समाधानाचे मुखवटे भाग - १
सलग दोन दिवस आणि रात्री झालेल्या अखंड जागरणामुळे त्याला कसलीतरी धुंदी आल्यासारखे वाटत होते, पूर्णपणे नशेत असल्यासारखी भावना. डोळेही भयंकर जळजळ करत होते. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता, जरा वेळ इकडे तिकडे केले कि त्याला प्रचंड उत्साह येई, मग अचानक आजूबाजूचे लोक, घटना हास्यास्पद वाटत. आणि मग अचानक थकवा. सखोल थकवा..
आता एकदाची गाडी आली म्हणजे दहा बारा तास ह्या अवजड पिशव्यांपासून सुटका होईल आणि निवांत झोपता येईल. असा विचार करत तो बसस्थानकावर कसा बस वेळ काढत होता.
मिसळपाव