एलावेनिल व्हॅलॅरियन : भारताची नेमबाज सुवर्णकन्या

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
31 Aug 2019 - 11:34 amElavenil Valarivan joins elite list with maiden senior Shooting World Cup gold in Rioएलावेनिल व्हॅलॅरियन या भारताच्या नेमबाज कन्येने रिओ दि जनेरिओ (अर्जेंटिना) येथे नेमबाजीच्या जागतिक चषक स्पर्धेत (ISSF World Cup), २८ ऑगस्टला, १०मिटर एअर रायफल खुल्या गटात, सुवर्णपदक पटकावले.

राष्ट्रिय खेळ दिवसाला (#NationalSportsDay) हे पदक जिंकून तिने त्या दिवसाचा आनंद व्दिगुणित केला.

या अगोदर एलावेनिलने जागतिक स्तरावरच्या नेमबाजीच्या कनिष्ठ (junior) गटांत अनेक पदके मिळवलेली आहेत. खुल्या गटातील तिचे हे सुवर्णपदार्पण सर्व भारतियांना आनंदाचे आणि अभिमानाचेच वाटेल !तीन जिगरबाज कन्यांनी गेल्या आठवड्यात भारतावर "हॅट ट्रिक सुवर्णवर्षाव" केला आहे !

१. मानसी नयना जोशी : बासल् (स्विटझरलंड) येथिल बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत, दिव्यांग स्त्री गटात, सुवर्णपदक : २४ ऑगस्ट २०१९.

२. पि व्ही सिंधू : बासल् (स्विटझरलंड) येथिल बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत, खुल्या स्त्री गटात, सुवर्णपदक : २५ ऑगस्ट २०१९.

३. एलावेनिल व्हॅलॅरियन : रिओ दि जनेरिओ (अर्जेंटिना) येथिल १०मिटर एअर रायफल नेमबाजी, खुल्या गटात, सुवर्णपदक : २८ ऑगस्ट २०१९.


या सर्व जिगरबाज भारतकन्यांचे जगज्जेत्या कामगिरीसाठी मनःपूर्वक अभिनंदन !मानसी जोशी

(सर्व चित्रे जालावरून साभार)


क्रीडाअभिनंदनबातमी

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Aug 2019 - 11:53 am | ज्ञानोबाचे पैजार

भारताच्या या तिनही गुणवान सुवर्णकन्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पैजारबुवा,

यशोधरा's picture

31 Aug 2019 - 12:03 pm | यशोधरा

वा! छानच! अभिनंदन!

सुधीर कांदळकर's picture

31 Aug 2019 - 12:12 pm | सुधीर कांदळकर

तिन्ही चॅम्पिअन्सचे अभिनंदन आणि बातमीबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क's picture

31 Aug 2019 - 12:21 pm | जॉनविक्क

त्याच्या यशाचा आलेख असाच कायम राहो, आणी या पुन्हा पुन्हा भारताला यश मिळवत राहोत.

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 12:33 pm | कुमार१

छानच, अभिनंदन!

उपेक्षित's picture

31 Aug 2019 - 8:36 pm | उपेक्षित

आजच पेपर मध्ये पाहिले भारत गुणतालिकेत अव्वल आहे नेमबाजांच्या.
अभिनंदन ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2019 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये अजून भर पडली आहे...

Shooting World Cup: Yashaswini Deswal wins 10m Air Pistol gold, secures Olympic quota

रिओ द जनरिओमध्ये चालू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ओलेन कोस्तेविचला मागे टाकत, भारताच्या यशस्विनी देसवालने "१० मिटर एअर पिस्तल (स्त्रीया)" मध्ये सुवर्णपदक पटकावले.

यशस्विनी या गटातील कनिष्ठ (ज्युनिअर) स्तरावरची भूतपूर्व जगज्जेती आहे. या विजयाने यशस्विनिने येत्या "२०२० टोक्यो ऑलिंपिक्स"मधले स्थान पक्के केले आहे.


या स्पर्धेत भारतिय नेमबाजांनी अजून दोन पदके पटकावली आहेत...

१. अभिषेक वर्मा : १० मीटर एअर पिस्तल : सुवर्णपदक.

२. सौरभ चौधरी : १० मीटर एअर पिस्तल : कास्यपदक.