शवविच्छेदन...... भाग - २
शवविच्छेदन...... भाग - १
......तरुणपणी डिसुझा विजापूरच्या मेडिकल कॉलेजमधे शिकत होता. ते कॉलेज आता मी जे प्रकरण सांगणार आहे त्या प्रकरणामुळेच बंद पडले. असो. कुठलीही गोष्ट पटकन शिकणे हे डिसुझाच्या रक्तातच होते. त्याच्याकडे अजून एक दैवी देणगी होती ती म्हणजे एकदा कुठली गोष्ट ऐकली की ती त्याच्य सदैव लक्षात राहायची आणि तो या देणग्यांचा यथोचित उपयोग करत असे. त्याला घरी काम करावे लागतच नसे पण कॉलेजमधे तो त्याच्या शिक्षकांची भाषणे अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आणि विद्वत्तापूर्ण शंका विचारायचा.
मिसळपाव

