गाण्यांचे शब्द व आमचे मजेशीर शब्द

dadabhau's picture
dadabhau in जनातलं, मनातलं
17 Oct 2017 - 5:18 pm

माझ्या मराठी शाळेच्या दिवसात म्हणजे बच्चनभौ शिखरावर असतांना (जेव्हा दूरदर्शन आमच्या गावात आलेले नव्हते) हिंदी मराठी गाणी फक्त रेडिओ वर च कानावर पडत ( विविधभारती म्हणजे जीव कि प्राण होता आमचा !!) आमच्या गावाच्या पूर्वेस एक ओपन टाकी ( टॉकीज नव्हे...टाकीच) होती , दर मंगळवारी म्हणजे बाजारच्या दिवशी शिनेमा बदलत असे. नवीन आलेल्या पिच्चर चे पोस्टर हातगाडीवर ठेवून ढोल ताशाच्या गजरात गावभर मिरवत असत. आम्ही मुले त्या गाडीमागे गावभर फिरून त्यांच्या जाहिरातीस हातभार लावत असू. देवीची यात्रा १५ दिवस चाले व आमच्या शाळेस सुट्ट्याच असत. दादा कोंडकेंचे सगळे रेकॉर्डब्रेक पिच्चर यात्रेच्या काळात लागत व तुफान गर्दीत १५ -२० दिवस चालत. आम्ही मुले त्यावेळी फेमस झालेली हिंदी-मराठी गाणी आम्हा मुलांना जशी ऐकू येत तशी जोरजोरात ओरडून म्हणत असू ....( त्यातल्या म्युझिक सह ). रेडिओवर गाण्याच्या शब्दांपेक्षा खरखर च जास्त असे त्यामुळे बोल नीट कळत नसत . काही वर्षांपासून रंगोली मध्ये गाण्याचे बोल ही दाखवायला लागले म्हणून बरीच गाणी clear झालीत. तर काही अजून ही नीट कळत नाहीत . मित्रांनो तुम्हीही लहानपणी अशी काही गाणी नक्कीच शब्द नीट न कळता म्हटली असतील ...काही गाणी उदा. म्हणून खाली देत आहे.
१) बाप बन जाये ( हे कायम टॉप ला असते !!).
२) विठ्ठला... पूर्वेला शनिमा ...( गावाच्या पूर्वेस टाकी होती तेव्हा ....) - विठ्ठला ... तू वेडा कुंभार
३) आणू नको ताट माझ्या माईला ( माई जेवायचे नाही म्हणतेय..तिला ताट नका आणू!!!) - आनंद पोटात माईना ....
४) एक फेमस ऍड - म्हाताऱ्या म्हाताऱ्या थोडं च खाय...म्हाताऱ्या म्हाताऱ्या थोडं च खाय ... - ओळखली असेलच !!

अजून ही अशी बरीच गाणी व जाहिराती आम्ही आमच्या समजुतीप्रमाणे म्हणत असू... खरं तर आजकाल इतकी सुस्पष्ट आवाजाची साधने आलीत तरीही त्या बॉम्बे च्या एका गाण्यातील " दाबड़ दाबड़ ...दाबड़ दाबड़ भ्हेब " ह्या शब्दांचा अर्थ अजून नाही समजला !!!

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

18 Oct 2017 - 11:26 am | अत्रन्गि पाउस

च्यायला कित्येक गाणी , त्यातले शब्द मला अशीच ऐकू यायची आणि अजूनही येतात :-D

-अजीपता सता है ये ....नमस्तमस सफिनही
-माय नेम इज शिना शिना कि जबानी अमृतसर से आयी मै तेरे हात न आई
-नभ मेघांनी आक्रमिले हा ब्रम्हे
-छोटा गंधर्व आलापी करतांना 'आ SS जा ...किंवा हां SSS जा' असं म्हणतात असं वाटत
-धुल्न्द एकाल्न्त हा ...

अजून आठवली आणि ऑफिस मधून घरी गेलो कि टाकतो

आरओएफएल :)

अभ्या..'s picture

19 Oct 2017 - 10:52 pm | अभ्या..

त्या गाण्याचा गायक रेमो फर्नांडिझ आहे, त्याला असे गाण्यात निरर्थक फिलर्स भरायची आणि पॉप सिंगर असलेने बेबे, बेब वगैरे शब्द वापरायची सवय आहे. ते रिदम मध्ये असते आणि ऐकायला छान वाटते.

तिमा's picture

19 Oct 2017 - 7:23 am | तिमा

अशी अनेक गाणी आठवून सांगता येतील. पण वानगीदाखल सध्या एकच लिहितो.
उधळून येई वळु, जाहली रोमांचित ही तनु. आणि असे ऐकू आल्यामुळे कडव्यांचा अर्थ भलताच वाटायचा. जसे की,
'दवापरि ते सुख टपटपले, ओठांनी या अलगद टिपले....

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Oct 2017 - 10:39 pm | अमरेंद्र बाहुबली

चांद आया है जमी पे "अजगर" भै की रात मे....