आरक्षण
"आरक्षण - योग्य कि अयोग्य" या विषयावर चर्चेसाठी मला TV वर बोलावण्यात आलं होतं. चर्चेत प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून आरक्षणाविषयी मत मांडत होता. कोणी तात्विक आणि तर्कशुद्ध मत मांडून आरक्षण हे कसे वरवरचे मलम आहे आणि याने प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच कसे जाणार आहेत असे पटवून देऊ पाहत होता तर कोणी ऐतिहासिक दाखले देऊन आरक्षण हि कशी सामाजिक गरज आहे हे दाखवू पाहत होता. काही चाणाक्ष लोक आरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची आहे असा दोन्ही पक्षांना नाराज न करणारा सावध पवित्रा घेत होते. चर्चेला उधाण आले होते पण निष्पन्न काहीच होत नव्हते. तेवढ्यात एकजण म्हणाला "लै तर्क लावू नका.