Skip to main content

कविता

रिस्क - तळीराम

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 09/01/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....
Taxonomy upgrade extras

मधुशाला

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 03/01/2008 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकहो, थंडीचा सुखद मोसम सुरू आहे. नववर्षाच्या पार्ट्यांना वेग आलेला आहे. वातावरण कधी नाही इतकं सुखद आहे. जीवनातील दु:खे क्षणभर का होईना विसरून एखादी चक्कर मधुशाळेत टाकावी असे वाटले तर त्यात गैर तर नाही? आमचे आदरणीय कविवर्य श्री. हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला अशा वेळेस आमचं सर्व विश्व व्यापून टाकते आणि त्या रूबाईया आमच्या भोवती गुंजारव करीत राहतात. त्यातले हे काही मधुकण. प्रियतम !
Taxonomy upgrade extras

निवारा...

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 03/01/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक चाहूल इवलिशी ती कोकीळेच्या अंतरी आली जीव कोवळा नाजूक साजूक 'आई' म्हणोनी साद घाली.. "ऐक सख्या रे अंतरी माझ्या अंश आपुला अंकुरतो...." घेई भरारी हर्षभरे तो.. कोकीळ कूजन करू लागतो.. ना वसंत ना पालवी नवी ना आम्रतरू मोहरला.. कूजन ते अकल्पित नवे सारा निसर्ग गहिवरला... "गलिच्छ आणिक बेसूर वाटे नको सख्या ती 'काक' सृष्टी... आपुल्या खोपी जन्मेल तो करू मायेची आपण वृष्टी.." "हो राणी!
Taxonomy upgrade extras

शिक्षक दिन

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 02/01/2008 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिली आहे. पाच सप्टेंबर दिन उजाडला जाऊ सत्काराला शिक्षकांच्या शाळा रंगवली हार मागविले गळ्यात घातले पुढार्‍यांच्या. करूनिया स्मित स्वारी पुढे आली भाषणास केली सुरुवात तास सव्वातास भाषण सुंदर दारुबंदीवर त्यांनी केले. त्यांच्या पाठोपाठ दुजा उठे कोणी गरिबीचा त्यांनी नारा दिला. गरिबांच्या पाठी म्हणे कोण आहे शल्य बोचते हे अंतरात तसेच दाबून धरून हृदय संपवी वक्तव्य दीनांसाठी. शेवटी म्हणाले अध्यक्ष सन्मान्य केले उपकृत बोलावून. आम्हावरी लोभ ठेवावा असाच पुढल्या खेपेस येऊ खास. शिक्षक दिनाचा ऐसा सोहळा भ्रमाचा भोपळा नित्य हाती! कविता संग्रहः शब्द मना
Taxonomy upgrade extras

उड्डाण पूल

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 02/01/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिलेली आहे. या उड्डाण पुलावरून वाहेल गर्दी एकविसाव्या शतकातली, त्याही वेळी असतील आसर्‍याला आलेले वळचणीचे संसार पुलाखाली. आता हे जणू ठरूनच गेलेले, अंगणातले नवे फोफावणारे झाड पाहून जशी यावीत पाखरे चोचीत काडी घेऊन घरट्यासाठी तशी माणसेही असतातच वळचणीच्या शोधात नव्या पुलाच्या नव्या आढ्याखाली. नवजात चोचीतला चिवचिवाट ऐकताना रोज सकाळी आपण भिडवू कौतुकाची नजर घरट्यावर, पुलाखालील उघडी बाघडी मुले पाहून मात्र आपण थुंकू पचकन बर्वे किंवा कर्वे रस्त्यावर. कविता संग्रहः शब्द मनातले कवी: अतुल व्यं.देशमुख प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान © सौ.स्मिता देशमु

तूच नव्याने घडशील काय

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 31/12/2007 07:28 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?

गेल्या वर्षातील दिवस जे सार्‍यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय

आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?

Taxonomy upgrade extras

काय सांगू नवलाई

लेखक इनोबा म्हणे यांनी रविवार, 30/12/2007 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
या कविता मी संकलित केलेल्या असून मूळ कविची माहिती कवितेच्या खाली देण्यात आली आहे. काय सांगू नवलाई बाई,जाहले उन्मन उतरता पाण्यामध्ये लाज गेलीच वाहून. आता पदराशी माझ्या वारा करी हितगुज वेळी अवेळी वाजते मनामधे अलगुज. घर राहिले पाठीशी तुटे संसार पुरता काठावर यावे सांग सखे,कुणा ग करिता! कविता संग्रहः शब्द मनातले कवि: अतुल व्यं.देशमुख प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान © सौ.स्मिता देशमुख

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना - कविता

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना मीच अथांग होऊन जातो... तुझ्या हसण्याचा आनंद घेताना मीच आनंदून जातो ... तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना मीच गुंतून जातो ... तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना मीच हरवून जातो ... तुझ्या हाताला स्पर्श करताना मलाच तुझा स्पर्श होतो ... तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना मीच त्यांत विरघळून जातो... - सागर
Taxonomy upgrade extras

पाखरु : भाग १ (कविता)

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकराला प्रेयसीपासून तोडून दूर कोठेतरी पाठवले... तेव्हा प्रियकरास पक्ष्याकडे पाहून त्याची आणि आपली अवस्था सम वाटली... त्या अवस्थेचे वर्णन म्हणजे हा पाखरु कवितासंग्रह.... सगळ्या कविता देत नाहिये... पण सुरुवातीच्या ३ कविता देत आहे... या संग्रहाचे विशेष म्हणजे सर्व कविता या एकाच मनोभूमिकेतून लिहिल्या आहेत....की दूरदेशी प्रियकराच्या मनात कोणते विचार प्रकटतात....
Taxonomy upgrade extras