Skip to main content

कविता

भास

लेखक धनंजय यांनी सोमवार, 15/10/2007 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
भास ***************** चाहुल लागुनि का मी जागे? पा‍उल नव्हते तव ते मागे - शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी * भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली * मस्तकावरि स्पर्श कसा हा गोंजारे मज हात तुझा का? छे! तो अभ्रा केस हलवितो पंखा वारा जसा फिरवितो * जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा * भास तुझे हे अवतीभवती क्षणभंगुर तरी भ्रम हे असती निरसे ना परि, छळे गंध हा ओतप्रोत तव भिने मंद सा *****************
Taxonomy upgrade extras

॥ स्फूर्ती देवीची आरती ॥

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 14/10/2007 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
॥ स्फूर्ती देवीची आरती ॥ स्फूर्ते अवघड भारी तुजविण संसारी । अज्ञानी वत्सांच्या ज्ञाना विस्तारी ॥ वारी वारी मजला अकर्मण्याद्वारी । कृतीच्या स्फूर्ती ने आम्हा निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी । निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुलना तुज नाही । तव किमयेचे कौतुक कळते लवलाही ॥ अगणित मनुजा प्रेरक कमालीची ठरशी । ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥ उत्स्फूर्त वदने स्फूर्ती देशी निजदासा । आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥ स्फूर्ते तुज वाचून कोण वाढवी यशा । 'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा

"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 14/10/2007 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो सलीम राजपुत्र मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे प्रीतीची आसवे पत्थ्थरात पाझरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || धृ || अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले | शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले || इष्काच्या दरबारी चांदरात बरसली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || १ || बंड करून उठली तलवार सलीमाची | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची || अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || २ || ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले | राजा वा रयतेला ना कधीच घाबरले || मिलनच्या वाटेवर भिंत जरी बांधली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 14/10/2007 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोई लौटा दे मेरे मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये || आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय!

तेथे पाहिजे जातीचे!

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 09/10/2007 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
एका कोल्ह्याने एकदा, आव आणला सिंहाचा केला निवाडा झिंगून, दारूबंदीच्या प्रश्नाचा त्याच्या वरलिया रंगा, भोळे भुलले अजाण गाती गोडवे ठेवून, सारी अक्कल गहाण तूच तारक आमुचा- बैल, टोणगे बोलती लोभी तुकड्याचे श्वान, मागे पुच्छ हलविती व्यवस्थापन कराया, झाला गडी उतावीळ शेत नांगराया घेई, जुना गंजलेला फाळ ढीग दगडगोट्यांचा, नुरे मूठभर माती एका दाण्याला महाग, झाली मोतियाची शेती तरी खुर्चीत बसोनी, करी पोकळ गर्जना पुढे लाचार हुजरे, फक्त डोलविती माना हाती धरून माकडे, म्हणे तरेन सागर कुठे पगारी चाकर, कुठे राजा रघुवीर दोष दुसर्‍याना देई, पराभवात दारूण लाथा खाऊन शोधाया, निघे दुसरे कुरण चला माकडेच झालो, नाह
Taxonomy upgrade extras

गणेशस्तोत्र (संस्कृत रचना)

लेखक अशोक गोडबोले यांनी रविवार, 30/09/2007 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी संस्कृत भाषेत एक स्तोत्र रचले होते ते येथे देत आहे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म I निर्गुंणारंभमूलकम् I पूर्णात्मरूपबोधाय I ओंकाराय नमोनम: II १ II देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते II २ II गणेशोऽपि गुणेशस्त्वं I विराट गणनायक I सर्वसिद्धिफलस्वामिन् I ऋद्धिसिद्धिविनायक II ३ II मगलाचरणं नित्यं I वैदिकानां परम्परा I कार्यादौ स्तुवते त्वां च I ऋषयो मूलकारणम् II ४ II भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: II ५ II ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषा
Taxonomy upgrade extras

झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

लेखक धनंजय यांनी शनिवार, 29/09/2007 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमाम्यहं सरस्वतीम् ******************* सुशुक्लवस्त्रधारिणीम् सुमन्दहासहासिनीम् । सुतन्तुवाद्यवादिनीम् नमाम्यहं सरस्वतीम् ॥ १ ॥ उमेशसन्निधाम् उमाम् रमेशसन्निधाम् रमाम् । हिरण्यगर्भयोषिताम् नमामि बुद्धिदेवताम् ॥ २ ॥ अगाधवाहिनीम् नदीम् प्रबोधतोयदायिनीम् । मनःसरोजवर्धिनीम् नमामि वेदवादिनीम् ॥ ३ ॥ मुनीन्द्रदेववन्दिते सुबुद्धिदे विशारदे | जडत्वमूढसेवकं हि पाहि देवि शारदे ॥ ४ ॥ ******************* या अखंड स्फूर्ती देणार्‍या विद्यादेवीवर हे इतके स्फूर्तिशून्य गीत कसे रचले त्याचे विच्छेदन सांगतो. झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत) चला मुलांनो, आप

पत्ते!

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा हसत हसत, पत्ते पिसून बावन्न येवो फलतू का पाने, होऊ नका कधी खिन्न पाने येणे हे प्रारब्ध, खेळा यत्न कौशल्याने जन्मा कोठेही कसेही, उंच व्हा कर्तृत्वाने कुणी राजा कुणी राणी, कुणी जाहला गुलाम हुकुमाच्या दुरीलाही, एक्का करीतो सलाम सारे नाहीत बदाम, काही काळे किलवर झाले चौकट हुजूर, आणि इस्पिक मजूर खेळताना एका हाती, सारे एकत्र नांदती चातुर्वर्ण्याची चौकट, किती सहज मोडिती त्रेपन्नावा दूर राहे, शांत एकला जोकर खेळ ब्रह्मांडाचा बघे, तटस्थ तो सूत्रधार हात करूनिया सारे, डाव शेवटी जिंकिला सारा जन्म हसण्यात आणि पिसण्यात गेला भल्याभल्यांना जगती, जादू पत्त्यांची कळेना आपुलाच रे अखेरी, त्यांना पत्ता स
Taxonomy upgrade extras

शिवी देतो भगवंत!

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
अर्जुनाने द्रौपदीला स्वयंवरात जिंकिले मात्र भावांनी फुकट पत्नीसुख संभोगले वस्त्रहरणप्रसंगी षंढ पाचही दादुले आणि भीष्म द्रोण थोर पोरासारखे वागले उच्च तात्विक कारणे देती महा प्रज्ञावंत पतिव्रतेच्या अब्रूला कवडीमोलाची किंमत बंधुप्रेमाच्या शेल्याने शील रक्षिले अभंग एक पान थाळीतले भक्षी भुकेला श्रीरंग कृष्णे कृष्णा ओवाळिले भाऊबीज ती अपूर्व वनवासातही लाभे महाराणीचे वैभव पण एक शल्य होते भाऊरायाच्या अंतरी कुरुक्षेत्री झळाळली क्रोधवह्नीने वैखरी क्लीब म्हणता अर्जुना नाही जीभ कचरली शहाण्याला शब्दाचीच एक ठिणगी पु
Taxonomy upgrade extras

गीतम् (संस्कृत रचना)

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अलिकडेच संस्कृतमध्ये एक रचना सुचली ती येथे लिहीत आहे.
नमामि मोदमंगलम् - विनायकं विनोदकम् II धृ II सुदर्शनेन केवलम् दुरितदलविलोपनम् व्याकुलोऽपि नि:स्वनं - मनो न मे ऽ स्तु कातरम् II १ II विषयबलविमोहिता अविद्ययाऽपि वंचिता धियं सधाय धीमता - पाहि तव पदाश्रितम् II २ II कृतं मया न सुकृतम् हितं कदा न चिन्तितम् अतीव विकलमानसम् - शरणचरणपंकजम् II ३ II न जातु मोक्षहेतवे भजनपूजने कृते तृषाहतं भवालयं - व्रतं ममाऽपि दुस्तरम् II ४ II देहि देहि गणपते आशिनं निरंतरम् सुनीतिपंथगामिनम् - पुनातु मंगलार्चनम् II ५ II
--अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras