मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

लाजाळू नि गुलाब

चांदणे संदीप ·
लाजाळूच्या झाडापुढे गुलाबाच फूल नको स्पर्शाविना मिटण्याची त्याला नवी भूल नको! गुलाबाच फूल भारी लाजाळूला खेटलेल लाजाळूच झाड वेड येता जाता मिटलेल! कुणी द्या रे रंग-वास लाजाळूला मिरवाया तोरा नवा दाखवून ताटव्याला फुलवाया! - संदीप चांदणे

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

वेल्लाभट ·
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे कुणी होत वाचाळ थयथय उगाच कुणी शांत राहून ठेवीत जाच कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे कृतीतून ठरते इथे कोण वाघ मुखे बोंबलोनी करी काय सांग एकीत असते रहस्य यशाचे तुम्हाला महत्व न पटले अशाचे तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला तिथे एक चेहरा भुलवतो जगाला असे वेळ हाती न वागा असे रे कशाला करावे स्वतःचे हसे रे इथे संधी सर्वांस आहे समान भूतापरी हो जपा वर्तमान जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला करोनीच हो दाखवा या जगाला -अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

नवमी

सूड ·
लेखनविषय:
काव्यरस
वडे घारगे पुर्‍या कधी नाजूकशा सांजोर्‍या दिंडे निवगर्‍या तूप काठोकाठी खमंग अळवड्या कधी तांदुळ कुरवड्या सुरळी पाटवड्या कधी देठीगाठी अबोली वळेसर कधी केवडा त्यावर अनंत नि तगर मोगर्‍याची दाटी असोल नारळ ओटी इंद्रायणी तांदूळ सुपारी तांबूल खण जरीकाठी जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी

भेट...

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
छान छान जावे दिवस छान छान व्हावी भेट दिवस जसा रात्रीला येऊन भिडतो थेट थेट मग होते रोजची सकाळ सूर्य येताे प्रकाशात दिवसभर थकून भागून रात्री मिटतो आकाशात असाच दिवस अशीच रात्र मला खूप आवडते मन माझं भेटीच्या त्या सोनसंध्येला निवडते आवडेल तुला जीवनात अशी भेट झाली तर? रात्री सोबत दिवसाला नवी पालवी आली तर!? मैत्रीच्या या फुलामधला परागकण मी व्हावे अश्या भेटिच्या पूर्णत्वाला वर्षे ने ही यावे ............................. https://lh3.googleusercontent.c

..... तो कृष्ण 'एकटा' होता !

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग पण वृन्दावनचा राणा ..... तो कृष्ण 'एकटा' होता ! चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया विश्व डोलते ज्या मुरलीवर.. ......

लाघवी

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या अल्लड, अवखळ... किंचीत खोडसाळ बटा, थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे, आणि... ओठावरचे मिश्किल हसू...!! अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही, वारंवार सावरायला लागली आहेस तू... डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल तू काही बोलत नाहीस... ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य... त्या बंद ओठाआड मात्र, कधी पोहोचताच येत नाही बघ... सगळं आर्त ... त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू ! आणि ते म्हणतात... व्वा, केवढी लाघवी पोर आहे ! विशाल...

असमाधानाची

अर्थहीन ·
लेखनविषय:
काव्यरस
एक भरलेली 'शव'वाहिका एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते .........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी?? पानसरेंच्या छातीतली गोळी दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते, ..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती. नेमाडेंच्या दौतीतली शाई कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते .........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी??? कलामांची मुठमाती याकूबच्या मुठमातीला म्हणते .........मला कालच 'पालवी' फुटली, तू अजुन कोरडीच कशी?? गझलेची कैफियत कवितेच्या दुःखाला म्हणते .........तुला 'एवढ्याss' शब्दांची गरज कशी??? माझी अ-स्वस्थता या जगाच्या स्वस्थतेला म्हणते .........असमाधानाची -तुझी ग 'व्याख्या' कोणती?

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

.....ही मनाची अंतरे...

चुकलामाकला ·
लेखनविषय:
काव्यरस
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे... होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे... जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... एकमेकाना इथे का आज सारे टाळती सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे.... लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....

तो पाहिला ना अत्ता..,बाप वेडा मी ....

अत्रुप्त आत्मा ·
तो पाहिला ना अत्ता..बाप वेडा मी हसता हसता अवचित रडू लागला भरुन आलेला होता आतून ..