बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.
मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत :
१. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार.
२, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान.
३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया.
ब्रिटनचे भावी मंत्रिमंडळ आणि तुर्कांचा / भारतीयांचा बदला
मूळ बातमी
Britain now has the most 'desi' Cabinet in its history
ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापित होणार्या बोरीस जॉन्सन या ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. त्यात महत्त्वाची पदे अशी...
हिमा दास... भारताची 'ट्रॅक अँड अॅथलेटिक्स' सुवर्णकन्या
क्रिकेट म्हटले म्हणजे भारतीय वेडे होतात... आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे तर बेभान होऊन इतर सर्व विसरण्याची वेळ. मात्र, या वेडामुळे भारतात इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडून गेले आहे.
शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल
पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही.
नक्की काय अपेक्षित आहे?
अलिकडॆच मला एक-दोघांनी विचारले की सगळे फिजिकल शेअर डिमॅट करून झाले का? ३१ मार्च नंतर त्या शेअरची किंमत शून्य होईल वगैरे...
अधिक शोध घेता असे समजले की ३१ मार्च नंतर फिजिकल-टु-फिजिकल होणार नाही. दुसर्याच्या नावावर करायचे असल्यास किंवा विकायचे असल्यास ते डिमॅट करणे आवश्यक आहे. पुढील दुव्यातील शब्द रचना हेच सांगते -
https://www.sebi.gov.in/media/press-releases/dec-2018/transfer-of-securi...
पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा
गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे.
खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत.
सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत. हे कार्य जनजागृतीतून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचेल व अधिक लोकसहभागातून कार्यास हातभार लागेल, हाच उद्देश आहे.
दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो. या उलट जगात बहुसंख्या लोक – दुग्ध शर्करा (लॅक्टोज) न पचविता येणारे सोडून – कुठलाही दृश्य त्रास न होता दररोज दुधाचे सेवन करीत आहेत.
सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.
नोकरीच्या संधींसंबंधी बातमी...
महत्वाची सूचना :
ही माहिती मला एका व्हॉट्सॅप संदेशाद्वारे मिळालेली आहे. त्यात दिलेल्या दुव्यातील https://www.majhinaukri.co.in या संस्थळाशी माझा काहीही संबंध नाही. परंतू, ते जालदृष्ट्या सुरक्षित (https://) संस्थळ दिसते आहे. त्याच्यावर अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधींची सूची आहे व ती सूची सतत अद्ययावत केली जाते, असे दिसते. नोकरीच्या नवीन संधींच्या प्राथमिक माहितीसाठी त्याचा जरूर उपयोग होईल.