मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषांतर

संघर्ष : सुरुवात.

दिपक लोखंडे ·
०५ ऑगस्ट सकाळी : ७ वा. त्या दिवशी राधा खूप सुंदर दिसत होती तिचा तो निरागस चेहरा अबोला असूनही खूप काही बोलून जात होता. राधा अंघोळ करून केस झटकावत बाहेर आली पहाटेची तीव्र किरणे तिच्या चेऱ्यावर पडताच तिने डोळे बंद केले, तसा आनंद तिच्या समोर जाऊन थांबला. अचानक समोर आल्याने राधा थोडी दचकली (तशी राधा खूप धाडशी व जिद्दी होती प्रेमळ स्वभाव असल्याने तिने तिच्या ओवातिभोवती असणाऱ्या सर्व लोकांची मने जिंकली होती. आनंद ही त्यातलाच एक. इंजिनीयरिंग कॉलेज मधली ओळख..

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

दिपक लोखंडे ·
भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे ·
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

फकीर

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire फकीर जॅक्सन म्हणजे एक वाट चुकलेला फकीर होता. वाहवत जाणे हा त्याचा स्थायीभाव होता असं म्हटलं तरी चालेल. एकदा का एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की परत मागे फिरणे त्याच्या स्वभावातच नव्हते. ‘‘जॅक्सन’’ याच नावाने त्याला सर्व ओळखत. आगा ना पिछा. बाजारात सुद्धा ‘जॅक्सन’ याच नावाने ओळखला जाई.

एक संध्याकाळ..

दिपक लोखंडे ·
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..

लिखाण

माम्लेदारचा पन्खा ·
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

स‌त्तेत‌ली मिश्किली आणि विवेक

मन ·
काल‌ माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस‌ क्ल‌बात‌. त्यांनी "एक असाधारण वाचक" साद‌र‌ केलं. हा "अॅल‌न‌ बेनेट‌" लिखित‌ ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उप‌स्थित राह‌णं हा नित‌ळ सुंद‌र‌, निव्व‌ळ अप्र‌तिम‌ अनुभ‌व होता. पुरंद‌रे ताई थोर आहेत‌. ग्रेट्ट आहेत‌. मी त्यांचा प‌ंखा/फॅन आहेच. विविध‌ भाषांव‌र‌ची त्यांची हुकुम‌त‌ , व त्या- त्या भाषेत‌लं स‌हित्य‌ स‌म‌जून घेणं हे स‌ग‌ळं त‌र‌ त्यांच्याठायी आहेच‌ प‌ण एका भाषेत‌ला म‌ज्कूर‌ दुस‌ऱ्या भाषेत‌ नेम‌क्या आश‌यास‌ह‌ पोच‌व‌णं हे काम‌ लै अव‌घ‌ड‌. प‌ण ह्या त्यात‌ही वाक‌ब‌गार आहेत‌. असो.

कथुकल्या १३

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. गोष्ट “पप्पा सांगा न लवकर गोष्ट.” “ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?” “नको ती बोअर आहे.” “मग गुरुवरच्या चेटकीणीची ?” “ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.” “बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?” “सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.” नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं. “ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.” “चालेल.” शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला. “खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता.

नामकरण.. एक प्रेमकथा - भाग २ (अंतिम)

दिपक लोखंडे ·
भाग १ पासून पुढे - .................................................................. बसा मि. सागर.. डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना? काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे... आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल.. हो डॉक्टर.. दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी.. ............................................................. संध्याकाळी ६ वा.. (सागर व कविता गार्डनमधे...) सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना? होय.. अहो तुम्हाला आठवतय?