आमचे मनोगतीय मित्र श्री खोडसाळपंत यांनी अलिकडेच एक सुरेख गझल लिहिली आहे. गझल फारच छान आहे. आम्ही खोडसाळरावांचे प्रथमपासूनच फ्यान आहोत. सदर गझल आम्हाला फार आवडली आणि म्हणून ती आम्ही इथे देत आहोत...
आपला,
तात्या सरपंच!
कैक सारे मिसळ खाया लागले
अन् रुचिपालट कराया लागले
हा असंतुष्टांस अड्डा लाभला
रुष्टणारे चळवळाया लागले
वाजले स्वातंत्र्यडंके जालभर
दो दिसांनी शांत व्हाया लागले
बंदुका स्कंधी दुज्याच्या ठेवुनी
पारधी पारध कराया लागले
'प्रसव'पत्राची करोनी डिलिवरी
पोस्टमन कोणी ठराया लागले
'वीजवाटा' तद्न्य तो लावे छडा
नाव पोष्ट्या कोण घ्याया लागले !
जाहली ऐसी तिखट मग मिसळ की
वाचता ठसके बसाया लागले
Tor वा सायबरकफेच्या आडुनी
बाण शत्रुंवर पडाया लागले
हाय, एकाची तिथे नावे किती
फसवणारेही फसाया लागले !
जाग सरपंचा कधी येईल का ?
लोक त्याला वापराया लागले
खोडसाळा, हीच खाणावळ बरीे
परतणारे कुजबुजाया लागले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12957
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक
अर्थ
सरपंचांची काळजी नका करू!
तात्या
व्यक्तिगत रोख
In reply to तात्या by सुवर्णमयी
आमचे उत्तर
विडंबनाचे विडंबन छान !
In reply to आमचे उत्तर by धोंडोपंत
तात्या आणि मिसळपाव हे काव्याचे विषय!
In reply to आमचे उत्तर by धोंडोपंत
अनुदिनीचा पत्ता आणि पंचायत समिती
In reply to तात्या आणि मिसळपाव हे काव्याचे विषय! by राजीव अनंत भिडे
उल्लेख
In reply to अनुदिनीचा पत्ता आणि पंचायत समिती by विकेड बनी
हे खरे आहे.
In reply to उल्लेख by कोलबेर
सुंदर गझल