येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने मराठी गायक "अजित कडकडे" यांच्या बद्दल सामुहीक लेखन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Feb 2014 - 11:53 am
गाभा: 

नमस्कार; माझ्या अलिकडील मिपा वास्तव्यात मिपाकर अमेय यांच्याकडून मराठी विकिपीडियाकरीता विकिमिडिया कॉमन्सवर मराठी गायक अजित कडकडे यांच प्राप्त झालेल छायाचित्र अशात लावल आहे.

छायाचित्र लावताना मराठी आणि इंग्रजी दोन्ही विकिपीडियावर अजित कडकडेंबद्दल फारतर एक परिच्छेदभर माहिती आहे अस लक्षात आलं. मराठी विकिपीडियावर ३८०० बाईट्सच्या आसपास मजकुर आहे. तर इंग्रजी विकिपीडियावर १२०० बाईट्स मजकूर आहे. विकिपीडियावर किमान वाचनीय माहितीचा आकार चार परिच्छेद किंवा ७००० बाईट्सतरी असावयास हवा.

मराठी भाषा दिन जवळ येतोच आहे आणि एका मिपाकरांनी अजित कडकडेंचे चित्र टाकून छोटी सुरवात केलीच आहे; मग जमले तर येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने सगळ्यांनी मिळून अजून दोन एक परिच्छेद मजकूर जरी जमाकरून सामुहीक पद्धतीने लिहून पाहिला तर एका मराठी गायका बद्दल मराठी आणि इंग्रजी ज्ञानकोशातील माहितीस परिपुर्णता येईल.

मराठी विकिपीडियावरील अजित कडकडे लेखातील सध्याचा मजकुर

अजित कडकडे (जन्मदिनांक ११ जानेवारी - हयात) हे मराठी हिंदुस्तानी गायक, पार्श्वगायक आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.

अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या.

इंग्रजी विकिपीडियावरील Ajit Kadkade लेखातील सध्याचा मजकुर :

Ajit Kadkade is a reputed Hindu devotional singer in Maharashtra, India. He learnt Hindustani classical music from the famous singer Jitendra Abhisheki. Ajit specializes in singing Marathi devotional songs (Bhajans), Abhangs, Natya Sangeet, Hindustani classical music etc.

He is known for his unique and melodious style of singing.

तुम्हाला मिळालेली माहिती तुम्ही तुमच्या शब्दात विकिपीडियावर अथवा येथे देऊ शकता. शक्यतो स्वतःच्या शब्दात लिहा (कॉपीपेस्ट टाळा) जिथे उपलब्ध असेल तिथे संदर्भ नमूद करा. किंवा आपल्याला इतर भाषा येत असतीलतर सध्याच्या माहितीचा हिंदी आणि इतर भारतीय अथवा जगातील कोणत्याही भाषेत अनुवाद करून द्या. या निमीत्ताने एका मराठी माणसाचा आणि संस्कृतीचा परिचय परकीयांना करवला जाऊन मराठीच एक पाऊल पुढे पडण्यात साहाय्य होऊ शकेल.

किंवा मराठी विकिपीडियातील गीत संगित प्रकल्पाद्वारे इतरही संगीत विषयक योगदान करण्याचे स्वागतच असेल.

Ajit Kadkade

२७ तारखे पासून मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारी चर्चा व्हावी तसा धागा काढावा असा मानस आहे. तत्पुर्वी येत्या मराठी भाषादिनाच्या निमीत्ताने हा सामुहीक लेखनाचा बेत जुळून आल्यास दुधात साखरेचा गोडवा लाभेल.

नित्या प्रमाणेच विकिपीडियावर वापरण्यासाठी या धाग्यावरील आपले स्वतःचे प्रतिसाद लेखन प्रताधिकार मुक्त म्हणजेच कॉपीराईट फ्री समजले जाईल. अमेय यांचे धन्यवाद आणि प्रतिसादांकरीता आपणा सर्वांना धन्यवाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Feb 2014 - 9:33 pm | पैसा

अजित कडकडे हे गोव्यातल्या मूळगाव, डिचोली इथले. आणि जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकले आहेत एवढे माहित आहे.

तुम्ही दिलेल्या माहितीमुळे मी अजित कडकडे डिचोली असा गूगल शोध घेतला आणि दिव्यमराठी वर त्यांची छोटी मुलाखत सापडली. (स्वभावाने प्रांजळ असावेत काही आडपडदा न ठेवता मुलाखत दिलेली दिसते. हे मुलाखत वाचून झालेले माझे व्यक्तीगत मत)

अवांतरः
मराठी माध्यमातील लेखक पत्रकार इत्यादी नोंदी घेण्याचे काम करत नाहीत का संक्षीप्तीकरणात गाळतात माहित नाही पण एकुण इन्फर्मेशन गॅप निर्माण होते. म्हणजे अजित कडकडेंची जन्म तारीख कुणीतरी दिली आहे पण जन्मवर्षच उपलब्ध नाही. असे अजित कडकडे म्हणून नाही सर्वच मराठी माहिती स्रोतांबद्दल होत असते.

अशा चर्चांच्या माध्यमातून थोडी थोडी माहिती संकलीत होत गेली तर या इन्फर्मेशन गॅप्स भरल्या जाण्यात मदत होईल. त्यामुळे आपण दिलेल्या माहिती बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

आत्मशून्य's picture

23 Feb 2014 - 10:17 am | आत्मशून्य

तर तुम्ही त्यांचाशीच का संपर्क करत नाही ? हिकडे तिकडे हातपाय मारण्यापेक्षा ते जास्त सुरेख असेल. तसही तुम्ही विकिपेडिआ पेज सुरु करणार आहात आत्मचरित्र लिखाण न्हवे... थोडक्यात मुलाखत उर्कुनही जाइल.

काळजी करू नका प्रांजळ असावेत हे वाक्य विकिपीडियासाठी नक्कीच नाही मुलाखत वाचून झालेल मत कंसात टाकल आहे. तस मत होण्याच कारण मुलाखतीतील एकदा तानपुरा महाविद्यालयाची माझी परीक्षा चुकवून मी क्रिकेट पाहायला गेलो. ; भक्तिगीत मला कधीच आवडत नव्हते.; लोक मला ‘भक्तिगीता’ची फर्माइश करायचे. तेव्हा मी फारच जड अंत:करणाने गायचो. ; करिअरच्या सुरुवातीच्या काळात फारसे कार्यक्रम मिळत नसत. संगीत नाटकांतून मी भूमिका केल्या. मात्र, तिथे माझे मन रमले नाही.; हिंदीमध्ये मी ‘साई की चिठ्ठी आई है’, ‘साई मंगल’ आणि ‘कबीर के दोहें’ असे तीन अल्बम केले. मात्र, त्यात मला गोडवा वाटला नाही.

संदर्भ: दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरू जितेंद्र अभिषेकीबुवांनी शिकवले गायन! - गायक अजित कडकडे दिव्य मराठी नेटवर्क | May 20, 2013, 08:25AM IST http://divyamarathi.bhaskar.com/ संकेतस्थळ भाप्रवे २३/२/२०१४ रोजी सकाळी १०.४५ वाजता जसे दिसले

म्हणजे ज्या गोष्टींकरता ही व्यक्ती परिचीत आहे. ज्या गोष्टींवर तुमचा उदर निर्वाह अवलंबून असतो; त्याबद्दल कोणताही आडपडदा न ठेवता बोलणे तशी सोपी गोष्ट नसावी अस माझ व्यक्तीगत मत झाल्याने मी म्हणालो. कदाचित चुक असेन तर माहीत नाही. आणि या व्यक्तीगत मताचा विकिपीडियाशी संबंधही नाही.

आत्मशून्य's picture

23 Feb 2014 - 10:55 am | आत्मशून्य

अहो प्रांजळपणाचा संदर्भ मी तुम्ही त्यांची प्रत्यक्ष भेटुन मुलाखत घेउ शकता यासाठी प्रोत्साहित करायला दिला आहे. माझा त्यावर कोणताही आक्षेप वा समर्थन नाही. जर का ति व्यक्ती खरच इतकी चांगली आहे तर आपणास नक्किच मुलाखत देइल. हे काम खरे तर आज फोन आणि इमेलद्वारे सुधा होउ शकतकतेजमत असेल तर जस फॉलो दॅट अप टु रॉक...! मे द गॉड ओफ सक्क्सेस ब्लेस यु.

आत्मशून्य's picture

23 Feb 2014 - 10:55 am | आत्मशून्य

अहो प्रांजळपणाचा संदर्भ मी तुम्ही त्यांची प्रत्यक्ष भेटुन मुलाखत घेउ शकता यासाठी प्रोत्साहित करायला दिला आहे. माझा त्यावर कोणताही आक्षेप वा समर्थन नाही. जर का ति व्यक्ती खरच इतकी चांगली आहे तर आपणास नक्किच मुलाखत देइल. हे काम खरे तर आज फोन आणि इमेलद्वारे सुधा होउ शकते, जमत असेल तर जस फॉलो दॅट अप टु रॉक ट्रुली...! मे द गॉड ओफ सक्क्सेस ब्लेस यु.

आत्मशून्य's picture

23 Feb 2014 - 11:45 am | आत्मशून्य

दोष तुमचा नाही. प्रांजळपणे लिहला असला तरी बरेचदा "अरे वा " शब्द बोल्ड फेसिंगमधे (आपण फार वेळा वाचत नाही. त्यामुळे तसा तो) वाचताना पहिला विचार हेटाळणी वगैरे आहे की काय अस गैरसमज वाचकामधे निर्माण करु शकतो. नेमके तेच घडले आहे. झाल्या गोंधळाबद्दल क्षमा.

सॉरी मी त्यांना प्रांजळ म्हणाल्याने तुम्ही रुष्ट का झालात किंवा उपरोधाने लिहिताय असा गैरसमज झाला त्या बद्दल पुर्ण क्षमस्व.

विकिपीडियावरील शास्त्रीय संगीताच्या लेखाबद्दल संदर्भ मागताना अजित कडकडे किंवा अजून कुणा गायक संगितकार किंवा रसिकाशीही (रसिकच हं !) संपर्क करण्यास हरकत असणार नाही पण अजित कडकडे असोत किंवा अजून कुणी विकिपीडियावरील लेखन त्रयस्थ संदर्भ घेऊन केले जाते त्यामुळे माहिती नसेल तर ती इतर माध्यम क्षेत्रात सहसा यावयास हवी त्यास दुजोरा मिळावयास हवा मग नंतर ज्ञानकोशात नंबर लागतो.

एक किस्सा :
अगदी पत्रकार मुलाखत घेत असेल डायरेक्ट मिळालेली माहितीसुद्धा त्या पत्रकाराने सुद्धा त्रयस्थपणे खात्री करून घ्यावयास हवी असते. माझ्या समोर झालेला अमोल पालेकरांचा किस्सा सांगतो. पत्रकार आजकाल माहितीची खातरजमा न करता बातम्या छापतात म्हणून वैतागले होते त्यावेळी एका पत्रकाराचा फोन आला त्यांना बहुधा वृत्तपत्राती माहितीची खातरजमा केली जात नसल्याचा मुद्दा उचलून धरावयाचा असावा म्हणून त्यांनी त्या राष्ट्रीय अग्रगण्य दैनिकाच्या पत्रकाराला चक्क चुकिची माहितीच पुरवली त्याने ती तशीच छापली.(अमोल पालेकर मध्यंतरात हे विसरूनही गेले). योगायोग माहिती दैनिकाचा संदर्भ देऊन विकिपीडियात (इंग्रजी) आली. अमोल पालेकरांना समारंभात त्यांची ओळख करून देताना त्यांच्याच बद्दल त्यांच्या समोर चक्क चुकीची माहिती सांगितली जाऊ लागली त्यांनी चौकशी केली माहिती कुठून येते तर त्यांना विकिपीडिया नावाच्या वेबसाईटचा परिचय करवला गेला. त्यांनी नाट्यसंमेलनात व्यासपिठावरून विकिपीडियाचे टिका न करता नाव घेतले. आपल्याला समर्थक मिळाले समजून एका समारंभाचे उद्घाटन करावे म्हणून मराठी विकिपीडियाकर पालेकरांकडे पोहोचले त्यांनी विकिपीडियाकरांची झडती तर घेतलीच पण पत्रकार भवनातले आमंत्रणही स्विकारले कारण श्रोते मुख्यत्वे पत्रकारच आणि पत्रकारीतेचे विद्यार्थी होते. पालेकरांनी विकिपीडियावरील चुकीच्या माहितीचा विषय काढला तर मी त्याचा संदर्भ राष्ट्रीय अग्रगण्य दैनिकातून येत असल्याचे मांडले आणि मग त्यांना ती माहिती एका बातमीदाराला दिल्याचे त्यांना आठवले आणि समोर श्रोतृवर्ग आयता पत्रकारीतेचे विद्यार्थी त्यांचे गुरूजन आणि पत्रकार मिळाला मग त्यांनी माहितीची खात्री करण्याची काळजी घेण्या बद्दल एकजात सर्व मंडळींना त्यांच्या भाषणातून फैलावर घेतले.

सांगण्याचा मुद्दा हा की अजित कडकडेंनी माहिती स्वतः दिलीतरीही त्यांनी मला अभिषेकींनी शिकवले एवढे म्हणून पुरेसे नसते त्याच खातरजमा पत्रकाराने इतरत्र करावयास हवी. मगती बातमी पेपरात/पुस्तकात यावयास हवी त्यात तुमच्या सारख्या चार डोळस लोकांनी चुका काढणे समीक्षण करणे हे झाल्या नंतर ती ज्ञानकोशात जावयास हवी त्या मुळे उचलला फोन आणि लिहीली विकिपीडियावर माहिती असे करता येत नाही. त्यामुळे ही सर्व आवश्यक उठाठेव आहे. शक्यतो इतरत्र आधी लिहून यावे लागते. अर्थात भारतीय संगित क्षेत्रातील प्रसिद्धी पराङमुख व्यक्तींच्या माहितीबद्दल लवचिकता दाखवावी असा प्रयास असतो.

शिवाय मिपावर धागे काढण्याचा उद्देश विकिपीडियावरील लेखन पद्धतीचा या निमीत्ताने परिचय करून देणे होते असाही आहे.
लेखनchakra

आपल्या प्रतिसादांकरता धन्यवाद

तर सोर्स पकडणे सर्वात उत्तम. त्याचे व्हेरिफिकेशन रिफाइन करणे वगैरे बाबी नंतर आपोआपच ही माहिती सर्वांना उपलब्ध झाल्याने होत राहिलच. पण मुख्य म्हणजे सुरुवातिचा अधिकृत विदा आपणास मिळेल. आपण योग्य उद्देश व प्रक्रिया अनुसरत आहात यात शंका नाही. फक्त मला माहितीची वनवा असणे हे प्रमुख आव्हान वाटले म्हणून आपल्या इतर मार्गांमधे हा ही (वर मुलाखतिचा उल्लेख केलेला मार्ग) सामाविष्ट करवा ही विनंती करायला हा प्रतिसाद प्रपंच.

माहितगार's picture

23 Feb 2014 - 12:01 pm | माहितगार

माहितीची वानवा हा खरेच मराठी ज्ञानक्षेत्रा करता मोठा प्रश्न आहे. त्या करता वर म्हटल्या प्रमाणे प्रसिद्धी पराड्मुख व्यक्तींच्या माहितीच्या बाबतीत लवचिकता दाखवण्याची तयारी असते. विकिपीडियाकरता एडीट विथ एक्सपर्ट तज्ञां सोबत लेखन अशा स्वरूपाचे काही कार्यक्रम करावेत असा मानस आहे. पण यात पार्टीसिपेट होणारा ट्रेंड विकिपीडियन वर्गही तयार करावयाचे आवाहनही आहे. सध्या मराठी विकिपीडियाची स्थिती इतर मराठी वेबसाईट्स सारखीच थोडेसे कायम स्वरूपी बाकी लिहिणार्‍यांची एक फळी येते जाते मग दुसरी फळी येते असे चालु असते. मग जुन्या कायम स्वरूपी लोकांचा वेळ ट्रेनिंग देण्यातच संपून जातो त्यामुळे अ‍ॅडीशनल गोष्टी करणे सध्या फारसे होत नाहीए.

माहितगार's picture

23 Feb 2014 - 12:04 pm | माहितगार

सध्या जसा मिपा वर पडिक आहे तसे आम्ही आधून मधून आंतरजालावर मराठी मंडळी दिसली विकिपीडियाकरता कोण संपादक लेखक गळाला लागतोय का हे पहात जाळी पसरून मासा गळाला लागण्याची वाट पहात बसतो. :)

आत्मशून्य's picture

22 Feb 2014 - 11:38 pm | आत्मशून्य

त्यांनी गायलेले अभंग मंत्र मुग्ध करून सोडतात.

तिमा's picture

23 Feb 2014 - 11:33 am | तिमा

आम्हाला तरी त्यांचे गाणे कधीच आवडले नाही. त्यांच्या तानांतून आम्हाला कायम कडकडच ऐकू आली. तरी त्यांच्याविषयी काही लिहिण्यास असमर्थ आहोत.

माहितगार's picture

23 Feb 2014 - 11:47 am | माहितगार

तिमा तरीही धन्यवाद. आपण अजित कडकडेंचे गायन अल्पांशाने का होईना ऐकुन प्रतिक्रीया देत आहात. (माझ्या बाबतीत मी त्यांचे गाणे ऐकलेलेच नाही हे अजित कडकडेंच्याच प्रांजळपणाने कबुल करतो फक्त काही मिपाकरांना रस असण्याची शक्यता वाटल्याने मराठी माणसाची दखल घेतली जावी म्हणून धागा काढून प्रयत्न करावे म्हटले)

तिमा ज्ञानकोशात माहिती लिहिताना सर्व अधिक उण्याची दखल घेतच समतोल लेखन करावे लागते काही उणे असेल तर त्याबद्दलही संदर्भ असतील तर बरेच पडते संदर्भ असल्या शिवाय विकिपीडियावर लिहिता येत नसले तरी त्याबद्दलही चर्चा होईल तेव्हा आपल्या प्रतिसादाचे महत्व आहेच आणि म्हणून प्रतिसादा करीता धन्यवाद