वलय (कादंबरी) - प्रकरण ६
प्रकरण ५ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41844
----
प्रकरण 6
एके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.