मोठं परिजातकाचं झाडं होतं . श्रावण महिन्यात ते बहरलं आणि रोज अंगणात फुलांचा सडा पडू लागला . आमची आजी देवभोळी होती . तिने प्राजक्ताचा लक्ष शंकराला वहाण्याचा संकल्प केला .

नावात बरंच काही असतं!

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे नावात काय आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्याला शेक्सपिअर हे नाव आठवतं. हो, फक्‍त नावच आठवतं. कारण शेक्‍सपिअर नावाची व्यक्‍ती कोणी पाहिली? निदान मी तरी नाही. व्यक्‍तीच काय पण शेक्‍सपिअरचं छायाचित्रही मी अद्याप पाहिलं नाही. आपण पाहतो ते शेक्‍सपिअरचं चित्र आहे. असो. म्हणजे नावात काय आहे, हे वाक्‍य म्हणायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात नावात बरंच काही असतं. नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं. लग्नपत्रिका मिळाली. वराचं नाव वाचलं. तेजेंद्र उर्फ बंडू आणि कंसात नाना. नावाखाली एम एस ई बी असं लिहिलेलं.

एक red wine नातं!

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ती त्याच्याहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होत. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही त्याची आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतेच इंटरनेट सुरु झाले होते. भेटण कमी व्हायचं दोघांच. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा व्ह्यायच्या. ती त्याला सतत चिडवायची कोणत्या ना कोणत्या मुलीवरून. तो ते एकदम खेळीमेळीने घ्यायचा. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. त्याच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् त्याचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तस काही झाल नाही.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

एक ट्रेक ---- झपाटलेला (भाग १)

अमर विश्वास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. 1995 च्या डिसेंबरची एक रात्र,, साधारण आठची वेळ... स्थळ : आनंद नगर मधला एक फ्लॅट... चार मित्र कोंडाळ करून बसले आहेत.. कुणीच काही बोलत नाही... प्लॅंचेट वगैरे काही नाही.. तसाही माझा असल्या गोष्टींवर विशवास नाही.... हो.. पण आधी आमची ओळख करून देतो.. आम्ही चौघ... विन्या, सुन्या, मन्या आणि मी म्हणजेच अम्या किंवा अमर्या किंवा.. जाउदे सगळीच टोपणनावे सांगण्यासारखी नाहीत. चौघही इंजिनियरिंगचे विद्यार्थी. परिक्षा, व्हायावा नुकत्याच संपलेल्या.. त्यामुळे श्रमपरिहार करायला आम्ही एकत्र जमलो होतो. या सुट्टीत काय करायचे हाही विषय होताच. च्यायला..

विवाह: परंपरा आणि प्रतिष्ठा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे विवाह कसे छोटेखानी असावेत, लग्न खर्च कसा कमी असावा, हुंडा घेणे बेकायदेशीर आहे अशा चर्चा नेहमी ऐकू येतात. पण प्रत्यक्षात परंपरा टाळण्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. हा लेख दुसर्‍याला सांगण्यासाठीचा केवळ उपदेश नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी माझ्या मुलीच्या विवाहाबद्दल बोलतो. (आधी केले मग सांगतोय): माझ्या मुलीचा विवाह ठरवताना मुलीच्या संमतीने मी काही अटी घातल्या होत्या.

विरगावचा भोवाडा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे मी लहान होतो तेव्हा दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत- वैशाख महिण्यात आमच्या विरगावला भोवाडा व्हायचा. अजूनही भोवाड्याची परंपरा विरगावला कायम असली तरी पूर्वीसारखं दरवर्षीचं सातत्य आता उरलं नाही. चैत-वैशाख म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात शेतकर्‍यांना फारशी कामं नसतात. म्हणून खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातली लोकरंजन भोवाड्याची लोकपरंपरा आताआतापर्यंत टिकून राहिली असावी. मात्र अलिकडे रंजनाचे अनेक माध्यमं उपलब्ध झाल्याने हा लोकपरंपरेचा प्रकार क्षिण होऊ लागला. भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावकर्‍यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे.