महिलांचा T-20 वर्ल्ड कप २०१८
नमस्कार,
खरे तर हा धागा श्रीगुरुजी काढतील असे वाटले होते, पण ...असो...
आत्ता पर्यंत तरी ४ मॅचेस झाल्या आहेत.
भारताच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे, हरमनप्रीत कौरने काढलेले शतक...फक्त ५१ बॉलमध्ये १०३ धावा..
आस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने आपापल्या मॅचेस जिंकल्या आहेत तर, इंग्लंड आणि श्रीलंका ह्यांच्या मधली मॅच पावसामुळे वाया गेली...
अजून अर्ध्या तासाने, भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच सुरु होईल.
रात्री १:३० वाजता, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड ह्यांच्या मध्ये सामना होईल.
हरमनप्रीत कौर आणि भारतीय टीमला शुभेच्छा....