मोबियस भाग -२ : प्रकरणे २१-२२
तेवढ्यात एक कावळा काव काव करत उडाला. डोळ्यासमोरचा रंग पिवळ्यातून निळा झाला आणि त्याच्या वेदना हळूवारपणे त्या आसमंतात विलीन झाल्या. चार कावळे खालून किनार्याला समांतर उडत होते. त्यांच्या उन्हात चमकणार्या कडा गडद हिरव्या भासत होत्या. त्याने त्याला त्याच्याकडे असलेल्या किटकबाटलीतील पोटॅशियम सायनाईडची आठवण झाली.
मिसळपाव