Skip to main content

शांतरस

गणेश माझा........

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 25/08/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश माझा........ गणेश माझा आहे सुन्दर कटी तयाच्या शुभ्र पीतांबर प्रभा तयाची दशदिशांवरी नभी उगवला वाटे दिनकर ! कटी मेखला नागांची ही डोक्यावर्ती जुडी दुर्वांची आहे गणेश मोहक माझा हाती मोदक त्याच्या शंभर! दुखे हरतो भक्ताची हा आहे गणेश माझा सुखकर पुजिती त्याला देवही सगळे आणी मराठी हा जनसागर ! आणी मराठी हा जनसागर ! -अनिरुद्ध-
काव्यरस

गणपती बाप्पा मोरया ! (भक्तिरस)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अवनिशा.., अलंपता बुद्धीनाथा तू बुद्धीदाता धार्मिका गौरीसुता बुद्धी दे विनायका ! गजवक्त्रा.., एकदंता चतुर्भुजा तू देवव्रता सिद्धीपती विघ्नहर्त्या सौख्य दे गणनायका ! धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा मंगलमुर्ति गजानना महाबळा मुक्तिदात्या सन्मति दे सिद्धीनाथा ! शुभगुणांकना सिद्धीप्रिया शुभानना तू वक्रतुंडा स्कंदपुर्वजा सिद्धीदायका सामर्थ्य दे तू विघ्नेश्वरा ! अल्पमति मी भक्त तुझा तु समृद्धी दे गणराया विघ्न हरो चराचराचे दे पसायदान वरदेश्वरा ! विशाल.
काव्यरस

गणेशवंदना

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 22/08/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया! काही दिवसापूर्वी देवकाकांनी 'एखादी ५-६ ओळींची छोटीशी बंदिशीसारखी रचना केलीस का? असं विचारलं, आणि नुकतीच मशकूर अली खान यांची मालकौंसातली "मुरख मन मेरे" ही बंदिश ऐकून तिच्यात मराठी शब्द बसवता येतील का, असा विचार करता करता ही गणेशवंदना मनातून कागदावर उतरली. उद्या गणेशचतुर्थी, आणि मिपाचा वर्धापनदिन.
काव्यरस

कृष्णार्पण

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 16/08/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ रंगांचा एकदा झाला मोठा वाद सारे म्हणती मीच श्रेष्ठ हेच निर्विवाद शांतीप्रीय आम्ही हिरवा, निळा, जांभळा, भडक व गर्विष्ट, लाल, नारींगी, पिवळा प्रत्ये्कजण केवळ गाती आपली महती मी श्रेष्ठ म्हणतांना इतरांस नावे ठेवती काहीच करून त्यांचा वाद नाही शमला तेव्हा लोलक धरून पांढरा सरसावला बघा जरा म्हणत लोलका मधून तो गेला अनेक रंगांचा फ़ुलोरा दुसऱ्या बाजूने आला वेड्यांनो तुम्ही सारे माझेच आहात अंश पांढऱ्यानेच बनवले सगळ्या रंगांचे वंश सारे रंग गप्प बसले, पांढरा आनंदे नाचला म्हणे मीच विश्व विजेता निर्विवाद ठरला कृष्ण रंग बघत होता गुपचूप तमाशा म्हणाला सगळ्यांना या माझ्यासवे बसा एकेक करून रंग
काव्यरस

ध्येय!

लेखक राघव यांनी शनिवार, 01/08/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :) आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज, भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे! अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! राघव
काव्यरस

आला पाऊस पाऊस.....

लेखक अनिरुध्द यांनी मंगळवार, 14/07/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
आला पाउस पाऊस आल्या सरींवर सरी त्यात न्हाऊन न्हाऊन सुखावली धरती सारी आला पाउस पाऊस आकाशात ढग काळे एक मल्हाराची धून नभ आज हे आळवे आला पाउस पाऊस त्यात वा-याची ही मस्ती धरणे, नद्या, नाले सारे दुथडी भरुन वाहती आला पाउस पाऊस झाडे झाली ओली चिंब हिरवा शालू पांघरुन पाहतात प्रतिबिंब आला पाउस पाऊस डोंगर हिरवे नटले सजणाला भेटायाला मन प्रियेचे आतुरले आला पाउस पाऊस रस्ते पाण्याचेच झाले धावपळीचे जीवन दोन क्षण थांबलेले आला पाऊस पाऊस मुले काढतात खोड्या कुणी डुंबती पाण्यात कुणी सोडतात होड्या आला पाउस पाऊस ओले चिंब झाले पक्षी तारेवरती विजेच्या दिसे सुंदर ही नक्षी आला पाउस पाऊस माझ्या आवडीचा स
काव्यरस

सखा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 13/07/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
मत्त मी, मदमस्त मी आषाढीचा जलद मी साद घालतो उधाणवारा ...........पाऊस माझा सखा ! धुंद मी, मृदगंध मी वरुणाचा वर्षाव मी वळवाचा तो थेंब साजीरा ...........पाऊस माझा सखा ! मी धरा, दंवाचा थेंब मी घनगंभीर आकाश मी बेधुंद बरसती वर्षा धारा ...........पाऊस माझा सखा ! तृप्त मी, आश्वस्त मी पाऊसवेडा चातक मी मनमोराचा फुले पिसारा ............पाऊस माझा सखा ! विशाल.
काव्यरस