पावसात जळाया लागलो...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
8 Jun 2015 - 8:37 pm

प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो

आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई

येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो

कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला

पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो

सांत्वनाप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

कोणाचं काय, तर कोणाचं काय!! =))

वेल्लाभट's picture

8 Jun 2015 - 8:49 pm | वेल्लाभट

हेच म्हणतो

प्रचेतस's picture

8 Jun 2015 - 8:55 pm | प्रचेतस

कसं काय सुचतं ओ तुम्हाला?

श्रीरंग_जोशी's picture

8 Jun 2015 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी

हाच प्रश्न मलाही पडतो.
वरीजनल ठावं नाय पर हे जे बी हाये, ते लय भारी.

अनुप ढेरे's picture

8 Jun 2015 - 9:06 pm | अनुप ढेरे

हा हा हा... भारी!

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 9:23 pm | टवाळ कार्टा

पाताळेश्वराजवळ सुचली का हि क्वीता?

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jun 2015 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा

नाही.
पात्तळेश्वरा जवळ सुचली असणार! ;-)

हापिसात असताना ढ़णाजीराव त्या एकांतवासी स्थानात नेहमी अधून मधून जात असतात.
बरुबर ना हो स.गा. ? ;-)

सतिश गावडे's picture

8 Jun 2015 - 10:35 pm | सतिश गावडे

तुमच्यासारखे "त्या एकांतवासी स्थानी" गेल्यावर सुचायला ही शौच काही कविता नाही. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jun 2015 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी बरोब्बर ! मलाही शौच काव्य तिथे कधीच सुचलेली नाहित. पिकत तिथे विकत नाहीच! ;-)

प्रचेतस's picture

8 Jun 2015 - 10:57 pm | प्रचेतस

मग कुठे सुचली?

सतिश गावडे's picture

8 Jun 2015 - 10:59 pm | सतिश गावडे

मलाही शौच काव्य तिथे कधीच सुचलेली नाहित.

मग तुम्हाला शौच काव्य कुठे सुचतात?

पिकत तिथे विकत नाहीच

म्हण अस्थानी वाटते. म्हणजे काही टोटल लागत नाही. जरा इस्कटून सांगता का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पिकायला काय तिकडे आढी लावलेली असते का? बेसिक प्रश्ण!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jun 2015 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

संदर्भा पेक्षा आशया कडे पहा चिमणराव! :-D

प्रचेतस's picture

9 Jun 2015 - 7:02 am | प्रचेतस

तुम्ही वरच्या प्रश्नांना हुशारिने बगल दिलेली दिसत्ये.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा

तो तुमचा भ्रामक भ्रमवाद आहे! ;-)

भ्रमवाद भ्रामक असणे म्हणजेच तो भ्रमवाद नसणे. ;)

बॅटमॅन's picture

9 Jun 2015 - 12:13 pm | बॅटमॅन

क्या बात है!

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2015 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

वरील संवाद आवडला नाही :-\

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एखाद्या सदस्याची किती टर उडवावी हे आपल्याला कळायला हवेय. एखादा माणूस चिडत नाही म्हणून त्याची कितीही चेष्टा करायची हे पटत नाही..

#हीणसंवाद

सूड's picture

9 Jun 2015 - 2:25 pm | सूड

#हीणसंवाद

बॅटमॅन's picture

9 Jun 2015 - 2:26 pm | बॅटमॅन

लिहिल्या कमेंटीवर अशी टीका करू नये.

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 2:31 pm | सतिश गावडे

अशी टिका करू नये तर कशी करावी?
आपण साक्षात भाषाप्रभू पाणिनी आहात. आपणच आम्हा अडाण्यांना मार्गदर्शन करावे.

बॅटमॅन's picture

9 Jun 2015 - 2:38 pm | बॅटमॅन

तो कमेंटवाला आला होता का सांगत 'माझ्या कमेंटीला प्रतिप्रतिसाद द्या' म्हणून?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा

@ म्हणजेच तो भ्रमवाद नसणे>> :-D तुम्ही निरर्थक स्वात्मवादाचे बळि आहात! :P

एकदा कशाचे बळी ते नक्की ठरवा राव.
कधी म्हणताय भ्रामक भ्रमवाद तर कधी म्हणताय निरर्थक स्वात्मवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा

=))))))))))))

आदूबाळ's picture

8 Jun 2015 - 9:39 pm | आदूबाळ

भारी!

मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं. माझ्यासारखे जे झंगड असतील त्यांना "कल्लूळाचं पानी..." हे गाणंही आवडेल.

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 1:17 pm | सतिश गावडे

मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं.

मलाही. पाच वर्षांपूर्वी मी त्या गाण्याचं रसग्रहण केले होते.

एकदा जुन्या हायवेने मुंबईला जात होतो. वाटेत खोपोलीला पेट्रोल टाकायला पंपात गेलो. गाडीत हे गाणं जोराने वाजत होतं. मी गाडीतून बाहेर पडताच पेट्रोल टाकणारा पोऱ्या माझ्याकडे अनाकलनीय नजरेने पाहू लागला. बहुतेक त्याला माझी गाडी, माझा गेटप आणि गाडीत वाजणारे गाणं याची सुसंगती लागत नव्हती.

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 1:19 pm | सतिश गावडे

दुहेरी प्रतिसाद.

सदस्यनाम's picture

9 Jun 2015 - 2:23 pm | सदस्यनाम

दुहेरी प्रतिसाद.

अर्थात..
व्यक्तिमत्वच दुहेरी दिसतय.
पंप वाला पोरगा त्यमुळेच पाहात असेल औत्सुक्याने.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जमेश.

कोणाला कशाचं नि बोडकीला केसाचं!! =))

प्रसाद गोडबोले's picture

8 Jun 2015 - 10:29 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर कविता गावडे सर !

किसन शिंदे's picture

8 Jun 2015 - 11:38 pm | किसन शिंदे

हेच म्हणतो.

बर्‍याच दिवसांणी गावडे सरांनी झक्कासपैकी लोकगीत लिहीलेय.

मितभाषी's picture

8 Jun 2015 - 10:38 pm | मितभाषी

सलाम
:)

मित्रहो's picture

8 Jun 2015 - 11:12 pm | मित्रहो

शब्द भारी, भाव भारी
सारी कविताच लय भारी

रमेश आठवले's picture

9 Jun 2015 - 7:56 am | रमेश आठवले

बरेच वर्षा पूर्वी बडे गुलाम अली खान यांच्या ठुमरी मध्ये हे बोल ऐकले होते
-क्या तमाशा है के बारीश मे घर जलता है-
जाणकाराना विचारल्यावर त्यांनी याचा अर्थ असा समजाऊन सांगितला होता- विरहिणी नायिका अश्रु ढाळत असते व ते तिच्या वक्षावर पडत असतात-
हे पाहून शाय्र्र म्हणतो
क्या तमाशा है के बारीश मे घर (दिल ) जलता है

खटपट्या's picture

9 Jun 2015 - 8:09 am | खटपट्या

वा वा खूप सुंदर कविता...
अशाच येउद्या अजुन...

स्पा's picture

9 Jun 2015 - 8:11 am | स्पा

गावडे सरांना लाल सलाम

स्पा's picture

9 Jun 2015 - 8:12 am | स्पा

आशय घन कविता

गणेशा's picture

9 Jun 2015 - 8:37 am | गणेशा

तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो

मस्त कॅची लाईन्स.. एकदम जबरदस्त... खुप आवडल्या ह्या ओळी

नाखु's picture

9 Jun 2015 - 8:45 am | नाखु

जोमदार काव्य. पुभाप्र

धीर धरा.
मी पळाया लागलो हे विडंबन येईल (माझ्या कडून नाही "शिष्योत्तम,मर्यादापुरूष, लाडोबा")
आम्ही दिलेले नामाभिधान किती सार्थ होते ह्याची प्रचीती आली असेलच तरी हि जिल्बी टकायला घेणे.

सूचक
अभामिपाहाविकसंघ

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2015 - 11:34 am | ज्ञानोबाचे पैजार

उत्स्फुर्त काव्य म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सगांच्या या काव्यपुष्पाकडे पहाता येईल.

"कोणाला कशाच आणि करीनाला सैफच", किंवा "ये ये बैला आपण खेळु भोंडला" ह्या म्हणी सार्थ करणारी अशी ही कविता वाचताना आमच्या चश्म्यासमोर साक्षात सुर्यनारायण चमकून गेले. अहाहा केवढीही अगाध प्रतिभा.

ज्ञानदेवांच्या विरहीणींचा आनंद सगळेच घेतो. पण विरह्याची बाजू मात्र आतापर्यंत फारच थोड्या कवींनी मांडली आहे. ज्या काही थोड्या फार कवीता प्रकाशीत झाल्या त्या सर्वांमधे या कवीतेचा नंबर बराच वरचा आहे हे सर्व रसिक "बिनशर्त" मान्य करतील. शतकानूशतके दूर्लक्षीत / अप्राकाशित राहिलेली बाजू इतक्या प्रभावीपणे आणि प्रांजळ पणे मांडण्याचे धाडस दाखवणार्‍या कवीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.

पहिल्या चार ओळींमधेच कवी आपल्याला सांगतो की त्याला मैना सोडून गेली आहे आणि त्यामूळे तो जळायला लागला आहे. ही मैना म्हणजे कोण हे जरी कवीने गुलदस्त्यात ठेवले असले तरी ती कोणती तरी महत्त्वाची व्यक्ती किंवा वस्तू यांचे प्रतिक म्हणून कवीने वापरली आहे हे जाणकारांच्या सहज लक्षात येईल. उदा. घरातले "पायलेक्स" अचानक संपले किंवा हरवले तर ते नियमीत वापरणार्‍याची काय अवस्था होईल तशीच काहीतरी अवस्था ही मैना सोडून गेल्या मूळे कवीतेतल्या नायकाची झाली आहे. त्याच्या सर्वांगाचा दाह होत आहे काही केल्या तो दाह कमी होत नाही म्हणून शेवटी अग्नीशामक दलाला पाचारण करावे असे तो सूचवतो.

येथे अग्नीशामक दल हे सुध्दा प्रतिक कवीने मोठ्या हुशारीने निवडले आहे. कवीच्या या निवडचातुर्याला नक्कीच "दाद" द्यायला पाहीजे. केवळ या उपमे करता म्हणुन आमच्या तर्फे कवीला दाद खाज खुजली का दुष्मन असलेले "बी-टेक्स" मलम भेट देण्यात येत आहे.

थोड्याशा विषयांतराबद्दल क्षमस्व पण मला जेष्ठ कवी आनंद बक्षी साहेबांची "टीप टीप बरसा पानी" हे अजरामर काव्य आणि त्यावर रविनाताईंनी केलेले नृत्य आठवले. तिकडे तर नायकाची नुसती आठवण आली म्हणून नायिकेच्या बॉडीला आग लागली आहे "तेरी याद आयी तो जल उठा मेरा भीगा बदन, अब तुही बता ओ सजन मै क्या करु?" असे ती नायकाला विचारते आहे. (बक्षी साहेबांना त्या वेळी फयरबंब बोलवायचे कसे सुचले नाही?)

त्या मैना नामक व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या विरहाने आता आपल्या काव्यनायकाची तहानभूकही हरपली आहे. काय करु आणि काय नको याचे त्याला फारच टेंन्शन यायला लागले आहे.त्यातच मैना जवळ नसल्यामूळे ह्या टेंशनचा निचरा करण्याचे कोणतेही साधन नायका कडे उपलब्ध नाही. मग तो ते टेंन्शन उराशी बाळगत गादिवर तळमळत रहातो. "अग मैना अग मैना तुझी हौस पुरवीन" हे मैनेला दिलेले वचन नायकाने बहुतेक पाळले नसावे. त्यामुळेच रागावून मैनाबाई त्याच्या पासून दुर गेल्या असाव्या.

इकडे मध्यमवर्गीय कुटुंबाचा अजून एक प्रॉब्लेम कवीने नकळत अधोरेखीत केला आहे. "कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" याची साधी शिकवण हे मध्यमवर्गीय आईवडील मुलांना देत नाहीत आणि मग मुलांवर अशी गादिवर तळमळत पडण्याची वेळ येते. हे कवीने मोठ्या खूबीने सांगीतले आहे.

मग आपला काव्यनायक काय करतो? तर मैनेच्या विरहामुळे होणार्‍या या त्रासापासून मोकळे होण्याचे विविध मार्ग शोधू लागतो. म्हणजे बायको माहेरी गेल्यावर घरातला पुरुषमाणूस कसा हॉटेल मधे जोवायला जातो तसेच काहीतरी. पण हे मार्ग मोठे खर्चिक असतात. दोनचार दिवसातच नायकाचा खिसा खाली होतो.

एवढे पैसे उडवले तरी हाती काहीच लागत नाही. म्हणून उव्दीग्न झालेला नायक दु:खी होतो. रोज चांगल्या हॉटेल मधे जेवणे त्याला परवडेनासे होते. पैसे संपल्या मूळे नायक बहुतेक कोणत्या तरी खालच्या दर्जाच्या हॉटेल मधे जाउन आपली भूक भागवायला लागला आणि मग होउ नये तेच झाले.

तो बहुतेक कोणत्यातरी संसर्गजन्य रोगाचा बळी पडला. नायक इकडे प्रांजळ पणे कबूल करतो "पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो" आणि मग तो आपल्या मित्रांना विनंती करतो की या जाचातून सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा मला हे सगळे आता सहन होत नाही.

असे हे एक अर्थवाही पण गुढगर्भ काव्यपुष्प प्रसवल्या बद्दल कविचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

(भेटवस्तु कवीला योग्यवेळी कुरीयरने पाठवली जाईल. त्यासाठी कृपया मागे तगादा लाउ नये)

पैजारबुवा,

पै. बुवा आजकाल लईच फॉर्मात हायती! =))

दमामि's picture

9 Jun 2015 - 11:56 am | दमामि

कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे"
:):):):):)
यावर मोरोपंतांची एक आर्या आठवली, परवानगी असेल तर लिहितो.

जडभरत's picture

30 Jun 2015 - 3:35 pm | जडभरत

लिहा ना मग, विचारताय काय त्यात इतकं? आमालाबी हसू द्येत!

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 4:36 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा व्यनीतुन घ्या...नैतर इथे कोणालातरी जळजळेल =))

स्व* घ*त नसतां **अतिशमनार्थ ** राखावी |
तेही नसतां मग स्वहस्तेंचि ** दा*वी ||

नाहीतरी हल्ली हस्तोद्योगांना चांगले दिवस आलेतच.

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 7:42 pm | टवाळ कार्टा

दात आणि नखे नस्लेला वाघ =))

जडभरत's picture

1 Jul 2015 - 10:24 am | जडभरत

हं हवाच फुस्स झाली त्या कवितेची!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

क्वीता फर्मास, क्वीतेचं रसग्रह्न बी फर्मास !

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 12:04 pm | टवाळ कार्टा

आरारारा...उठवला धन्याचा बैजवार बाजार

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 1:11 pm | सतिश गावडे

बेक्कार हसतोय राव... एव्हढा विचार मी ही कविता पाडताना केला नव्हता. कृपा त्या अमितसांगलीची.

प्रचेतस's picture

9 Jun 2015 - 1:19 pm | प्रचेतस

लैच ब्येक्कार =))

गुढगर्भ काव्यपुष्प

चुकून 'गर्दभगूढ काव्यपुष्प' वाचलं.

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 2:29 pm | सतिश गावडे

#हीणप्रतिसाद

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

@'गर्दभगूढ काव्यपुष्प'>> ह्ह्या ह्ह्या हुक्क्क! :-D

आदूबाळ's picture

9 Jun 2015 - 8:40 pm | आदूबाळ

__/\__

कोणत्या गिरणीतून आणलेलं दळण खाता?

गणेशा's picture

10 Jun 2015 - 9:15 am | गणेशा

@ पैजारबुवा

मस्त रसग्रहन ...
सगा चे खेचक शब्द खुप मस्त असतात ... कायम लक्षात राहतात..
जसे की तू ये तुला फुकट देईन ..

आणि येथील फायरबंब आणि जळाया लागलोय या २ ओळी..
नक्कीच प्रेरणादायी

प्रचेतस's picture

10 Jun 2015 - 9:18 am | प्रचेतस

सगा चे खेचक शब्द खुप मस्त असतात ... कायम लक्षात राहतात..जसे की तू ये तुला फुकट देईन

ह्या ओळीचे पितृत्व श्री सगा यांचेकडे नाही.

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 9:33 am | सतिश गावडे

होय. एका गुर्‍हाळवाल्याकडून ऐकल्या मी त्या ओळी.

अगदी या कवितेतील "पावसात जळाया लागलो" ही ओळसुद्धा माझी नाही. ती अमितसांगली यांच्या एका प्रतिसादावर आधारीत आहे. आणि "तुम्ही बोलवा फायरबंब" ही ओळ मला माझ्या "तुझी घागर नळाला लाव" या आवडत्या गाण्यावरून सुचली.

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2015 - 9:37 am | टवाळ कार्टा

अग्गाग्गा

कवीने शब्द नविन तयार करावा अशी कधीच अपेक्षा नसते.. असलेल्या शब्दातुनच त्याने कविता लिहिलेली असते...
आणि जो माणुस प्रामाणिक पणे हे कबुल करतो त्याचा तर मला जास्त हेवा वाटतोच ..
जरी मुळा वाक्य तुझे नसले तरी मुळा कविता तुझ्याच आहे.. अआणि आम्ही तरी तसेच माणनार.. अंध भक्ती म्हणु शकते कोणी... पण
राजकारणात अंध भक्ती करण्यापेक्षा साहित्यात केली तर जास्त बरी..

आता...

"मन तळ्यात" हे शब्द आधीच होते... तरी संदिप खरेंची सुंदर कविता यावरुन आहेच ना ... तसेच हे...

जडभरत's picture

29 Jun 2015 - 5:25 pm | जडभरत

आयला कविता जितकी भन्नाट, त्याच्याहून १०० पट भन्नाट रसग्रहण.
पैजारबुवा यांचे आपण आजपासून चाहते.

बॅटमॅन's picture

9 Jun 2015 - 12:13 pm | बॅटमॅन

सगाकाकांनी सखू नंतर लैच दिवसांनी एक फर्मास लोकगीत लिवल्याबद्दल पूस्प्गुच देऊन सत्कार केल्या जात आहे.

पैजारबुवांचे परीक्षणही भन्नाट जमले आहे.

हाडक्या's picture

9 Jun 2015 - 2:48 pm | हाडक्या

पण सखूची सर कशालाच नै हो.. हे ही नमूद करतो.. ;)

#हीणप्रतिसाद

(हाणाहितं)

छान कंपु बाजीचे उत्तम उदाहरण..

हाडक्या's picture

9 Jun 2015 - 2:49 pm | हाडक्या

अहो जेपी,

जग ही कंपु शाळा,
कुणी न येथ भला चांगला..

असो... :)

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 2:55 pm | सतिश गावडे

कंपु म्हणजे काय?

सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर अजुन तरी भेटल नाही!!

(नेम अचुक लागला)

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 3:06 pm | सतिश गावडे

उत्तर भेटणारही नाही. जे अस्तित्वातच नाही ते कोण कसे सांगणार? ;)

मंजे जे अस्तित्वात नाही त्याच अस्तित्व नाकारुन तुम्ही अस्तित्वात असणार्या गोष्टीच अस्तित्वात असण शक्य नाही अस म्हणत आहात तर ते अस्तित्वावरच शंका घेण्यासारखे आहे..!!

चौकटराजा's picture

9 Jun 2015 - 3:05 pm | चौकटराजा

काव्य मस्त ( कळले शष्प नाही तरीही ) . ....................................याला म्हणतात कंपू बाजी ! ( जय टाटा मोटर्स चा नाका !! )

नाखु's picture

9 Jun 2015 - 3:10 pm | नाखु

नाका समोर उभा राहणारा

सरळ नाखुस

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2015 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले

कंपु म्हणजे काय?

>>> तुम्हाला अलझ्यायमरर्स झाला आहे का सर ?

http://www.misalpav.com/comment/652220#comment-652220

खी खी खी

सूड's picture

9 Jun 2015 - 3:57 pm | सूड

#हीणप्रतिसाद

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 4:39 pm | अत्रुप्त आत्मा

+१

स्पंदना's picture

9 Jun 2015 - 5:37 pm | स्पंदना

फायरबंब????

मराठी भाषा उतरणीला लागली ती या मुळेच!!

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 6:51 pm | सतिश गावडे

लोकसंगीतात लोकांची भाषा असते.

फ़ायरबंब हा रुळलेला शब्द आहे. जर मराठी शब्दच वापरायचा ठरवला तर मला तरी "अग्निशामक दलाची गाडी" असा लांबलचक शब्दच समोर येतो. दुसरा सुटसुटीत शब्द मला माहिती नाही.

याच नियमाने "राया माझ्या हिरीला इंजिन बसवा" या लावणीत इंजिन या शब्दाऐवजी "पाणी उपसायचे यंत्र" असा शब्द वापरायला हवा होता त्यांनी.

खटपट्या's picture

9 Jun 2015 - 7:26 pm | खटपट्या

"आगीचा बंब" हा शब्दही चालेल. मीटरमधे बसतोय का बघा.

-आख्खे बालपण अग्निशमन दलात काढलेला खटपट्या.

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 8:10 pm | सतिश गावडे

हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये बसते किंवा कसे हे सूडला विचारावे लागेल. त्याच्याकडे शिंप्याकडे असते तशी मीटरपट्टी आहे.

अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे बसतेय का असे म्हणतोय...

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 8:21 pm | सतिश गावडे

चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार प्रकाश टाकतील.

स्पंदना's picture

10 Jun 2015 - 4:34 am | स्पंदना

सगा बाबा इनोद व्हता त्यो!!
कवितेला आणि कधी भाषेचा लगाम रुचेल होय?

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 9:35 am | सतिश गावडे

अरारा... म्या उगाच शिरेसली घेतला. पुढच्या वेळी इनोद लिवाल तवा "हा इनोद हाये" आसा सपष्ट लिवा. ;)

खटपट्या's picture

10 Jun 2015 - 9:44 am | खटपट्या

हो चालेल.

कधी कधी गाण्याचे संगीत आधीच तयार असते आणि त्या चालीवर गीतकाराला गाणे लीहायला सांगीतले जाते. अशावेळी गीतकार गाणे लीहून आधीच तयार असलेल्या चालीवर म्हणून बघतो. या प्रक्रीयेला गाणे मीटरमधे बसवणे असे म्हणतात.

चू.भू.दे.घे.

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 9:49 am | सतिश गावडे

तसं असेल तर बसतंय मीटरमध्ये. चाल तयार होती, मी फक्त एका प्रतिसादाला मीटरमध्ये बसवलं. ;)

अनुप ढेरे's picture

10 Jun 2015 - 11:32 am | अनुप ढेरे

राया माझ्या हिरीला इंजिन बसवा

हे कुठ ऐकायला मिळेल?

पैसा's picture

9 Jun 2015 - 7:45 pm | पैसा

=))