Skip to main content

..... तो कृष्ण 'एकटा' होता !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/09/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग पण वृन्दावनचा राणा ..... तो कृष्ण 'एकटा' होता ! चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया विश्व डोलते ज्या मुरलीवर.. ...... तो कृष्ण 'एकटा' होता ! धुर्त शकुनी, विषयी कौरव, षंढ सभागृह ठरले सर्वस्व हरवून बसले पांडव पतीधर्मही विसरले भीष्म, विदुर ते स्तब्ध, शापदग्ध हस्तिनापुरी सखी द्रौपदी त्रस्त मंडपी, त्राता झाला श्रीहरी कृष्णेसाठी स्वये धावला , ...... तो कृष्ण 'एकटा' होता ! कुरुक्षेत्रावर डाव मांडूनी उद्धरीले कुरु कुल सारे गतीमुढ पार्था बोध, जगाला सांगितली त्वां गीता कर्तव्यबोध तो होता सरली शामसख्याची माया व्याधाने धरीला नेम, सोडला बाण, छेदली काया संपले पर्व सुटला देह... ..... तो कृष्ण 'एकटा' होता ! विशाल कुलकर्णी १८-०९-२०१५
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5384
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

छान आहे! कृष्णाचा संपूर्ण जीवनपट उभा राहतो. प्रत्येक ओळीच्या मध्ये एक छान पाॅझ येतोय. तो कृष्ण एकटा होता याचा अर्थ खूप गहन आहे. अद्वैतमतानुसार आयुष्यातील सर्व सुख दुःख जीव भोगताना दिसतो. परंतु आत्मा मात्र त्यापासून अलिप्त राहतो. आणखी एकः कृष्णासारखा आत्मज्ञानी पुरूष भौतिक जगातील सर्व सुख दुःखे समरसून भोगताना दिसतो. परंतु अंतरात मात्र तो या सर्वांपासून अलिप्तच असतो.

In reply to by मांत्रिक

इथे लेखक एकटा म्हणतोय. एकटा आणि अलिप्त दोन्हीं शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एकटा असेल तो प्रत्येकवेळी अलिप्त असू शकत नाही आणि अलिप्त प्रत्येक वेळी एकटा असेलच असे नाही. हे असले एकटे पण अटलजिंनि अचुक शब्दात पकडले आहे. सच्चाई यह है कि, केवल ऊँचाई ही काफि नहीं होती, सबसे अलग-थलग, परिवेश से पृथक, अपनों से कटा-बंटा, शून्य में अकेला खड़ा होना, पहाड़ की महानता नहीं, मजबूरी है, ऊँचाई और गहराई में, आकाश-पाताल की दूरी है, जो जितना ऊँचा, उतना एकाकी होता है, हर भार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्कानें चिपका, मन ही मन रोता है, या कवितेमधला कृष्ण मला असा वाटला. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यस्स ज्ञानोबा, अगदी हेच अपेक्षीत आहे. मांत्रिक यांनी सांगितलेला अर्थ जरी लगू होत असला तरी मला तुम्ही सांगितलेला अर्थच अभिप्रेत आहे. धन्यवाद. _/\_

अप्रतिम लेखन केलेय मला खुप आवडले माझा कान्हा एकटा होता

रच्याकने, हा प्राची अश्विनींच्या कवितेचा प्रतिवाद आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

नाही, ही कविता खुप आधी लिहायला सुरुवात केली होती. पण अर्धवटच राहून गेली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पुजा भडांगे यांची 'सावळबाधा' वाचनात आली. ती वाचल्यावर का कोण जाणे ही कविता पूर्ण कराविशी वाटली. पुजा भडांगे यांची सावळबाधा इथे वाचता येइल.

विशाल जी तुम्हाला एक विचारु का ? हि कविता लिहीतांना कवी ग्रेस यांची असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला.... वस्त्रांत द्रौपदि च्याहि तो कृष्ण नागडा होता या ओळींचा प्रभाव हि रचना करतांना कुठेतरी होता का ? अर्थात ते असो नसो हि कविता सुंदर च आहे यात वाद नाही त्या ओळींची तात्काळ आठवण झाली म्हणुन विचारलं इतकचं.

In reply to by मारवा

असेलही कदाचित... ग्रेसचं वेड आमच्याही रक्तात आहेच. पण ही कविता वाचताना तुम्हाला ग्रेसच्या ओळींची आठवण आली यातच या रचनेचे सार्थक झाले _/\_

मस्त रचना. तुझं वाचन अफाट आहे त्याचा पुनर्प्रत्यय आला. कविता निरक्षर नाखु

सुरेख... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani

वा!

हम्म.. एक एकटा एकटाच...! अवांतरः- अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता वगैरे टाइप वाचायला मिळेल असे भासले होते.

श्रीकृष्णाचं अगदी यथार्थ वर्णन केलंय. अतिशय सुरेख कवीता. त्यात श्रीकृष्णाची कथा तुम्ही इतकी छान सारांश रूपात सांगितली आहे ते खूप आवडलं.

और ये लगा सिक्सर विशाल - फिर चैपियन.....

अतिशय आशयघन... स्वगतः एकदा भेटायलाच हवे या माणसाला...

सुंदर !

अप्रतिम कविता! मला मात्र एकटा म्हणजे 'एकाकी' या एकाच अर्थापेक्षा "one & only one" वगैरे अर्थच्छटा जाणवल्या! झकास! (याला कारण इथे गोव्यात एक जण या अर्थाने "एकटा" शब्द वापरतात त्याची झालेली सवय हे असू शकेल.)