बातमी!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
6 May 2018 - 10:30 am

मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.
त्याला फालतू वाटणाऱ्या बातमीचा मथळा होता, ‘चाॅकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार’...
त्या दिवशी गप्पा कट्ट्यावर काहीतरी साहित्यिकाच्या एका कादंबरीवर परिचर्चा होती. ती बातमी लागली नव्हती, आणि त्यापुढे ही बातमी त्याला फालतू वाटली होती.
साहित्यक्षेत्रात बऱ्यापैकी नाव असलेल्या त्या माणसाची मला कीव वाटली.
मी म्हणालो, या बातमीमुळे आज हजारो आया सावध झाल्या असतील. ‘कुणी अनोळखी माणसाने काही दिले तरी घ्यायचं नाही’ असंही त्यांनी आपल्या लहानग्यांना सांगितलं असेल... आणि तुम्हाला ही बातमी फालतू वाटते!’...

त्यानंतर ते सदगृहस्थ मला भेटलेले नाहीत! अधूनमधून कुठेतरी त्यांचं नाव असलेली बातमी वाचायला मिळते!

समाजमाध्यमवेधबातमी

प्रतिक्रिया

देशपांडे विनायक's picture

6 May 2018 - 12:13 pm | देशपांडे विनायक

" त्या दिवशी गप्पा कट्ट्यावर काहीतरी साहित्यिकाच्या एका कादंबरीवर परिचर्चा होती. ती बातमी लागली नव्हती, आणि त्यापुढे ही बातमी त्याला फालतू वाटली होती."

ती बातमी फालतू वाटणे असंवेदशीलता दर्शवते
परंतु कादंबरीवरील परिचर्चेची जागा घेणे [ गप्पा कट्टा साहित्यासाठी असेल ] तर गैर आहे
तुम्हाला कीव येणाऱ्या माणसांच्या यादीत भर नाहीना पडली ?

माहितगार's picture

6 May 2018 - 3:55 pm | माहितगार

उपसंपादकाचे निर्णय उपसंपादकाचे तत्वतः मान्य आहे पण बातमी जराशी नंतर / उशिरा लावण्याचा मार्ग शिल्लक असतो. सहसा प्रिऑरिटीवर येणार नाही अशी बातमी, अगदी राष्त्रीय आणि राज्यस्तरावरील प्रियॉरीटी बातम्या बाजूला सारुन कुणीतरी उपसंपादक किंवा पत्रकाराच्या ओळखीत आहे म्हणून पहिल्या पानावर बातम्या येताना पाहिले आहे .

बरेच वृत्तपत्र संपादक सर्व बातम्या देतात पण सरकार बाजूच्या कि विरोधी बातम्या वर ठेवायच्या कि खाली ठेवायच्या ह्यावर खेळतात . आपण त्यातले असणार नाही हे ओघाने आलेच

तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे असाल तर या क्षेत्रासंबंधी अनेक रोचक किस्से आपल्यापाशी असतील. मिपाकरांसाठी कृपया एखादी लेखमाला चालवल्यास आभारी असेन.