आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने एकुश्येचे मनोगत
एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.
एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.
मित्रांनो,
मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे.
नमस्कार; माझ्या अलिकडील मिपा वास्तव्यात मिपाकर अमेय यांच्याकडून मराठी विकिपीडियाकरीता विकिमिडिया कॉमन्सवर मराठी गायक अजित कडकडे यांच प्राप्त झालेल छायाचित्र अशात लावल आहे.
प्रिय मिपाकरांनो,
कसे आहात?
गेले ७/८ दिवस सीकेपी हॉल्,ठाणे इथे सीकेपी खाद्य पदार्थांची जत्रा आहे, असे तुम्हाला समजावे आणि आम्ही काही मिपाकर मंडळी पण तिथे जाणार आहोत, अशा अर्थाचा एक धागा मी काढला होता.
तशी लहानपणा पासून मला ह्या ना त्या निमीत्ताने, ह्या पदार्थांची चव घ्यायला मिळत असे.मित्र तर सीकेपी होतेच पण आमचे शेजारी पण सीकेपी होते.आम्ही करतो ती करंजी आणि सीकेपी लोक करतात ते कानोले.हा फरक फार पुर्वीच लक्षांत आला होता.
मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं?
राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे.
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे.
संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे.
सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा
"you attitude" "यू अॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
भारतातील जनतेने पाश्चात्य संस्कृतीतल्या नेमक्या चुकीच्या गोष्टीच उचलल्यात, आत्मसात केल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.