आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी

लेखनविषय:
आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे.

तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

लेखनप्रकार
पावसात जळाया लागलो... या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १० दिवस ज्याच्या साक्षीने ऐश केली त्या गणपती बप्पाला त्याच्या घरी पोचवायला आम्ही मिरवणूकीने निघालो होतो. मोठे मोठे डिस्कोलाईट होते आणि डिजेचा फुल साउंड सोडला होता आणि आम्ही सगळेजण त्याच्या तालावर बेभान होउन नाचत होतो. बर्‍याच वेळेला गाणे कोणते चालले हे पण समजत नव्हते. फक्त रीदम ऐकून मी त्यावर नाचत होतो. कारण मी जवळजवळ गेले १० तास त्या मिरवणूकीत नाचत होतो पण अजून मनाचे समाधान होत नव्हते. आजूबाजूला मिरवणूक बघायला येणारे लोक सारखे बदलत होते.

आमचेही प्रवासवर्णन…

लेखनप्रकार
Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्‍याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा) आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं. ******************************************************** मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो.

सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत

लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी. तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत. ..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया. मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना ! तो हो ज्जाव सुरू !!!

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखनविषय:
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

मलाही कविता सुचली

मलाही कविता सुचली मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।। सक्काळी सक्काळी उठून ब्रशला पेस्ट मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। १ ।। आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। २ ।। हाफिसात निघताना बुटाची लेस मी बांधली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ३ ।। बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ४ ।। कवी - अथक घासकडवी (माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती . तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )

(सई)

जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते. मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही. माझी सई तशी बोल्ड आहे सीन आणि सिनेमाची गरज पाहून काय आणि कसं करायचे ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी हातात काही काम नसेल तर रीअ‍ॅलीटी शोची अँकर बनणेही जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस दिग्दर्शक रोल देत नसेल तर त्याची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई त

विश्वास वासावरचा

आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या
Subscribe to पाकक्रिया