सखे........!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !